झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पर्सनल स्कोर सेटल करण्यासाठी मी स्कोअर ठेवतच नाही.>> छान. जे शब्दात उतरवले आता ते कृतीत उतरवणे जमवायचे बघा.

तुम्हाला जे त्या एका बाईंमुळे भ्रम होताहेत, की सगळे तुमचे प्रतिसाद शोधत येतात आणी तुमच्या बद्दल बोलतात ते तुम्हाला लखलाभ असं म्हणून मी तुमच्याबद्दल काही लिहिण्ं वैगेरे थांबवलं >> Rofl आपण जाता जाता हवे ते लिहून घ्यायचे आणि मग 'आता मी थांबते तुम्ही ही काही लिहू नका' म्हणायचे.. Lol
दुसरयाकडून समेटाची अपेक्षा करण्याआधी आपण सुद्धा आपली निंदनीय प्रवृत्ती बाजूला ठेवणे अपेक्षित आहे.
असो, तुमच्या विनंतीचा मान ठेऊन मनाचा मोठेपणा दाखवणे उचित. अपेक्षा करतो तुम्ही ह्यापुढे लिहिताना काळजी घ्याल.

ते बाकी भ्रम, थट्टा वगैरे कुठल्या बाईंबद्दल लिहिले आहे कळाले नाही.
तुमच्या स्वतःबद्दल लिहिले आहे का? मला तुमच्या माझ्याविषयी लिहिण्याबद्दल काही भ्रम नाही हे तुम्हीच आजवर अनेक प्रतिसाद लिहून सिद्ध केले आहे की.
ह्या कोणी दुसर्‍या बाई असतील आणि तुम्हाला त्यांचे थेट नाव घेण्याची भीती वाटत असेल तर अशी पळपुटी उठाठेव कशाला करता आहात.

अज्ञातवासी,
तुम्ही कोणाबद्दल आणि काय लिहावे किंवा काय लिहू नये हा तुमचा लूकआउट आहे पण एक आदरार्थी आणि मित्रत्वाचा सल्ला देईन...
Please don't write as if you are everyone's my grandpa.

चरप्स तो थांबण्यासाठी दुसरा धागा काढलाय!
>>> तिथे काय लिहिणे अपेक्षित आहे? संपला ना झिरो आता. शाखा पुढच्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त पण झाला.
आता माणिकर्णिका किंवा पेट्टा वर चर्चा होऊद्या.

एकटा रूनमेश किती झीरो च्या धाग्यांवर लिहिणार.☺️

सल्ला नोटेड!
आणि मी कुणाचाही ग्रँडपा नाही शोभणार हो! २४ व्या वर्षी ग्रँडपा नकोच Wink बट एम या शॉर्ट टेम्पर गाय, ज्याला कळतही नाही कोण चांगलं कोण वाईट!
जस्ट आयुष्यात खूप चांगल्या व्यक्ती निघून गेलेल्या बघितल्या आहेत, त्यामुळे आता वाईट वाटत, कुणी चांगलं जाताना किंवा वाईट होतांना.
असो आज तुमच्या एका डायलॉगने, एक खूप जुनी आठवण ताजी केली, खपली काढली म्हणा ना!
थँक्स, तुम्ही माझा आदर करतात आणि मला मित्र मानतात हे ऐकून छान वाटलं!
तुम्हाला वाटलं तर आपण कधीही गप्पा मारू.
पण आजपासून, सल्ला शिरसावंद्य!!!

चरप्स तो थांबण्यासाठी दुसरा धागा काढलाय!
Submitted by अज्ञातवासी on 5 January, 2019 - 19:11
>>>

कुठे?
लिंक द्या ना...

अहो सस्मित,. काढला की अख्रेर त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन नवीन धागा.
धन्यवाद अज्ञातवासी Happy

अवांतर - झिरो लेटेस्ट स्कोअर १६० करोड माझ्या विश्वसनीय सूत्रांनुसार Happy

सर्वांना कळविण्यात येते, की इथे कुणाच्याही विनंतीला मान वगैरे दिलेला नसून,उलट वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.
हा धागा कुठल्याही परिस्थितीत स्थलांतरित होणार नाही!!!!
भाताच्या रेसिपी लिहिण्यासाठी नवीन धागा उघडला आहे!!
https://www.maayboli.com/node/68569

मोदींशी आणखी एक साम्य. सतत मी मी मी मैं मैं मैं.
√√√√

हा शोध तुम्ही नव्याने लावलेला नसून मीच मागेच म्हणालेलोच की बॉलीवूडमध्ये शाहरूख, राजकारणात मोदी आणि मायबोलीवर ऋन्मेष ही तीन माणसे सेल्फ मार्केटींग करत आपले नाव कसे कायम चर्चेत राहील हे बघतात.
मी वरचेवर आत्मपरीक्षण करतो आणि त्यात जे सापडते त्याचा प्रामाणिकपणे स्विकार करतो Happy

सर्वांना कळविण्यात येते, की इथे कुणाच्याही विनंतीला मान वगैरे दिलेला नसून,उलट वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.
हा धागा कुठल्याही परिस्थितीत स्थलांतरित होणार नाही!!!!
>>>>>

हा धागा कुठल्याही परिस्थितीत स्थलांतरित होणार नाही भले त्यावर कितीही अवांतर पोस्ट पडो. लोकांने अगदी मोदी मोदी आणोत. पण हा धागा कुठल्याही परिस्थितीत स्थलांतरित होणार नाही!!!! हेच वदवून घ्यायचे होते Happy

थोडक्यात काय तर आपल्या मताशी साधर्म्य राखणारया पोस्ट आल्या तर स्वागत नाही तर धागा स्थलांतरीत.

झिरो पडावा म्हणून हाच डाव जिथे तिथे पाहत आहे आणि मी तिथे तिथे जाऊन लोकांना सत्यकथन करत आहे.
खरा फॅन याला बोलतात. फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारयांना नाही Happy

मी तर हल्ली शाहरूखशी ईतका एकरूप झालो आहे की त्याचा प्रत्येक चित्रपट बघण्याची मला गरजच वाटत नाही. चित्रपटाचा पोस्टर टीजर ट्रेलर लोकांची चित्रपटाबद्दलची मते वाचूनच शाहरूखने चित्रपटात काय धमाल उडवली असणार हे डोळ्यासमोर उलगडत जाते Happy

<<<अमेरीकन एवढे बिनडोक खरेच असतील का?>>>
हो. म्हणूनच कुणिहि इथे यावे नि इथला पैसा लुटावा.
अक्कल नसेल, पण शिस्त, कायदे पाळणे, वेळ पाळणे, इमानदारीने काम करणे, लाच न खाणे इ. व्यवस्थित करतात. म्हणून त्यांच्या जवळ पैसे आहेत, जगात किंमत आहे. अक्कल स्वस्तात मिळते जगात! तुमची अक्कल तर फारच स्वस्त!
तुमच्याजवळ असलेल्या अक्कलेचा उपयोग काय? पाच रुपये दिले की अक्कल गहाण टाकून काहीहि करणार!
<<म्हणजे जगात एकाच नावाची हजारो माणसे असतात हे त्यांना माहीत नसेल का?>>
अहो तुम्ही कुणाबद्दल बोलताहात? जे इथे लोकांना अडवतात, ते त्यांना तसा हुकूम असतो म्हणून ते करतात. अमेरिकेत कायदा पाळायची प्रथा आहे. म्हणून प्रत्यक्ष टेडी केनेडी ला बॉस्टन विमनतळावर कस्सून चौकशीला तोंड द्यावे लगत असे. याचा अर्थ तुम्हाला कळणारच नाही. तुम्हाला तुमचा कुठलातरी खान जास्त प्रिय, त्याच्या पुढे सगळे तुच्छ! आमच्या खानला कायदा माफ नाही का??
भारतात काय? कसले कायदे नि कसले काय? अपना आदमी आहे, किंवा पाच रुपये दिले की कुणिहि काहीहि करा.
<<<ललित मोदी वा नीरव मोदीला पकडायचे अटक वॉरंट निघाले तर नरेंद्र मोदींना धरतील का?>>>
होय. नरेन्द्र मोदीला व्हिसा नाकारलाच होता. प्रत्येक देशाला स्वतःची सुरक्षा करण्याचा नि ती कशी करावी हे ठरवण्याचा अधिकार आहे.
फक्त भारतात गोरा माणूस म्हणजे सर्व गुन्हे माफ! अमेरिकेचे सगळे चांगले असल्या गुलामी प्रवृत्ति आहेत.
<<आणि तेव्हाही आपण भारतीय असेच शांत बसू का?>>
नका बसू. पण बोंबलून करणार काय? तुम्हाला वाटते तेव्हढी तुमची जगात किंमत नाहीये. सध्या तुमच्याजवळ पैसे आहेत म्हणून इतर देश तुमच्याकडे बघतात. तेहि पैशासाठी! पूर्वी बघत पण नव्हते. तुम्ही कितीहि ओरडलात तरी, बेधडक पाकीस्तानला मदत करत होते तुमच्याविरुद्ध! !
उगाच अमेरिकेशी तुलना करू नका. फार तर इथे या, चैन करा.
तुम्ही उगाच वादविवाद करू नका. आपल्या शहारुखची मूर्ती घट्ट हृदयाशी धरून त्याच्या नावाने नमाज पढा. तुम्हालाहि शांति नि इतरांनाहि!

<<<अमेरीकन एवढे बिनडोक खरेच असतील का?>>>
हो. म्हणूनच कुणिहि इथे यावे नि इथला पैसा लुटावा.
अक्कल नसेल, पण शिस्त, कायदे पाळणे, वेळ पाळणे, इमानदारीने काम करणे, लाच न खाणे इ. व्यवस्थित करतात. म्हणून त्यांच्या जवळ पैसे आहेत, जगात किंमत आहे. अक्कल स्वस्तात मिळते जगात! तुमची अक्कल तर फारच स्वस्त! >>> Lol Lol
Nandya rocks sometimes! Akkha pratisad epic ahe! Lol

शिस्त, कायदे पाळणे, वेळ पाळणे, इमानदारीने काम करणे, लाच न खाणे इ. व्यवस्थित करतात.
>>>>>>

हे तर मी सुद्धा करतो. मी अमेरीकन नाहीये. कोकणी माणूस आहे. पण यात सांगून दाखवण्यासारखे काय आहे. क्षुल्लक गोष्टींचे काय ते कौतुक करायचे Happy

म्हणून त्यांच्या जवळ पैसे आहेत, जगात किंमत आहे.
>>>>
ओके. म्हणजे ज्याकडे पैसे त्याला तिथे किंमत मिळते. मी कोणाची किंमत पैश्यावरून नाही तर स्वभावावरून ठरवतो. मला पैश्याचे आणि पैसेवाल्यांचे कौतुक नाही Happy

अक्कल स्वस्तात मिळते जगात!
>>>>
मुळात ती मिळत नाही. उपजत असते.

तुमची अक्कल तर फारच स्वस्त!
तुमच्याजवळ असलेल्या अक्कलेचा उपयोग काय? पाच रुपये दिले की अक्कल गहाण टाकून काहीहि करणार!
>>>>
ईथे तुमची म्हणजे मी की भारतीय?
मी स्वत:ला कोणत्या जाती धर्म प्राण्त समूहासोबत जोडत नाही. मी स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे आणि माझी अक्कल अफाट आहे.

अमेरिकेत कायदा पाळायची प्रथा आहे.
>>>
कायदा चुकीचा असला तरी??

प्रत्यक्ष टेडी केनेडी ला बॉस्टन विमनतळावर कस्सून चौकशीला तोंड द्यावे लगत असे.
>>>>
कोण आहेत हे टेडी केनेडी?

तुम्हाला तुमचा कुठलातरी खान जास्त प्रिय
>>>
कुठचाही नाही. फक्त शाहरूख! Happy

त्याच्या पुढे सगळे तुच्छ!
>>>>
असा दावा मी कधीच करत नाही. बाकीचेही बेस्ट आहेत. पण शाहरूख त्यांच्यापेक्षा जरा बेटर आहे ईतकेच Happy

आमच्या खानला कायदा माफ नाही का??
>>>>
वर म्हणालात तुमचा खान. आता म्हणत आहात आमचा खान. नक्की कोणाचा खान? की सबका खान एक है Happy
असो,
मी कोण माफ करणारा?

भारतात काय? कसले कायदे नि कसले काय? अपना आदमी आहे, किंवा पाच रुपये दिले की कुणिहि काहीहि करा.
<<<
पाच रुपयात काहीही करता येत नाही. १९५० च्या दशकात कदाचित शक्य असेल.

ललित मोदी वा नीरव मोदीला पकडायचे अटक वॉरंट निघाले तर नरेंद्र मोदींना धरतील का?>>>
होय. नरेन्द्र मोदीला व्हिसा नाकारलाच होता.प्रत्येक देशाला स्वतःची सुरक्षा करण्याचा नि ती कशी करावी हे ठरवण्याचा अधिकार आहे.
>>>>>>
माझ्या प्रश्नाचा अर्थ होता की ललित मोदी समजून त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल नरेंद्र मोदींना धरायचा बाव्ळटपणा करतील का?
बाकी नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदी समजूनच धरत असतील तर मला काही प्रॉब्लेम नाही. सुट्टीच्या दिवशी दुपारी बाराच्या आत मला भेटायला आले तर मी सुद्धा त्यांची भेट घेणार नाही.

फक्त भारतात गोरा माणूस म्हणजे सर्व गुन्हे माफ!
>>>>
गोरे लोकं गुन्हा करतात? वर तर तुम्ही म्हणालेलात की ते कायदे पाळतात. म्हणजे तिथे कोणीच गुन्हेगारच नसेल ना.
काही गल्लत होतेय का?
कि तिथे कायदे पाळून गुन्हे घडतात? कायद्याने खून. कायद्याने बलात्कार... ईंटरेस्टींग आहे सारे Happy

अमेरिकेचे सगळे चांगले असल्या गुलामी प्रवृत्ति आहेत
>>>>>>
पण ते लोकं चांगलेच आहेत ना? चंगल्याला चांगले बोलणे गुलामी झाली का? कि ते चांगले नाहीयेत? गुलाम लोकांनाच ते चांगले वाटतात?

<<आणि तेव्हाही आपण भारतीय असेच शांत बसू का?>>
नका बसू. पण बोंबलून करणार काय?
>>>>>>
सॉरी. ते वाक्य मी तुम्हालाही भारतीय समजून सर्वसमावेशक म्हटलेले. मला माहीत नव्हते आपण कायमस्वरुपी अमेरीकेत राहता

तुम्हाला वाटते तेव्हढी तुमची जगात किंमत नाहीये. सध्या तुमच्याजवळ पैसे आहेत म्हणून इतर देश तुमच्याकडे बघतात.
>>>>>
पुन्हा गोंधळ.
वर म्हणालात अमेरीकेकडे पैसा आहे म्हणून त्यांना किंमत आहे
आता म्हणत आहात की भारतीयांकडे पैसे आहेत पण किंमत नाही.

तुम्ही कितीहि ओरडलात तरी, बेधडक पाकीस्तानला मदत करत होते तुमच्याविरुद्ध! !
>>>>>
मी स्वत:ही पाकिस्तानचे क्रिकेट सामने बघतो. जराही आरडाओरडा न करता...

उगाच अमेरिकेशी तुलना करू नका.
>>>>
शाहरूखची तुलना मी कोणाशीच करत नाही. अमेरीका ग्रेट असेल. पण शाहरूख जरा बेटर आहे Happy

फार तर इथे या, चैन करा.
>>>
चैन या शब्दाचा अर्थ द झिप असा नसून टाईमपास असेल तर मग मी काय वेगळे करतो Happy

तुम्ही उगाच वादविवाद करू नका.
>>>>
वादविवाद हे माझ्या चैनीतच येतात Happy

शहारुखची मूर्ती घट्ट हृदयाशी धरून त्याच्या नावाने नमाज पढा. तुम्हालाहि शांति नि इतरांनाहि!
>>>>
नमाज देवाची पडतात आणि देव मी मानत नाही तसेच शाहरूखही माझा देव नाही. मी त्याचा भक्त नाही तर चाहता आहे. वेळोवेळी त्याच्यावर टिकाही केली आहे!

प्रत्युत्तराच्या प्रतीक्षेत,
दुनियाके सबसे बडे सुपर्रस्टारका
सबसे बडा सुपर्रफॅन
ऋन्मेष Happy

झक्कींना चक्कर आली असेल आता. Proud त्यांना वाटत होते की तेच एक रिकामटेकडे, पण त्यांना त्यांच्यापेक्षा सवाई रिटे भेटला. Proud

ते बाकी भ्रम, थट्टा वगैरे कुठल्या बाईंबद्दल लिहिले आहे कळाले नाही.>>>>>> Rofl Rofl

रश्मी, कितीतरी रिकामटेकडे आहेत इथे. Happy
फक्त पोस्ट यायचा अवकाश की आलेच उत्तरं द्यायला. आपल्याला वाटतं आपणच रिकामे पडीक. पण बरेच तसे आहेत. Happy

अगं गंमत म्हणून टाकली ती लिंक. बाय द वे, पडला एखादा पिक्चर तर पडु दे, अमिताभचे आणी राजेश खन्नाचे नाही का पडले असे अनेक पिक्चर. पण त्यांनी जास्त नाही मनाला लावुन घेतलं. पण इथे ऋन्मेष, तो झीरो पडला त्याचे जाम सुतक पाळतोय. आणी कुणीही काही लिहीले की लगेच येऊन सपष्टीकरण करतोय. Proud

अज्ञातवासी, तुम्ही धाग्याचे नावच चूकीचे लिहीले. ते कमीतकमी झिरो : परीक्षण असे हवे होते. इथे झिरो परीक्षण म्हणले की कसले काय परीक्षण करणार? असा अर्थ होतो. किंवा परीक्षण कशाचेच काहीच केले नाही असाही अर्थ होणार.

रश्मी काय फरक पडतोय? लिहिलेल्या परीक्षणाकडे कुणी ढुंकूनही पाहत नाहीये, खरोखर झिरो परीक्षणच झालंय Wink !!!

<<<झक्कींना चक्कर आली असेल आता. >>>
झक्कींना चक्कर आली की नाही माहित नाही, पण ऋन्मेSSषला नक्कीच चक्कर आली. दोष माझ्या अत्यंत विस्कळीत अमुद्देसूद लिखाणाचा.
तुम्ही हा शब्द मी सर्वसाधारण भारतीयांना उद्देशून लिहीला होता , वैयक्तिक त्यांना उद्देशून नाही हे कसे कळावे? काही लोकांना सर्व जग आपल्याच बद्दल बोलत असते असा विश्वास असतो. त्यांना कसे समजावे?
जगात किंमत नाही असे म्हंटले कारण अमेरिका, इंग्लंड या देशांनी राजकारणात युनो मधे गेली सतत ७० वर्षे भारता विरुद्ध पाकीस्तानची बाजू घेतली आहे. बांगलादेश युद्धात अमेरिकेने भारताविरुद्ध युद्धनौका पाठवली होती! इतका त्या देशाला आपल्या भारताचा द्वेष. अमेरिकन कॉन्सुलेटमधे वाट्टेल त्या कारणाने किंवा कारण न देताहि भारतीयांना व्हिसा नाकारला जातो, नि त्यांचे पैसे हडप करतात! भारताविरुद्ध इथले कित्येक लोक काय गरळ ओकतात ते ऐकून आहे. त्या अर्थाने मी म्हणालो होतो. पण ज्यांना सिनेमा नि क्रिकेट याशिवाय इतर काहीच माहित नाही त्यांना ते कसे समजावे?

<<<शिस्त, कायदे पाळणे, वेळ पाळणे, इमानदारीने काम करणे, लाच न खाणे इ. >>>
यात विशेष काय हे इथे राहून बरीच वर्षे व्यवहार केलेल्यांना नि भारतातहि तेच व्यवहार अनेक वर्षे केलेल्यांनाच समजते!
मी स्वतः भारतात नि अमेरिकेत दोन्हीकडे नोकरी केली, बँकेचे व्यवहार केले, सरकारी कचेर्‍याशी माझे संबंध आले. तसेच माझ्या अनेक मित्रांचे. त्या सगळ्यांचा अनुभव हाच. इथले अनेक लोक भारताशी व्यवहार करतात, त्यांची तक्रार हीच.
माझा एक मित्र इथे २५ वर्षे राहीला. आता परत भारतात जाऊन रहातो. मी भारतात येऊन जिथे नोकरी करत होतो तिथे तो फार मोठ्या हुद्द्यावर होता. त्याच्याजवळ मी बोललो तर तोहि म्हणाला भारतात हे असेच असते, लाच द्यावीच लागते, कामे वेळच्यावेळी होत नाहीत, शिस्त अजिबात नाही, माझ्या हाताखालच्या लोकांना सुद्धा वारंवार चहापाणी केल्याशिवाय ते कामे करत नाहीत. पण इतर अनेक महत्वाच्या गोष्टींपुढे हे चालवून घ्यायचे. तेव्हढे भारताने सुधारले तर भारत केव्हढा तरी बलाढ्य देश होईल!
आता ऋन्मेSSष स्वतः वेगळा असेल, पण वैयक्तिक रीत्या असल्या माणसाशी माझा संबंध फक्त मायबोलीवर येतो तेव्हढा पुरे. तोहि केवळ माझी गंमत, त्याच्या एव्हढा गंभीरपणा माझ्या अंगातच नाही!

नण्द्याजी तुमची भारताची आणि भारताबद्दलची मते समजली. आणि ती सत्य परिस्थिती असेलही.
पण त्याचा या धाग्याशी, शाहरूखशी वा माझ्याशी संबंध काय?

उलट तुम्हाला माहीत आहे का?
शाहरूख हा जगातला दुसरया क्रमांकाचा श्रीमंत कलाकार आहे.
पहिला कोण माहीत नाही.
चला तो असेलही अमेरीकेचा.
पण याचा अर्थ बाकीचे सारे अमेरीकन कलाकार पैश्याबाबत शाहरूखच्या मागेच आहेत.
आणि ते सुद्धा डॉलरमध्ये कमावून...
अरे हो की रे..
शाहरूख डॉलरमध्ये कमावत असता तर..
तर जेवढे एखाद्या एवरेज अमेरीकन अभिनेत्याचे मानधन असते तेवढा त्याचा सिगारेटचा खर्च असता Happy

पण ज्यांना सिनेमा नि क्रिकेट याशिवाय इतर काहीच माहित नाही त्यांना ते कसे समजावे?
>>>

ज्याला सिनेमा आणि क्रिकेट पुर्ण समजले त्याला जगात आणखी कश्याची गरजच काय Happy
आज सिनेमा आणि क्रिकेट (आयपीएल) याच्या जीवावर शाहरूख जगातील दुसरया क्रमांकाचा श्रीमंत कलाकार झाला आहे.

ऋन्मेष तु लिंक दिलीयेस तिथेही पोचला बरं Happy
>>>>

अग्नी, ध्वनी आणि ऋन्मेष.... हे क्षणार्धात कुठेही पोहोचू शकतात.

जल, वायू आणि ऋन्मेष..... यांना रोखणे सोपे नाही.

शाहरूख डॉलरमध्ये कमावत असता तर..
तर जेवढे एखाद्या एवरेज अमेरीकन अभिनेत्याचे मानधन असते तेवढा त्याचा सिगारेटचा खर्च असता
>>>
मला वाटले एवढा पैसा त्याच्याकडे आहे तर त्याला हव्या तेवढया सिगरेटी तो ओढू शकत असेल. अजून जास्त कमाई असती तर अजून ओढल्या असत्या म्हणजे सध्या हव्या तेवढ्या सिगरेट्स ओढू शकत नाहीये का तो?

Pages