सागर किनारे... दिल ये पुकारे...

Submitted by फारुक सुतार on 18 November, 2014 - 13:46

प्रचि:१
MB SS 12.jpg

कही दूर जब दिन ढल जाये...
सांज की दुल्हन बदन चुराये, चुपके से आये...
मेरे ख़यालों के आँगन में, कोई सपनों के दीप जलाये...दीप जलाये...

समुद्र किनारा कोणाला नाही आवडत?… मला वाटते भावनांना मोकळीक देण्याचे हे योग्य ठिकाण असावे…

पाण्यात मनसोक्त डुम्बायचे… कधी किनार्‍यालगत दगडावर बसून तासंतास गत आयुष्यातील अनुभवांची उजळणी करत रममाण व्हायचे…
कधी संध्याकाळी जोडीदाराबरोबर किनार्‍यावर रोमैण्टिक सैर व्हावी आणि ओल्या मातीत बसून गोड स्वप्ने रंगवावीत…
कधी रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडावीत आणि दूरवर नाहीशी होऊ पर्यंत पहात रहावीत …
चौपाटीवर भेळ, पाणीपुरी, चाटचा मनसोक्त आस्वाद घ्यावा…
आणि समुद्र किनार्‍यावरून परत येण्या आधी मनमोहित करणारा सूर्यास्त पहावा…

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी असा अनुभव घेतला असेलच… असाच समुद्र किनार्‍यावर घालवलेला वेळ, त्यावेळी काही काढलेली प्र.चि. आणि आता ते पहाताना मनात येणाऱ्या भावना, त्याबरोबर सहज गुणगुणली जाणारी गाणी, कविता येथे मांडत आहे…

प्रचि २:
MB SS 02.jpg

देवाची किमया खरच अपरंपार… आणि सूर्यास्त होत असताना तो जो काय किमया करतो तो अवर्णनीय, अविस्मरणीयच …

चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतीयाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...

प्रचि ३:
DSC_2449.JPG

समुद्र/सागरा बद्दल लिहितोय आणि "सागरा प्राण तळमळला…" हि स्वात्यंत्रवीर सावरकरांची स्फूर्ती दायक कविता आठवणारच…

प्रचि ४:
IMG_3599.jpg

अश्या रोमैण्टिक ठिकाणी आपल्या जीवनसाथी बरोबर वेळ घालवणे म्हणजे केवळ अविस्मरणीय अनुभवच…

सागर किनारे, दिल ये पुकारे… तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है
जागे नज़ारे, जागी हवायें… जब प्यार जागा, जागी फिजायें
पल भर तो दिल की दुनियाँ सोयी नहीं है…
लहरों पे नाचे, किरनों की परियां… मैं खोयी जैसे, सागर में नदियां
तू ही अकेली तो खोयी नहीं है …

प्रचि ५:
DSC_2472.JPG

कधीतरी आयुष्यात समुद्रच्या किनार्‍यावर एकांतात वेळ घालवावा... आठवणी, बरे वाईट अनुभव, विचारांनी जीवनरूपी खोल समुद्रातुन लाटांप्रमाणे बाहेर यावेत, मन रुपी कड्यावर आदळून डोळ्यांचे किनारे अलगद ओलाऊन जावेत... समुद्राची लाट जाताना नवीन स्वच्छ वाळू किनार्‍यावर सोडुन जाते तशी वैचारिक लाट जाताना सल काढून स्वछ भावना मनात सोडुन जावी… मन शांत व्हावे… नवीन उमेद मिळावी… समाधानी वाटाव आणि या अथांग समुद्राने जीवनाच्या प्रत्येक टप्यावर अशीच साद घालावी आणि पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जाण्याचा योग यावा… असाच एक दोस्त समुद्रकाठच्या दगडांवर आपल्या विचारांत रंगून गेलेला मला दिसला… हा "विक्रांत" काय विचारात असेल?…

प्रचि ६:
MB SS 07.jpg

जीवनाच्या चढ उतारात हाच सूर्य कधी कधी स्फूर्ती देणारा असतो… एखाद्या सुखद घटनेने, यशाने… आत्मविश्वास दुणावतो, स्वप्ने अजून मोठी होतात, अश्यात आकाश ठेंगणे वाटायला लागते, सूर्यतर तळ हातावर सामावतो आणि नकळत हे बोल ओठातून येतातच…

प्रचि ७:
MB SS 0100.jpg

ए साला…
अभी अभी हुआ यक़ीन की आग है मुझ में कही…

हुई सुबाह मैं चल गया…

सूरज को मैं निगल गया…

रु-ब-रु रोशनी…. हे…

प्रचि ८:
MB SS 01.jpg

सूरजकी बाहोंमे अब हे ये जिंदगी… किरणे हे सांसोंमे बातोंमें रोशनी…

प्रचि ९ अ:

MB SS 15.jpg

समुद्राचा आणि नावेचा देव आणि भक्ता इतकाच जवळचा संबंध… सूर्यास्ताला परतीच्यावेळी, सुर्य… परतणारा पक्षी आणि परतणारी होडीचे हे दृश्य…

कश्ती का खामोश सफ़र हैं, शाम भी हैं, तनहाई भी
दूर किनारे पर बजती हैं, लहरों की शहनाई भी
आज मुझे कुछ कहना हैं, आज मुझे कुछ कहना हैं…

प्रचि ९ ब:
MB SS 03.jpg

प्रचि १०:
IMG_9872.JPG

समुद्र हे तर कोळी बांधवांचे साम्राज्य… आणि हे दृश्य पाहून कोळी गीत तर स्मरणाला हवेच…

वल्हव रे नकवा हो वल्हव रे रामा …
मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा…
घर पाण्यामंदी, बंदराला करती येजा… मी डोलकर दर्याचा राजा…

प्रचि ११:
MB SS 04.jpg

हळूहळू सूर्य क्षितिजाला निरोप देण्यास अधीर होतो… डोळ्यादेखत आगीचा गोळा समुद्राने सामाऊन घ्यावा आणि पाण्याने निखारे विझावेत असा सऱ्ररकन आवाज व्हावा…

प्रचि १२:
MB SS 17.jpg

हा विहंगम सूर्यास्त पहात असताना संदीप खरेंचे या खालील ओळी खरच अनुभवायला होतात…

हा समुद्र...
हजार लाटांनी समजावतो आहे या तटाला
तरीही त्याचे ’जमिनपण’
प्रत्येक लाटेला ओसरवताना
रंगीतच होते आहे अधिकाधिक......!

बदलते,मावळते रंग
गोंदवून घेण्याचा
मनस्वी छंद या वाळूला
खूप जुना !

त्या मावळत्या तांबड्या टिकलीला
हे कपाळ रोजचेच...
युगानुयुगांचे अभंग पातिव्रत्य !

प्रचि १३:
MB SS 11.jpg

दूरवर विरघळते आहे
आणखी एक संध्याकाळ
समुद्राच्या पाण्यात...
...तू कुठे आहेस, प्रिय ?
बघ, हे जीवघेणे विरघळणे ......

खूप वरचे स्वर लागताहेत आज
अचूक आणि भिजलेले...
त्यात हा समुद्राचा अखंड खर्ज...
असेच गाणे येईल ?

जायची वेळ ! वारा सुटलाय...
माझी परतती पावलंही
त्रयस्थपणे पुसतो आहे हा समुद्र !
दुसर्याला रडवणारी
कसली ही स्थितप्रद्न्यता......प्रिय?

मी नसेन
तेव्हाचा समुद्र पाहायचा आहे......

मी नसताना
खडकांच्या गळ्यात हात टाकून
उदास ह्सत असेल हा...
...असेल ना, प्रिय ?.......

येतो...सार्यांनो...येतो...

...हुरहुर...
...लाटेगणिक...
...लाटाभर...

-संदीप खरे.

प्रचि १४:
MB SS 16.jpg

सूर्याला असा मावळताना पाहून अंत:करन नकळत जड होत जाते… नभाच्या कैनवसवर पिवळे तांबडे रंग उधळून, सुंदर देखावे सादर करून, आपले सामर्थ्य "सुरज हुं जिंदगी की रमक छोड जाउंगा… मी डूब भी गया तो शफक छोड जाउंगा…"… या शब्दात तो मांडून जातो…

प्रचि १५:
MB SS 05.jpg

क्षितिजाच्या पार वेड्‌या संध्येचे घरटे
वेड्‌या संध्येच्या अंगणी रात थरथरते
कुणी जा दूर तशी मनी हूरहूर
रात ओलावत सूर वात मालवते...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! मंडळी... खुप छान वाटले तुमची प्रतिक्रिया वाचुन...

@अवल: फोटो हॉटेल रूम मधुन, उंचावरुन बराच झूम करुन काढला आहे...

@माधव: अनुमोदन!

हा सागरी किनारा, ओला सुगन्ध वारा! मस्त.

अप्रतीम फोटो ! खूप छान थीम निवडलीत.:स्मित: अजून समुद्र पहाण्याचे/ अनूभवण्याचे सौभाग्य प्राप्त झालेले नाहीये.:अरेरे:

तसे लहानपणी पाहिले, ते आता आठवत नाही. आता पुढे म्हातारपणात तरी जायला मिळेल का हे बघावे लागेल.:फिदी:

@श्री, च्याटमचाट , बोबडे बोल, निलुदा, रश्मी.. , kamini8, सहि, मनीमोहोर... धन्यवाद!

@रश्मी.. "अजून समुद्र पहाण्याचे/ अनूभवण्याचे सौभाग्य प्राप्त झालेले नाहीये..."

कधी वेळ काढुन नक्कि जा समुद्र किनारी आणि ही मजा एकदा घेउन पहाच...

अप्रतिम प्र.ची आणि वर्णन...
सूर्याला असा मावळताना पाहून अंत:करन नकळत जड होत जाते+++ अगदी अगदी.

Pages