Submitted by सुप्रिया जाधव. on 25 September, 2018 - 00:11
मनस्वी मुक्त जगताना जगाला भीत नव्हते मी
फरक इतकाच होता की विसरले रीत नव्हते मी
तुला जे पाहिजे होते तुला ते देत गेले...पण
उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी
बरे केलेस दाखवलीस तू जागा मला माझी
किती पाण्यात होते नेमकी माहीत नव्हते मी
सदा कोषात वावरल्यामुळे दुर्लक्षिले गेले
कुणालाही कधीही टाकले वाळीत नव्हते मी
तुझ्या माझ्यातले हे साम्य बहुधा आडवे आले
कण्यातुन वाकले नाही जरी, मोडीत नव्हते मी !
खरी किंमत कुठे कळते सहज उपलब्ध झाले की ?
तुझ्या नशिबात होते पण तुझे भाकीत नव्हते मी
स्वतःच्या अनुभवांवर बेतले एकेक शेराला
कुणालाही कधीही फारसे वाचीत नव्हते मी
तुझ्या कुवतीप्रमाणे काढले अनुमान माझे तू
तुझ्या प्रेमात, कुठल्याही चढाओढीत नव्हते मी
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप छान
खुप छान
तुला जे पाहिजे होते तुला ते
तुला जे पाहिजे होते तुला ते देत गेले...पण
उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी
>>> व्वा
छान, आवडली.
छान, आवडली.
तुझ्या नशिबात होते पण तुझे
तुझ्या नशिबात होते पण तुझे भाकीत नव्हते मी>> मस्तच! भारी!!
छान लिहीलयं. आणखी वजन देता
छान लिहीलयं. आणखी वजन देता आलं असतं.
खुप छान!!
खुप छान!!
तुला जे पाहिजे होते तुला ते देत गेले...पण
उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी>>
खरी किंमत कुठे कळते सहज उपलब्ध झाले की ?
तुझ्या नशिबात होते पण तुझे भाकीत नव्हते मी>>>
हे फार आवडले
सुंदर.
सुंदर.
सर्वांना मनापासून धन्यवाद
सर्वांना मनापासून धन्यवाद
1 नंबर
1 नंबर
सुंदर
सुंदर
तुला जे पाहिजे होते तुला ते
तुला जे पाहिजे होते तुला ते देत गेले...पण
उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी.. अप्रतिम.
सुंदर
सुंदर
अप्रतिम,
अप्रतिम,
खरी किंमत कुठे कळते सहज उपलब्ध झाले की ?
तुझ्या नशिबात होते पण तुझे भाकीत नव्हते मी >> हे तर खासच
छान. पोहोचले
छान. पोहोचले
खूप छान
खूप छान
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
खुप सुन्दर
खुप सुन्दर
धन्यवाद
धन्यवाद
खरी किंमत कुठे कळते सहज
खरी किंमत कुठे कळते सहज उपलब्ध झाले की ?
तुझ्या नशिबात होते पण तुझे भाकीत नव्हते मी>>>
हे फार आवडले
सुंदर
सुंदर
तुला जे पाहिजे होते तुला ते
तुला जे पाहिजे होते तुला ते देत गेले...पण
उशीराने कळाले की तुझ्या यादीत नव्हते मी
खुप सुन्दर .....!