फार्म हाऊस 3

Submitted by शुभम् on 31 January, 2019 - 10:05

#farmhouse_complte

अगोदरचे भाग .....


http://manatalepanavar.blogspot.com/2019/01/farm-house-1.html?m=1


http://manatalepanavar.blogspot.com/2019/01/blog-post.html?m=1

कथा पूर्ण वाचल्यानंतर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका........

ते फार्महाउस गावाच्या बाहेरच्या बाजूला होते . पूर्णपणे मोकळ्या ओसाड माळरानावर . छोटी-मोठी खुरटी झुडपे सोडली तर एकही मोठे झाड त्याठिकाणी नव्हते . ओसाड माळरानावर असलेले ते फार्महाउस भयाने ओतप्रोत भरलेले होते . गण्याला वाटेत वेळोवेळी दिशेचं ज्ञान होत होतं . तो त्या पोलिसाला सांगत होता आणि असे करत करत तिघांचाही ताफा त्या फार्महाउस कडे चालला होता . शेवटी ते फार्महाउस पाशी पोहोचले . त्याठिकाणी पोहोचेपर्यंत सूर्य मावळून संध्याकाळचा गार वारा सुटला होता . पश्चिमेकडे पसरलेल्या लालिम्याच्या पार्श्वभूमीवर ते फार्महाउस शिकारीसाठी टपून बसलेल्या आहे हिंस्र श्वापदाप्रमाणे दिसत होते . गार वाऱ्यामुळे की अनामिक भीती मुळे तिघांच्याही अंगावरतीं शहारे येत होते . काळोख पसरत चालला होता . त्यांनी रस्त्याच्या बाजूलाच गाडी उभा केली. फार्महाउस पर्यंत गाडी जात नव्हती. मुरमाड व काट्याकुट्यांची एक पायवाट जात होती . दूर असलेले ते फार्महाउस अंधाराची चादर ओढून कोणत्यातरी अघोर कार्यात व्यस्त असल्यासारखे भासत होते

शैलाने पाऊलवाटेवर पाय ठेवला व ती त्या दोघांचीही वाट न बघता सरळ चालू लागली .

" शैला थांब जरा मिळून जाऊ ....

गणेश तिच्या मागोमाग पाउलवाटेकडे जात म्हणाला पण जेव्हा त्याची पावले वाटेवरती पडली तो मंतरल्याल्याप्रमाणे तिकडे चालू लागला । त्या फार्महाऊसमध्ये जे काही होते , त्याची शक्ती अपार होती . ते तिघेही संमोहित अवस्थेत त्या फार्महाउस कडे खेचले जाऊ लागले . आता पूर्ण अंधार पडला होता . कातळ काळोखात बुडून गेलेल्या त्या फार्महाउस समोरच एक लोखंडी प्लेट होती . तिला वरती हुक होता . शैलाने ती प्लेट उचलून एका बाजूला केली . आत एक भुयार होतं . तिघही त्या पायर्‍या उतरून खाली गेले.

जेव्हा गण्या शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिले तिघेही त्यांच्याच उंचीच्या खांबाला बांधले गेले होते . त्यांचे हात मागच्या बाजूला व संपूर्ण शरीराभोवती दाव्याने गुंडाळा केला होता . त्यांच्यापुढे सहा-सात फूट व्यासाची व दीड-दोन फूट उंच वर्तुळाकार वेदी होती . त्याच्या वरती काळे पडलेले रक्ताचे डाग होते . ती वेदी बळी देण्यासाठीच वापरली जात असावी . त्यांच्या उजव्या बाजूला एक यज्ञकुंड होतं . त्याचा वापर नक्कीच चांगल्या कामासाठी केला जात नसनार. यज्ञकुंडाच्या आजूबाजूला चित्र विचित्र साहित्य होत . हळद , कुंकू , गुलाल , तांदूळ , लिंबू , मिरच्या , बीबे , कातडी चपला , मांसाचे तुकडे , हाडे , कसले तरी केस आणि दोन-तीन मडक्यात काही तरी भरून ठेवलेले होत . अशा चित्रविचित्र वस्तू त्या ठिकाणी पसरलेल्या होत्या . त्यांच्या डाव्या बाजूला उंच , विशाल , अजस्त्र आणि तितकीच विचित्र मुर्ती दिसत होती . ती अंधारात गडप झाली होती . त्या वर्तुळाकार वेदीवर बरोबर मध्यभागी लावलेल्या मशालीच्या उजेडात याचा अर्धवट दिसत असलेल्या भागाण कुणालाही घाबरवायला पुरेसा होता . समोरच सिंहासनासारखं काहीतरी दिसत होतं . अंधार असल्याने त्याच्यावर कोणी बसलेय का नाही याचा अंदाज लागत नव्हता .....

" झालं का पाहून ...? निरीक्षण करून ....."

उजव्या बाजूच्या यज्ञकुंडात जवळ कोणीतरी उभं असलेलं अंधुक उजेडात दिसत होतं .

" बप्पा तुम्ही इथे ...." गण्या

" हो मीच ...."

" मला माहित होतं की तुम्ही येणार आमच्या मदतीला ....."

" मग मी येणारच होतो..... पण तुमच्या नाही त्यांच्या , आमच्या हुकुमच्या मदतीला ....."

" काय .....कोण हुकुम .....? बाप्पा काय बोलताय .....?"

बप्पा जरा पुढे सरल्यामुळे त्या मशालीच्या उजेडात त्यांच्या चेहऱ्यावर खुनशी हास्य दिसत होतं......

" तुला काय वाटलं मी तुमच्या बाजूने आहे.......? "

आणि आसमंत एक कुत्सित हास्याने भरून गेला. बाप्पा त्यांच्या मूर्खपणावर हसत होते .

" अरे मीच तुमचा बळी देणार , आणि पुन्हा आमच्या हुकुमना जिवंत करणार , पूर्ण शक्तीनिशी ......"

पुन्हा एकदा बाप्पांनी हास्याची कारंजी उडवली . इतके दिवस जा बप्पा वर गण्याने आंधळेपणाने डोळे झाकून विश्वास ठेवला होता . तेच शत्रू होते . त्याला एकदाही जाणीव का झाली नाही ......? त्याला पश्चाताप वाटत होता . त्याने बाप्पा वर विश्वास ठेवला त्याचा त्याला राग येत होता . स्वतःच्या मूर्खपणाने इतरांनाही त्यांने संकटात टाकलं होतं .

" म्हणजे ते सत्याचा शिलेदार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी खोट्या होत्या ..... आमचा बळी द्यायचा होता म्हणून गुंफलेलं जाळं होतं तर.....

गण्या निराश होऊन म्हणाला

" नाही रे ते सगळं खरं होतं . फक्त मी त्यात कुठेच नव्हतो . तू सत्याचा शिलेदार होतास आणि आहेस . पण मी नव्हतो . मी तुला मदत करायला नव्हतो मी तुझा बळी देण्यासाठी तुझ्याशी मैत्री जोडली होती...... "

" मग इतक्या दिवस मी तुझ्यासोबतच होतो .... मग तू आमचा बळी का नाही दिलास....?

" अरे बळी देण्यासाठी योग्य वेळ , योग्य ठिकाण आणि योग्य तयारी करावी लागते . सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तरच त्याचा उपयोग होतो..... आणि तुम्हा मूर्ख लोकांना कळलं सुद्धा नाही मी त्या बळीचीच तयारी इतक्या दिवस करत होतो आणि मूर्खासारखं तुम्ही मला साथ देत होता ...... म्हणून मी तुमचा मनापासून आभार मानतो

आणि पुन्हा एकदा बप्पा त्यांच्या गडगडाटी हास्यात हरवून गेले....

" बहोत खुब ... बहोत खुब ... सेवक , ये जो भी खेल तुम ने खेला है उस खेल के पीछे मेरा दिमाग है ये मत भुलना.....

त्यांच्यासमोर असलेल्या सिंहासनावरती एक गडद काळी छाया अवतरल्यासारखे वाटत होते . तिथुनच त्या भसाड्या आवाजाचा उगम होता... बप्पांनी सिंहासनाकडे वळून कुर्निसात करतात तसं केलं .

" तुझा जगणार नाहीस.... तुझा जगण्याचा हव्यासच तुझ्या मृत्यूचं कारण झाला होता , आणि आता ही होईल ....." इतका वेळ शांत असलेली शैला गंभीर आवाजात म्हणाली .

" हो तुझा आता शेवट होणार आहे ..." गण्याही त्याच गंभीर आवजात म्हणाला....

" गणेश , ये गणेश , तू आलास , माझ्यासाठी आलास ... " तो अंजलीचा आवाज होता " आता आपण या साऱ्यांना संपवू , तू खरंच किती शूर आहेस तू माझ्यासाठी या संकटात पडतोयस , खरंच मी किती भाग्यवान आहे मला तुझ्या सारखा मित्र मिळाला..... मला आज खरंच खूप आनंद झाला......"
आणि ती हसू लागली . एकाएकी कोमल मधुर असणारा तिचा आवाज बसका व चिरका होऊ लागला.... हळूहळू तो आवाज भसाडा होऊ लागला.....

" हाssss हाssss हाsssss किती सहजपणे फसतात काही मूर्ख लोक ..." तोच तो त्या हुकुमच आवाज होता...

" अंजली , अंजली कुठे गेली ...? काय केलस तू तिला.....? "
पुन्हा एकदा तो हसला

" अंजली कधी नव्हतीच .....तिची प्रतिकृती मीच निर्माण केली होती . तुझी फक्त एक आठवण आठवण मी उलटी फिरवली होती..... आठव , आठव तो पकडापकडीचा खेळ . तुम्ही झाडावर चढला होता . तू घसरतो , मग ती तुला पकडते . पण हे कधी घडलं नव्हतं हे सारं खोटं आहे . ही आठवण मी तुझ्या मनात कोरली आहेत . खऱ्या आयुष्यात पकडापकडी खेळताना तू घसरलाच नव्हता . घसरली होती ती अंजली , आणि अंजलीला तू वाचवू शकला नव्हता . अंजली घसरली तेव्हा खाली पडून तिचा मृत्यू झाला व ती तेव्हाच मुक्त झाली . मात्र तिच्या आठवणीचा उपयोग करून मी तुला फसवलं....हा हा sssssss

तो आवाज गन्याला त्रास देत होता . त्याने गण्याचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं . बप्पा ही त्याच्या विरोधात होते . आता अंजली कधी अस्तित्वातच नव्हती हे जेव्हा गाण्याला कळालं तेव्हा तो पूर्णपणे ढासळून गेला . ते फक्त आता दोघेच उरले होते . तो आणि शैला . त्या दोघांना या बलाढ्य शक्ती विरुद्ध लढा द्यायचा होता . त्यांची मदत कोण करणार होतं....? मदत केव्हा होणार होती .....? त्याच्या मृत्युनंतर....!

गण्याला राग आला , खूप राग आला . तो वैतागला त्याच्या आयुष्यावर , त्याच्या दैवावर . त्याला जगण्याची मुळीच इच्छा नव्हती. तो ढासळून गेला . त्याचा आत्मविश्वास , त्याचे आधार कोसळले . उन्मळून पडलेल्या वृक्षाप्रमाणे त्याची अवस्था झाली . एक वादळ त्याच्या आयुष्यात आलं होतं . त्या वादळाने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली होती . त्या वादळाने त्याच्या आयुष्यात परिवर्तन आणलं होतं . पण तेच परिवर्तन , तीच कलाटणी त्याच्या आयुष्याला घातक ठरली होती . तू लढायला सक्षम होता . लढा द्यायची ताकद त्याच्यामध्ये होती . पण त्याच्यापुढे प्रश्न होता लढायचं कशासाठी ....? लढायचं कोणासाठी....?

" पण मग गण्याला तू त्या अघोरी बेटावरून का वाचवलं........? " शैला विचारत होती गण्या आता काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हता . तो हरवला होता . त्याचे जगण्याचे आधार हरवून गेले होते . त्याची जगण्याची इच्छा या क्षणाला नष्ट झाली होती .

" मीच वाचवलं होतं त्यावेळी त्याला . कारण मला गाण्याचा माझ्यासाठी बळी द्यायचा होता. तो खरंच उत्तम बळीचा बकरा आहे . बळी जाण्यासाठी ज्या काही अटी गुणधर्म लागतात ते त्याच्यामध्ये पुरेपूर भरलेले आहेत . तुमच्यासारख्या स्पेशल माणसांचा बळी दिल्यानंतर तो खूप खुश होतो . त्यावेळी जो कोणी बळी देत होता त्याच्या कचाट्यातून त्याला कसं सोडवले मी हे माझं मलाच माहित आहे . आणि आता ती वेळ आलेली आहे . आता मी गण्याचा बळी देणार .... नंतर मला शरीर मिळणार , तेही नेहमीसाठी... अमरत्व , चिरंजीव अमर्याद काळासाठी अनंत जीवन . म्हणूनच मी आत्ता या जगावर राज्य करण्यासाठी तयार आहे......

" तुला जर आमचाच बळी हवा होता तर इतर लोकांना तू का मारलं ......? ती डायरी, गोगलगाय हे सारं कशासाठी होतं......? "

" तुला काय वाटलं , मी फक्त चार-पाच , दहा-पंधरा माणसे मारली असतील .... मी तब्बल 1109 माणसे मारली आहेत आतापर्यंत ......तेही स्वतः अमर होण्यासाठी ....मागची पाचशे ते सहाशे वर्षे याच उपद्व्यापात मी गुंतलेलो आहे..... आणि हा सेवक पिढ्यानपिढ्या तेच करत आहे....आता तुमच्या असामान्य सत्यतेचा बळी दिला कि 1111 बळी पूर्ण होणार आणि मी अमर होणार .....हा हा हाssssss...

" सेवक भरपूर झालं बोलंणं , त्या पैलवानाला आता वेदीवर टाक ,आपल्या शिकारी गोगलगाय खुप भुकेल्या आहेत....

" जी हूकूम.....

तो पोलीस अजूनही बेशुद्ध होता . बापाने त्या पोलिसाला सोडवले व वेदीवरती टाकले . वेदीच्या बरोबर मध्यभागी जे होल होते त्यातून गोगलगाय निघू लागल्या व पोलिसाच्या शरीराभोवती गराडा करू लागल्या....

बप्पा त्याचं शक्ती च्या बाजूने होते ज्याविरुद्ध त्यांना लढायचे होते . पोलीस आता शिकार झाला होता , आणि गण्या हतबल झाला होता . तो काही ऐकायच्या करायच्या मनस्थितीत राहिला नव्हता . आता उरली होती शैला . तीलाच दुष्ट शक्ती विरुद्ध काही ना काही करायला पाहिजे होते......

शैलाचे हात बांधलेले होते . ती ते सोडवायचा प्रयत्न करू लागली . तिचे मन पूर्णपणे ते हात सोडवण्यावर गुंतले . मनाची पूर्ण शक्ती , शरीराची पूर्ण शक्ती तिने हात सोडवण्यासाठी वापरली आणि तिचा हात सुटला.....
तिने हालचाल केली नाही . ती तशीच थांबली . तिने विचार केला ' आपल्याला जर यांना पराभूत करायचं असेल तर ते एकट्याला शक्य नाही . आपल्या गण्याचेही हात सोडवावे लागतील .....पण कसे?

तिने गण्या कडे पाहिले . गण्या निश्चिल , डोळे झाकून उभारला होता , जणू काही तो बेशुद्ध पडला होता .
शैला पटपट विचार करणे भाग होते . अजून घाई केली नाही तर त्या पोलिसाचा मृत्यू होणार होता , आणि काही क्षणानंतर त्या दोघांचाही बळी दिला जाणार होता . ती विचार करत होती . तिला एक कल्पना सुचली आणि तिने जलद हालचाल केली . ज्या यज्ञकुंडपाशी बाप्पा बसले होते त्या यज्ञकुंडात पाशी असलेल्या सर्व वस्तू तिने विखरून टाकल्या . दोन-तीन मडक्यात जे काही द्रव भरून ठेवले होते ते तिने सांडून दिले . यज्ञकुंडात पेटलेला अग्नी तिने विझवून टाकला........

आणि पुढे काही करणार तोवरच ती हवेत उचलली गेली ...
तिच्या गळ्याभोवती दाब वाढू लागला जसं कोणी तिचा गळा दाबत होतं . तिला श्वासोच्छवास घेणं कठीण जाऊ लागलं . डोळ्याभोवती काळा निळ्याजांभळ्या पिवळ्या तांबड्या चित्रविचित्र रंगाच्या रेषा दिसू लागल्या . दृश्य धूसर होऊ लागलं . काहीही ऐकू येईनासा झालं . सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना बधिर झाल्या . तिला वाटल आपला मृत्यू झाला.......
गण्याने जलद हालचाल केली . त्याने खिशात हात घातला . त्याच्या खिशात ते सूत होतं . त्याला कोणी दिलं , कोणी ठेवलं हे काही आठवत नव्हतं . फक्त होतं . त्याने एक टोक शैलाकडे फेकलं , दुसरं स्वतःच्या हातात धरलं . त्याला तीन टोके होती . जेव्हा शैला व गणेश दोघांनीही एकेक टोक धरले तेव्हा आपोआपच तिसरा टोक बप्पा कडे जाऊ लागले व त्यानी ते पकडलं....
तेव्हाच तिला स्पर्शाची संवेदना जाणवली . तिच्या हातात काही तरी होतं . तिने ते घट्ट पकडून ठेवलं . हळूहळू सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना परतू लागल्या . तिने डोळे उघडले . तिच्या हातात सप्तरंगी सूत होतं . त्या घनदाट अंधारात चमकणारं......

त्या सुताला तीन टोके होती व मध्यभागी वर्तुळाकार भाग होता . एक टोक शैला हातात होतं , दुसऱ्या गाण्याच्या आणि तिसरे टोक बप्पाच्या हातात होतं ......

" शांत व्हा , मी सांगतोय शांता ह्वा , मनातील सर्व विचार काढून टाका . तेच विचार करा जे गरजेचे आहेत ,या वेळेला गरजेचे आहेत ......"

बप्पा धीर गंभीर आवाजात बोलत होते

एरवी त्या दोघांनाही विचारांना आवरणं शक्य नव्हतं . पण ते सुत आणि बप्पाचा आवाज यामध्ये नक्कीच काहीतरी जादू असली पाहिजे . कारण त्यांनी कधी विचारही न केलेल्या गोष्टी त्यांच्या विचारात येत होत्या त्यांनी कधी पाहिली नसतील अशी दृश्ये त्यांना दिसत होती . समोरचं दृश्य हळूहळू पालटत गेलं . ते एका नव्या जागी पोहोचले......

स्वच्छ सूर्यप्रकाश प्रकाश , आजूबाजूला हिरवळ , सर्वत्र एक मंद सुगंध आणि हळूहळू वाहणारा मंद गार वारा. हा परिसर किती अल्हाददायक होता असं वाटत होतं की कायमसाठी इथेच राहावे पण काही क्षणासाठीच.....

त्या तिघांनी एका वेगळ्या मितीत प्रवेश केला होता व त्या प्रवासाचे चालक होते स्वतः बाप्पा . बप्पानी त्यांना या ठिकाणी आणला होतं.....

" बाप्पा तुम्ही ...? "शैला म्हणाली

" सांगतो सारे काही सांगतो . पण आत्ताची वेळ बरोबर नाही . आता संघर्षाची वेळ आहे . आपल्याला त्याच्या विरुद्ध तिघांना मिळून लढायचा आहे . दोघही सावध व्हा . आता आपला संघर्ष होणार आहे......

त्यांनी बाप्पाला वाईट व दुष्ट समजलं होतं बाबा खरं तर त्यांच्याच बाजूने लढत होते....

आजूबाजूचा परिसर दुरून बदलात येत होता . दुरून कोणीतरी येत होतं दुर्गंध काळोख घेऊन त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी.....

तोच तो हुकूम होता . ना त्याला आकार होता न कसलं शरीर होतं . काळोखाची काळी छाया , त्याचबरोबर , निराशा , क्रोध , भय वासना , सार्‍या नकारात्मक भावनांचा मिलाफ घेऊन तो आला होता....

ते तिघेही वर्तुळ करून बसले होते . बाप्पा पुन्हा एकदा म्हणाले " काहीही दिसो , काहीही होऊ , मी जरी येऊन म्हणालो तरीही हे सूत सोडू नका......

आजूबाजूचा परिसर पूर्ण पालटला . बाग बगीचा फुलझाडे नि आल्हाददायक गारवा सारं काही नष्ट झालं . सर्वत्र दुर्गंधी पसरली . झाडे वाळून कुजून गेली . वाळला पालापाचोळा सर्वत्र पसरला . हाडे गोठवून ठेवणारी थंडी वाजू लागली.....

" तुला काय वाटलं , तू मला हरवलं , मला फसवलंस.....?
मी तुला पहिल्यांदाच ओळखलं होतं , जेव्हा तू माझ्याकडे आला होता माझा दास बनून माझा सेवक बनवून पण मी तुझा वापर करून घेतला . तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नव्हतं ....? तू काय करणार आहे मला माहीत नव्हतं .....? मला सारं माहीत होतं आणि आता तुझा शेवट होणार आहे......

आसमंतात एक भयानक किंकाळी घुमली . ती बप्पाची होती . बाप्पाचे दोन्ही हात मनगटापासून तुटून बाजूला पडलज . त्याठिकाणी रक्ताचे पाट वाहू लागले . बप्पा च्या हातून ते सुत सुटलं होतं . त्यामुळे आता त्याला रोखणारी , थांबवणारी कोणतीच शक्ती त्याठिकाणी अस्तित्वात नव्हती . बप्पा वेदनेने विव्हळत होते , ओरडत होते . दोघांचेही मनोधैर्य खचत चालले होते तरीही दोघांनीही ते सूत सोडले नव्हते . सुताची दोन टोके ते दोघेही धरून बसले होते । त्यांच्यापासून काही फुटांच्या अंतरावर बाप्पा व त्यांचे दोन मनगटापासून तुटून पडलेले हात अस्ताव्यस्त पडले होते . समोरचे दृश्य अधिकाधिक किळसवाणे होत चालले होते त्यांच्या हातातून रक्ताचा स्राव थांबत नव्हता . तो रक्ताचा स्राव कसेही करून थांबवायला हवा होता . अन्यथा पप्पांचा मृत्यू फार दूर नव्हता .

गण्या तिथून उठला . तो विसरला बप्पांनी स्वतः सांगितले होते की काहीही झाले तरी तिथून उठू नको पण शेवटी गण्या तिथून उठलाच . त्याने आपल्या शर्टाची बाही फाडत बापाच्या हाताला बांधली . तेव्हाच विकृत हास्याचा गडगडाट त्याठिकाणी ऐकू येऊ लागला .

" आता मला अमरत्वाच्या मार्गापासून कोणीच रोखू शकत नाही..... " पुन्हा तेच विकृत हास्य.....

" सेवक तू तयार राहा भयंकर वेदनेसाठी . तू मला धोका दिला आहे तुझा मृत्यु इतका भयानक होणार आहे की साक्षात अघोर सुद्धा घाबरेल ..... दयेची भीक मागितली तरी मृत्यू देणार नाही .....अगणित काळासाठी वेदना व तडफडीच्या सागरात तुला जगावं लागेल.......

आवाज हवेत विरतो न विरतो , तोच पुन्हा बाप्पाची किंकाळी ऐकू आली . यावेळी बाप्पाचा हात कोपरापासून तुटला होता . दोन्हीही पायाची दहाच्या दहा बोटे इतस्ततः विखरून पडली होती.....

ते दृश्य किळसवाणे होते . शैला ओरडून बेशुद्ध झाली...... एवढ्या भयानक वेदना होत असूनही बप्पा बेशुद्ध होत नव्हते . ते अजून जागे होते आणि एवढं रक्त जाऊनही त्यांचा मृत्यू होत नव्हता जणू तो हुकूम स्वतः बापाला बेशुद्ध होऊ देत नव्हता आणि मरूही देत नव्हता . सार्‍याच्या सार्‍या वेदना बप्पाला सोसाव्या लागत होत्या . त्या वेदनेमुळे बप्पाचा मेंदू बधीर झाला होता. त्यांना काही सुचत नव्हते न काही कळत होते . ते फक्त ओरडत होते . किंचाळत होते....

ते तिघे पूर्णपणे त्याच्या तावडीत सापडले होते . त्यांचा मृत्यू होणार होता आणि साधासुधा मृत्यू नाही ; तर वेदनेने परिपूर्ण असलेला नरकातही अशा वेदना नसतील इतक्या भयानक वेदना त्यांना या ठिकाणी भोगाव्या लागणार होत्या....

शैला बेशुद्ध झाली होती . बाप्पा वेदनेने विव्हळत होते . गण्याला कळना त्याला काय करावे.....?

बाप्पा विव्हळत -विव्हळत बारीक आवाजात अडखळत-अडखळत बोलत होते
" अरे गणेश माझ्या पिशवीमध्ये एक काचेची छोटीशी कुपी आहे . त्या कुपी मधील ते पवित्र जल तू या ठिकाणी शिंपड म्हणजे आपल्यासाठी नेहमीच्या जगात जाण्याचा मार्ग खुला होईल . या जगात मी त्याला आणले होते मला वाटले मी आपण त्याचा पराभव करु शकू , पण ते आता आपल्याला अशक्य आहे . आपण लवकरच जर नेहमीच्या जगात नाही गेलो तर आपल्या अंत निश्चित आहे....

गण्याने पिशवीकडे उडी घेतली तशा पिशवीतील सर्व वस्तू हवेत उडाल्या.... हवेतच उंचावरती ती काचेची कुपी होती . कितीही उड्या मारल्या तरी गणाच्या हाताला की कुपी यणं कधीही शक्य नव्हतं..... त्याचवेळी बाप्पांनी कसल्या तरी विचित्र भाषेत विचित्र शब्द एकदम मोठ्या आवाजात उच्चारले आणि क्षणभरासाठी त्या हवेत उडालेल्या वस्तू जमिनीवरती स्थिर झाल्या . गण्याने ती काचेची कुपी पकडली पण त्यामागोमाग बाप्पाचा तीव्र स्वरात किंचाळण्याचा आवाज त्यांच्या कानी आला व पुन्हा त्या सर्व वस्तू हवेत उडाल्या .

गण्या त्या कुपीचं बुच काढून त्यातील ते पवित्र जल शिंपडण्याचा बेतात होता . पुन्हा एकदा त्याच्या हातातून ती उडाली व काही अंतरावर जाऊन खळकन फुटली . पण त्यातील पवित्र जल खाली पडल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच्या जगात जाण्यासाठी वाट खुली झाली होती...

पण त्या ठिकाणी गण्याला एकट्याला जायचे नव्हते दोघांनाही घेऊन जायचे होते . तो बाप्पाकडे वळला , पण बप्पाच म्हनाले आधी शैलाला नेउन सोड.... गण्या शैला कडे वळला त्याने शहराला उचलले व तो चालू लागला...

हवेत रंगीत पाण्याचा फवारा उडावा त्याप्रमाणे नेहमीच्या जगातील म्हणजे ते काही वेळापूर्वी ज्या भुयारात होते त्याठिकाणचं एक दृश्य दिसत होतं... समोरची अजस्र विशाल मूर्ती होती . त्या मूर्तीच्या समोर बरोबर ती वाट खुली होत होती.... गण्या चालत निघाला पण या वेळी कोणताच प्रतिकार झाला नाही मागे बाप्पा तीव्र स्वरात मोठ्या आवाजात काहीतरी बडबडत होते.....

गण्या त्या भुयारात पोहोचला व मागे वळणार पण वाट बंद होऊ लागली होती पण आवाज येत होता त्या मूर्तीच्या हातामध्ये असलेल्या घाडग्यातील रक्त सांडून दे आणि दुसर्‍या घाडग्तील हाडे पाण्यात बुडवून टाक.......

ती वाट बंद झाली होती आणि बप्पांचा आवाजही म्हणजे बप्पा त्या ठिकाणीच राहिले होते . याचा अर्थ बप्पाचा मृत्यू निश्चित होता . जे काही करायचे होते ते फक्त आता त्याला एकट्यालाच करावे लागणार होते . शैला तर बेशुद्ध होती . तो पटकन मूर्तीकडे वळाला...

मूर्तीचे हात जमिनीपासून आठ ते दहा फूट उंचीवर होते . त्या हातात जे गाडगं होतं ते त्याला खाली पाडायचं होतं . तो पोलीस अगोदरच त्या हातापर्यंत पोहोचला होता . पोलिसांबद्दल गण्या तर विसरलाच होता . त्या पोलिसाने ते गाडगे सांडून दिले . ते गाडगे खळखळ आवाज करत फुटले . त्यातील रक्त जमिनीवर सांडले . त्या मागोमाग भयंकर ओरडल्याचा , किंचाळण्याचा आवाज आला. ते जे काही होतं ते नक्कीच चवताळलं होतं.....

तो पोलिस आठ दहा फुटांच्या उंचीवरून बेदमपने जमिनीवर आदळला गेला . त्याच्या डोक्याला मार लागला आणि तोही बेशुद्ध झाला . कसेही करून आता गण्याला त्याच्या दुसऱ्या हातातील गाड्यांमध्येही जी हाडे होती . ती पाण्यात टाकणे आवश्यक होते .....

पण सरळ सरळ त्या मूर्तीकडे तो आता पळत जाऊ शकत नव्हता कारण ते जे काही होते ते जागृत झालं होतं व त्यावर हल्ला करायचा प्रयत्न करणारच होतं . त्याही अवस्थेत गण्याने जरा डोकं चालवलं व भुयारातून बाहेर जाण्याचा जो मार्ग होता त्या बाजूला तो पळत सुटला...... तो हुकुम चवताळला होता त्याला गण्याला मारायच होतं . तो घरातून बाहेर जाण्याच्या मर्गाकडे पळाला पण त्याने गण्याला बाहेर निसटू दिले नाही . गण्या हवेत उडाला आणि जोरात विरुद्ध बाजूला येऊ लागला . त्याचा फायदा घेऊन गाण्याने आपले शरीर त्या मूर्तीच्या बाजूला झोकून दिले व तो मूर्ती वर जाऊन आदळला... तो पटकन मूर्तीच्या हाता पर्यंत पोहोचला व ते हातातील घाडगे घेऊन खाली आदळणार तेव्हा त्याच्या लक्षात आले त्याला तर ती हाडे पाण्यात टाकायची होती पण येथे पाणी कुठेच नव्हते....

आणि काय आश्चर्य भुयारात सर्वत्र पाण्याचे झरे लागावेत तसं पाणी भरलं गेलं. गण्याने ती हाडे त्या पाण्यात टाकून दिली . हाडे पाण्यात पडतात न पडताच जोरात किंचाळल्या ओरडल्याचा आवाज येऊ लागला हळूहळू शांत झाला ......

ते जे काही होतं ते नष्ट झालं होतं पण ते पाणी आलं कुठून गण्या मनात विचार करत होता तेव्हाच आवाज आला

" जेव्हा कोणताही मनुष्य आपले अवजड शरीर त्यागून जातो तेव्हा त्याच्याकडे निश्चितच अधिक चेतना शक्ती जागृत होते कारण अवजड शहरांमध्ये तेच आत्मतत्व असते तरीही त्या चेतना जागृत होत नाहीत कारण त्याला जडाचे बंधन असते....

" बप्पा तुम्ही .....?

" जाता जाता तुम्हा दोघांना एकच सांगतो तुम्हाला अजून खूप शिकायचं आहे . तुम्हाला लवकरच कोणीतरी भेटेल जो तुम्हाला सारं काही सांगेल........

" पण बप्पा......." गण्याला एक हुंदका दाटून आला शैलाच्याही डोळ्यातह आसवे गोळा झाली होती...

" रडू नका ....... बाप्पा चा आवाज आला . गाण्याच्या हुंदका कुठल्याकुठे हरवला .शैलाच्या डोळ्यातली आसवेही विरून गेली.... काय आश्चर्य ते दोघेही रडायचे थांबले . बप्पा पुढे बोलू लागले....

" मी तुम्हा दोघांचीही माफी मागतो . मी तुम्हाला या माझ्या नियोजनाची पूर्वकल्पना द्यायला हवी होती . मी याच परंपरेचा पाईक असल्याचं त्याला दाखवत त्याच्या परंपरेत घुसलो होतो . त्याला कसेही करून मारायलाच हवा होते . पण ते मला एकट्याला शक्य नव्हतं म्हणून मी तुम्हा दोघांची वाट पाहत होतो . त्याची परंपरा फार वर्षांपासून चालत आलेली आहे . आता तुम्हा लोकांचा बळी गेला असता तर तो निश्चितच शक्तिशाली झाला असता . पण आपण तिघांनीही त्याला रोखले , ते तुम्हा दोघा शिवाय कधीही शक्य नव्हते .

माझ्या उघड्या डोळ्यांनी मी गण्याची विटंबना पाहत होतो . जी विटंबना तो अंजली च्या रूपात करत होता . माझ्या उघड्या डोळ्यांनी मी ती डायरी त्या गोगलगाय व ते सिरीयल किलींगचं प्रकरण पाहत होतो . पण मी एकटा काहीच करू शकत नव्हतो . या सर्व गोष्टींच्या मागे तोच होता . त्याने त्या सर्व गोष्टी घडवल्या होत्या.

फार पूर्वीपासून त्याची परंपरा चालत आलेली आहे . त्याने सुरुवातीला अमर व्हायचा प्रयत्न केला होता पण तेव्हा तो यशस्वी झाला नव्हता . मग त्याच्या साधकांकडे पिढ्यानपिढ्या त्याने हे प्रकार चालू ठेवले होते . पण मला जेव्हा याविरोधात लढायची वेळ आली तेव्हा मी ती परंपराच बंद करून टाकली . मी एकाचा मृत्यू घडवून आणला व त्याच परंपरेचा पाईक असल्याचे दाखवत त्याच्या या खेळात सामील झालो . त्याच्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता......

नंतर मी तुम्हा दोघांची वाट पाहत होतो तुम्हा दोघांबाबत मला पूर्वकल्पना जाणिवा येत होत्या . जेव्हा मला तुझी जाणीव झाली तेव्हा मी मुद्दाहून तुझ्याबद्दल त्याला सांगितले . तेव्हाच त्याने तुला त्या अघोरी बेटावर येऊन वाचवले .....

पुन्हा एकदा सांगतो . तुम्हाला खूप शिकायचं आहे . तुमचं आयुष्य आता पूर्वीसारखे राहिलेले नाही . तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे . त्याला कलाटणी मिळालेली आहे . त्याला परिसाचा स्पर्श झाला आहे . ते आता सोनं झालं आहे .

तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर असेच लढे द्यावे लागतील . तुमची निवड झालेली आहे.....

आणि एकाकी तो आवाज बंद झाला . त्या दोघांनाही या जगात दृष्टांविरुद्ध लढण्याची जबाबदारी देऊन . इतक्यावेळ वेळ ते शांत राहिलेले दोघेही हुंदके देऊन रडू लागले.........

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

shudha lekhnacha thoda problem ahe bhau . katha thodi dhaslalyasarkhi vatli romanchik vatli nahi.
katha ajun pudhe geli pahije , aani nehami pramane kadddaak zhali pahije ......pu.le.shu.
baki matra kaddddaak zhaliye katha.