मोबाइल फोन वर येणार्या अ‍ॅड कशा थांबवाव्या?

Submitted by _आनंदी_ on 7 January, 2019 - 02:27

मोबाईल वर सतत गूगल अ‍ॅड येतात ..
अगदी लॉक स्क्रीन वर सुद्धा.. कोणाचा फोन आला की मुद्दाम अ‍ॅड डिस्प्ले होते ..
त्यामुळे कॉल घेताना आधी अ‍ॅड क्लिक होते.. कोणाचा फोन आला डिस्प्ले होतच नाही..
काहीही बघताना अधे मधे अ‍ॅड सुरु होतात.. माझा मोबाईल सॅमसंग..अ‍ॅन्ड्रॉइड ८.१.० ..
गूगल वर सर्च करुन पाहिलं काही फरक नाही पडला.. कोणाचा सेम प्रॉब्लेम असेल तर मदत करा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॅमसंगच अँड्रॉइड व्हर्जन स्टोक अँड्रॉइड नाहीये, त्यामुळे तेही काही ऍड दाखवू शकतात. पण सॅमसंगचा जुना अनुभव पाहता हि शक्यता नगण्य आहे.
फोनवर कायम इंटरनेट चालू असेल, तर भरमसाठ पॉप अप ऍड डाउनलोड होतात. त्यामुळे गरज नसल्यास इंटरनेट बंद ठेऊ शकतात. वेब ब्राउजिंग करताना काही वस्तूविषयी माहिती घ्यायची असेल तर इनकॉग्निटो मोडमध्ये सर्च करा. त्यामुळे सर्च हिस्टरी ट्रेस होत नाही.
तुम्ही जर काही फ्री अँटिव्हायरस अप्लिकेशन, बॅटरी सेव्हर अप्लिकेशन, UC ब्राऊजर किंवा ऑपेरा ब्राऊजर डाउनलोड केलं असेल, तर त्यांना ऍक्सेस असतो. त्यामुळे ऍड दिसतील.
३६०, क्लिंमास्टर अँटिव्हायरस असेल तर १००% लॉक स्क्रिनवर ऍड येतात.
उपाय एकच! या अप्लिकेशन काढणे किंवा त्याना लिमिटेड ऍक्सेस ग्रांट करणे.
शाओमी असेल तर अक्षरशः सेटिंग मध्ये ऍड दिसतात.
जर यूजर इंटरफेस बेस्ट आणि ऍड फ्री हवा असेल तर स्टॉक अँड्रॉइड किंवा अँड्रॉइड वनचे फोन बेस्ट!

सँमसंग जे सिअरिज का?
एक नवीनच जीमेल अकाउंट(ब) बनवून तो फोनच्या सेटपमध्ये लावायचा. आताचा(अ) काढून टाकायचा. या(अ) जिमेलची इमेल नोटिफिकेशनस अर्थातच येणार नाहीत. फायरफॅाक्समधून लॅागिन करून (अ)चे मेल पाहावे लागतील. क्रोम नको. त्यांचं जाहिरातदारांशी साटंलोटं आहे.
सुरुवातीला थोडी अडचण येईल पण जाहिराती बंद होतील. कारण (अ)चे सिंक्रनाइझेशन संपेल.
माइक्रोसॅाफ्टचा एज ब्राउजरही चालेल.

Submitted by अज्ञातवासी - बरोबर.
--
बाकी अँटिव्हायरस बनवणाऱ्या कंपन्याच सांगतात की ही सॅाफ्टवेर आता निरुपयोगी आहेत कारण परमिशन्स तुम्हीच दिलेल्या असतात.

Gmail log out केलं .. एक काहीतरी app होत flash keyboard imoji मुलीने डाउनलोड केलं होतं.. ते काढलं आणि मुख्य म्हणजे क्रोम डिसेबल केलं ..
लॉक स्क्रीन च्या ऍड तरी गेल्याच सध्यातरी.. बाकी पण सतत दिसणाऱ्या दिसत नाहीत .. धन्यवाद सर्वांना Happy

अग्गोबाई सॅमसंग वर पण येतात अ‍ॅड्स? Uhoh मला वाटलं माझ्याच फक्त येतात की काय Sad माझा एम आय नोट ५ आहे. टाक टुक मान फिरवा, आता पाणी प्या असले नोटिफिकेशन्स पण येतात मला. उबर ईट चे. आन कसले कसले Sad

काही वस्तूविषयी माहिती घ्यायची असेल तर इनकॉग्निटो मोडमध्ये सर्च करा. त्यामुळे सर्च हिस्टरी ट्रेस होत नाही. >> पण काही गोष्टी थेट अ‍ॅप मधुन पाहिल्या तरिही त्याच्या जाहिराती मला गाना वर वगैरे दिसतात (लॅपटॉप वर) Uhoh

पण काही गोष्टी थेट अ‍ॅप मधुन पाहिल्या तरिही त्याच्या जाहिराती मला गाना वर वगैरे दिसतात (लॅपटॉप वर) Uhoh
<<
लॉपीत ब्राऊजरला गूगल अकाऊंटला कुठेतरी लॉगीन रहात असणार आहे. accounts.google.com ला जाऊन लॉगाऊट करा.

गूगल सेटींग्ज नावाचा एक प्रकार मोबाईल सेटिंग्स मधे असतो. तो एकदा फुरसत मधे सगळ्या सबमेन्यू वाचून बघा. नको त्या बाबी डिसेबल करून ठेवा.

@दक्षिणा - रेडमी नोट ५ असेल. शॉमीचा हाच किस्सा आहे! फोन चांगले असतात, पण ऍडमुळे रेव्हेन्यू घेतात.

ब्राउझर मध्ये बुकमार्क्स करुन ठेवलेल्यापैकी कधी कधी काही साइट्स त्रास दायक ठरतात असा अनुभव आहे.
आणि गाना सारखे ऐप्स जे स्टार्ट केले की लगेच भरपूर रैम वापरतात आणि कैशे बनवतात त्यामुळेसुद्धा काही होत असावे का माहीत नाही. पण मी अशी एप्स काढून टाकल्यानंतर मात्र स्क्रीन जाहिरात मुक्त झाली होती.

कोणती अॅप्स हे करतात ते पाहा --
तुमचे फेसबुक अकाउंट असो, नसो, असलेले लागाउट असो , गुगल अॅड आइडी का काहीमधून तुमचा शेअरिंग डेटा फेसबुकला पाठवतात हे फेसबुकने मान्य केलेय. (गुगल अन्ड्र्राइडची मदत घेऊन)
लेख

गोष्टी थेट अ‍ॅप मधुन पाहिल्या तरिही त्याच्या जाहिराती मला गाना वर वगैरे दिसतात>> गुगल डेटा ट्रेस करत असते सतत आणि recommendation computation engines ला पाठवत असते..

google knows everyone on this planet who has used internet ever

अँड्रॉइड ओ एस वापरणे म्हणजे गुगल नामक सैतानाला आत्मा विकण्याच्या करारावर रक्ताने सही करण्या सारखं आहे. ☺️☺️
पण सिम्बियन ओ एस चे फोन इतिहासजमा व मायक्रोसॉफ्ट ओ एस चे फोन दुरुस्त होत नसल्याने आणि सफरचंद ओ एस भारतात परवडत नसल्याने या सैतानाशी आपण मैत्री करून घेऊया.

फोन जुना असेल तर रुट करा व TWRP recovery Download करा. XDA forum वरुन तुमच्या मॉडलला सुटेबल स्टॉक ॲन्ड्रॉईड .zip फाईल लॅपटॉपला डाऊनलोड करा . अनझिप करुन फाईल फोनमध्ये घ्या. मोबाईल TWRP रिक्व्हरी मोडमधून चालू करा व स्टॉक वर्जन फ्लॅश करा.
जाहीराती बंद होतील.
जास्त रॅम फ्री मिळेल
रुट ॲक्सेस ने प्रोसेसरचे स्पीड वाढवने वगैरे किडे करता येतील.
वि.सू-- वरील प्रकार आपल्या जबाबदारीवर करावा .फोन ब्रिक झाल्यास वॉर्ंटी संपते . धन्यवाद!!

उनसेफ साईट्स वर जाऊन पण व्हायरस येतात. पॉर्न , चीप शॉपिंग, unknown गेम्स साईटस वगैरे साईट्स टाळाव्यात फोन वर.

>>recommendation computation engines ला पाठवत असते..
google knows everyone on this planet who has used internet ever>>

ठीके, पण तुमी हे शोधताय ना? ते शोधताय ना?हो बाबा हो पण आमचं आमी बघू. च्या जाहिराती नको आहेत वापरणाऱ्याला.

ठीके, पण तुमी हे शोधताय ना? ते शोधताय ना?हो बाबा हो पण आमचं आमी बघू. च्या जाहिराती नको आहेत वापरणाऱ्याला.>>>>>>
म्हणून इंकॉग्निटो मोड वापरावी. आणि अप वरून सर्च करू नये.
सगळ्या कंपन्या डाउनलोड द आप नाऊ असं म्हणतात ते यामुळे!
एकतर नोटिफिकेशन, नाहीतर गुगल ट्रेस!