Submitted by सुप्रिया जाधव. on 14 January, 2019 - 09:31
*स्फूट - मृत्यूपत्र*
प्रिय अक्षय,
तुझे बाबा ऐन उमेदीत गेले
अवघ्या बेचाळीशीतच आटोपला कारभार !
मृत्यूपत्र केले नव्हते त्यांनी
मात्र
हक्काची बायको म्हणून
आपसूकच मिळालं मला सगळं !
मी जाईन तेव्हा...
मृत्यूपत्र केले नाही तरिही
एकुलताएक वारसदार म्हणुन
तुलाच मिळणार आहे सगळं !
फक्त
डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, स्वादुपिंड आणि त्वचा सोडून...
ह्या अमूल्य संपत्तीवर
पहिला हक्क गरजवंतांचाच
नात्यांप्रमाणेच समाजाचही देणं लागतोच
की आपण !
खरतर तुझ्यासाठीच करतेय हे मृत्यूपत्र
तुझे बाबा अचानक गेले
ते कायमचेच !
मी मात्र रेगांळेन म्हणते नंतरही काहीकाळ !
निदान तुला मी नसण्याची सवय होईपर्यत !!
तुझीच आई,
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भिडलं हे मृृत्युपत्र!
भिडलं हे मृृत्युपत्र!
भिडलं ! संपत्तीचं काही नाही
भिडलं ! संपत्तीचं काही नाही हो केले नाही केलं तरी त्यावाचून अडत नाही. एकमेकांच तोंड न पहाणारे /पहाणारे त्यानिमीत्त्याने एकत्र येतात आणि उस्तवार करतात. पण हे करणं मात्र गरजेच आहे.
होय मंजूताई
होय मंजूताई
भार्रीच
भार्रीच
खरोखर सुंदर!
खरोखर सुंदर!
वाह.... सजग करणारं मृत्युपत्र
वाह.... सजग करणारं मृत्युपत्र
'मृत्यूपत्र तयार करणे' वगैरे
'मृत्यूपत्र तयार करणे' वगैरे माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे. पण असे मृत्यूपत्र पूर्वी कधी पाहिले नव्हते!
आभार मंडळी
आभार मंडळी