सांग ना आई ऽऽ.....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 January, 2014 - 22:22

सांग ना आई ऽऽ.....

खर्रे खर्रे सांग मला
गप्प बैस म्हणू नको
नसेल सांगायचं ना तुला
पापी माझी मागू नको

ढग दिसतो आकाशात
पुढे पुढे जातो कसा
दाणकन् येऊन खाली
पडत नाही बॉल जसा ?

कोण उठवतो सूर्याला
सांगतो जा सरळ असा
जाताना पुढे पुढे तो
मागे वळत नाही कसा ?

चांदोबा हा असा कसा
एकटाच फिरतो रात्रीचा
झोपवत नाही आई याची
घेऊन एक गालगुच्चा

सगळं सांगीन बाई तुला
ऐकशील का माझं जरा
गर्रम गर्रम दूध पिऊन
थोडी लोळालोळी करा

सांगू का छान्शी गोष्ट
परीराणी का जादूची ?
गाणं नव्वीन म्हणशील का गं
कित्ती सोना गुणाची !!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय् !
पण तुमच्याच आवाजात गावून डर्ाँँपबाँक्स चा दुवा दिला असतात तर आणखीनच बहार आली असती.
गाण्याची मजा स्वरान्नी वाढते.
उदा. "सांन्ग सांन्ग भोलानाथ"
शुभेच्छा !

फारच सुंदर कविता आहे शशांक.. अगदी बरोब्बर प्रश्न पडलेत, निरागसता, फुरंगटणं, समजूत सगळं जिथल्या तिथे नेमकं आलंय Happy
सोप्पी, सुलभ आणि गोग्गोड!! पण अशी कविता करणं मात्र महाकठिण असेल..

मस्त.