डिप्रिसिएशन व्हॅल्यू !

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 February, 2019 - 10:55

डिप्रिसिएशन व्हॅल्यू !

स्वकर्तृत्वाने बांधलेल्या
दुमजली प्रशस्त बंगल्यात
आप्त-स्वकीयांच्या साक्षीनं
कोरी करकरीत पैठणी नेसून
गोठ, पाटल्या, बांगड्या,
नथ, राणीहार, बाजूबंद मिरवत
हौसेन गृहप्रवेश करताना..

तिला यत्किंचितही कल्पना नव्हती
की
अजुन काही वर्षांनी
विशेष निगराणी अभावी
बंगल्याची आणि तिची
दोघांचीही
किंमत ठरणार आहे मातीमोल !

निदान
डिप्रिसिएशन व्हॅल्यू वगळता
प्लॉटला मिळणारी किंमत
तिला मिळणाऱ्या
कवडीमोल किमतीपेक्षा
कित्येकपटीने असेल उजवी !

किंवा

अगदी त्याच प्लॉटवर
जुना पाडून नवीन बांधता येईलही बंगला
पण खचलेले मन ???
ना बदलता येईल
ना धरेल तग

म्हणून म्हणतेय
वेळीच सावर
आपुलकीच छत कोसळण्यापूर्वी !!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणूनच असे बंगले स्वतःच्या पैशाने बांधावेत आणि मग टीशर्ट जीन्स घालून त्यात प्रवेश करावा व मनसोक्त बागडावे.
ती वज्रचुडेमंडित पैठ णी वाली जागा युसलेस असते. निव्वळ डेकोरेटिव्ह.

आवडली कविता.
नात्याचं डिप्रिसीएशन .... ग्रेट कंसेप्ट
पण हे दोन्ही जेंडरना लागू होईल नं !

होय अगदीच दोघांनाही लागू होईल पण एकंदरीत आलेले अनुभव पाहता स्त्रीची घराशी जास्त बांधिलकी असते म्हणून तिच्यावर बेतली गेली.

धन्यवाद्

छान.

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत

आहो आमा प्रश्न पहेरावाचा नाहीय इथे...>> ते मलाही माहीतच आहे. वज्रचुडेमंडित पैठणी वाली पत्नी जिच्या नावावर ती जागा संसारात रिस्पेक्ट नसेल तर काय उपयोग त्या मोठ्या बंगल्याचा. अजुनही स्त्रियांना भावनिक आधार जास्त महत्वा चे वाटतात पण हे व्यवहारिक जगात टिकत नाहीत. शी र्षकानुसार लिहिले आहे. छान कविता नेहमी प्रमाणेच.