१.
"पक्या, जरा दमाने घे. जीव खालीवर हुतुय माझा."
"आग राणी असं दमून कसं चाललं, अजून तीन टेकाड वलंडायचित,"
"पक्या, आक्ख रान पालथं घातलया, तरी तीन टेकाड बाकी?"
"गप की राणी. हे घे. दोन घोट हाण... आणि चाल..."
दोन्हीही जिवाच्या आकांताने टेकडी चढत होते.
"पण पक्या, ती दावल ना व?"
"आग लिहून ठेवलंय... वाच..."
ती वाचू लागली.
'काळा कातळ, लाल घोडा,
शेंदूर फासतोय मारुती!
करा मारुती बाजूला,
भुत्याची करा आरती!
भुत्या बाजू होई,
गणाला आरोळी देई!
गण आला धावून
विहीर जावा पोहून!
मासा तळाला,
लागल गळाला!
तडफडत मासा
कसा कासा!
ती येईल
आणाभाका घेईल!
मागा सगळ्या इच्छा,
पूर्ण करील!
परत फिरा माघारी,
जाऊ नका कुणाबरोबरी!
जाल जाळ्यात,
मासा फसला कोळ्यांत!!!'
"मग राणी, चलायचं?"
...आणि एवढं बोलून दोन्ही जोमाने टेकडी चढू लागले.
२.
"आपल्याला अशी ही बनवाबनवी बघायचाय बरं."
"हो ग, कसं विसरेन?"
"ए त्या टेकडीवरच्या दाराची गोष्ट सांग ना."
"अग कितीदा ऐकशील?"
"अरे सांग ना प्रकाश. रात्रीच्या वेळी ऐकायला मस्त वाटते."
"अग प्रिये, ऐकण्यापेक्षा बघण्यात खरी मजा आहे."
"काय सांगतोस? अशी टेकडी आहे?"
"हो, लिहून ठेवलंय. ऐक"
'सोनेरी किरणे,
दारावर पडती!
अगडबंब पहारेकरी,
दार उघडती!
मोहरा टेकवा,
बाजूला होती!
न टेकवता,
जीव घेती!
आत बसलाय
काळा नाग,
लावता आग
उडून जाई!
पकडा त्याला,
ती येईल,
आणाभाका घेईल!
मागा सगळ्या इच्छा,
पूर्ण करील!
परत फिरा माघारी,
जाऊ नका कुणाबरोबरी!
जाल बिळात,
नाग फसला गारुड्यात!'
"तर मग प्रिये, चलायचं?"
...आणि ती त्याच्या डोळ्यात हरवून गेली.
३.
"पीके, यु डोन्ट अन्सर माय हंड्रेड व्हॅटसाप मेसेजेस!"
"सॉरी बे, जरा बिजी होतो."
"व्हॉट रबिश, आणि फेसबुकवर ऑनलाईन नाहीये तू, फ्रॉम लास्ट थ्री डेज. ओ एम जी!"
"बे मला काहीतरी इंटरेस्टिंग सापडलंय..."
"आय नो, त्या रिनाच्या बडेला तू स्टेटस टाकलं, तेव्हाच आय नो."
"नो ग बे, लिसन. जरा अवघड मराठी आहे, बट एव्हरी वर्ड इज रियल. ऐक."
'सनराईजच्या नन्तर,
प्लेन उडत!
त्यात चढा,
रोप ओढा!
रोप ओढताच,
स्वान येतो!
मिल्क दाखवताच
घटघट पितो!
मिल्कचा थेंब,
बाकी वॉटर ठेवा!
स्वानला टाइम लागतो,
नेट तयार ठेवा.
स्वान कॅच करताच,
ती येईल!
आणाभाका घेईल!
मागा सगळ्या इच्छा,
पूर्ण करील!
परत फिरा माघारी,
जाऊ नका कुणाबरोबरी!
जाल ढगात,
स्वान फसला डकात!'
"मग बे, शाल वी गो, मिन्स, चलायचं?"
...आणि ऑडी सुसाट निघाली...
क्रमशः.... ठेऊ?
ऑssss
ऑssss
हे काय आहे अज्ञातवासी ?
पुभाप्र !
धन्यवाद आनंद!
धन्यवाद आनंद!
पुभाप्र>>>>> टाकू?
Zero पाहिल्याचा हां परिणाम
Zero पाहिल्याचा हां परिणाम म्हणावा का ?
.. बहुतेक !
टाकू?>>>अं हं
टाकू?>>>अं हं
@डूडायडू- तुमचा आय डी चुकलाय
@डूडायडू- तुमचा आय डी चुकलाय हो. डूआयडू असा हवा. असो विषयांतर नको. दुर्लक्ष आहेच....
करमरकर हायेत ते!
करमरकर हायेत ते!
पुढचा भाग टाका!
बरोबर जावेद भाई
बरोबर जावेद भाई
डू डाय डू
कर मर कर
मित्रांनी शाळेपासुन ठेवलेले पेटेंट नाव आहे ते
क्रमशः.... ठेऊ?
क्रमशः.... ठेऊ?
Wink
बिंदास
० नंतर
१ ... २ क्रमशः मालिका हवीच
जावेद कुणीही असू दे, जेव्हा
जावेद कुणीही असू दे, जेव्हा झिरोचा विषय निघाला तेव्हांच मी समजलो...
असो... दुर्लक्ष आहेच...
मस्तच क्रमशः पाहिजे
मस्तच
क्रमशः पाहिजे
धन्यवाद L Lawliet.
धन्यवाद L Lawliet.
आज पुढचा भाग लिहायला घेतो.
जेव्हा झिरोचा विषय निघाला>>>
जेव्हा झिरोचा विषय निघाला>>>
अरे सावरा लवकर स्वताला !
एक शाखाचा पिक्चर बघून एवढा मनावर परिणाम नका करुन घेऊ.
रोचक हाये. येऊद्या फुडचा भाग.
रोचक हाये. येऊद्या फुडचा भाग.
धन्यवाद अॅमी!
धन्यवाद अॅमी!
व्वा येऊ द्या पुढचा भाग☺️
व्वा
येऊ द्या पुढचा भाग☺️
धन्यवाद VB
धन्यवाद VB
हा हा भारी आहे...पहिला जुने
हा हा भारी आहे...पहिला जुने मराठी मग थोडे आधुनिक नंतर इंग्लीश मराठी ....क्रमशः आले की कुठली भाषा येणार
मस्तय हे
मस्तय हे
थँक्स किल्ली आणि उमानू!!!
थँक्स किल्ली आणि उमानू!!!
छान कल्पना! मस्तच.
छान कल्पना! मस्तच.
छान कल्पना! मस्त आहे.
छान कल्पना! मस्त आहे.
श्रद्धा तुम्हाला स्पेशल थँक्स
श्रद्धा तुम्हाला स्पेशल थँक्स. तुम्ही कायम माझा हुरूप वाढवतात.
धन्यवाद विकास!
धन्यवाद विकास!
छान कल्पना! मस्त आहे.-- +111
छान कल्पना! मस्त आहे.-- +111
मेघा तुला थँक्स नाही म्हणणार,
मेघा तुला थँक्स नाही म्हणणार, तुझा प्रतिसाद माझा हक्काचा आहे
नक्की काय सांगायचंय.. मला
नक्की काय सांगायचंय.. मला नाही समजले.
जे काही आहे ते वाचायला छान
जे काही आहे ते वाचायला छान वाटलं पण जरा डोक्यावरून गेलं. पुढचा भाग वाचल्यावर संदर्भ लागेल बहुदा. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
काही उलगडा झाला नाही.
काही उलगडा झाला नाही.
प्रत्येक जन्मात तिथे जातात का?
च्रप्स, मीरा, सस्मित,
च्रप्स, मीरा, सस्मित, प्रतिसादाबद्दल धन्यवाद।
मजा आली वाचायला! येवू दे
मजा आली वाचायला! येवू दे पुढला भाग!
Pages