ऑम्लेट

Submitted by Barcelona on 16 November, 2014 - 10:15

"लाईफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा " हा यक्ष प्रश्न आमच्या फ्रिज मधल्या नऊ अंड्यांना नेहमी पडतो. होत काय की चिपर बाय दि डझन म्हणून मी १२ अंडी घेऊन येते पण माझ्या बेकिंग मध्ये २-३ च वापरली जातात. मग ह्यांना लाईफ मिळणारच असेल तर ह्यातून अँथनी गोन्साल्वीस येऊ दे म्हणून मनातील परवीन रोज फ्रीज समोर गिरकी घेऊन जाते. एक्सपायरी डेट जवळ येते तरी अँथनी कौन है अशीच परिस्थिती राहते. शेवटी विकांताला ब्रंच साठी ऑम्लेट करावे असे ठरते . मी ऑम्लेट करणार हे वाक्य टॉम क्रूझ अॅक्टींग करणार इतकच खर आहे. हॉस्पिटलच्या मेणकापडा सारखं चिवट आणि लाल ऑम्लेट घडू शकत आणि … तव्यावर विशाल आंध्र सारख्या दिसणाऱ्या ऑम्लेटमधून प्लेट मध्ये तेलंगण बाहेर पडू शकत. थोडक्यात एरवी बऱ्यापैकी सैपाक करणारी मी ऑम्लेटपुढे सपशेल शरणागती पत्करते. तेव्हा काही टीप्स ऑर ट्रीक्स द्या. सोबत टोस्ट आणि साईड साठी पण काही सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, नाही मोडत. मी नॉन्स्टिक पॅनवर करते. फोडलेलं अंडं भाज्यांखाली जाऊन शिजतं. त्यामुळे भाज्यापण ऑम्लेटला चिकटतात. तवा बशीत कलता करून कालथ्याशिवाय ऑम्लेट काढता येतं. घरटं तव्यावरून घसरून थेट बशीत... Happy

अर्र! मला टेंपररी अंधत्व आलेलं दिस्तंय. अजूनही दिसेना कृती. Sad तुझ्या वरच्या पोस्टीवरून थोडा थोडा अंदाज आला मात्र.

र्म्द, अगं हीच रेसिपी :

>> फक्त कांदा, हिरवी मिर्ची, सिमला मिर्ची, मश्रूम्स आणि कोथिंबीर आहे. या सगळ्या भाज्या खमंग परतून घेऊन त्यात तिखट, मीठ किंवा इटालियन स्पाइस ब्लेंड घालून त्याचं खळगं करून त्यात अंड फोडून घालायचं. त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवायचं. बलक नको असेल तर तो ऑम्लेट सेट झाल्यावर काढून टाकता येतो. नुस्त्या एगव्हाइटचंही करता येईल.

आमच्याकडे ऑम्लेट बनवायचं घाऊक काँट्रॅक्ट नवर्ञाकडे आहे. मला ऑम्लेट न तोडता उलथायला होत नाही. त्याची टीप अंडी चांगली फेटून तव्यावर घातली की मध्यावर थोडं चमच्याने हलवून सारखं करायचं म्हण्जे तिथला भाग शिजतो आणि उलथताना सेंटर डळमळत नाही पण मला बहुतेक ते फॉलो करायला पण जमत नसावं. जमेल तेव्हा मी ते आउटसोर्स करते.ंघरात असेल तर त्यात पालक आणि मश्रुम हे काँबो घालून भाज्या खाल्ल्याचं पुण्य पदरात पाडायचा माझा प्रयत्न असतो.

आईने मुलांना तुपात अंडं बनवून देत जा म्हणून सांगितलं आहे. ते अर्थात जास्तच टेस्टी लागतं. ही वरची घरट्याची आयड्या नवर्ञाला दिली पाहिजे त्याला तो तसला कच्चा पिवळा बलक आवडतो.

अमेरीकेतली अंड्याची चव न आवडणार्^यांना शक्य असेल तर फार्म वरची अंडी मिळाली तर बघा. एकदम आपली भारतातली गावठी अंडी असतात ती आणि तशीच चव. ब्राउन असतात आणि त्यात ओमेगा ३ जास्त असतं असं ज्या कलिगकडून घेतली त्याचं म्हणणं आहे. (अवांतर - किंमत पण जरा जास्तच ;))

आमच्या होस्टेलवर आम्लेट पोहे मिळायचे

म्हणजे आम्लेट अर्धवट करून त्यात एक प्लेट कांदापोहे ( तयार कांदापोहे) घालून सगळे मिसळायचे,
म्हणजे आम्लेटचे तुकडे कांदापोह्यात असे

नेहमीचच ऑम्लेट, म्हणजे मिरची, कोथिंबीर, कांदा, मीठ, एक चमचा दूध या व्यतिरिक्त मी एक पिंच गरम मसाला आणि ग्रेटेड चीझ घालते. ज्या दिवशी अतीच चीझ खायची लहर असेल तेव्हा चीझ क्युबचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घालते, मग ते melt झालं की ऑम्लेट इतकं भारी लागतं.

समस्त पुरुष जातीला बनवता येणारा ऐकमेव पदार्थ आहे आम्लेट .
जसं २ मिनिटात मॅगी तसे ३ मिनिटात आम्लेट पाव आणले की प्रश्न मिटला

Pages