रणरागिणी

Submitted by mrunal walimbe on 5 February, 2019 - 00:10

विशाखा झोपेतून जागी झाली. ती आपण कोठे आहोत याचा अंदाज घेत होती... तिला काल आपणं अचानक कश्यावर तरी आदळल्याचेचं आठवतं होते नंतरच तिला काहीही आठवत नव्हतं.... खरं तर गेले दोन महिने तिच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली होती की तिला काही चं समजण्याच्या पलीकडे गेले होते....
ती उठण्याचा प्रयत्न करत असतानाचं तिला कुणीतरी येतं असल्याची चाहूल लागली...
अहो ऊठू नका तुम्ही, आता कसं वाटतयं तुम्हाला, एक दहा अकरा वर्षांची चुणचुणीत मुलगी तिच्या बेडशेजारी येऊन तिला विचारतं होती... थोडीशी सावरत विशाखा म्हणाली मी बरी आहे. थोडसं डोकं दुखतयं .पण मी इथे कुठे आले..
तसं त्या मुलीनेचं सांगितले काल तुम्ही अचानक माझ्या बाबांच्या गाडीला रस्ता क्राँसिंग करताना आदळलातं..मी आणि माझे बाबा गाडीतून घरी येत होतो तेव्हा... तुम्ही बेशुद्ध पडला होतातं आणि माझ्या डाँक्टर बाबांना तुम्हाला तिथेच टाकणे न पटल्याने आम्ही तुम्हाला आमच्या चं घरी आणलं...
नंतर मीचं आगाऊपणे तुमची पर्स उचकली म्हणजे तुमच्या घरच्यांना कळवता येईल म्हणून.... तर तुमचं कार्ड सापडलं आणि घरचा नंबरही... पण तो कोणीचं उचलतं नव्हतं... इतक्या तं हाक आली इरा तुझी नेहमीची डेक्कन एक्सप्रेस बंद कर. मावशींना जरा आराम करु दे नंतर बोलू आपण त्यांच्याशी.... तशी इरा साँरी साँरी म्हणतं पळाली....
विशाखाने डोळे मिटले नाही तरी तिचं डोकं तसं भणभणतं होतं... तिला वाटले कोणं कुठला डॉक्टर हा ना नात्याचा ना गोत्याचा, ना ओळखीपाळखीचा,पण याला सुध्दा आपली कणव आली अन् तो एक आपला नवरा सुजय .... कसलीही दयामाया न ठेवता फालतू संशय घेऊन रात्रीचं घराबाहेर काढले आपल्याला अन् वर धमकी दिली पार्थला भेटशील तर याद राखं म्हणून.... एवढसं लेकरु चार वर्षाचं बाबाच्या त्या अवतारानं पारं भेदरलं होतं..... तिच्या डोळ्यातून पाणी आले तिला सारखी एकचं बोचं होती तिच्या आणि सुजयच्या भांडणातं ते छोटसं लेकरु होरपळून निघणारं...
ती आठवत होती गेले महिनाभर तिने किती वकीलांच्या appointment घेतल्या की divorce नंतर मुलाची कस्टडी मिळावी म्हणून... पण प्रत्येकाचे एकचं म्हणणे होते की जर divorce चारित्र्य हीन या आधारावर झाला तर मुलाची कस्टडी आईला नाहीचं मिळणारं... कालही तेचं झाले होते तिने तिचे फॅब्रिक बुटीक लवकर बंद केले अन् ती एका नामांकित वकिलांना भेटायला गेली पण परत तेच उत्तर ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली... अन् मग संतापाने बहुधा बी पी वाढून तिला चक्कर आली होती.....
तिला कधी झोप लागली तिलाचं कळले नाही.... अचानक पुरषी आवाजाने ती एकदम जागी झाली, how are you madam now तसं तिने त्याच्याकडे पाहिले अन् ती तीस वर्ष मागे भूतकाळात गेली....
हा तर गौरव नाडकर्णी तिचा क्लासमेट एके काळी सुंदर भरतनाट्यम करणाऱ्या विशाखावर प्रेम करणारा....
विशाखा काँलेजमधे असताना हरहुन्नरी म्हणून प्रसिद्ध होती... भरतनाट्यम च्या तिने परिक्षा दिल्या होत्या. अभ्यासातही ती हुशार होती.. हजरजबाबी ही होती अत्यंत मनमिळाऊ आणि सदैव दुसऱ्याच्या मदतीला धाऊन जाणारी अशी होती... त्यामुळे काँलेजमधल्या ब ऱ्याचं मुलांना ती आवडायची... पण गौरव वेगळा होता कारण तो बडे बाप का बेटा होता अन् याचं जोरावरं त्याने तिला प्रपोज ही केले होते... पणं विशाखाला स्वतःच्या घरचं वातावरण माहितं होतं तिला चांगलं ठाऊक होतं आण्णांना हे पटणारचं नाही आणि तिचा फोकस अभ्यास वर होता त्यामुळे तिने त्याला प्रांजळपणे नकार दिला होता...
आणि आता त्याचं गौरवच्या घरातं आपण आणि तो आता आपल्याला डाँक्टर म्हणून check करणारं या विचारानेचं तिला घामं फुटला.... तसं त्यानं म्हटलं relax मी तुला कालचं ओळखलं होतं पण डोक्याला मार असल्यामुळे दवाखान्यात न नेता घरी आणलं कारणं डोक्याच्या मारामुळे पुढचे चोवीस तास जरा critical असतातं....तू एवढी कशाला restless होते मी तुझ्या नवऱ्याला जुने काहीच नाही सांगणारं..
ती उठली म्हणाली मला आता बरे वाटते आहे मी जाईन माझ्या घरी... इतक्या तं इरा आली मावशी तुमचं डोकं परतं दुखलं तर काय करणारं त्यापेक्षा इथेचं रहा म्हणजे बाबा तुला पटकन बरे करेलं... विशाखा म्हणाली नाही बाळं माझा छोटा पार्थ माझी वाट पहातं असेल मला गेलचं पाहिजे.. अन् तिच्या ही नकळत ती तिथून बाहेर चालू पडली...
सध्या रहात असलेल्या भाड्याच्या जागेत ती आली... तिला वाटलं हबंरडा फोडावा अन् रडावं थोडं तरी मोकळं वाटेलं....इतक्यात बेल वाजली तर दारातं सुजय ... कालं कुठे दिवे लावून आलीसं...
तिला खरं तर त्याला घरातं घेण्याची अजिबात इच्छा नव्हती पण चार लोकांत तमाशा नको म्हणून तिने त्याला घरात घेतले ... तिला त्याच्या विचारांची देखील किळस वाटत होती. त्यामुळे ती इतकचं म्हणाली mind your toungue Sujay पण तो तिच्या अक्षरशः अंगावर धाऊन गेला अन् म्हणाला मला माहितं आहे तुझ्या या अश्या करण्यामुळेचं तर तुला नवनवीन सिरियल स् ची costume designing orders मिळतात म्हणून चं तुझी सावली पार्थवर मी अजिबात पडू देणार नाहीये लक्षात ठेवं..... तिने अंगात असलेले सारे बळ एकवटले आणि त्याला घराबाहेर काढले.... आता तिची रणरागिणी झाली होती.. जगाची पर्वा करण्यापेक्षा आपला आत्मसन्मान आणि आपली सुरक्षितता आता तिला जास्तचं महत्वाची वाटली...
त्याचं दिवशी तिने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या विरुध्द कंप्लेंट नोंदविली...आणि कधी नव्हे ती दोन महिन्यांनंतर ती शांतपणे झोपली....
सकाळी सकाळी बेलच्या आवाजाने ती जागी झाली.. तर दारातं डॉक्टर गौरव तिला कळेचं ना की हा इथे कसा आला ..मग तोचं म्हणाला i am sorry पण काल तू तडकाफडकी निघून आलीसं ...त्यामुळे काळजीपोटी मी तुझा पाठलाग केला अन् नंतर बहुतेक तुझा तो नवरा असावा त्याला तू घालवून देताना ही पाहिले मी तुला...Is any problem I will help you.
तशी ती त्याचा कडे रोखून बघतं निग्रहाने म्हणाली, no thanks i will manage my problems thanks for concern but I think you may leave now it's a request. Don't do this again please.
तो नाराजयुक्त भावनेने तिच्या घराबाहेर पडला. तिच्या मनात विचार आला जग कसं आहे ना एकटी बाई दिसली रे दिसली की सगळे पुरुष लांडग्याची कातडी पांघरून लाडीगोडी लावायला अगदी सज्जचं...
आता तिनं मनाशी पक्क ठरवलं पार्थला काही करुन मिळवायचेचं. तिने तिच्या एका वकील मैत्रिणीला फोनं केला , appointment घेऊन तडकं भेटायला गेली.. तिला सर्व सांगितले तशी बऱ्यापैकी वकिली पेशातं मुरलेल्या तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले ते ऐकून ती चकितचं झाली. ज्या पुरुषांचे बाहेर लफडे असते ना ते मग बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागतात म्हणजे खरं तर चोराच्या उलट्या बोंबा असाचं हा प्रकार पणं त्यामुळे त्यांना divorce मिळतो परत बायको बदफैली ठरवली की पोटगीचा प्रश्नचं येतं नाही अन् परत यांना रान मोकळेचं....
विशाखा म्हणाली मला सुजयच्या लफड्यातं वगैरे interest नाही पण मला माझा पार्थ हवा आहे. आज इतके दिवसांनी पहिल्यांदाच तिला कोणीतरी हो हे होईल असे positive म्हणाले होते. त्यामुळे ती जरा relax झाली होती...
यथावकाश केस कोर्टात उभी राहिली ...सुजय विशाखाला बदफैली सिध्दचं करू शकला नाही आणि सुजय विशाखा चा divorce झाला पण छोट्या पार्थची कस्टडी त्याच्या आईला म्हणजे विशाखाला मिळाली....
विशाखा ला खूप आनंद झाला. छोटा पार्थही दिमाखात आपल्या आईच्या कडेवर विराजमान झाला...
एवढ्यात विशाखा म्हणाली जज साहेब मला थोडं बोलायचयं..।
ज साहेबांनी होकार भरताचं ती म्हणाली.. खरं तर माझी केस ही पुरुषी अहंकार चं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. खरं तर सुजय वाईट नाही पण आपली बायको आपल्या पेक्षा सरस आहे हे त्यांच्या पुरुषी ego ला झेपलं नाही आणि एका ग्लॅमरस फील्ड मधे कोणीही godfather नसताना स्वतः चं नुसतं नावचं नाहीतर तर सरग दोन वर्षे award मिळवलं हे काही त्याच्या पचनी पडलं नाही ,या असूयेतूनचं खरं तर हे सारं घडलं. त्यामुळे माझी सर्वच पुरुषांना अशी विनंती आहे की आपल्या घरच्या गृहलक्ष्मीला कधीही कमी लेखू नका अन् तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करु नका नाही तर ती रणरागिणी तिच्या तील महिषासुरमर्दिनी ने तुमचा संहार करायला मागे पुढे पाहणार नाही.
विशाखा च्या या व्यक्त्व्यावर सारे चं जप अगदी जज साहेब सुध्दा उठून उभे राहून टाळ्या वाजवू लागले अन् सुजय मात्र एका कोपऱ्यात दिड्मूढ होऊन ऊभा होता..

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Chan

ठीक आहे कथा.

> कसलीही दयामाया न ठेवता फालतू संशय घेऊन रात्रीचं घराबाहेर काढले आपल्याला अन् वर धमकी दिली पार्थला भेटशील तर याद राखं म्हणून. > बायको, आई, मुलगी, इतर कोणीही स्त्री नातेवाईक असेल तर तिला 'रात्री' घराबाहेर काढता येत नाही कायदा आहे तसा.

> पण प्रत्येकाचे एकचं म्हणणे होते की जर divorce चारित्र्य हीन या आधारावर झाला तर मुलाची कस्टडी आईला नाहीचं मिळणारं... > कस्टडी नाही'च' मिळणार असे नसून इतरवेळी कस्टडी आईला मिळायची शक्यता जेवढी असते त्यापेक्षा भरपूर कमी होते.

> पणं त्यामुळे त्यांना divorce मिळतो परत बायको बदफैली ठरवली की पोटगीचा प्रश्नचं येतं नाही अन् परत यांना रान मोकळेचं....> अहो पण बायको बदफैली असल्याची प्रुफ द्यावी लागते आधी...

आणि अपघात झाल्यावर हॉस्पिटल मधे नेणे हे अतिशय नैसर्गिक आणि बरोबर होते , घरी कशासाठी आणले कळले नाही.
एकूण तो सगळा प्रसंगच अनावश्यक वाटला..
पण कथाबीज चांगले आहे.
पुलेशु..