Submitted by रिंकी on 14 January, 2019 - 03:57
त्याच्या येण्याची ,अलगद असते वाट
काहीसा वेगळाच असतो, त्याचा थाट
येताना मात्र 'एकटा - च' येतो पण!
जातांना स्वता:चा ,डंका वाजवून जातो
गाजावाजा नसतो ,तो असतो स्वतःचा
दबक्या पायाने येवून, देतो एक तमाचा
कदर नाही कोणाची ,तोडतो नात्याची नाळ
आगळ्या वेगळ्या रहस्याशी ,जोडतो ' काळ'
त्याच्याही दारात होतो, वेगळा नृत्य
ओळखला जातो, त्याच नाव ' मृत्यू' ....
#रिंकी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे ...पण रिंकी तुझ्या
छान आहे ...पण रिंकी तुझ्या सगळ्या कथा न कवितांचे शेवट दुःखी का आहेत...तू छान लिहीत आहेस...शेवटही पॉजीटीव करता येईल का पाहा या पुढच्या एखाद्या कथेत
मृत्यू म्हणजे दुःख असं थोडेच
मृत्यू म्हणजे दुःख असं थोडेच आहे? मृत्यू म्हणजे फक्त अंतिम सत्य.
@रिंकी
कवितेतले विचार आवडले.