व्हॅलेंटाईन बॅलेंटाईन

Submitted by बेफ़िकीर on 14 February, 2019 - 09:33

व्हॅलेंटाईन बॅलेंटाईन (८ फेब्रुवारी, २०१९)
=====

महागडी ही फुले, खिश्याला चाट, कशाला नाद करा?
इकराराची, इजहाराची अपनी तो औकात नही
जिला फूल द्यावे ती म्हणते आरश्यात बघ तोंड जरा
व्हॅलेंटाइन बॅलेंटाइन अपने बस की बात नही

दिले फेकुनी गुलाब ताजे वैतागुन रस्त्यावरती
ताजी भाजी विकणारी आजी तेथे बसली होती
तिला वाटले तिच्याचसाठी गुलाब होते ते सारे
झक्क लाजली ती अन् फिरले माझे सारे ग्रहतारे

धूम ठोकली तिथून मी तर पब्लिकला आला संशय
छेड काढुनी कुणी रोमिओ पळतो आहे, त्यास धरा
धीमी केली चाल जराशी, साळसूद मी, मनात भय
घरी पोचलो आणि जाहला सुरू मनाला त्रास खरा

ऑफिसमधुनी आलेल्या पत्नीच्या हाती किती फुले
मला पाहुनी वर म्हणते ती हात मोकळे तुझे कसे?
तिला म्हणालो तुला फुले देणारा कोण बरे चावट?
मला म्हणाली गप्प रहा तू, कोल्ह्याला द्राक्षे आंबट

शिवसेनेतच प्रवेश घ्यावा, मोर्चाबिर्चा काढावा
ना है अपने दिन रोमँटिक, रंगीं अपनी रात नही
नाकासमोर चालावे अन् मार्ग गुलाबी टाळावा
व्हॅलेंटाइन बॅलेंटाइन अपने बस की बात नही

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

गझलेशी एकनिष्ठ रहा , अन राजकारणाशीही