पाटील v/s पाटील - स्पिन ऑफ!

Submitted by अज्ञातवासी on 7 July, 2018 - 13:35

डिस्क्लेमर-

या भागाचा कथेशी काहीही संबंध नाही.

वादळी रजनीत तो सुधाकर तेजाने तळपत होता. आपल्या सहस्र किरणांनी तो या भूभागाला तेजोभूमी बनवत होता.

आणि याच तेजोभूमीत एक मर्त्य मानव आगेकूच करत होता. तर वाचकहो! हा मानव मर्त्य असला तरी त्याचे तेज भानूला सुध्दा लाजवेन असं होतं. त्याचा मुखचंद्रमा अतिशय तेजस्वी होता. त्यावर एक विलासी तेज विराजत होतं. मात्र हा मुखचंद्रमा असा का काळवंडला बरे? चला वाचकहो, आपण यामागचं कारण जाणून घेऊयात.

"हे दयाघना, सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञात, सर्वशक्तिमान परमेश्वरा, अरे या वादळात मी किती कालावधीपर्यंत स्वतःला सावरू? गेले चार दिवस उदरात अन्नाचा कण नाही. परमेश्वरा, आतातरी मार्गदर्शन कर."

तर वाचकहो, अशा आर्त स्वरात केलेल्या आर्जवामुळे परमेश्वरालाही त्याची दया आली असावी. वादळानेही आता विश्राम घेतला. तो आणि त्याचा अश्व वेगाने आगेकूच करू लागले.

मैल-दीड मैल गेल्यावर अचानक त्याच्या दृष्टीस एक तेजपुंज वस्तू पडली. ती वस्तू बघून अक्षरशः त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. काय होती ती वस्तू?

चकाकणारी, छोटी, गोल आकाराची आणि सोन्याच्या कोंदणात असलेली ती तेजपुंज वस्तू काय होती बरे?

तर वाचकहो, ती वस्तू होती आपल्या सगळ्यांच्या कानात गुंजणारी, रुंजी घालणारी... घुंगरू...

"व्यास थांब... अरे व्यास थांब... याच वृक्षाच्या ढोलीत तिच्या कोमल करांनी हा घुंगरू माझ्यासाठी ठेवला होता. अरे व्यासा, अश्वराज, थांब रे."

आपल्या मालकाच्या आर्जवामुळे त्या अश्वराजाच्याही अश्रुधारा वाहू लागल्या.

मानवाने अश्वावरून उडी घेतली, आणि धावतच तो ढोलीकडे उडी घेतली. आणि त्याने तो घुंगरु हातात घेताच....
.... त्याच ढोलीत एक तेजोवलय निर्माण झालं, आणि त्यातून एक तेजस्वी आकृती बाहेर आली.
तर वाचकहो, ती तेजस्विनी कोण होती बरे???....
वाचूयात पुढच्या आठवड्यात....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद माऊमैया!
पुढच्या आठवड्यात सर्व रहस्ये उलगडण्यात येतील...