एका तळ्यात होती बदके पिले सुरेखं

Submitted by mrunal walimbe on 14 January, 2019 - 11:36

आज खूप दिवसांनी ती अशी निवांत होती. तिच्या आवडीचा छंद मराठी गाणी ऐकणे त्यामुळे चं तिने रेडिओ लावला कधी नव्हे ती मराठी गाणीचं लागली होती....
इतक्या तं तिचं आवडीचं गाणं तिच्या कानी पडलं....
गदिमा चं गाणं...
एका तळ्यात होती,बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयांत एक
कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे,ते वेगळे तरंगे.....

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी....

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले

पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक....
ऐकता ऐकता ती भूतकाळात हरवली अन् जुन्या आठवणींच्या गर्तेत बुडाली....

ती तशी बघितलं तर भावडांनी वेढलेली पण प्रत्यक्षात मात्र एकटी अगदीच एकटी....
ती घरातील सर्वात मोठी मुलगी... पण पहिली मुलगी म्हणून आजीनं नाक मुरडून बाजूला सारलेली...
अन् तिच्या पाठीवर झालेल्या बहिणीला मात्र दिसायला खूप सुंदर म्हणून जवळ केलेली...
नंतर झालेल्याला मुलाला घराण्याचा दिवा त्यातही शेंडेफळ म्हणून तर कोणं मान...
अशी ती या सख्ख्या भावडांबरोबरचं एकत्र कुटुंबामुळे चुलत भावडांनी ही वेढलेली.
खरं तर घरात अन् भावडांत मोठी असल्यामुळे तिच्यावर घरातील बरीचं कामे पडतं. या सगळ्या चिल्या पिल्या भावंडांना सांभाळून स्वतः चा अभ्यास करुन ती सा ऱ्या कामाचा निपटा अगदी हसतमुखाने करे. तिला हे सारे करण्यात कुठलाचं कमी पणा किंवा मीचं कामं करावे असे काहीही वाटतं नसे. ती जशी लहानाची मोठी होत गेली तशी मुळातच समंजस असल्यामुळे ती आपसूकच आजी, काकू यांना मदत करु लागली.
तिची आई एका शाळेतं शिक्षिका होती.परंतु तिची शाळा दुसऱ्या गावात होती त्यामुळे ती बिचारी फक्त शनिवार रविवार चं या मुलांना भेटू शकायची. काकू मात्र घरीचं असायची पण घरात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या राबत्यामुळे ती थकून जाई. त्यामुळे चं तर हिला काकूच्या बरो बरीने कामाची सवय लागली होती. काकूला खूप वाईट वाटे की अभ्यासातं हुशार असूनही हिला आपल्याला कामाला लावावावे लागते. पण काकू च्या या वाटण्याला ही शिताफीने बगल देऊन म्हणतं असे अग काकू आपल्या घरच्या कामाने का कोणाला त्रास होतो तसही माझा सारा अभ्यास उरकूनचं मी तुला मदतं करते. काकूला तिचं खूप कौतुक होतं पण सासूला चालत नाही म्हणून ती बिचारी उघड उघड बोलत नसे इतकचं.
एक दिवस तीने एक निंबध लिहिला त्याचं शाळेत खूप कौतुक झालं अन् कुठल्याश्या निंबध स्पर्धेला तो शाळेतर्फे पाठवला गेला अन् तिला उत्कृष्ट निबंधाचं बक्षीसं मिळालं. शाळेतून घरी आल्यावर तिने ही गोड बातमी सगळ्यांना सांगितली पण एक काकू सोडून कोणीचं तिचं कौतुक केलं नाही. उलट आजी तर म्हणाली कसले निबंध फिंबध लिहिती शेवटी बाईच्या जातीला स्वयंपाक पाणी आलं म्हणजे झालं शेवटी काय चूल अन् मुलचं तर करायचयं. ती काहीच बोलली नाही पण थोडीशी मनातून दुखावली ....
दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून जागी झाली तर अंथरुणाची घडी करताना तिला उशाशी दोन लिमलेटच्या गोळ्या दिसल्या तसं तिला वाटलं नेहमीप्रमाणे कुठल्या तरी धाकट्या बहिणीच्या असतील दुसऱ्या कोणी खाऊ नये म्हणून झोपताना लपवल्या असतीलं अन् सकाळी विसरून गेल्या असतीलं. म्हणून ती त्या काकूला द्यायला गेली तशी काकूच्या डोळ्यातं पाणी आलं अन् ती म्हणाली इतकी कशी गं तू भोळीभाबडी मीचं ठेवलं होतं तुझ्या उशाशी तुला कालं बक्षीस मिळालं ना म्हणून हे माझ्याकडून तुला बक्षीसं. खरं तर तुला एखादा ड्रेसचं शिवायला हवायं ग पण तुला तरं माहित आहे ना घरची परिस्थिती, तुझ्या आजीचा स्वभावं त्यामुळे हे छोटसं बक्षीस.... तिला खूपचं आनंद झाला तिने काकूला मिठीचं मारली.
हळूहळू ती मोठी होत होती आता तिची प्रतिभा छान खुलू लागली होती. शाळेतल्या एका बाईंच्या प्रोत्साहनाने ती आता तिच्या कविता, ललितं लेखं ,कथा ही लिहू लागली होती. आता तरं तिचं graduation ही पूर्ण झालं होतं..
दरम्यानच्या काळात तिच्या बहिणींची शिक्षणही रडत खडत का होईना पूर्ण झाली होती. भावाचं मात्र अजून शिक्षण बाकी होतं.
ती आता एका नामांकित काँलेजमधे professor म्हणून चांगलीचं settle झाली होती. तिची आई retired झाल्यामुळे आता याचं शहरात आली होती. काकूही आता थकली होती. बहिणींची लग्ने झाली होती थोड्याफार हिच्याचं हातभाराने. भावाचंही आता इंजिनिअरिंग पूर्ण झालं होतं त्याला परदेशात शिकायला पाठवायला हिनेचं आर्थिक बळं दिलं होतं.परंतु या कुठल्याही भावंडांना तिची म्हणावी इतकी ओढ नव्हती.

अन् बेलच्या आवाजाने ती भानावर आली.दारात एक गृहस्थ उभे होते. त्यांनी तिला नमस्कार केला.तीनेही नमस्कार केला परंतु तिने त्यांना ओळखले नव्हते पण ते मात्र तिला चांगले ओळखतं होते. ते एक प्रकाशक होते.तिच्या कथा त्यांनी कोणाकडून तरी वाचल्या होत्या अन् त्यांना त्या प्रकाशित करायच्या होत्या. तिला वैषम्य वाटलं की आपणं इतकं चांगलं लिखाण करतो हे आपल्यालाचं कळू नये...
आज तिची काकू आई दोघीही खूप आनंदात होत्या. तिच्या पहिल्या वहिल्या पुस्तकाचं आज प्रकाशन होतं. तिनं साऱ्या भावंडांना बोलावलं होतं परंतु प्रत्येक जण काही तरी बिझी या कारणाने आले नव्हते. तशी ती काकूला म्हणाली काकू मला नेहमी चं माझं आयुष्य त्या गदिमांच्या काव्याशी साधर्म्य साधणारं वाटतं...
पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी....
तशी तिची आई तिच्या जवळ येतं म्हणाली नाही बाळं तू त्या संगळ्यांपेक्षा जास्त कर्तबगार आणि प्रतिभावान आहेस. तू त्यांच्या पेक्षा वेगळीचं आहेस. तू चारचौघींसारखी रांधा वाढा उष्टी काढा या साठी जन्मलेली नाहीसं तर एक नावाजलेली लेखिका होण्यासाठी तुझा जन्म झालायं हे कायमं लक्षात ठेवं..

काही दिवसांनी तिच्या पुस्तकाच्या खूपं पुनरावृत्ती निघत गेल्या ती लिहितं गेली पुस्तके ही निघतं गेली अन् तिच्या आईची वाणी तिने खरी ठरवली ती एक प्रतिभावान लेखिका म्हणून प्रसिद्ध झाली...

©मृणाल वाळिंबे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान कथा !
प्रत्येक कथेत जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन जास्त भावला.
पुलेशु