स्नेहलता !!!!

Submitted by मण - मानसी on 25 January, 2019 - 07:46

सकाळची प्रसन्न वेळ होती.साधारण आठ वाजले असतील.कोवळ्या उन्हामध्ये बाल्कनी मध्ये निवांत पेपर वाचत बसले होते.एवढ्यात माझा मोबाईल रिंग झाला.स्क्रीन वर तरुण च नाव झळकत होत.एवढ्या सकाळी तरुण चा कॉल पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. थोड्यात काळजी वाटली सगळं ठीक असेल ना.लता ची तब्बेत ठीक असेल ना.कालच तर बोलले होते मी तिला.एवढ्या सकाळी आलेल्या कॉल ने नको ते सगळे विचार एका क्षणात डोक्यात आले.
मी कॉल उचलला.....
" मावशी आई ला हॉस्पिटल ला आणलेय काल रात्री अचानक तिला अस्वस्थ वाटत होत आणि नंतर छातीत दुखायला लागलं.डॉक्टर म्हणत आहेत कि घाबरण्याचं कारण नाही पण ती अजून ती शुद्धीवर नाहीए, माऊ मला भिती वाटतेय तू ये प्लीज "तरुण रडत रडतच म्हणाला.तरुण च्या तोंडात माऊ हे शब्द मी खूप दिवसांनी ऐकत होते मला तरुण चा तो लहान मुलांसारखं घाबरलेला चेहरा डोळ्यासमोर आला.
तू काळजी करू नकोस मी निघते लगेच.त्याच्याशी बोलत बोलतच मी गाडीची चावी, घराचं कुलूप हॉस्पिटलचं नाव आणि काही पैसे अश्या काही गोष्टी घेत घाईतच बाहेर पडले बाहेर पडताना फक्त ती सुखरूप असूदेत हीच प्रार्थना करत होते.

स्थळ : नीरजा हॉस्पिटल

पंचावन्न साठ वर्षांची स्त्री शांत पडलेली आहे बेड वर जस की झोपलीय.डॉक्टर नर्सेस आणि अजून काही मेडिकल कर्मचारी आहेत शेजारी.दरवाज्याच्या काचेतून साधारण पंचविशीतला एक मुलगा डबडबलेल्या डोळ्याने पाहतोय तिला.त्याच्या बरोबर साधारण त्याच्याच वयाची एक तरुणी आहे.जिने त्याला धीर देण्यासाठी त्याच्या खांद्यावर हाथ ठेवला आहे.

रिसेपशनिस्ट ला ICU विचारून मी धावतच ICU जवळ आले तिथेच तरुण उभा होता त्याच्या लाडक्या मावशीला पाहून तो धावतच तिच्या कडे गेला." मावशी आई...., माऊ आईला बघ ना ग.डॉक्टर म्हणतायत काही सिरीयस नाहीए मग आई अजून शुद्धीवर कशी नाही येतेय ग ?" "मला खूप काळजी वाटतेय".

एवढ्यात डॉक्टर बाहेर आले ,"इथे सौम्या कोण आहे? सौम्याचं नाव घेत आहेत त्या.त्या शुद्धीवर येतील तेव्हा सौम्या त्यांच्या समोर असतील तर त्या लवकर रिकव्हर होतील.ते इथे नसतील तर त्यांना बोलावून घ्या"

डॉक्टर कडून सौम्या हे नाव ऐकून मी तर हादरूनच गेले.अडोतीस चाळीस वर्षांपूर्वीची माणसं आणि नाव डोळ्यासमोरून ताजी होत गेली.बिचारा तरुण काही न कळल्याने फार गोंधळाला होता.माझ्याकडे बघत म्हणाला माऊ "आपल्याकडे कोणीच सौम्या नाहीए मग आई कोणाची आठवण काढतेय?"

दुपार पर्यंत चा वेळ असाच गेला सौम्या कोण हा विचार करण्यात खरं तर विचार फक्त तरुण करत होता मी तर फार लांब गेले होते आठवणींच्या पुस्तकात फिरत.
नर्सने ICU मधून बाहेर येत काही औषधनांचे नाव लिहून दिले आणि आणायला सांगितले.माधवी तरुण बरोबर असलेली त्याची सखी आणि लवकरच होणारी अर्धांगिनी त्या गोळ्या आणायला गेली.

तरुण ची घालमेल मला पाहवत नव्हती आता. खूप बेचैन झाला होता तो आई च्या काळजीने आणि सौम्या कोण ? या प्रश्नाने.

खूप धीर एकवटून मी त्याला बोलले मला माहित आहे कोण आहे सौम्या ते.

त्याने एकदम आश्चर्याने मला विचारले कोण आहे सौम्या? कुठे आहे? आईच्या आश्रमात कोणी आहे का? आई फार लवकर आपलंस करते कोणालाही तिने लग्न लावून दिलेल्या लोकांपैकी आहे का कोणी? पण असा असेल तर माधवीला तरी माहिती असायला हवे होते ती तर आई बरोबरच असते आश्रमात.माऊ प्लीज सांग कोण आहे सौम्या?

डोळ्याचे पाणी पुसून आणि पूर्ण धीर एकवटून मी तरुण ला सांगायला सुरवात केली,

"लता आणि मी लहानपणापासून एकत्र बहिणी पेक्षा जास्त प्रेम आमच्यात एकवेळ स्वतःला खोटं बोलू पण एकमेकींना सगळं खरं आणि खोटं बोललेही नाही जायचे कारण लगेच पकडले जायचो.तुझी आई खूप साधी सरळ शांत. कधी कोणाचं एक नाही कि दोन नाही ती आणि तिचा अभ्यास ,घर ,शाळा बास एव्हडेच तिचं आयुष्य.तिचं एकच ब्रीद होत मला माझे कर्तव्य पूर्ण करायचेत.मला माझ्या आई वडिलांना कायम सुखी ठेवायच आहे.आत्ता मी जी हि काही आहे त्यामध्ये तिचा खारीचा वाटा आहे."

एक सुस्कारा सोडला आणि पुढे बोलू लागले," आमची शाळा झाली आणि आम्ही कॉलेज ला पण एकत्रच ऍडमिशन घेतलं.एक एक दिवस पुढे जात होते.कॉलेज मध्ये ओळखी होत होत्या.मी,स्नेहलता (तुझी आई),वैभव,आदित्य,गौरांग,रोशनी,अभिलाषा आणि सौमित्र असा आमचा बऱ्या पैकी मोठा ग्रुप झाला होता.आम्ही सगळे वेगळ्या फॅमिली बॅकगोरुंड चे, वेगळे ध्येय ठेवणारे पण वाटा मात्र असणारे सहप्रवासी झालो होतो. तरीही लता ला मी आणि मला ती ही जागा कधी कोणी घेऊ शकलं नाही. कॉलेज मध्ये आम्ही वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेत होतो काही जिंकत होतो काही हरतं होतो पण एकत्र राहून पूर्ण धमाल करत होतो."

माधवी नर्सना गोळ्या देऊन आली आणि शांतपणे आमच्या जवळ येऊन आमच्या संवादाचा एक भाग झाली.
"धमाल करत मजा मस्ती करत पाहिलं वर्ष पूर्ण झालं होत आणि त्यावर्षाबरोबर आमची मैत्री देखील. परीक्षा संपल्या आणि आता १ महिना सुट्टी होती. एक महिना आम्ही कोणी कोणाला भेटणार नव्हतो.सुट्टी लागून एक आठवडा झाला आणि मी स्नेहलता ला भेटायला तिच्या घरी गेले होते तर ती तिच्या घरी झोक्यावर बसून काहीतरी विचार करत होती.ती विचारात एव्हडी अडकली होती की मी तिच्या इथे जाऊन तिला हलवले नाही तोपर्यंत, मी आले आहे हे तिच्या ध्यानातच आले नव्हते.मी तिला विचारले काय ग काय झालं एव्हडा काय विचार करतेयस तर तिने सांगितले की "अतुल दादा म्हणजे तुझा मामा लताचा चुलत मोठा भाऊ त्याने एक मुलीशी प्रेम विवाह केला आहे म्हणून घरातल्यांनी त्याला घराबाहेर काढले आहे आणि परत कधी तोंड नाही पाहायचे म्हणून सांगितले आहे. त्यांनी लताला पण त्याने तोंडही न पाहण्याची सक्ती केली होती. लता अतुल दादाला भेटू शकणार नाही याने खूप दुखी झाली होती.तिला कसे तरी समजावून तिला शांत केले".

मला तेव्हा काय माहित होत एक वादळ शांत करत असताना दुसरा वादळ चालू होणार आहे.थोडं पाणी घेऊन पुढे सांगायला चालू केले " पुन्हा कॉलेज चालू झालं पुन्हा आमचा ग्रुप दंगा मस्ती आणि न संपणार वादळ.दरम्यानच्या काळात कॉलेज उपक्रमासाठी आमचे गट तयार करण्यात आले होते मी, वैभव, रोशनी एका गटात आलो तर सौमित्र , लता आणि आदित्य एका गटात.उपक्रमामुळे आम्ही सगळे रोज एकत्र भेटत नसलो तरी मैत्री तशीच होती.अभ्यास उपक्रम या सगळ्यात मी आणि लता थोड्या दूर तर ती आणि सौमित्र थोडे जवळ आले."
"सौमित्र तसा बड्या घरातला,दिसायला चांगला आणि सुस्वभाळु मुलगा होता.त्याच पूर्ण कुटुंब शिक्षित आणि मनमोकळं होत.त्याच्या घरामध्ये त्याला पूर्ण मोकळीक होती त्याचे निर्णय त्याने घ्यावेत ही रीत होत.एकूणच कोणालाही कशाचंही बंधन नव्हतं.पण म्हणतात ना कोणाचंही धाक नसणे हाच मोठा धाक असतो तसाच काहीस तो सगळ्यांचा मान ठेवायचा आणि योग्य ते करायची हिंमत पण.तर या विरुद्ध लता च्या घरात वातावरण होत लता अत्यंत पौराणिक घरात वाढलेली मुलगी धर्म , पंथ , प्रथा या सगळ्यात समाज तोलणाऱ्या घरात राहिलेली.तिलाही बंधन नव्हती पण एका मर्यादे पर्यंत तिला पण तिचे निर्णय स्वतःच घ्यायला लावले जायचे पण एका मर्यादेपर्यंत.उदाहरण च सांगायचं तर तुला शिकायचंय तर शिक पण काय शिकायचं हे आम्ही ठरवणार.पण माझी लता खूप सोशिक होती भावाशी नातं संपल्या नंतर आई - बाबांना खूप सांभाळून घेत होती.त्यांचा एक शब्द पण खाली पडून नाही द्यायची.काका-काकूंना खूप अभिमान होता तिचा.त्यांचं सर्वस्व झाली होती ती. कधी भावाचा विषय निघालाच तर काका काकू म्हणत तिला बेटा फक्त आपल्या जातील बघ ग पोरी मुलगा ."

"कॉलेज मध्ये ट्रॅडिशनल डे होता सगळ्या मुली साड्या नेसून आल्या होत्या, लता आधीच दिसायला छान त्यात साडी म्हणल्यावर मुलांची तर चांदीच होती.आम्ही कॉलेज पोहचलो आमचा ग्रुप तिथेच होता रोशनी आणि अभिलाषा ने देखील साडी नेसली होती.सगळे एकमेकांना चिडवत कॉम्प्लिमेंट्स देत चालले होते तेव्हड्यात सौमित्र आला किती छान दिसत होता तो त्यादिवशी तो डायरेक्ट लता ला कॉम्पिटिशन देत होता ;).तो आल्यावर आम्ही सगळे कॅन्टीन कडे गेलो जाताना आम्ही सगळे पुढे गेलो पण लता आणि सौमित्र मागे राहिलेले कोणाच्याच ध्यानी नाही आले.त्यादिवशी कॅन्टीन मध्ये सगळ्यांसमोर सौमित्र लताला बोलला ती खूप छान दिसतेय पण ते आम्हाला कोणालाच कळले नाही.म्हणतात ना जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तुमचं जागाच वेगळं असतं."

"दिवस पुढे सरकत होते इकडे यांचे एकमेकांची काळजी घेणे सतत सोबत देणे, आत्मविश्वास वाढवणे,कधी कळत कधी न कळत हक्क गाजवणे चालूच होते.ते बहरत होते. नव्या भावनांमध्ये खेळत होते.सौम्या म्हणजे सौमित्र नेहमी म्हणायचं लता त्याच गुड लक आहे. आणि खरंच असा काहीस असावं ती त्याच्यासोबत असेल तर तो यशस्वी व्हायचं मग ते कबड्डीचा मैदान असो वा कॉलेज च इलेकशन." मी आत्ताचे तरुण तरुणी पहाते शरीर संबंधांना प्रेमाच्या व्याख्या देऊन फक्त स्वतःची भूक मिटवणं चालू आहे."सौम्या आणि लता तसे नव्हते ते मनाने बांधलेले होते,त्यांनी त्यांच्या मर्यादा कधी ओलांडल्या नाहीत. कदाचित म्हणूनच ते जास्त दृढ झाले.कदाचित म्हणूनच ते जास्त बहरले.नात्याला हळू हळू उलघदडण्यातला आनंद त्यांनी घेतला."

तरुण च्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न होते, ज्याचे उत्तर देणे गरजेचे होते.

"वेळ कोणासाठी थांबत नसतो.लता च्या घरी लग्न साठी बोलणी चालू झाली होती. लताला सौमित्र शी लग्न करायचं होत पण आडवी येत होती ती त्यांची जात.लता ने घरी समजावण्याचा खूप प्रयत्न केला सौमित्र च्या घरी काही अडचण नव्हती.घरचे ऐकत नाहीत हे पाहून तिने त्याला पळून जाण्याविषयी पण सुचवले मी तर यावर विश्वासच करू शकले नव्हते लता हे बोलतेय....पण सौमित्र चांगल्या घरातला एक भावानळु मुलगा होता.त्याने लता ला समजावले आपण जन्मभर लग्न नाही केले तरी चालेल पण होईल ते घरच्यांच्या संमतीनेच.त्याच्या विषयीच विश्वास आणि प्रेम तेव्हा अजूनच वाढलं होत.
लता ऐकत नाही पाहिल्यावर तिच्या आई बाबांनी तिला एक दिवस सांगितलं तुला पाहिजेच तर आम्ही तुझं लग्न लावून देतो त्या मुलाशी पण नंतर आमच्या दहाव्याला पण नाही यायचं आणि आमचं तोंडही नाही पाहायचं.आणि जर आमच्या बरोबर पाहिजे असेल तर आम्ही सांगू त्यामुलाशी लग्न करावं लागेल. आयुष्य ज्या मुलीने फक्त आई वडिलांचा विचार केला त्या मुलीला हे बोलणं जिव्हारी लागलं.तिने वेळ मागून घेतला आणि सौमित्र च्या कानावर घातली ही गोष्ट.सौमित्र ने तिला यातही साथ दिली.तिचे कर्तव्य त्या दोघांनी पूर्ण केले.त्याने लग्न करून तिचा हात नाही धरला पण तिची साथ ही नाही सोडली.त्यानंतर सौमित्र ची अवस्था मात्र फार वाईट झाली त्याच्या घरच्यांना ते पाहवत नाही म्हणून त्यांनी त्याच लग्न लावून दिल. लग्न झाल्यावर माणसं रिकामी राहत नाहीत या खोट्या आशेवर.इकडे तुझ्या बाबांचं म्हणजे शंतनू परांजपे च स्थळ आले लता साठी, तिने नाही किंवा हो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.लग्न हे एक नफ्याचा करार होता तिच्यासाठी ज्यामध्ये जात नावाचा राक्षसाने तिच्या प्रेमाचा बळी घेतला होता."

"देवकृपेने त्याच सगळं चांगलं झालं आणि तिचंही पण सौमित्र वरच प्रेम नेहमीच डोकं वर काढायचं देवाच्या पाय पडताना, नदीत दिवे सोडताना आश्रम चालू करताना पण". तरुण तुला आठवत तू तिला विचारलं होतास एकदा "की लोक अनाथाश्रम, वृद्धाश्रम चालू करतात तू जोडप्यांसाठी का आश्रम चालू केलास? मला वाटते ती त्या प्रत्येक मुलात सौमित्र शोधात असावी आणि मुलीत स्वतःला."

तरुण आणि माधवी ला आत्ता समजलं होत की माधवी ला हो म्हणताना आईच्या डोळ्यात पाणी का होते?

"मला एक किस्सा आठवतोय तुझ्या जन्माच्या आधी एक दिवस अचानक ती आली होती माझ्याकडे आणि मला विचारलं होत " त्याच लग्न झालेय किंवा माझं लग्न झालेय म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करू नयेत का? की भावना आणूच नयेत? पण कोणासाठी काहीतरी मनात भावना येणं आपल्या हातात आहे का? मी खोलात जाऊन विचारले तर सांगितले की आत्ता येता येता एका ट्रक शी तिचा मोठा अपघात होता होता वाचलाय पण त्या क्षणी आई, बाबा, भाऊ, शंतनू हे कोणीच नाही आठवले, आठवला तो सौम्या माझा सौमित्र.खूप समजावलं मी स्वतः ला ,तो तुझा नाहीए पण...."तिच्या कोणत्याच प्रश्नच उत्तर माझ्याकडे नव्हतं.तिला आहे त्या परिस्थितीत साथ देणं या पलीकडे मी काहीही करू शकत नव्हते. कधी कधी वाटायचं तिला म्हणावं जा सगळं सोडून तुझ्या सौम्या कडे पण मी ओळखते तिला तिचे कर्तव्य तिच्या मर्यादा याच भूत आहे डोकयावर तिच्या नाही ऐकणार ती.सगळे कर्तव्य मूक पणे सांभाळताना सर्वात मोठं पाप ती वेळोवेळी करत होती क्षणोक्षणी स्वतः ला मारत होती आणि जगाला भासवत होती ती सुखी आहे."

"काय जादू होती त्याच्या प्रेमात माहित नाही,आज मरणाच्या दारात पण तिला तो हवा आहे"

"देवा प्लीज मरण्याच्या आधी एकदा त्यांना भेटवं एकदा मनसोक्त बघूदेत एकमेकांना" असा म्हणत रुमालाने मी डोळे टिपून घेतले.
तरुण ने मला विचारले तुझ्याकडे त्यांचा नंबर आहे का? मी बोलावेल त्यांना.
माझ्याकडे त्याचा नाही पण वैभव चा आहे नंबर. वैभव, अभिलाषा असे सगळे संपर्क केल्यानंतर कसातरी सौमित्राचा नंबर मिळाला.
तरुण ने कॉल केला तीन रिंग नंतर कॉल उचलल्या गेला. तरुण ने माझ्याकडे कॉल दिला. मी गरजेची सगळी माहिती देऊन मी त्याला येण्याची विनंती केली. तो ही लगेच तयार झाला आणि कॉल केल्यानंतर ५ तासात तो हॉस्पिटल ला हजर झाला.

देवानं माझी प्रार्थना ऐकली असावी.पस्तीस वर्षानंतर दोन प्रेमी एकमेकांना भेटणार होते.
सौम्या आत गेला त्याने लता चा हात हातात घेतला आणि बोलला " लता उठ बघ मी आलोय तुला भेटायला.लता बघ ना सगळं जग सोडून आलोय मी तुझ्यासाठी."
लताने डोळे उघडले "तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने एकवार सगळ्या रूम मध्ये नजर फिरवली तरुण, मी, माधवी आणि तिचा सौम्या सगळे होतो.ती बोलू लागली " सौम्या मला माफ कर माझ्या कर्तव्यांची शिक्षा मी तुला दिली.मला विसरू नकोस मी तुझी होऊन तुझी नाही झाले."
सौम्या हसून बोलला " अगं वेडे आपण कायम एकमेकांचेच होतो आणि राहणार."

धो धो पावसानानंतर निरभ्र आकाश राहावं तसा सगळं स्वच्छ होत.अपूर्णच एक प्रेम कथा पूर्ण झाली होती.

जातीचा राक्षस पुन्हा हरला होता.प्रेमाने त्याचा डाव जिंकला होता.आज सगळेच समाधानाने सुखाने नांदू लागले होते.माणसाने माणसाला माणसासारखे मानलं होते.

प्रत्येकामध्ये एक लता आणि सौमित्र असतो निस्वार्थी,निराकार प्रेम करणारा त्याला जात ,धर्म ,गरीब ,श्रीमंत याच बालंट नको लावायला.प्रेम दिले तर प्रेम भेटेल आणि दुनिया तरेल.

@किर्ती कुलकर्णी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults