धाबा स्टाईल चिकन

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2019 - 05:40

नेहमीच पारंपारीक चिकनपासून थोड वेगळ काहीतरी करू म्हणून आंतरजालावर चिकनच्या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा धाबा स्टाईल चिकन ची रेसिपी दिसली. मुळ रेसिपीत मला पटले ते बदल करून खालील रेसिपी केली आहे.

साहित्यः
१ किलो चिकन
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ मोठे चमचे
पाव वाटी दही
२ मोठे कांदे चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचून
हिंग पाव चमचा
हळद १ चमचा
२ -३ टोमॅटो मिस्करमध्ये फिरवून
२-३ मध्यम बटाटे मोठ्या फोडी करुन
लाल तिखट किंवा रोजच्या वापरातला मसाला ४-५ चमचे किंवा आपल्या आवडी नुसार
पाव वाटी बेसन (तव्यावर खमंग भाजून)
१ चमचा गरम मसाला
१ चमचा धणे पावडर
खडा मसाला ल३-४ दालचिनीचे तुकडे, ४-५ लवंगा, ७-८ काळी मिरी, १ मोठी वेलची (बडी वेलची किंवा काळी वेलची), १ जायपत्री, तमालपत्र ३-४
चविनुसार मिठ
फोडणीसाठी तेल

१)

२)

चिकनला आल, लसुण,मिरची कोथिंबीरची केलेली पेस्ट, दही आणि हिंग हळद चोळून ठेवा.
३)

भांड्यात तेल गरम करुन त्यावर लसुण फोडणीला देऊन, खडा मसाला घाला व कांदा घालून त्याला गुलाबी रंग येई पर्यंत परता. आता ह्यात टोमॅटोची प्युरी घाला आणि ढवळून घ्या.
४)

हिंग, हळद, मसाला, भाजलेल बेसन हे सगळ भांड्यातील मिश्रणावर टाका. व चांगले परतून घ्या.
५)

आता ह्यावर चिकन व बटाट्याच्या फोडी घाला आणि गरजेनुसार पाणी घालून शिजत ठेवा. बटाट्याच्या फोडी शिजल्या की चिकनही शिजत. चिकन शिजल की त्यात मिठ, धणा पावडर व गरम मसाला टाका आणि परतून पुन्हा एक वाफ येऊद्या.
६)

वरून थोडी कोथिंबीर पसरा. तर अशा प्रकारे तयार झाले धाबा स्टाईल चिकन.
७)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे बरेचजण बटाटा न घालता करून बघायचं म्हणतायत, तर मी चिकन न घालता करून बघेन म्हणते Wink
दिसतंय इतकं मस्त, पण शाकाहारी असल्याने पास!

यात धाबा स्टाईल काय आहे ते कळले नाही. धाब्यावरचे चिकणमध्ये चार मगज पेस्ट, कॉर्न सिरप (घट्टपणा येण्यासाठी) काजूबदाम पेस्ट असा बराच जामानिमा असतो. इथे असे काही दिसत नाही. काही केमिकल्स ही असतात जसे की अजिनोमोटो MSG. धाब्यावरचे नॉनव्हेज चांगले लागते याला आणिक एक कारण म्हणजे सगळे वाटण वगैरे खूप आधी करुन ठेवलेले असल्याने मुरलेले असते, रेडिमिक्सचा प्रकार असतो. घरी मटण /चिकण आणणार संध्याकाळी आणी तासा दोन तासात शिजुण खायला बसले तर फारशी चव येत नाही. हा माझे निरिक्षण आहे ,कदाचित चूकीचेही असेल.

यात धाबा स्टाईल काय आहे ते कळले नाही.>> भाजलेले बेसन हे धाबावरच्या करिला थिकनेस साठि वापरतात, चार मगज पेस्ट, काजु बदाम पेस्ट हे सगळे रॉयल डिशेस साठी वापरतात जस चिकन टिक्का , पनिर टिक्का, पनिर बटर मसाला, बटर चिकन ,भाजलेले बेसन घालुन एक अन्डाकरी रेसिपी करुन पाहिली होती आधी वाटलेल बेसन घातल्याने कशी चव लागेल पण बेमालुम थिकनेस येतो आणी चवित फरक जाणवत नाही

नीतिन शेगडे, सिंडरेला, स्वाती धन्यवाद.
केशव तुलसी - प्राजक्ता म्हणतेय ते बरोबर आहे आणि धाब्यावर ग्रेव्ही दाट होण्यासाठी बेसन वापरले जाते. काजू बदाम पेस्ट परवडणार नाही त्यांना. मला वाटत अजिनोमोटो चायनिज प्रकारात घालतात.

जागु जागु अगं काय करू गं मी तुझं?
किती प्रेमाने लिहितेस ना रेसिपी? तुझ्या माश्याच्या रेसिप्या वाचून वाचून मी माशे खायला शिकले
आता चिकन पण सुरू करू का काय?
मस्त वर्णन करतेस तु.
अगदी अन्नपुर्णा वाटतेस..

अगदी अन्नपुर्णा वाटतेस..+११११११११११११११११११

चिकन असल्यामुळे मी काही करू शकत नाहीये,
सैरावैरा पळून जाते इथे सारखी येवुन

-- हल्ली अल्पसंख्यान्क झालेले शुद्ध शाकाहारी

भाजलेले बेसन हे धाबावरच्या करिला थिकनेस साठि वापरतात,
<<

ह्या धाबेवाल्याचे नक्कीच दिवाळे निघाले असावे,
करिला थिकनेस देण्यासाठी दुसरे अनेक उपाय उपलब्ध असूनही, तो जर बेसन वापरत असेल तर त्यांनी धाबा बंद केलेलाच बरा.

मटनाच्या रश्श्यात बेसन घालणे नॉर्मल आहे, व ते असंख्य पारंपारिक व्हेज/नॉनव्हेज रेसिपींचा अविभाज्य भाग आहे, हे ठाऊक नसलेल्या महाभागांना दंडवत व वाढदिवसांच्या शुभेच्छा.

अहो साधी कढी घट्ट करायला ताकाला बेसन लावले जाते. Lol

जागु जागु अगं काय करू गं मी तुझं?>>>>> जागुचं काहीच करु नको. Proud माश्यांचेच काही तरी अधून मधून कर. Biggrin Light 1

जागु, ही तुझी रेसेपी मी चिकन वगळुन, बटाटा घालुन करेन. नवर्‍याला रेसेपी वाचायला देते, जर त्याला ती आवडली तर तो बटाटे वगळुन करेल, कारण तो मांसाहार आणी मत्स्याहारात बटाटे घालण्याच्या सक्त विरोधात आहे. Proud

Wow recipe
अर्थात च माझ्या आवडत्या दहात Happy

दक्षे तू प्रतिसाद पण तितक्याच प्रेमाने देतेस ग नेहमीच. जुने दिवस आल्यासारख वाटल. Happy

दक्षु, अग ती अन्नपूर्णा cum वनदेवी आहेच. Happy
म्हणजे एका हातात कालथा आणि एका हातात फुल अस इमॅजीन केल मी. धन्यवाद ग.

चिकन असल्यामुळे मी काही करू शकत नाहीये,
सैरावैरा पळून जाते इथे सारखी येवुन


Lol

अनिरुद्ध धाबाच काय बर्‍याचशा हॉटेलमध्ये कॅन्टीनमध्येही वापरतात. वरणात सुद्धा डाळीच पीठ घालतात काही काही ठिकाणी.

रश्मी दोन्ही कस झाल ते कळव ग मला.

वर्षुतै तुला जागु सप्ताहाला अजून एक प्रकार मिळाला.

,

जागु सोपी रेसिपी वाटली म्हणून लगेच करून पाहिली. मुलाने चक्क "आई ही रेसिपी पुन्हा कर" असं जेवणं होता होता सांगितलं त्यामुळे तुझे खास आभार. मला पण चव आवडली. मी कमी तिखट केली होती.
हा फोटो.
DhabaChicken.jpg

जागू, मस्त रेसिपी With मस्त फोटोज्...
ढाबा स्टाईल आणि आगरी स्टाईल हे माझे सगळ्यात लाडके प्रकार..
एखाद्या फार्महाऊसवर नक्की करुन बघणार.. आणि तेही चुलीवर...

आ.रा.रा. याचे अनुभविक प्रतिसाद ही आवडले..

Pages