३१ डिसेंबर

Submitted by s.mukund on 17 January, 2019 - 03:37

३१ डिसेंबर ची पार्टी. तिघे जण मित्र असतात व ते ३‍१ डिसेंबर ची पार्टी करायचे ठरवतात व त्यानुसार ते सर्व जण रात्री १०:३० वाजता ठरल्याप्रमाणे बाहेर पडतात.बाहेर पडल्यानंतर रोड वर धमाल मस्ती करत चालेले असतात कारण बाहेर माहोलच नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जल्लोश चाललेला असतो.कारण थोड्याच वेळात नवीन वर्ष चालु होणार असते.पण ते ज्या रोड वरून जाणार असतात त्या रोडवर एक पिझ्झा खाण्याचे स्वस्त व मस्त हॉटेल आहे.असे त्या तिघांपैकी एक मित्र त्या दोघांना सांगतो कि आपण( ४०₹ ला एक आहे असे पण सांगतो. )जाऊन पिझ्झा खाऊ.व ते दोन मित्र पण तयार होतात.ते तिघे मग त्या हॉटेल मध्ये जाऊन टेबलावर बसतात.व मेन्यु कार्ड मागवतात मागितल्यावर ते मेन्यु बघायला लागतात.पण ते कार्ड इग्लिंश मध्ये असते.त्यांना काही कळत नाही कि कुठला पिझ्झा मागवायचा कारण ते पहिल्यांदास तिथे गेलेले असतात.आणि जो वेटर असतो तो इग्लिश मध्ये बोलत असतो.पण ते मोडके तोडके इंग्लिश बोलुन (कारण त्या तिघांना पण इंग्लिश येत नसते.)कार्डमध्ये बघुन अॉर्डर करतात पिझ्झा.व त्यांना मेन्युमध्ये बघुन वाटते की आपण जे मागवले आहेत ते एकावर एक फ्री आहे म्हणुन.पण ते जेव्हा पुन्हा कार्ड निट चेक करतात तेव्हा त्यांना कळते की ते एकावर एक फ्री नाही अाहे म्हणुन.ते अॉर्डची वाट बघत बसतात.तेव्हढ्यात तिथे लाईट जाते व एक मित्र म्हणतो की चला आपण जाऊया येथुन पण एक मित्र म्हणतो की नाही पिझ्झा खाऊनच जाऊ.मग त्यांनी मागवलेला पिझ्झा येतो.व ते खायला लागतात पण त्यांना तो पुर्ण जात नाही म्हणुन ते तो पार्लस करायला व बिल आणयला सांगतात.बिल आल्यावर ते फक्त पिझ्झा लियले आहे त्या पुढिल किंमत वाचुन त्याला बिल देतात व बाहेर पडतात.व त्या हॊटेल पासुन थोड्यास अंतरापर्यंत जात असतात व मागुन त्यांना त्या हॉटेल मधिल वेटर गर्ल हाका मारुन थांबवते व ते तिघे थांबतात व विचारतात की काय झाले.व ति वेटर गर्ल बिल दाखवत ईंग्लिश मध्ये बोलत असते पण त्यांना ते काय म्हणते आहे ते कळत नाही पण जेव्हा ती बिल दाखवुन म्ह्मणते की सर्व्हिस टक्स भरला नाही तेव्हा त्यांना समजते की मोठ्या हॉटेल मध्ये तो द्यावा लागतो.व ते सर्व आपले पाकिट खिसे चेक करतात पक्त एकाच्याच पाकिटात तेव्हढे पैसे निघतात व ते पैसे देऊन थोडे पुढे घेल्यावर ज्या मित्रांने कल्पना दिलेली असते त्याला ते दोघे खुप बोलतात त्याला शिव्या घालतात.पण ऐक मित्र म्हणतो नशीब माझ्याकडे पैसे मिळाले नाहीतर आपल्या तिघांना तिथे भांडी घासावी लागली असती.असे एकुन तो मित्र त्या दोघांची माफी मागतो.व ते ठरवतात कि येथुन पुढे माहीत असेल तरच हॉटेलमध्ये जायचे.पिझ्झा पार्लस घेतलेला असतो तो फुगे विकणारया मुलाला देतात.व त्याच्या चेहरयावरचा आनंद बघुन खुश होतात.व रंगाचा बेरंग झालेल्या पार्टिची आठवन मनात साठवत व येण्यारया नववर्षाचे स्वागत करीत घरी जातात. टिप.हि कथा मी स्वत: लिहीलेली आहे.लेखक- मुकूंद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खुप छान..! तुमच्यात एक हरहुन्नरी कथाकार दडलाय त्यास बाहेर काढा. अजुन खुप मोठा पल्ला गाठायचा आहे तेव्हा नवनविन कल्पना सतत वाचकांसमोर आणा.

बरे झाले मी ३१ डिसेंबर ला हि कथा वाचली नाही....नाहीतर मी संपूर्ण वर्ष कथा न वाचण्याचा संकल्प केला असता. "त्या रोडवर एक पिझ्झा खाण्याचे स्वस्त व मस्त हॉटेल आहे.असे त्या तिघांपैकी एक मित्र त्या दोघांना सांगतो" अरे स्वस्त आणि मस्त पिझ्झा हॉटेल मध्ये फक्त इंग्लिश बोलणारा वेटर आणि स्टाफ भरलाय का?. हॉटेल कुठे आहे भारतात का अमेरिकेत. ते पहिल्यांदाच तिथे गेले असतात पण त्यांना पिझ्झा ४० रुपयाला आहे हा माहित असते. एकावर एक फ्री पिझ्झा भेटला असता तर काय केले असते त्यांना तर एक पिझ्झा पण संपला नाही. अहो मुकुंदराव हॉटेल मध्ये सर्विस टॅक्स बीला बरोबरच येतो तो काय हॉटेल मधून बाहेर पडल्यावर गेट किपर ला द्यायचा नसतो. "सर्व्हिस टक्स भरला नाही तेव्हा त्यांना समजते की मोठ्या हॉटेल मध्ये तो द्यावा लागतो." अरे हॉटेल तर स्वस्त आणि मस्त होते न मग मोठे कधी झाले. ह्या पुढे ते माहित असलेल्या आणि मराठी मेनू कार्ड असलेल्या हॉटेल मध्ये जायचे ठरवतात असे पाहिजे.

लेखक टीप: हि कथा मी स्वत: लिहीलेली आहे.लेखक- मुकूंद.

वाचक टीप: हि कथा तुम्ही दुसऱ्याची ढापली असती तरी मूळ लेखकाने त्याचे पातक तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतल्या बद्दल तुमचे नुसतेच आभार मानले नसते तर तुमचा जाहीर सत्कार केला असता.

हि कथा तुम्ही दुसऱ्याची ढापली असती तरी मूळ लेखकाने त्याचे पातक तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतल्या बद्दल तुमचे नुसतेच आभार मानले नसते तर तुमचा जाहीर सत्कार केला असता. >> Lol

कथा मी पण वाचली ,, पण डोके गरगरलेन काय!

हॉरर कथा वाटतेय मला.. लाईट जाणे.. भाषा न कळणे.. मला वाटले आता तिथे पिझ्झा खाऊन झोपणार आणि जागे झाल्यावर आपण कुठल्यातरी पडक्या हवेलीत आहोत धुळीत.... आणि इथे कसे आलो आठवत नाही.. असे काही ..

लेखकाला शुभेच्छा!!
अजुन खुप मोठा पल्ला गाठायचा आहे तेव्हा नवनविन कल्पना सतत वाचकांसमोर आणा. +११

नवीन Submitted by किल्ली on 17 January, 2019 - 17:04
लेखकाला शुभेच्छा!!>>>>>
+७८६
लिहीत रहा !

@कथा --
एकदम बकवास

@धागा --
पहिल्या प्रयत्नाबद्दल मनापासून अभिनंदन

@लेखक / धागा कर्ता --
निगेटिव्ह प्रतिसाद म्हणजे पुढील लिखाण अधिक छान व्हावे म्हणून मायबोली वाचकांनी दिलेले टॉनिक समजा आणि आनंदाने (IDनव्हे) पिवून टाका तर पुढील कथेची तब्येत सुधारेल

@ वाचक / प्रतिक्रिया --
प्रांजल आणि निर्भीड प्रतिसाद हीच मायबोली एक कुटुंब असल्याची खासियत.... त्याबद्दल सर्वांचे कौतुक (पुन्हा एकदा ID नव्हे Wink )

मला स्वतःला कथा बांधणी जमत नाही त्यामुळे तुमच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. तुमची कथा चांगली आहे आणि कंटेंट आणि मेसेज बरोबर आहे. हीच कथा जो जास्त अनुभवी लेखक असतो तो जास्तीची वाक्ये आणि शब्दरचना करून फुलवतो. जमेल तुम्हालाही !!! शुभेच्छा ।

क्रमशः आहे का? Happy

हि कथा तुम्ही दुसऱ्याची ढापली असती तरी मूळ लेखकाने त्याचे पातक तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतल्या बद्दल तुमचे नुसतेच आभार मानले नसते तर तुमचा जाहीर सत्कार केला असता. >> Lol
मला तर वाटलं लाईट गेलेत तर काही तरी अभक्ष्य खाणार हे लोक वैगेरे. Happy मधेच लाईट जाण्ञाचा संबंध काय?
बरं सर्विस टॅक्स न भरता पैसे कसे पे करतात रेस्टॉरन्ट मधे?
आणि ४० चा एक पिझ्झा संपला नाही? दारु-चखणा जास्त झाला होता काय? ३१ डिसेंबर आहे म्हणुन म्हटलं.

खच्चीकरण कशाला करताय रे लेखकाचं? कौतुकाचे दोन शब्द लिहिले तर पुढच्या वेळेस अजून चांगला प्रयत्न करतील ते. मुकुंद तुम्ही लिहा. मी वाचतोय तुमच्या कथा.

@ मुकूंद....तुमचा प्रयत्न चांगला आहे...लिखाणात अजुन खूप सुधारणा करायला हवी ती होईल हळू हळू अनुभवाने.. पण त्यासाठी लिहीत रहा..शुभेच्छा