फुकटात विनासायास वेटलॉस

Submitted by शाम भागवत on 3 July, 2018 - 03:17

वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय.

ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे .......
थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय.

कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो!

घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार.

तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये.

तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल.

त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.

सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही.

आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा!

तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते.

त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे.

बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती.

डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत.

पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात.

२०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे.

खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता.

डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ

ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/

डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा.
https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4

मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे.

एक महत्त्वाची सूचना :
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol ( हे मयेकरांसाठी)

आंधळे किंवा डोळस कसेही असले तरी लोक आपल्याला फॉलो करतात या जाणिवेतून सल्ला आला पाहिजे. >>>> हम्म पण त्यांनी * देऊन डिस्क्लेमर लिहिला होता असं वर आलं आहे ना? हा डबल स्टँड आहे मग. (इथे मला बाकी ठिकाणच्या अ‍ॅनालॉजी देता येतील, पण इथे थांबतो).\

(रच्याकने, मी दोन्हीपैकी कुठलीच पद्धत पूर्णपणे पाळत / पाळू शकत नाहीये. संध्याकाळी लवकर जेऊन, दुसर्‍या दिवशी सकाळचा चहा मग १० ला कॉफी आणि मग जेवण असा काहीतरी अर्धवट फास्ट करतो. पण इथल्या दोन्ही बाजूंच्या पोस्टी टोकाच्या वाटल्या म्हणून लिहिलं.)

प रागचे प्रश्न मला आवडले.
मी एक महिना का दोन महिने दिक्षीत करून पाहिले. वजनाला फरक पडलेला.
समहाऊ भाज्यांचे क्रेविंग्ज वाढलेले त्या काळात.

तरीही म ला आयेफ जास्त चांगले वाटले.
१. एन र्जी लेवल जास्त चांगली होती आयेफ मधे.
२. जास्त मॅनेजेबल वाटले. (दो नदाच खाण्यापेक्षा मल्टिपल टाईम्स खाऊ शकतो - हा दि लासा :ड)
३. दोन्ही पद्धती विशेषतः दि क्षीत पद्धतीत वेळ आणि युजेबल वेळ खूप वा ढतो हे जाणवले.
४. दिक्षीत फॉलो करताना खाणे हा एक सोहळा झाला होता. प्रत्येक वेळच्या खाण्यात प्रत्येक प दार्थाची चव कळायची. वे ळ आणि प्रेम इन्व्हेस्ट करून खाणे तयार केले जायचे. खूप विविधता आलेली. दॅट वॉज फन पार्ट.
५. कधीही खा पद्धतीने जेवणा चा/ खाण्याचा आनंद निघून जा तो असे जाणवले आहे.
सध्या कुठलेच डाएट फॉलो करत नाहिये (कारणाने). पण जेवण हा कंटाळवाणा प्रकार झाला आहे. अरे देवा आता खायचे, असे वाटते. (सतत चरत नाहिये, तरीही). जेवणात सध्या वरायटी नाहिये ( चौकटीतला आ हार) हे एक कारण असू शकेल.
६. २-२ तासाने खा माझ्यासाठी डिझॅस्टर डाएट होते.

आणि म्हणूनच ऋजुता काय किंवा दीक्षित काय, ज्या लोकांना ते पर्सनली भेटू शकत नाहीत, त्यांना त्यांनी टीव्ही, फेसबुक व्हिडियो वगैरे वरून असे सल्ले देऊन गोंधळात पाडू नये. >>>
एकदम योग्य कॉमेंट !

दीक्षितांच्या व्हिडिओत सुरवातीला काही यशोगाथा आहेत. त्यात एक काकू, काकांच्या मधुमेहाचा अनुभव सांगतात, त्यात म्हणतात (या डाएटनुसार) काकांनी गणपतीत यथेच्छ मोदक खाल्ले तरी शुगर कंट्रोलमध्ये राहिली. यातून प्रेक्षकांना, व्हिडीओ बघणाऱ्यांना काय संदेश जातो? मला मधुमेह असेल तर हे डाएट करून मग मला यथेच्छ गोड खाता येईल.
जरी हे त्या काकूंनी म्हटले आहे, तो डॉ. दीक्षितांच्या "विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध" या व्हिडिओचा तो भाग आहे.

तसेच ऋजुता दिवेकर यांच्या Why should you eat diwali sweets या व्हिडिओत त्या म्हणतात मधुमेह असणाऱ्यांनीही दिवाळीच्या भारतीय मिठाया खायला हरकत नाही. या पारंपारीक पद्धतीने बनवलेल्या मिठायांमुळे शुगर वाढणार नाही, स्टेबल राहील!!
कठीण आहे.

बरोबरच आहे. ५५ मिनिटांत का ही ही कितीही खाल्लं तरी चा ल तं.
साखर वाढली तर जबाबदारी पेशंटची आणि त्याच्या (ज्याला तो फी देतो त्या) डॉक्टरची.
उपाशी राहूनही गोळ्या घेतल्या तरीही जबाबदारी या दोघांची

मधुमेह्यांच्या बाबतीत आमची जबाबदारी नाही, हे मुलाखतीत स्पष्ट सांगितलंय.
तुम्ही सगळे व्हिडियो, सगळ्या मुलाखती, सगळे प्रबंध वाचा. पण हे कशाला? व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप कशासाठी आहे. तिथेच काय ती अचूक माहिती मिळेल (तरीही जबाबदारी....).

दिवसाकाठी एखाद-दुसरा वाईनचा प्याला आरोग्याला हितकारक असतो असं प्रतिपादन करणारे तज्ञ सुद्धा दोषी म्हणायला पाहिजेत मग. कारण त्याचा विपर्यास करून रोज एक बाटली मारणारे तळीराम असणारच ना?

तुमच्या आकलनशक्तीचं कौतुक आहे. पण मुळात तो प्रतिसाद मागच्या पानावरच्या "पेशंट सगळ्या प्रकारचे असतात आणि ते आपल्या बोलण्याचा विपर्यास करणार हे गृहीत धरून मुद्दे मांडले पाहिजेत" या सईंच्या वाक्या ला उद्देशून होता.

दिवसाकाठी एखाद-दुसरा वाईनचा प्याला आरोग्याला हितकारक असतो >>>
दारूच्या कुठल्या धाग्यावर हे कसे हितकारक असते ते सांगा. माहिती मिळेल, चर्चा होईल.

सई, तुमचे प्रतिसाद आवडले अन बरेचशे पटले देखिल..

माझ्या ऑफिसमध्ये दोघी आहेत दिक्षीत डायेट वाल्या, त्यांनी त्यांचा वॉट्सप ग्रुप पण जॉईन केलाय. त्या लंचमध्ये भरपुर खातात. पण त्या दिवसभर खुप सारे ताक पितात, अन तेही घट्ट असते लस्सी सारखे, सो मला एक शंका आहे की भुक लागले अन मधल्या वेळेत जेवायचे नाही , चहा प्यायचा नाही म्हणुन ताक पितात , हे कितपत योग्य आहे??

चान्गले आहे. चलु द्या त्यान्चे. किति दिवस करु शकतात ते पहा. ताकाचा नॉशिआ कधी येतो त्याकडे लक्ष ठेवा. मग त्यांची चिडचिड वाढते का ते बघा.

कोणताही पॉप्युलर डायट जोशात सुरु करणारे हजारो लोक असतात त्यातले फार थोडे सातत्य ठेवण्यात यशस्वी होतात.

खुप सारे ताक पितात, अन तेही घट्ट असते लस्सी सारखे,>>>>पण दीक्षित तर सांगतात की पाणी जास्त असलेले ताक प्या म्हणून.बाकी कुठल्याही डायेटशी संबंध नाही.

कोणताही पॉप्युलर डायट जोशात सुरु करणारे हजारो लोक असतात त्यातले फार थोडे सातत्य ठेवण्यात यशस्वी होतात.>>>> हो

<<पण दीक्षित तर सांगतात की पाणी जास्त असलेले ताक प्या म्हणून>>>> तेच तर ना ताई, माझी शंका तीच आहे, कारण मी माझ्या डाएट मध्ये दुधाचे पदार्थ टाळते. अन मला ताक खुप आवडते , सो जर ते डाएट ला चालणारे असेल तर भले रोज नाही पण आठवड्यात दोन-तीनदा प्यावे का असा विचार करतीये

सायीच्या विरजणाच ताक चालतं (लोणी काढून घेतलेलं).साध्या दह्याच्या ताक प्यायच असेल तर चमचाभर दही फेटून त्यात ग्लासभर पाणी घालून ताक करुन प्यायचं. ताक डाएट करताना प्यायला हवं, त्याचा चोथा उपयोगी ठरतो.

कारण मी माझ्या डाएट मध्ये दुधाचे पदार्थ टाळते>>>>> गोड वगळून दुधाचे पदार्थ टाळू नकोस.दूध आणि तत्सम पदार्थ शरीराला आवश्यक आहेत.

"पेशंट सगळ्या प्रकारचे असतात आणि ते आपल्या बोलण्याचा विपर्यास करणार हे गृहीत धरून मुद्दे मांडले पाहिजेत" या सईंच्या वाक्या ला उद्देशून होता.
<<

"टीव्हीवर मुलाखत देताना" हा भाग आपण सोयिस्कर रित्या विसरलेले दिसता.

आता, कृपया टीव्हीवर मुलाखत देताना रोज २ ग्लास/पेग वाईन पिणे चांगले असे (व इतकेच) सांगणार्‍या डॉक्टरांच्या मुलाखतींच्या लिंका डकवणार का? आवडेल मला.

डॉ. दीक्षित की ऋजुता दिवेकर या द्वंद्वात सापडलेल्यांसाठी...

कैफ, पठाण की धोनी ?

- डॉ. नितिन पाटणकर

सध्या बरेचजण डाएट म्हणून ‘दोनदा खा कितीही खा’ या नावाने प्रसिद्ध पावलेला डाएट करत आहेत. याला मी पठाण मॅक्सवेल डाएट म्हणतो. दोघांनी षटकारांची बरसात करून मॅच जिंकून दिलेल्या आहेत. याची मुख्य वैशिष्ट्ये
१)दिवसांतून फक्त दोनदा खाणे
२)भुकेच्या वेळा ठरविणे
३) भुकेच्या वेळेच्या लगतच्या तासाभरात खाणे
४) काहीही व कितिही खाणे ( मनसोक्त ) काहीजण दुधाचे पदार्थ टाळून डाएट करतात.
५) दोन खाण्यांच्या मधे ग्रीन टी, ब्लॅक काॅफी , ताक असे इन्सुलिन न पाझरवणारे पदार्थ सेवन करण्यास परवानगी
याचा उगम सांगितला जातो तो कै. डाॅ. श्रीकांत जिचकर यांच्या व्याख्यानामधे.
जिचकरांनी जेव्हा ही व्याख्याने दिली तेव्हा, ‘दर दोन तासांनी खाणे’ हा प्रकार आज हा डाएट जसा लोकप्रीय आहे , तसा लोकप्रिय होता.
या दर दोन तासांनी थोडे थोडे खाणे या मुळे वजन कमी होण्यापासून ते डायबेटीस बरा होणे असे अनेक फायदे होतात असे स्वानुभवाने सांगणारे अनेक जण होते. याला मी कैफ बेव्हन डाएट म्हणतो. दोघांनीही सिंगल्स घेत मॅच जिंकून दिलेल्या आहेत.
दोनदाच भरपूर खाणे आणि दर दोन तासाला थोडे थोडे खाणे या दोन टोकाच्या, एकमेकांच्या विरोधी वाटणाऱ्या भूमिका. दोनही तितक्याच यशस्वी ठरतात हे ठामपणे सांगणारे अनेक जण. हे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न सहज पडतो. सध्या चलती आहे ती फक्त दोन वेळा खाण्यची. दर दोन तासांनी खाणे आता जुने झाले.
या दोन्ही पद्धती का यशस्वी होतात त्याची दिली जाणारी कारणे बघण्या आधी शरीरात नाॅर्मली काय होत असते ते बघूया.
अन्न सेवनानंतर पॅंक्रिॲस मधून इन्सुलिन पाझरते. हे किती, कसे पाझरते याबद्दलच्या विरुद्ध भाकितांवर या दोन्ही पद्धती बेतलेल्या आहेत.
इन्सुलिनचे काम काय ते थोडक्यात बघूया. रक्तात अन्न शोषले गेले की रक्तातील साखर आणि फॅट्स दोन्ही वाढू लागतात. रक्तातील वाढत्या साखरेला विविध पेशींच्या आत पोचवणे हे इन्सुलिनचे मुख्य काम. पेशींच्या आत साखर पोचली की ती उर्जा म्हणून वापरली जाते किंवा भविष्यात वापरण्यासाठी साठवली जाते. याच सोबत रक्तातील वाढणाऱ्या फॅट्स ना फॅट साठवणाऱ्या पेशींच्या आत ढकलणे हे काम पण इन्सुलिन करते.
याच सोबत इन्सुलिनचे अजून एक काम आहे. ते बरेचदा लक्षात येत नाही. ते म्हणजे, जोपर्यंत साखरेची व्यवस्था लागत नाही तो पर्यंत फॅटसेल्समधून फॅट बाहेर येउ न देणे हे पण काम इन्सुलिन करते. रक्तात जर साखर किंवा फॅट जास्त प्रमाणात राहिल्या तर त्याचे वाईट परिणाम होतातच पण विटेपेक्षा दगड कडक अशा न्यायाने साखरेचे वाढते प्रमाण हे जास्त धोकादायक असते. जो पर्यंत साखरेचे प्रमाण सुरक्षित पातळीपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत फॅटला तिच्या घरातून बाहेर पडू न देण्याचे काम इन्सुलिन करते. हे एकदा लक्षात आले की पुढील गोष्टींची संगती लावणे सोपे जाते.
आता थोडे इन्सुलिन रेसिस्टंस बद्दल. जेव्हा खाण्यातून येणारी उर्जा ही कामातून जाणाऱ्या उर्जेपेक्षा जास्त असते तेव्हा ती साठवली जाते. शरीरातील बहुतेक पेशींची उर्जा साठवण्याची क्षमता मर्यादित असते. फोनच्या बॅटरीप्रमाणेच अती चार्ज झाल्या तर पेशींना धोका असतो. विविध उपायांनी ही अतिरिक्त साठवण टाळली जाते . त्यासाठी काय उपाय केले जातात ते बघूया.
इथे आपल्या गुणसूत्रातील फरक दिसून येतात. काही भाग्यवान लोकांच्यात, जितकी साखर किंवा फॅट जास्त येईल तितक्या प्रमाणात ‘अनकपलिंग प्रोटीन्स ‘ चा वापर करून त्यांचे उष्णता आणि पाण्यात रूपांतर केले जाते. यांना ना स्थूलता भेडसावत, ना मधुमेह. काही जणांच्यात आलेल्या सर्व अतीरिक्त उर्जेचे फॅट्स मधे रूपांतर केले जाते. यांच्या शरीरात फॅट्सच्या पेशींचा आकार आणि संख्या वाढत जाते. या लोकांच्यात स्थूलता वाढते पण बाकी काहीही ‘ केमिकल लोचा’ होत नाही. बाकी आपण सर्वसामान्यजन, मध्मवर्गीय, आपण जाडही होतो आणि बाकी आजार पण व्हायला लागतात.
हे सर्व टाळण्यासाठी शरीर आपल्यापरीने प्रयत्न करतेच. अतिरीक्त उर्जा फॅटसेल्स सोडून इतर कोठे साचू नये म्हणून बाकी सर्व पेशींमधे इन्सुलिनची ॲक्शन पटकन होउनये म्हणून प्रयत्न करते. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होउन जाते. उर्जा हवी, त्यासाठी इम्सुलिनही हवे पण जास्त उर्जा पण नको. खरेतर अशावेळी भूक लागूच नये, अन्न सेवनाची इच्छा होउच नये म्हणून शरीराने प्रयत्न करायला हवेत. इथेच आपला तो प्रगत मेंदू घोळ करतो. तो खाण्यावरील वासना कमी होउ देत नाही. मग बिचाऱ्या शरीरालाच काही मार्ग शोधावा लागतो. चैनी आणि मानी नवरा हट्टाला पेटून काही करतो आणि त्याचे वाईट परिणाम होउ नयेत म्हणून बायको काहीतरी सावरून घेत पण शेवटी नुकसानच पदरी पडते असे काहीसे होते. अन्न घेण्याच थांबत नाही हे बघून मग स्नायूंमधे शरीर काही बदल घडवते. त्यामुळे साखर स्नायूंच्या आत पटकन शिरत नाही. ही अतिरिक्त साखर मग लिव्हर मधे किंवा त्याचे फॅटमधे रूपांतर करून फॅटसेल्समधे साठवली जाते. हे प्रकरण इतक्यावर थांबले असते तर फार बरे झाले असते. पण स्नायूंना पुरेशी साखर मिळत नाही हे बघून पॅंक्रिॲसला दया येते आणि ते खूप जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करून रक्तात सोडते. एकीकडे इन्सुलिनच्या कार्याला विरोध तर दुसरीकडे इन्सुलिनचे प्रमाण वाढत चाललेले. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. साखर पेशीत ढकलण्याच्या कामात रेझिस्टन्स असला तरी सुरवातीला लिहिल्याप्रमाणे, इन्सुलिनचे दुसरे काम; फॅटसेल्स मधे फॅट साठवणे आणि आतील फॅट बाहेर येउ न देणे हे मात्र जोमाने चालू राहते. इन्सुलिनचे प्रमाण वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि वजन वाढणे, मधुमेह होणे या गोष्टी अशा रितीने एकमेकांत गुंफलेल्या आहेत. हे लक्षात घेउन आता ‘दोनच वेळा खाणे’ आणि ‘दर दोन तासाला खाणे’ या सल्यांमागील तर्क बघूया.
‘दर दोन तासाला थोडे थोडे खाणे’ हा सल्ला देणारे असे मानतात की एका वेळेस तुम्ही जितके अन्न घ्याल त्या प्रमाणात इन्सुलिन रक्तात येणार. इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यामुळे प्रमाणाबाहेर इन्सुलिन रक्तात येणार. जितके इन्सुलिन जास्त तितका जास्ती वेळ ते पुन्हा आपल्या अल्प पातळीवर येण्यासाठी लागणार. तेवढा वेळ ते फॅटसेल्स मधे फॅट ढकलत तर रहाणारच पण फॅटसेल्स मधून फॅट बाहेर येउ देणार नाही. म्हणून स्थूलपणा, साखर कमी न होता वाढत रहाणार.
यावर उपाय म्हणजे एका वेळेस अगदी कमी खाणे. म्हणजे थोडेसेच इन्सुलिन पाझरेल. ते काम झाले की पुन्हा अल्प पातळीवर येणार. इन्सुलिन कमी झाले की फॅट बाहेर येउन ती जाळली जाणार. हे सर्व दोन ते तीन तासात होउन पुन्हा जेव्हा अन्नाची गरज भासेल तेव्हा पुन्हा थोडेसे खायचे. यात गृहित धरलेल्या गोष्टी, जितके अन्न तितके इन्सुलिन पाझरते. दोन तासात हे इन्सुलिन कमी होते, त्यामुळे शरीराला उर्जेसाठी फॅट मोकळी करावी लागते म्हणून फॅट कमी होते. हे सर्व दोन तासात होउन पुन्हा बाहेरून अन्न घेण्याची गरज निर्माण होते. की पुन्हा थोडेसे खायचे. यात गृहित धरले आहे की कमी अन्नामुळे कमी इन्सुलिन पाझरते, त्याचे प्रमाण तासाभरात अतियल्प होते. पुढचा तास फॅट जाळण्याचा. दोन किंवा तीन तासात पुन्हा अन्नाची गरज लागते आणि पुन्हा थोडेसे खाउन, तेच चक्र चालू राहते.
आता ‘फक्त दोनदाच खा’ या सल्यामागील तर्क बघू. यांचे म्हणणे असते की तुम्ही कमी किंवा जास्ती खा, पदार्थ कुठचाही असूदे इन्सुलिन खूप जास्ती तयार होण्याचे थांबत नाही. अन्न येत आहे हे कळले की भरपूर इन्सुलिन पाझरणारच. हाच मुख्य समजूतीतील फरक आहे ‘दर दोन तासाला कमी खाणे’ आणि ‘दिवसांतून फक्त दोनदाच खाणे’ या दोन भूमिकांमधे. फक्त दोनदा खायला लागले की किमान बारा तास तरी अन्नाशिवाय काढावेच लागतात. तेवढ्या वेळात इन्सुलिन अत्यल्प होउन, फॅट जळायला मुबलक वेळ मिळतो. म्हणून वजन कमी होते.
पहिला म्हणतो, जितके खावे तितकेच इन्सुलिन पाझरेल; तर दुसरा म्हणतो की कमी किंवा जास्ती काही फरक पडत नाही, इन्सुलिन भरपूर पाझरणार.
आणखी एक फरक. पहिला म्हणतो दोन किंवा तीन तासात पुन्हा थोड्याशा अन्नाची गरज लागते. दुसरा म्हणतो, एकदा भरपूर खाल्ले की अन्नाची गरज निदान बारा तास तरी लागत नाही. तितक्या वेळात इन्सुलिन कमी होउन फॅट जाळली जाते. पहिला हा क्रिकेट मधे म्हणतात तसे सिंगल्स काढून मॅच जिंकू म्हणतो तर दुसरा म्हणतो की मी चौकार षटकार मारूनच मॅच जिंकणार. पहिला ‘मोहम्मद कैफ’ किंवा ‘मायकेल बेविहन’ असेल तर दुसरा ‘युसूफ पठाण’ किंवा ‘ग्लेन मॅक्सवेल’ असतो.
मॅच जिंकायला मात्र या दोन्ही गोष्टींच योग्य मिश्रण असलेले खेळाडू लागतात. कोचची जबाबदारी असते की खेळाडूमधे या दोन टेकाच्या भूमिका योग्य वेळी वापरण्याचे कौशल्य निर्माण करण्याचे.
आहाराच्या बाबतीत म्हणाल तर ‘दर दिवसांआड एकदाच खाणे’ ते ‘दर दोन तासाला थोडे खाणे’ अशा पद्धतीने जीवन जगणारे लोक आहेत. अमेरिकन हार्ट असोशिएशनने या सर्व प्रकारात, जास्त चांगले कोण हे ठरविण्यासाठी अनेक शोध निबंधांचा तौलनिक अभ्यास केला. सर्वात परिणामकारक आणि अतीशय महत्वाचे म्हणजे वर्षानुवर्षे लोक करू शकतील अशी पद्धती त्यांनी सुचवली. ती ऐकून मी तर चकितच झालो. मला पूर्वीचे शेतावर जाणारे आजोबा आठवले. सकाळी न्याहरी, दुपारी शेतावर जेवण, रात्री घरी आले की जेवण. आठवड्यांतून एक दिवस उपास.
सर्व चाचण्यातून सर्वोत्तम ठरलेली पद्धत
दिवसांतून फक्त तीन वेळा खाणे, दर दोन खाण्यामधे किमान सहा तासाचे अंतर, भाज्यांचा वापर भरपूर आणि आठवड्यातून एकदा १८ तास उपास.
एकूण काय आपल्याला ‘ॲबे डी विलिअर्स’ किंवा ‘धोनी’ व्हायला हवे किंवा आपल्या आजी आजोबांसारखे व्हायला हवे.
M- 9223145555
Wisdom Clinic
('लोकप्रभा'च्या ताज्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख.)

It's never about how people eat. It's all about what people eat.

लोकांना कन्फ्युजन होते किंवा मनाने वाट्टेल ते खात सुटतात हा सगळा त्यांच्या स्वतःच्या मेंटलिटीचा भाग आहे. दिक्षित डायट इन-फॅशन झालंय. म्हणजे काय तर लोकांना सांगायला की मी दिक्षित फॉलो करतोय. बास.. म्हणजे लोक आपल्याला अभिजन, हुशार, हेल्द कॉन्शन्स आणि 'तज्ञांकडे जाउन हजारो रुपये घालवणारे मूर्ख नाहीत' असे समजणार. बाकी खरोखर ती व्यक्ती काय करते हे फक्त तिला आणि तिलाच माहिती असते. कितीही योग्य आणि वन्टुवन मार्गदर्शन असले तरी आपल्या मनाने त्याला भोक पाडणारे तर तज्ञांना रोजच्या रोज अनेक भेटतात.

हे केवळ दिक्षित डायट बद्दल नाही. गेल्या सातशे वर्षात गाजलेल्या सर्व फॅड डायट्सबद्दल घडलेले आहे.

गेल्या सातशे वर्षात गाजलेल्या सर्व फॅड डायट्सबद्दल
<<

हेला नाना,

दीक्षितांची छप्पन उणे एक मिन्टे कुठून आली हे जसे गुल्दस्त्यात आहे, तसेच तुमच्या सातशे वर्षाचे मूळ जाणून घ्यायला आवडेल.

पहिला म्हणतो, जितके खावे तितकेच इन्सुलिन पाझरेल; तर दुसरा म्हणतो की कमी किंवा जास्ती काही फरक पडत नाही, इन्सुलिन भरपूर पाझरणार.
<<

सेन्सिबल लिहिलंय.

फक्त दुसर्‍या दीक्षित स्टायलिच्या रिसर्च अनुसार इन्शुलिन 'भर्पूर" नव्हे तर तितकेच पाझरते.

पहिला म्हणतो, जितके खावे तितकेच इन्सुलिन पाझरेल; तर दुसरा म्हणतो की कमी किंवा जास्ती काही फरक पडत नाही, इन्सुलिन भरपूर पाझरणार
दोन्ही पद्धतीने नेमके किती इन्सुलिन पाझरते हे अजूनपर्यंत कोणी अभ्यासले नाही का? इन्सुलिन तपासणी चाचणी उपलब्ध असताना असे उलटसुलट दावे का केले जातात?

काहीही खा यावर या धाग्याच्या सुरूवातीला आणि नंतर बरेच मंथन झालेले दिसले. पुन्हा त्यावर का आले लोक ?

डॉ. अंजली दीक्षित यांना या धाग्याची लिंक दिली होती मी. त्या स्वतः शंकानिरसन करतात. (जगन्नाथ दीक्षित यांच्या त्या पत्नी होत).
डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी जगन्नाथ दीक्षित यांना किंवा त्यांनी नेमलेल्या प्रशिक्षित व्यक्तींना त्यांचे रिपोर्ट्स पाठवायचे आहेत. डायबेटीक व्यक्तींनी प्रोटीनयुक्त आहार केल्यास किडनीवर ताण येऊ श्कतो. अंजली दीक्षित यांनीही तसे स्पष्ट केले आहे. या सूचना त्यांना व्यक्तीगत स्वरूपात मिळत राहतात. तसेच आपल्या डॉक्टरांना दाखवल्यानंतरच डायबेटीक व्यक्तीने ही ट्रीटमेंट सुरू करायची असे म्हटलेले आहे.

व्याख्यान हे जनरल स्वरूपात आणि रंजकता वाढवण्यासाठी असते. त्यातही पुस्तक वाचण्याचा सल्ला दिलेला असतो. फक्त सोपे तेव्हढेच फॉलो करायचे असेल तर मग कुणी काही करू शकत नाही.

रिसर्च पेपरच्या बाबतीत सँपलींगच्या मेथड्स सदोष आहेत असे वाटते. सँपलींग करताना एकूण ग्रुप कसा निवडतात याचे निकष दिसले नाहीत. अर्थात दीक्षित स्वखर्चाने हा अभ्यास करत असल्याने आणि ज्यांच्यावर प्रयोग करायचेत त्या व्यक्ती २४ तास त्यांच्या निरीक्षणाखाली आणून त्यांच्या चाचण्या घेणे हे शक्य नसल्याने आहे त्या परिस्थितीत व त्यांना जुळत गेलेल्या व रिपोर्ट पाठवलेल्या व्यक्ती हेच त्यांच्या हाती असल्याने त्यांनी ते नाईलाजाने स्विकारलेले दिसते.

असा अभ्यास करताना शंभर व्यक्ती रँडमली घेऊन त्यांच्यावर प्रयोग करण्यासाठी सरकारने , वैद्यकीय आस्थापने, संस्था, मोठ्या कंपन्या यांनीच पुढाकार घ्यायला हवा. किमान वैद्यकीय महाविद्यालयांनी तरी असा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी करायला हवा होता. शंभर लोकांमधे डायबेटीक असतील, नॉन डायबेटीक असतील, सुदृढ असतील, आजारी असतील अशा सर्व लोकांचा डेटा घेऊन त्यांच्यावर काय परिणाम झाले हे पहायला हवे. अथवा डायबेटीक शंभर आणि नॉन डायबेटीक असे दोन वेगवेगळे अभ्यासगट सुद्धा नेमता येतील. यांचे नमुने द्वतः घ्यायला हवेत. त्यांना अन्न या पद्धतीत सांगितल्याप्रमाणेच द्याय ला हवे.

हा अभ्यास करायचा तर किमान तीन महीने हे लोक सातत्याने तिथे रहायला हवेत. तसे करायचे तर त्यांना त्याचे पैसे द्यावे लागतील. हे शक्य आहे का ? मग करायचेच नाही का ? त्यापेक्षा किमान कसे का असेना , काम चालू राहतेय हे अनेकांना योग्य वाटतेय.

कुणाला यावर तोडगा दिसत असेल तर सुचवा.

मध्यंतरी दिवसाला आठ लीटर पाणी पिले पाहीजे अशी एक टूम आली होती. अभय बंग यांच्या पुस्तकात आहे का हे ? सकाळ मधे (साधारण दहा पंधरा वर्षांपूवी असेल) किमान पाच सहा लेख आले होते. नक्की आठवत नाही, कदाचित सरदेसाई किंवा तांबे असतील लेखक. त्याचे कारण पण त्यांनी दिले होते. पाणी पिल्याने किडनीचे आजार टळतात, त्वचा चांगलू राहते आणि अजून बरेच काही.

पण आठ लीटर पाणी हे खूप जास्त आहे. एव्हढे पाणी पिल्यावर कालांतराने शरीरातले क्षार कमी होत राहतात. पुढे पुढे सोडीअम डिफिशिअन्सी (वंध्यत्व?) झाल्यास तोल जाणे वगैरे प्रकार घडू शकतात. तेव्हां या प्रकारच्या टूम निघाल्या तर त्या तपासून घेणारी अधिकृत संस्था असावी आणि नंतरच हे निस्।कर्ष सामान्य जनतेला खुले केले जावेत असे वाटते.

आहार कसा असावा याचे बस्केचे काही फोटो आहेत जे तिने इथे किंवा आणखीन कुठेतरी पोस्ट केले होते. तिच्या ताटलीचे फोटो हा आयडियल आहार आहे असे म्हणता येईल.>>>>

थँक्यू सई! बर्याच दिवसात हा धागा पाहिला नव्हता. तू मेसेज केल्याने हे वाचायला मिळाले! थँक्यू सो मच.. मूठभर मांस चढले हे वाचून! Happy फोटो टाकते पण त्याआधी बॅकग्राउंड लिहीते..

मला थिअरीमध्ये काय खायचे हे पक्के माहित आहे, पण प्रॉब्लेम प्रॅक्टीकलचाच येतो. त्याहीपेक्षा कन्सिस्टंसीचा. मी मूळातच त्या डिपार्टमेंटमध्ये खूप कमी पडते. त्यामुळे माझा हा आहार खूप चांगला असला तरी दुर्दैवाने तो बर्याचदा ऑन/ऑफ फेजेसमध्ये चालू असतो. मला हायपोथायरॉईडीझम आहे व नवर्‍याला डायबेटीस. त्यामुळे मला शक्यतो ग्लुटेन कमी (लो कार्ब) व नवर्‍याला लो कार्ब आणि नो शुगर ही पथ्यं पाळावी लागतात. (किंवा आम्ही ती पाळणं अपेक्षित आहे..) सईने बर्‍याच ठिकाणी लिहीले आहे त्याप्रमाणे माझ्या नवर्‍याने प्रत्येक पदार्थ खाल्ल्यानंतर दोन तासांनी काय शुगर येते हे तपासून नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार कार्ब जास्त खाणे हे अजिबातच चांगले नाहीये हे पटले आहे. साधा सकाळचा ब्रेकफास्ट एक प्लेट पोहे खाल्ले तरी प्रचंड शुगर वाढते पोह्यांनी. असे सर्व नोंद करून ठेवल्याने त्याला योग्य तो आहार बनवायचा असेल तर त्यात प्रोटीन्स व फायबरचा भरणा जास्त, फॅट मध्यम प्रमाणात तर कार्ब एकदम कमी (आणि अर्थातच एक्स्टर्नल शुगर अजिबात नाही) असे ठरवणे क्रमप्राप्त होते.. पूर्वी पोळीभाजीने शुगर वाढते इतकेच ध्यानात ठेऊन केवळ सॅलड व सूपवर राहण्याचाही प्रयत्न केला आहे. ते बेस्ट मील आहे! पण घमेलंभर सॅलड खाणे ही खूप स्ट्रेनस अ‍ॅक्टीव्हिटी आहे शिवाय पोट भरल्यासारखे न वाटणे किंवा वाटले तरी लगेच भूक लागणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेवणाबद्दल satiety वाटणे हे कमी होत होते. कारण पिंड पोसलेला असतो आमटी भात, पोळी भाजीवर. त्यामुळे शेवटी दोन्ही कंबाईन केले व त्यात उसळींचा भरणा वाढवून पोळ्या कमी केल्या. अशा रितीने प्रत्येक जेवणात उसळ, कोशिंबिर, एक किंवा दिडच पोळी, कोरडी/फळभाजी किंवा पालेभाजी आणि ताजे सॅलड असा बेत ठरवला. तेल पूर्ण बंद केले. स्वयपाक तुपात केला. (तूप व बटर हे माफक प्रमाणात आहारात हवे कारण योग्य ते फॅट शिवाय सॅटीईटी हवी त्याचबरोबर तेल अगदी वाईट आहे.) कोशिंबिरींना फोडण्या केल्या नाहीत. केवळ दह्यात कालवलेल्या काकडी/कांदा/टोमॅटो किंवा गाजर, बीट इत्यादी आणि तिखट मीठ. दाण्याचे कूट वापरले तर त्याबरोबर फ्लॅक्ससीड पावडर मिसळली. रोजचे सॅलड करताना पुढील घटक पदार्थ वापरले. लेट्युस(चे प्रकार्)+केल+पालक्/चार्ड ह्या इतर पालेभाज्या+गाजर+ रंगीत सिमला मिरच्या+ स्ट्रॉबेरी+स्ट्रिंग किंवा मोझरेला चीज+एडमामे+ स्प्राऊट्स+रोस्टेड दाणे/बदामाचे काप/ वॉलनट/पिकान + सनफ्लॉवर/पम्पकिन/chia सीड्स आणि वरून लिंबू पिळून इतकेच ड्रेसिंग. तिखटपणा हवा असेलच तर ब्लॅक पेपर किंवा क्रश्ड रेड पेपर. अलिकडे मी ब्रेकफास्ट करत नाही कारण आयएफला जायचे आहे. पण नवरा मात्र करतो कारण तो सकाळी व्यायाम करतो तसेच खूप काळ उपाशी राहणे हे देखील शुगरसाठी चांगले नाही. मात्र तो ब्रेकफास्ट असा करतो: ग्रीन अ‍ॅपलच्या फोडी, मूठभर स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीज किंवा इतर बेरीज, एक वाटी दही, एक स्ट्रिंग चिज व पिकान नट्स किंवा वॉलनट्स/बदाम/दाणे.
आम्हाला कन्सिस्टंटली जमत नाही हे फॉलो करायला पण क्रेव्हिंगवाले फुड खाऊन झाले की (जसं ख्रिसमस व्हेकेशननंतर :ड ) ह्या फुडची आठवण येऊ लागते. तसेच प्रत्येक जेवणात भरपूर न्युट्रियंट्स जात असल्याने अधल्यामधल्या वेळेत भूक लागत नाही, अर्बट चरबट खाणे होत नाही. नवरा चहा कॉफी पण घेत नाही मात्र मला हे सोडता येत नाही. Sad सो वर्क इन प्रोग्रेस आहे अजुनही. पण निदान आम्हाला चांगले रिझल्ट्स देणारा आहार कुठला हे कळले आहे तपासण्यांमुळे. सो कितीही खाण्याबाबत पाय घसरला तरी चांगली बाब एक आहे की परत कुठे जायचे व कोणता आहार चालू करायचा हे माहित असते. (आता परत ते फॉलो करायचा विचार करतच होते, सईचा मेसेज वाचून एकदम उत्साह आला. आज उद्यात ग्रोसरी करून हे परत चालू करीन.) आता मी दिक्षित फॉलो करते की आयएफ हे मलाही कन्फ्युजिंग होते. मी म्हणेन मी बस्के डायेट फॉलो करते. Happy मला आहारात फॅट हवे असतात सो मी तूप, बटर, अंडी (पिवळ्यासकट), नट्स, अवोकॅडो सॅलडमधून हे जरूर खाते. ग्लुटेन आणि कार्ब कमीत कमी जितके जाईल तितके चांगले अशी खूणगाठ नक्की आहे. ते फॉलो नेहेमीच होत नाही हेच वाईट आहे. सॅलड म्हणजे केवळ कांदा तोमॅटो काकडीच्या स्लाईसेस नाहीत हे पक्कं ठाऊक आहे. उसळी पूर्वी मला उगाच हाय कार्ब वाटायच्या, पण त्यात प्रोटीन व फायबर्स असल्याने त्या आता जरूर इन्क्लुड करते. किन्वा पण ह्याच कारणाकरता अ‍ॅड करते. आई म्हणजे रोज पचायला जड खाऊ नये. पण अ‍ॅक्चुअली पचायला जडच खावे म्हणजे जास्त काळ पोट भरलेले राहते. अधूनमधून चिकन रस्सा वगैरे करते. शिवाय बेक्ड फिश/चिकन वगैरे.. (आता लिहीले आहे तर चालू करते :)) )

हे फोटो:

IMG_1077_0.JPGIMG_1148.JPGIMG_0939.JPGIMG_0971.JPGIMG_1001.JPGf1_1.png

@बस्के,
मस्त समजावून सांगितले आहेस.
असा आहार + आयएफ (मग ते दीक्षित पद्धतीने असले तरी) डायबेटिक आणि नॉन-डायबेटिक दोन्ही व्यक्तींना चांगला आहे.

थँक्यू सई, सिम्बा.
एक लिहायला विसरले, ते म्हणजे हे सर्व डॉक्टरशी बोलून, सल्लामसलत करूनच बदल केले आहेत. नवर्‍याचे एवनसी नॉर्मलला आली तसेच इतर सर्व पॅरामीटर्सही. गोळ्या बंद नाही केल्या पण डॉशी बोलून कमी केला डोस. अर्थात तो खूप व्यायामही करतो. डॉ म्हणाली तुला मॅजिक पिल सापडली आहे. जे करतोयस ते चालू ठेव. सो हे महत्वाचे सर्वात. हे करताय ते डॉ शी बोलून करा. विशेषतः डायबेटीस असेल तर.

Pages