चलायचं? भाग ४ (अंतिम?)

Submitted by अज्ञातवासी on 17 January, 2019 - 22:13

मायबोलीवर ही पहिली कथा पूर्ण करतोय! अजून बऱ्याच पेंडिंग आहेत. सो, आनंद आहे, एकतरी पूर्ण झाल्याचा!

चलायचं? भाग १
https://www.maayboli.com/node/68487
चलायचं? भाग २
https://www.maayboli.com/node/68503
चलायचं? भाग ३
https://www.maayboli.com/node/68535

११.
"पक्या माझ्यासोबत राहा कि, जीव घाबरा हुतुय माझा."
पक्याने मागे वळून न बघता आवाजाच्या दिशेने कुऱ्हाड फेकली.
वर्मी घाव बसून मत्स्यकन्या जागीच गतप्राण झाली.
अक्षय मोहरांचा हंडा घेऊन पक्या आणि मालती निघाले, आता त्यांचं आयुष्य बदलणार होतं!
आणि त्यातल्या काही मोहरा आपसूक प्रकाशाच्या खिशात येउन पडल्या.

१२.
आणि प्रकाशने आवाजाच्या दिशेने नागकन्येच्या डोक्याचा वेध घेतला!
"हुर्रे!!!!!!"
माला आणि प्रकाशने, सुखाने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.
अक्षय पात्रातून हवं ते भोजन खाऊन ते तृप्त झाले.
मात्र त्यांच्या नकळत एक दुधाने भरलेली कुपी पिकेच्या बॅगमध्ये गेली.

१३.
"पिके, धिस प्लेन इज सो क्लासी..."
"या बे, बट शांत रहा. "
पिकेने एअर होस्टेसला बोलावले.
वॉटर प्लिज?
तिने पाण्याचा ग्लास आणला.
"फोर मोर..."
तिने अजून चार पाण्याचे ग्लास आणले.
"तिची लिपस्टिक बघ, किती चिप आहे," मायला फणकाऱ्याने म्हणली.
"बे, डू यु हॅव बॉटल? रिकामी हविये!"
मायलाने बॉटल काढून दिली. पिकेने दुधाच्या कुपीमधून एक थेंब दूध पाण्यात टाकून, पाच ग्लास पाणी मिसळले.
"पिके, व्हाट्स धिस."
"बे, दॅट स्वान इज हंग्री फ्रॉम लास्ट ७० यिअर्स. वी निड टाइम टू कॅच हिम!"
दोन्हीही प्लेनमधून उतरले. आजूबाजूला सुंदर सरोवर होत. निळ्या पाण्यात सुंदर हंस विहार करत होते.
"पिके स्वान!"
"बट नॉट द वन वी निड!"
ते दोघेही चालू लागले, आणि अंधाऱ्या गुहेत शिरले.
गुहा अतिप्रचंड होती, आणि काळ्या पाण्याच्या तलावाने भरलेली होती.
पिकेने बॉटल काढली, आणि...
पिसं आणि रक्त झाडत एक वृद्ध हंस तलावाच्या बाहेर आला.
बॉटल उघडून पिकेने काठावर ठेवली. हंस दूध शोधू लागला.
संधी साधून पिकेने त्याला पकडले. त्याने कुठलाही विरोध केला नाही.
ती आली!
हंसकन्या!
ती गयावया करू लागली. मात्र पिकेने अनिर्बंध सत्तेचं वरदान मागितलं.
पिकेला ते मिळालं, मायला आणि पिके, दोन्हीही तिथून निघाले.
"वेट," पिके म्हणाला.
आणि त्याने खिशातून एक बॉम्ब टाकून गुहेत ठेवला.
"नाऊ रन."
दोन्हीही पळत सुटले.
गुहेच्या टोकाशी आल्यावर गुहेत स्फोट होऊन, सगळी गुहा ढासळली.
आणि ते दोघे समाधानाने हसले.

१३.
"बघ, जिंकलो की नाही आपण."
"काय जिंकलो, पक्याच्या आणि पिकेच्या १ लाईफ वाया घालवल्यात तू."
"अग असं कसं, जीवन किती आहे, याला महत्व नाही, ते कसं आहे, याला महत्व असतं. ते जगतायेत, त्या अवस्थेत सात जन्म जरी जगले असते, तरी त्यांना सुखी नसतं राहता आलं. अजून ६ जन्म आहेत त्यांना जगायला. एक जन्माचं दान देऊन, त्यांनी पुढचा जन्म सुखाचा केला!"
"हम्मम्म! मग पुढचा खेळ कधी?"
"आपण पृथ्वीवर १९६०, १९९० आणि २०२० मध्ये खेळलो...पुढची २०५०... बघुयात कधी येत ते! आणि थँक्स, तू त्यांचं भाग्य छान लिहिलंस."
'हो मी लिहिलं रे, पण आता ते टिकवणं त्यांच्याजवळ!"
"हम्मम्म"
"चल चलायचं? खूप कामे पेंडिंग आहेत, बऱ्याच लोकांच्या कपाळावर लिहायचंय."
"अग हो, मलाही बऱ्याच लोकांच्या डेट ठरवायच्या आहेत."
...आणि भाग्यश्री आणि काळ दोन्हीही बाहेर पडले...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
संपलं की! जावा घरला!!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे हो, २०५० मध्ये तिसरंही कुणीतरी खेळवणारं येणार आहे!
Wink
आता खरोखर संपली!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहे. Twist पण सही आहे.
Happy

मस्तच......
मायबोलीवर ही पहिली कथा पूर्ण करतोय
>>>>>>>>>>> अभिनंदन!!!....

भारी!
कल्पनाशक्ती मस्त
आणि हो, अभिनन्दन Happy :टाळ्या:

@DShraddha - ऍज युजयल, नो थँक्स Wink
I always need your support!

@पूर्वी - थँक्स

@किल्ली - धन्यवाद, तुम्हाला जुनी पापे उकरण्याची संधी नाही द्यायचीय मला. Wink

@अनघा - थँक्स. आपण बऱ्याच दिवसांनंतर मायबोलीवर दिसलात!

@कोमल - खूप खूप धन्यवाद!

आणि अभिनंदन काय करताय, कथा कशी वाटली लिवा की Lol

आणि याचा पार्ट २ ही येईल, मनात कल्पना चालुये. बघुयात. पण सध्यातरी इथेच समाप्त!

बिलकुल नाही, तुम्ही माझ्या पापांची लिस्ट अशी वाढवाल ना, तर मला नरकात काय, राजनंदिनी साडीच्या ऑफिसमध्येही जागा मिळायची नाही. Lol
हा फाउल धरला गेलाय, याची नोंद घ्यावी!!!!

तुम्ही माझ्या पापांची लिस्ट अशी वाढवाल ना,>>>> आयडी बदलून चित्रगुप्त घ्यावा का

राजनंदिनी साडीच्या ऑफिसमध्येही जागा मिळायची नाही. >>> आधी जुनी पापे, मग आजच नविन पाप,
ओके, सवलत दिली Happy

हा फाउल धरला गेलाय, याची नोंद घ्यावी>> चीटीन्ग चीटीन्ग

आयडी बदलून चित्रगुप्त घ्यावा का>>>> पापनाशक किल्ली, भारी वाटेल

आधी जुनी पापे, मग आजच नविन पाप,
ओके, सवलत दिली Happy>>>>> खूप खूप धन्यवाद

चीटीन्ग चीटीन्ग>>>>> Lol

अ‍ॅमी!

सापडलं नाव, इफ यु वॉन्ट टू चेंज Wink

?? तू लिहलेलं अॅमी! आणि माझे सध्याचे नाव अॅमी सारखंच दिसतंय मला. पण तरी आभार Happy
आणि सध्यातरी नाव जे काही चुकलंमाकलेलं आहे ते तसेच ठेवणार आहे. बदलायचा विचार नाही.

आभार कसले, काहीही Lol
पण काल एका धाग्यावर एकदम हे बरोबर नाव दिसलं आणि Light 1
तसंही ते चुकलेल नसून युनिक वाटतंय
(मि. अज्ञातवासी, नामपुराण बंद करा आता)

वा .. मस्त लिहीलत की. -- +111
आणि आभारी आहे एकतरी पूर्ण केली स्टोरी .. Proud
जमदग्नी ला पण पूर्ण कर की..

मेघे आता आलीस होय!
आणि जमदग्नी, पाटील दोन्हीही आता पूर्ण करायचेत!!!
आधी पाटील पूर्ण करावे म्हणतो!

शॉली Rofl

मस्त.
पुढचा भाग 2050 मध्ये येणार म्हणजे.

मस्त.
पुढचा भाग 2050 मध्ये येणार म्हणजे.>>++१११
भारी झालीय...आता बाकीच्या कथा संपवा लवकर Happy

Pages