चलायचं? - भाग २

Submitted by अज्ञातवासी on 29 December, 2018 - 12:55

चलायचं? भाग १
https://www.maayboli.com/node/68487

४.
"सगळं छान आहे, सगळं सुंदर आहे."
"ये गप रे."
"काय झालं?"
"मग काय, तुला माझ्याबरोबर घेतलं ना, तीच मोठी चूक झाली."
"काही चूक वगैरे नाही. बघ आपण दोन्ही मिळून सगळं गाठू."
"आधी जे आहे, ते तर पूर्ण कर. अजून पहिलंही काम पूर्ण नाही केलंय तू."
"चल आताच करूयात. चलायचं?"

५.
"पक्या, आता मी मरूनच जाईन."
"राणी हे बघ, आलंय!"
तिने आ वासून बघितला. रात्रीच्या सुमारास ते तिसऱ्या टेकडीवर पोहोचले. टेकडी चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाली होती. जणू चांदीची टेकडी!
"हे दोन घोट घे, आणि ताजी व्हय. आता लै जवळ आलूया आपण दोघी."
तिने तसंच केलं.
दोन्ही मिळून लक्षपूर्वक इकडे तिकडे शोधू लागले. सगळीकडे फक्त चांदी दिसत होती.
"मला कायबी दिसत नाहीये रं!"
"अगं असं कसं व्हईल, काळा कातळ इथेच तर घावायला पाहिजे हुता."
तेवढ्यात एक गिधाड चाल करून त्याच्याजवळ आलं, त्याचा लचका तोडणार तेवढ्यात तिने आपल्या हातातली कुऱ्हाड त्याच्यावर चालवली.
"मालते, तू मला वाचीवल गं."
"का रं, गिधाड लिवल नव्हत वाटत."
पक्या वरमला, पण या झटापटीत गिधाडाच रक्त जमिनीवर सांडलं!
त्याक्षणी टेकडी दुभंगली, आणि काळा कातळ वर आला, त्याबरोबर कुठूनतरी लालभडक घोडाही उडत आला!!!
दोन्हीही घोड्यावर स्वार झाले.
आणि घोडयावर स्वार होऊन तो म्हणाला...
"मालते, चलायचं?"

६.
"माला, प्रिये दार सापडत नाहीये ग."
"प्रकाश, मला खूप भीती वाटतेय रे."
"ये माझ्या कुशीत ये, सगळी भीती दूर होईल."
"चावटपणा नको, भर दुपारी या टेकडीवर सूर्याचं एक किरण नाही."
"अग प्रकाश आहे ना सोबत."
"बस झालं. मी परत जातेय."
माला परत जायला निघाली, पण...
तेवढ्यात एक काळा नाग फुत्कारत मालाजवळ आला, तिला डसायच्या प्रयत्नात असताना प्रकाशने पिस्तूलाच्या गोळीने त्याचा फणा उडवला...
नाग मरून पडला, त्याची काठी झाली. ती ढगात गेली, व ढगाला तिने छिद्र पाडलं.
झरझर सूर्यकिरणे टेकडीवर आली, आणि दोन भव्यदिव्य दरवाजे उघडले...
"माला, चलायचं?"

७.
"पिके, यु वॉन्ट टू किल मी, मग तू रिनाबरोबर हँगआउट ला मोकळा."
"नो मायला, आय जस्ट वॉन्ट टू एक्सप्लोर..."
"व्हॉट द हेल यू वॉन्ट टू एक्सप्लोर, इथे सनराईज काय सनच नाहीये. तू फक्त मला दमवून किल करणार आहेस."
"बे, वी एक्सप्लोर."
एअरपोर्टवर भीषण शांतता होती,चिटपाखरूही दिसत नव्हतं.
तेवढ्यात कुठूनतरी पिकेच्या दिशेने चार गोळ्या सुसाट आल्या...
पिके मरून पडला.
मायलाने त्या दिशेला पाहताच, एका गोळीने तिच्या डोक्याचा वेध घेतला.
दोन्हीही मरून पडले...
"खेळात असं चालायचंच...."

क्रमशः?

.
.
.
.
.
.

.
.

.
.
.

ठेवावच लागेल. खेळ तर आता सुरू झालाय.
Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय कळत नाहीय. पण तुमच्या डोक्यात काहीतर प्लॅन असेलच त्यामुळे शेवटी सगळे धागे जुळून येतील असे वाटतेय.
पुभाप्र.

@अॅमी>>>>> धन्यवाद... आशा करूयात Wink
@DShraddha >>>>> प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद. तुमचा प्रतिसाद आणि पावती मी हक्काची समजायला लागलोय!

Happy

येउ द्या, डोक्यावरुन जातय.. शेवटी कळेल बहुतेक
लिखाण भारी आहे >>>>
धन्यवाद किल्ली. यु अल्वेज मेड माय डे

काय चालुये तुझ्या डोक्यात नक्की??>>>
मेघा खरं सांगतो, या भागानंतर मला थोडीशी दिशा मिळायला लागलीये.
बघुयात काय होतं.
आणि तुला थँक्स म्हणणार नाही. यु नो Wink

जबरदस्त
पहिला आणि हा भाग सलग वाचला तर थोडाफार कळतंय असा वाटतंय, पण बघु...