नव-याला कसे रिझवावे ?

Submitted by पाटलीण बोवा on 22 January, 2019 - 08:53

हल्ली कामाच्या ओझाखाली बिच्चारे नवरे दबून आणि दमून गेलेले असतात. त्यामुळे घरी आल्यावर त्यांना कसलाही उत्साह नसतो.
चहापाणी झाले की लगेचच लॅपटॉप उघडून कामाचं ओझं उरकायचा प्रयत्न चालू होतो.
बायकांना मग राग येतो. हा प्राणी मग घरी तरी का येतो असं होऊन जातं ..

पण दिवसभर टीव्हीपुढं लोळत तुपारे, मानबा बघून नव-याच्या मनःस्थितीचा अंदाज येत नाही.
नव-याला बायकोने रिझवावे लागते असे आजीने सांगितले होते. पण नेमके काय करायचे हे सांगितले नाही.

मी मग गाणी म्हणून त्याला खूष करायचा प्रयत्न केला

रूठे रूठे सैय्या, मनाऊ कैसे

या गाण्यावर तो फिस्कारून लॅपटॉप घेऊन स्टडी मधे जाऊन कडी घालून बसला.

एकदा

सुबह और शाम, काम ही काम या गाण्यावर नाचून दाखवले..

पण स्वारी काही खुलत नाही. मलाही उदासवाणे वाटतेय,

तरी पुरेशा गांभीर्याने व फालतूपणा न करता योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
नव-याला कसे रिझवावे ?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघा ना सेम माझीसुद्धा हीच हालत झालीय बघाs s
मी गाणं गा गा गायलं,
नाच नाच नाचले!
पाय माझे दुखले,
घसा माझा बसला!
नवरा मात्र नाहीच ना हासला!!!!
काय करावे,कसे करावे काही म्हणजे काही कळेना झालेय!!!!!!बरे झाले तुम्ही विषय काढलात म्हणून--- मलाही तेवढीच मदत !!!! तुम्हाला मार्गदर्शन मिळाले की मलाही त्याचा प्रयोग करता येईल.

<<< पण स्वारी काही खुलत नाही. मलाही उदासवाणे वाटतेय >>>
मग शेजारणीच्या नवर्‍याला रिझवायचा प्रयत्न करून बघा.