Submitted by मुग्धमानसी on 15 May, 2013 - 07:19
’आताच दमू नकोस फार
जायचं आहे लांब’ म्हण
एकदा तरी हात धरून
मला ’थोडं थांब’ म्हण...
माझं गुर्हाळ तक्रारिंचं
कुरकुर करु लागलं की
जवळ बसवून मला फक्त
’ऐकतो मी तू सांग’ म्हण...
कधी चिडेन जगावरती
कावून जाईन, त्रासून जाईन
हसून माझी धग सोसून
’जगाच्या नानाची टांग’ म्हण...
कधी माझ्या डोळ्यांमधून
निसटून जाईल काहितरी
तेही पकडून शिताफीनं
’याचा पत्ता सांग’ म्हण...
मी हसताना उधाणलेले
मी रडताना गहिवरलेले
अश्रू माझे टिपून ठेव अन्
’जपून ठेवलंय वाण’ म्हण...
मोठेपण सोसणार नाही
पायांत त्राण उरणार नाही
तेंव्हा कुशीत घेऊन मला
’बाळ माझी छान’ म्हण...
फार काही मागत नाही
माझी तहान भागत नाही
हरलेच कधी मी तर हसून
’मी आहे ना सांग?’ म्हण...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे कविता! आवडली.
छान आहे कविता! आवडली.
किती सहज, सुंदर मनातलं.
किती सहज, सुंदर मनातलं. मनापासून भावलं.
आयला. लय भारी. सगळीच कडवी सरळ
आयला. लय भारी. सगळीच कडवी सरळ काळजात. जगाच्या नानाची... एक नंबर!
(No subject)
व्वा! क्या बात है! सुप्पर!
व्वा! क्या बात है! सुप्पर!
सुरेख. आवडली कविता.
सुरेख.
आवडली कविता.
वा वा! फार छान कविता. इतके
वा वा! फार छान कविता. इतके दिवस कशी काय वाचायची राहिली...
लिहीत राहा!!
मस्तय!!
मस्तय!!
वा! फार सुंदर!
वा! फार सुंदर!
खूsssssप मस्तं..... एकदम थेट
खूsssssप मस्तं..... एकदम थेट पोहोचणारी....
धन्यवाद!
धन्यवाद!
वा किति सुन्दर
वा किति सुन्दर
ही कविता खरच मॅड आहे. कसले
ही कविता खरच मॅड आहे. कसले जबरी हट्टं आहेत हे... एकदम गोड.... थेट आहे सगळं.... आरपार
मस्त लिहीलय मानसी...सुरेख.
मस्त लिहीलय मानसी...सुरेख.
मस्त लिहीलय मानसी...सुरेख.
मस्त लिहीलय मानसी...सुरेख.
आवडली.
आवडली.
खूप छान.....
खूप छान.....
इतके प्रतिसाद बघून अनेक
इतके प्रतिसाद बघून अनेक दिवसांनी कविता वाचली. खूप आवडली.
मस्त...!!!
मस्त...!!!
खूप खूप खूप धन्यवाद!
खूप खूप खूप धन्यवाद!
.
.
ही कविता खरच मॅड आहे. कसले
ही कविता खरच मॅड आहे. कसले जबरी हट्टं आहेत हे... एकदम गोड.... थेट आहे सगळं.... आरपार >>>> +१
खुप गोड आहे ही कविता
खुप गोड आहे ही कविता
अत्यन्त आवडली आहे
अप्रतिम...!
अप्रतिम...!
आवडली!
आवडली!
किती सहज, सुंदर
किती सहज, सुंदर
थेट आत भिडली सगळी कडवी ! खूप छान कविता
गोड कविता
गोड कविता
क्या बात है. बहोत खुब.
क्या बात है.
बहोत खुब.
सुरेख...
सुरेख...
सहज सोपं लिहिणं फार अवघड असतं
सहज सोपं लिहिणं फार अवघड असतं, पण तुम्हाला ते लिलया जमलंय. सुंदर आहे कविता! आवडली.
Pages