ती

Submitted by mrunal walimbe on 16 January, 2019 - 05:01

ती स्टेशन वर आली. अजून तिची नेहमीची लोकल यायला वेळं होता.त्यामुळे ती प्लॅटफॉर्मवर इकडून तिकडून तरंगत होती. तिला वाटले केवढी ही माणसे कुणी इथचं आलेलं,कुणी इथून दुसऱ्या destination ला जाणारं,कुणी घाईत, तर कुणी निवांत असं किती माणसाच्या मनाशी साधर्म्य साधाणारं,कधी मनाला वाटते हुरहूर, कधी वाटते उत्कंठा, तर हेच मन कधीतरी खूपचं उदास होतं. अन् ती थबकली याच उदास मनाच्या विचारापाशी....
खर तरं हे वर्षे संपायला आता तसे काहीच तासं उरले होते. पण या वर्षाने तसं तिच्या कडून खूपं काही हिसकावून घेतलं होतं अन् तिच्या आयुष्यात अत्यंत उलथापालथ केली होती. पण शेवटी जगावे लागतेचं ना मरणयेस्तोवर अशीच तिची काहीशी अवस्था झाली होती. इतक्यात announcement झाली लोकलं येतं असल्याची अन् तिची तंद्री भंग पावली...
नेहमीप्रमाणे ती ladies डब्यात घुसली गर्दी होतीचं पण आता काय शेवटचं उतरायचे असल्याने ती उभी राहिली. एक दोन स्टेशन नंतर तिला बसायला window seat मिळाली. रोजचीचं येत जात असल्याने बऱ्याचं जणींशी चेहरा ओळख होतीचं. तिच्या शेजारी रोजचं लोकलला असणाऱ्या आजी बसल्या होत्या. बसताक्षणी दोघींना एकमेकींना ओळखीचे हसू आदान प्रदान केलेच होते.मग तिने सीटवर मागे टेकून
डोळे बंद केले. परत मगाचच्याचं आठवणीत ती डुबून गेली. नेहमीप्रमाणे ती ऑफिस मधे होती अन् बाबांचा फोन आला आईचा accident झालायं ताबडतोब ये. तिने बाँसला सांगितले अन् ती निघाली इतक्यात परत बाबांचाचं फोन डायरेक्ट हॉस्पिटलमध्येचं ये त्यांनी हॉस्पिटल नाव पत्ता message केला.ती पोचली तर बाबा म्हणाले तिच्या डोक्याला खूप लागलयं त्यामुळे डॉक्टरांनी case critical सांगितली ये. ती सुन्न झाली हा सारा खेळं चार पाच दिवसचं चालला अन् सहाव्या दिवशी ती भयाण बातमी आई गेली. सगळी पुढची क्रियाकर्म पार पाडण्यातं महिना कसा गेला हेचं समजलं नाही तिला. हे सारे होऊन सहा महिनेचं झाले नसतीलं तोचं पहाटे बाबांना sever heart attack आला.अन् सगळचं खलास झालं. या साऱ्या दरम्यान तिचा जिवलग मित्र अविनाश तिच्या पाठीशी होता. पण बाबा गेल्यावर अविनाशचा नूर बदलला होता तिला कारणचं कळतं नव्हतं शेवटी एक दिवस मनाचा हिय्या करुन तिनेचं विचारले अवि नक्की काय problem आहे. त्यालाही ते जड जात होते सांगताना पण त्याने सांगितले आईचा आपल्या लग्नाला विरोध आहे. तिला काहीच कळेना असे का तिच्याकडे एकटक बघत अविनाश म्हणाला होता आईला तू पांढऱ्या पायाची वाटतेसं आता म्हणजे तिने प्रश्नार्थक मुद्रेने बघितले तसं अविनाश म्हणाला आई बाबा पाठोपाठ गेले ना त्यामुळे आई म्हणे हिच्या मुळे आणि काहीतरी वाईटचं होईल आपल्या घरातंअसं आईला वाटतयं ग मी काय करु. खरं तर याक्षणी तिला काही चं बोलायची इच्छा राहिली नव्हती त्यामुळे तिनेच त्याला सांगितले तू जा तुझ्या आईकडे मी तुला आपल्या बंधनातून मुक्त केलयं.अन् त्या रात्री तिने या वर्षातील तिसरी आंघोळ केली होती कुणाच्या तरी नावाने... या साऱ्या भेसूर आठवणींनी तिच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या अन् कुणीतरी आपल्या ला गदागदा हालवतं आहे असे तिला वाटले. अन् तेचं सत्य होते तिच्या शेजारच्या आजी तिला उठवतं होत्या अग उठ बाळा नाही तर परत जाशील bombay central ला...
तशी ती चाचपडून उठली त्यांना sorry म्हणाली आजी तुम्हाला माझ्यामुळे उशीर झाला खरचं sorry इतकी कशी झोपले कुणासं ठाऊक... चला उतरु या.
त्या दोघी स्टेशन बाहेर पडल्या तसं
त्या आजीच म्हणाल्या चल जरा चहा घेऊ इथे म्हणजे तुलाही जरा तरतरी येईल तिही फार आढवेढे न घेता गेली त्या रेस्टॉरंटमधे.
तिथे गेल्यावर आजी म्हणाल्या काही खाणार का तू बाळं तसं ती मानेनचं नाही म्हणाली मग आजीचं म्हणाल्या गेले काही दिवस पहाते तुला उदास असतेचं पूर्वी सारखी हसून खेळून नसते सं. तुमचा रोजचा ग्रुप नव्हता आज लोकलला. तशी ती म्हणाली त्या सगळ्या आज 31st celebration करणारं होत्या मला त्यात नव्हतं जायचं गत वर्षाने माझं आयुष्य चं उध्वस्त केलेयं त्याला काय celebrate करु मी...
तसं आजी काही जास्त बोलल्या नाहीत. मग म्हणाल्या तुला काही सांगितलं तर आवडेलं का तसं तिने मानेनचं होकार दिला.
तशी आजी म्हणाल्या तुला काय वाटतं या वयातं मी लोकलेने रोज कुठे जाते असं. दोन मिनीटं पाँज घेऊन त्याचं म्हणाल्या एका mentally retired मुलांच्या शाळेत जाते शिकवायला त्या मुलांत रमायला..
ती थोडी गोंधळून बघतं होती त्यांच्या कडे तशी त्या पुढं म्हणाल्या मला दोन मुलगे पण दोन्हीही आता या जगात नाही तं मोठा थोडा abnormal होता पण मी मला जेवढं त्याच्यासाठी करता येईल तेवढं केलं हाडाची शिक्षिका असल्याने त्याला मी बरचं normal मुलांबरोबर आणण्याचा प्रयत्न केला पण दैवाला मान्य नव्हते त्यामुळे तो अकरा वर्षाचा असताना गेला. त्याच्या पाठीवर झालेला अजय खूप गुणी हुशार हरहुन्नरी मुलगा होता पण एका running competition मध्ये धाप लागल्याचं निमित्त होऊनं वयाच्या आठव्या चं वर्षी तोही गेला. मी भगवंताला म्हणाले एकूणं तुला मला वांझोटी चं ठेवायचं ठेव बाबा. शाळा मास्तरीणं म्हणून काम केलं शेवटी मुख्याध्यापक ही झाले. माझ्या Retirement नंतर एकचं महिन्याने मिस्टर retired होणार होते.आम्हा दोघांना निर्सगाची खूप ओढ पक्षी प्राणी तर फारचं आवडीचे म्हणून प्लँन केला की काझीरंगा ला ट्रिप करायची पण नियतीला हेही मान्य नव्हते. ते retired झाले त्याच्या दुसऱ्या चं दिवशी पहाटे ते झोपेतचं गेले. आता मी एकटीचं उरले आहे मागे. पण मी असा विचार करते या सगळ्या घडून गेलेल्या घटनांचा विचार करत आठवणी तं कुढण्यापेक्षा आपलं जे आयुष्य ते सत्कारणी लावावं म्हणून मी हा पर्याय शोधला. मला माहीत नाही तुझ्या आयुष्यात काय घडलं ते पण एक नक्की तू अजून लहान आहेस जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर जगण्यापेक्षा नवीन छान अशा गोष्टी कर की ज्याने तुझाचं तुला अभिमान वाटेल बघ विचार कर. एव्हाना दोघींचा चहा संपला होता. ती म्हणाली मी बील देते तशी आजी म्हणाल्या next time जेव्हा तू आनंदात असशील तेव्हा. का कोणासं ठाऊक तिला त्यांना मिठी मारावीशी वाटली.. अन् तिच्या डोळ्यातूनअश्रूधारा वाहू लागल्या. त्यांनी तिचे डोळे पुसले अन् म्हणाल्या आता रडायचे नाही तर आयुष्याशाशी लढायचे.
ती घरी आली आज तिला खूपचं मोकळं वाटतं होतं.तिला त्या आजीच्या strength. ची कमाल वाटत होती. पण एक मात्र नक्कीच या भेटीने तिला जाणवले होते की जगात खूप दुःख आहे आपण मात्र आपलेचं कवटाळतं बसतो अन् तिने ध्येय केले की आजपासून रडणं बंद अन् आयुष्याला भिडणं सुरु ....

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान Happy

खूप सुंदर लिहिलंय.
हेही लिखाण खूप सकारात्मक संदेश देवून जाते आणि समदुःखीजनांस नवीन उमेदही !

छान लिखाण.. नेहमीप्रमाणेच..!!

वेळं,शेवटचं,लोकलं येतं,शेवटचं,होतीचं इत्यादी बर्‍याच शब्दांच्या शेवटच्या अक्षरांवर अनुस्वार नको.

सकारात्मक गोष्ट!
पण संदेश देण्यासाठी खूप लोकं मारली हो तुम्ही एकाच कथेत☺️