संभाजी : येत आहेत

Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50

संभाजी : येत आहेत

झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.

Upcoming Sambhaji Maharaj serial teaser

https://www.youtube.com/watch?v=AjKvkh1Qweo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाजी गेल्याचं संभाजीला खरंच कळवलं नव्हतं का. किती ती कारस्थानं. संवाद छान आहेत. थोरल्या आईसाहेबांवर काय कारवाई हेते ते बघायची ऊत्सुकता आहे.

मी वाचलं आहे की सोयराबाईंचे सगळे अधिकार संभाजीराजे काढून घेतात व त्यांना एकप्रकारचं नजरकैदेत ठेवतात. अनाजीपंताना सुद्धा हत्तीच्या पायदळी दिलं होतं. आता बघू सिरियल मध्ये काय दाखवतात.

जनरली ज्या सिरियल चांगल्या असतात त्याबद्दल इथे जास्त लिहिले जात नाही म्हणजे पिसे काढली जात नाही.
सिरीयलचा दर्जा आणि त्या सिरीयलवरच्या धाग्यावरचे प्रतिसाद यांचे प्रमाण व्यस्त असते Happy

सिरीयलचा दर्जा आणि त्या सिरीयलवरच्या धाग्यावरचे प्रतिसाद यांचे प्रमाण व्यस्त असते >> असचं असेल त्यामुळे इथे जास्त चर्चा नाही.

मी लिहीन इथे कधीपासून या सिरिअल वरचा धागा शोधत होते. खरंतर खूप उशिरा सुरुवात केली पाहायला पण आता जाम खिळवून ठेवतेय मालिका. फक्त इतिहास आहे तसाच दाखवावा एवढीच इच्छा आहे.

खरा ईतिहास काय आहे कोणास ठाऊक... संभाजीराजांबद्दल इतक विरोधाभास लिखाण आहे की कळतच नाही की कोणावर विश्वास हेच कळत नाही

मंचकारोहण आणि राज्याभिषेक वेगवेगळे असतात का? दोन्हीचा उद्देश एकच( राजा घोषित करणे असाच आहे ) कि एकात तात्पुरती पदभरती आणि एकात तहहयात ?

एकात तात्पुरती पदभरती आणि एकात तहहयात ?>> असचं असेल.
मंचकारोहण म्हणजे फक्त गादीवर बसणे मंत्रोच्चारण अभिषेक इ. शिवाय असं मला वाटतं.

कित्ती भावनांचा कल्लोळ ऊठला असेल संभाजी महाराजांच्या मनात रायगडावर जाताना Sad
शापित राजहंस त्यांच्यावरचं लिहिलयं ना?

शिवाजी महाराजांनी निवडलेले मंत्री एवढे पाताळयंत्री आणि एकच अजेंडा असणारे असतील का खरच ? सोयराबाई पण महाराजांच निधन झालं, त्यानन्तर शंभूराजांशी बोलायच म्हणत होत्या. आता मात्र अगदी शत्रूसारख वागत आहेत. येसूबाई मात्र फार छान दाखवल्या आहेत. तो काळ उभा करणं कठीण , त्यामुळे युद्धातले दैदिप्यमान पराक्रम अपरोक्ष बोलण्यातून दाखवले आहेत. पण मला तेच पहायला जास्त आवडल असत. आता मात्र एकुण वाईट मंत्री आणि त्यान्च्या आहारी जाणारे इतर ; विरूद्ध मनोगतातून किंवा येसूबाईंशी बोलताना व्यक्त होणारे संभाजीमहाराज असाच फोकस वाटतो आहे. - असो. तरीही इतर तद्दन बंडल मालिकांपेक्षा शंभूराजांची मालिका कधीही उजवीच.

सर्व पात्रांतील कलाकारांनी अतिशय सहज अभिनय केला आहे. भुमिकांची आणि पात्रांची निवड यांना दाद द्यावीशी वाटते.

छ. शिवाजी महाराजांनी निवडलेले मंत्री पाताळयंत्री निघाले कारण खाल्या ताटात विष्ठणारे 'असे' मंत्री अगदी पुर्वापार चालत आले आहेत.
छ. शिवाजी महाराजांनी स्व.कर्त्रुत्वाने निर्माण केलेल्या स्वराज्याचा कारभार कावेबाजपणाने हस्तगत केल्यावर ते रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ 'ठरावीक' नागरीकांनाच पंचपक्वांनाच्या भोजनावळी घालुन फुंकुन टाकणारे दळभद्री असोत ...की... चितोडगड्च्या राजा राजरतनसिंग राजपुत यांच्या राजवटीची हाहाकार उडवणारी अखेर करणारे क्रुतघ्न असोत ...की... राजा चंद्रगुप्त्ताच्या राजवटीची खुनशीपणाअने अखेर करणारे असोत ...की... विजयनगर साम्राज्याची कपटीपणाने राखरांगोळी करणारे असोत.. 'असे' मंत्री सर्वच ठिकाणी ओठी राम आणि काखेत सुरी घेऊन मांजराच्या पावलाने आले आणि आयत्या स्थापुन मिळालेल्या राजवटीवर त्यांनी वाकडा डोळा ठेवला हा इतिहास कोणीही नाकारु शकत नाही.

भले यांना कावेरीबाईंसारख्या समंजस, सत्याने चालणार्‍या पत्नीने लाख समजावुन सांगितले तरी खाल्या ताटात विष्ठायचे ते विष्ठलेच.

खूप सुदंर सुरू आहे मालिका . खिळवून ठेवते अगदी. मी असं वाचलंय की शंभूराजे या वेळी सगळ्या कैद्यांना माफ करतात अन परत आपापल्या पदांवर नियुक्त करतात परंतु त्यांच्या बंडाळ्या परत चालूच राहतात तेव्हा मात्र त्यांना शिक्षा करतात. अनाजी पंतांना हत्तीच्या पायी देतात वगैरे . सोयरा बाईंचे काय होते कुणास ठाऊक. एक मात्र आहे अनाजी पंताची भूमिका करणारा कलाकार अगदी उत्तम अभिनय करतो खूप खूप राग येतो त्याचा. खरं नाव शोधण्याचा प्रयत्न केला जालावर पण नाही सापडले. कुणास माहिती असल्यास सांगा.

एक मात्र आहे अनाजी पंताची भूमिका करणारा कलाकार अगदी उत्तम अभिनय करतो खूप खूप राग येतो त्याचा. खरं नाव शोधण्याचा प्रयत्न केला जालावर पण नाही सापडले. कुणास माहिती असल्यास सांगा.>>>>>> महेश कोकाटे नाव आहे बहुतेक, ठाम असे सांगु शकत नाही, पण चला हवा येऊ द्या मध्ये आले होते ते.

अप्रतीम सिरीयल आणी त्यातल्या पात्रांचा जिवंत अभिनय हेच या सिरीयलचे यश !

3.JPG

जनार्दनपंताचे डोळे काढुन त्याची रवानगी लिंगाणा किल्ल्यावर केली.

नाही काढले डोळे हा सगळा करभार्याना घाबरवण्याचा प्रकार होता. पण ही सिरीयल अत्यंत slow आहे तोच एक प्रॉब्लेम आहे.

एक मात्र आहे अनाजी पंताची भूमिका करणारा कलाकार अगदी उत्तम अभिनय करतो खूप खूप राग येतो त्याचा. खरं नाव शोधण्याचा प्रयत्न केला जालावर पण नाही सापडले. कुणास माहिती असल्यास सांगा.>>>>>मला वाटतंय 'हास्यसम्राट २' यामध्ये ते स्पर्धक म्हणून होते. नंतर एक दोन मालिकेतही दिसले.

@ बोकलत : हो.. अनाजी पंताची भुमिका करणारे महेश कोकाटे हे 'हास्यसम्राट २' होतेच शिवाय त्यांनी भरत जाधवच्या 'पछाडलेला' चित्रपटात बत्ताशा नावाच्या नाच्याची भुमिका देखिल केलेली आहे. ते जीव ओतुन काम करतात हे मनोमन पटते.

battasha.jpg

काल मालिका पहातांना घशाखाली घास उतरेना. खूप गहीवरुन आले जेव्हा मोरोपंत अखेरचा श्वास घेतात. काय बावनकशी अभिनय केलाय या सगळ्यांनी. मोरोपंतांचे काम करणारे अंगद पाटील तर अस्सल मोरोपंत वाटत होते. डॉ. अमोल कोल्हेंचे तर विचारायलाच नको. काल क्षणभर वाटुन गेले की प्रत्यक्ष संभाजी राजे आणी मोरोपंतच समोर आहेत.

मागे दापोलीला गेलो होतो तेव्हा पुण्यास परत येत असतांना आंबेनळी घाट व आजूबाजु च्या डोंगर रांगा पाहुन, दर्‍या पाहुन असे वाटले की कधी काळी येथुन राजे आणी त्यांचे सैन्य कसे ये जा करत असेल? त्या काळात आंबेनळी घाट तर नसेल पण त्या भव्य, अंगावर येणार्‍या पर्वत रांगा, खोल दर्‍या, गर्द वनराई यातुन कसा मार्ग काढत असतील हे लोक? आणी ते ही घोड्यावर बसुन?

आताचे आपण कधीकाळी कोणीतरी मावळे पण असु !

मोरोपंत हे अनाजीसोबत कटकारस्थानात गुंतले होते त्यामुळे त्यांना छ. संभाजी राजांच्या मंचकारोहणात पायरीवर बसु दिले नाही ज्याची बोच मोरोपंतांच्या जिव्हारी लागली आणि त्यातच ते गेले.. तरिही जाता-जाता त्यांना छ. संभाजी महाराज भेटले त्यामुळे नक्कीच मोक्ष मिळाला असणार..!!

हो, कधीकाळी मोरोपंतांनी लुटीतील दागिने लपवुन ठेवलेले होते. आणी त्याच वरुन अनाजीपंत मोरोपंतांना ब्लॅकमेल करत असत. मी बर्‍याच वेळा ते बघीतले, पण मोरोपंतांनी लुटी चे दागिने ठेवलेला भाग बघीतला नव्हता. आणी तसेच हिशेबात पण अफरातफर होती. त्यावरुन अनाजीपंत दोनदा मोरोपंतांना गप्प करतात. कारण मोरोपंत , अनाजी पंत आणी इतर लोकांचे कारस्थान महारांजासमोर उघड करणार असतात. पण नंतर संभाजी राजेंना त्याची कुणकुण लागलेली असते, ते बोलतात पण. याचाच अनाजी पंतांना राग येतो व ते डुक धरुन वागतात.

अनाजी पंतांची कन्या गोदावरी हिची त्या कारस्थानी नवर्‍यापासुन सुटका करण्यात संभाजी राजे सहाय होतात, त्याचा पण त्यांना राग असतो. पण मोरोपंत मात्र राग धरत नाहीत आणी आतमध्ये कुठेतरी आपण आपल्या राजाला फसवत आहोत ही टोचणी त्यांना लागलेली असते. आणी त्यातुनही पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असतांना ते सेवकाला चिठ्ठी देऊन संभाजी राजेंना सावध करण्यासाठी द्यायला सांगतात, पण सोमाजी ते मध्येच पकडतो. यातुनही त्यांना जेव्हा राज्याभिषेकात डावलले जाते तेव्हा ते त्यांच्या जिव्हारी लागते.

प्रत्येक माणुस चूका अनेक करतो, पण जर त्याला खरा पश्चाताप झाला तर देव पण माफ करतो. मोरोपंतांना खरेच पश्चाताप झाला होता, पण अनाजी पंतांना नाही. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन पण कपट केले, त्यातुन त्यांना हत्तीच्या पायी दिले गेले.

Pages