Submitted by सुप्रिया जाधव. on 24 January, 2019 - 04:24
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ?
राधिके येईल मोहन, समजवत यमुना म्हणे !
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !! धृ !!
गोपिकांचा घोळका उद्विग्न का करतो तुला ?
गंध येतो वेगळा हरएक फुललेल्या फुला !
मान्य कर, अष्टौप्रहर सोडून दे खंतावणे
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !!१!!
बासरी उच्चारते ना मंत्र नावाचा तुझ्या ?
मोरपिस मुकुटातले व्याकूळ ना बघण्या तुला ?
वेगळे ह्याहून नाही ना तुझेही मागणे ?
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !!२!!
सानिके कानात तुझिया गुपित आहे सांगते
सावळ्याच्या अंतरीची ओढही मी जाणते
भेटण्यासाठी सजण व्याकूळ आहे साजणे
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !!३!!
राधिके येईल मोहन, समजवत यमुना म्हणे !
पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ? !! धृ !!
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह सुप्रिया ताई , अप्रतिम
वाह सुप्रिया ताई , अप्रतिम
एक, एक ओळ काळीज चिरून आत
एक, एक ओळ काळीज चिरून आत शिरली...
खुप सुन्दर... हृद्य आहे
खुप सुन्दर... हृद्य आहे
खूप छान☺️
खूप छान☺️
खुप खुप मनापासून धन्यवाद
खुप खुप मनापासून धन्यवाद सर्वांना
अप्रतिम
अप्रतिम
वाह! खुपच सुंदर!!!!
वाह! खुपच सुंदर!!!!
रचना आवडली !
रचना आवडली !
खुप खुप आवडली !!
खुप खुप आवडली !!
खुप सुंदर!
खुप सुंदर!
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
खूप सुंदर ताई...पापण्यांना
खूप सुंदर ताई...पापण्यांना बांधशी का आसवांची तोरणे ?> किती सुंदर सुरूवातच आहे...
बाकी सगळ्या उपमा अप्रतिम...
धन्स माऊ
धन्स माऊ
Here Krishna hare Krishna
Here Krishna hare Krishna