झिरो परीक्षण

Submitted by अज्ञातवासी on 23 December, 2018 - 11:59

गणेशोत्सवात गावोगावी खूप देखावे उभारलेले असतात.पण प्रत्येक गावाचं आकर्षण असतो, तो एक देखावा, जो सगळ्या देखाव्यात उठून दिसतो. आपल्याला माहिती असतं, हा एक देखावा आहे, मूळ घटना यापेक्षा खूप भव्यदिव्य आहे. पण तरीही आपण तो देखावा मनापासून एन्जॉय करतो, त्या देखाव्यातील सत्यतेत कितीही भगदाडे असली तरी!

झिरो बघून मला काय मिळालं?
आनंद? हो थोडासा.
मी भावनिक झालो? नाही.
माझ्या मनावर काही खोलवर ठसा उमटला? नाही.
तरीही हा चित्रपट मी एन्जॉय केला. एका तटस्थ नजरेतून. ना मला कंटाळा आला, ना मला असं वाटलं हा चित्रपट संपू नये.
कारण भव्य देखावे सगळ्यांना आवडतात, पण देखावा संपल्यावर कुणालाही तिथे थांबावं वाटतं नाही!
या चित्रपटाची कथा सांगायची झाली तर बव्वा सिंग नावाची व्यक्ती वयाच्या ३८ व्या वर्षीही अविवाहित असते. कारण सगळ्यांना माहितीये, तो बुटका असतो. लग्नासाठी तो आसुसलेला असतो, आणि असच एका लग्न जुळवणार्या संस्थेत त्याला एक फोटो मिळतो. त्या मुलीला तो बघताच पसंद करतो, पण तिला प्रत्यक्षात बघून तो शॉक होतो, कारण ती असते नासाची वैज्ञानिक व तिला सेरेब्रल पालसी चा आजार असतो. मात्र आता बव्वा हट्टाला पेटलेला असतो, तो तिला पटवतो, मात्र त्याच्या आयुष्यात येते बबिता, आणि सुरू होतो प्रेमाच्या त्रिकोणी प्रवास. खाचखळग्यांचा प्रवास!
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर मी उतरत्या क्रमाने बोलेन. सर्व सहकलाकार, मग बव्वाचे आई वडील असो, लग्न जुळवणार्या संस्थेत असलेला पांडे असो, किंवा बव्वाचा मित्र असो, हे सर्व हिंदी पट्ट्यातील सिनेमामधील अत्यंत कसलेले कलाकार आहेत. त्यांच्या वाटेला कोणतीही भूमिका येवो, त्यांनी ती चोखपणे बजावली आहे, आणि येथेही त्यांच्या वाटेला जेवढं काम आलंय, ते त्यांनी चोखपणे बजावलंय, ना कमी ना जास्त. चोख व्यवहार.
आता मुख्य तीन कलाकारांविषयी म्हणायचं ठरलं, तर सगळ्यात कमी भूमिका कतरिनाची आहे. एक अल्कोहॉलिक, नैराश्य आलेल्या पण अजूनही अहंकार असलेल्या बबिताची भूमिका कतरिना करते, आणि नेहमीप्रमाणे, कतरीना कुठेही या रोलमध्ये फिट बसत नाही, आणि तिने या रोलसाठी मेहनत घेतलेलीही कुठे जाणवत नाही. सगळ्यात जास्त तिने माती खाल्ली असेल, तर हिंदी पट्ट्यातल्या उच्चारांमध्ये. इतकी वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत राहून जर साधे शब्दोच्चार न जमणारी ऐक्ट्रेस फक्त सुंदरतेच्या बळावर आज टॉपला असेल, (आता कतरिनाला मी ती आता सुंदर दिसत नाही असं म्हणणार नाही, कारण अजूनही ती छान दिसते. भलेही तिचा जुना चार्म गेलाय तरी!) तर हॉलीवूड बॉलीवूडला भारतातच का मागे टाकतय, याचं उत्तर मिळतं.शब्दोच्चार जरी सोडलेत, तरीही अभिनयाच्या बाबतीतही कतरिना कुठेही बबिता जाणवत नाही. दिसते ती फक्त कतरीना.
आता अनुष्काविषयी बोलूयात. तोंड वेंगाडून बोलणे, वाकडं चालणे ह्या दोन गोष्टी करून अनुष्का स्वतःला सेरेब्रल पालसीची रुग्ण दाखवते. पण तिच्या देहबोलीत कुठेही तो आजार, अथवा मर्यादा जाणवत नाही. कितीही आशावादी असलं, तरीही या आजारांनी शारीरिक मर्यादा येतातच. पण वरवरची शारीरिक लक्षणे घेऊन भूमिकेचा अभ्यास न करता, अनुष्काने ही भूमिका साकारलीये, मग त्या व्यक्तीची मानसिकता दूरच राहिली. अनुष्काच्या भूमिकेत पावलोपावली तो भडकपणा व उथळपणा जाणवत राहतो.
आता या कथेतील सर्वात मुख्य पात्र, ज्याच्यावर या चित्रपट मार्केटिंगचा सर्वात जास्त फोकस होता, त्या शाह रुख खानवर येऊ. एका शब्दात सांगायचं झालं, तर या चित्रपटात शाहरुखने फक्त माती खायची बाकी ठेवलीये. मी बाकी ठेवलीये असं यासाठी म्हटलो की नेहमीच गालात हसणं, शरीर वाकवून रोमान्स करणं, भडकपणे राग दाखवणं, मान हलवून अभिनय करणं, यात शाहरुख पैकीच्या पैकी मार्क घेतो. पण एका बुटक्या व्यक्तीचा लहेजा, शारीरिक मर्यादा, त्यातून येणारा न्यूनगंड, लग्न जमत नसल्याने येणारी निराशा, काहीतरी नवीन करण्याची प्रचंड उर्मी व आशावाद, या सर्व आघाडीवर तो सपशेल माती खातो.
आता या चित्रपटाच्या VFX अथवा CGI कडे वळू. एका शब्दात म्हणायचं झालं, तर वेल ट्राय, पण बुटका आणि लहान हे शब्द कितीही समानार्थी वाटत असले, तरी यांचा स्पष्ट अर्थ ना समजल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याच उत्तम उदाहरण. एखाद्या १२ वर्ष वय असलेल्या मुलावर तुम्ही शाहरुखला चिकटवला, असं वाटत राहतं, आणि ते बेमालूमपणे झालंय. पण त्याची चित्रपटात गरज नाही, आणि ज्याची गरज आहे, ते कुठेही दिसत नाही. म्हणून लहान शाहरुखला पैकीच्या पैकी मार्क, बुटक्या शाहरुखला शून्य मार्क, आणि गरज बुटक्याची होती राजा...
छायालेखन ज्या मनू आनंदने केलंय, त्यांना सलाम. देशी मातीपासून अंतरिक्षपर्यंत जो एक टच आहे, तो त्यांनी छान जपलाय. प्रत्येक फ्रेम नेत्रसुखद वाटते. भव्य वाटते. चित्रीकरण तर अत्यंत टवटवीत वाटत. एकंदरीत हा खुप छान अनुभव वाटतो.
म्युजिक मध्ये अजय अतुलने तुम्ही हिंदीत का नेहमी माती खाताय? असा प्रश्न मला यावेळीही विचारण्याची संधी दिलीय. 'मेरे नाम तू' सोडलं तर सगळी गाणे विस्मरणीय आहेत. आणि 'मेरे नाम तू' वर 'सैराट झालं जी'चा प्रभाव जाणवत राहतो.
आता बोलूयात कथेविषयी आणि पटकथेविषयी. कथा खरंच भव्य आहे. कथेची कल्पनाच मुळात अतिशय एपीक म्हणावी अशी आहे (मी एपिक म्हटलंय, युनिक नाही. गैरसमज नको). मात्र पटकथा, जी चित्रपटाचा आत्मा असते, तिच्यातच जीव नाही. मुख्य त्रिकोण सोडला तर, कुठल्याही व्यक्तिरेखेची चित्रपटात नीट वाढ किंवा ओळख होत नाही. मुख्य व्यक्तिरेखाही खूप उथळ लिहिलेल्या वाटतात. छोट्या छोट्या गोष्टी का व कशा घडतात, याचं स्पष्टीकरण मिळत नाही, व प्रेक्षक गोंधळून जातो.
आता शेवटचा व मुख्य भाग दिग्दर्शन. आनंद राय ही व्यक्ती उत्तर भागातील चित्रपट बनवणारा हुकुमी एक्का. तिथल्या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणं, ही त्यांची खासियत. पण या चित्रपटात नेमकं त्यांना व्यक्तिरेखा उभ्याच करता आल्या नाहीयेत,कारण...
...त्यांचं सगळं लक्ष शाहरुखच्या स्टारडमकडे केंद्रित झालंय...
वरची ओळ मी यासाठी हायलाईट केली, कारण याच एका कारणाने चित्रपट दणक्यात आपटतो. बव्वा सिंग जरी बुटका आहे, तरी तो शाह रुख असल्याने त्याची वागणूक स्टारसारखीच असणार, हे धरून सगळा चित्रपट त्याभोवती केंद्रित केलाय, आणि परिणाम... शून्य!
समारोपात मी असं म्हणेन की शेवटी ही कथा भव्य आहे, देखाव्याच्या कथेसारखी. पण देखावा दाखवताना त्या कथेला करावी लागणारी डागडुजी स्पष्ट दिसते. पण भव्यदिव्य देखावा उभं करायलाही कसब लागत...
हा चित्रपट म्हणजे असाच एक देखावा आहे. भव्य कथा, पण भगदाड पडलेली पटकथा. सर्व कलाकार अभिनयाचा देखावा करतायेत, पण कुणीही तो जगत नाहीये. सादरीकरण सुंदर आहे, पण ओढ लावणारं नाही. एखाद्या सुंदर देखाव्याकडे माणूस क्षणभर ओढला जाऊन तटस्थ होतो, तसंच इथे होतं. हा चित्रपट ना हुरहूर लावतो, ना टिकणारा आनंद देतो. आपण चित्रपट बघायला आलोय, चित्रपट संपलाय, चला आता घरी जाऊन अर्जंट मेल टाकायचाय...
...आणि शून्यापासून सुरुवात करून बाहेर पडताना तो शून्य होऊनच पडतो...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट भास्कर चा उपद्रव थांबवायला ही युक्ती उपयोगी पडलेली.
फक्त इतकेच करायला हवे की सगळ्यांनी दुर्लक्ष करायला हवे, एकाने जरी थोडी ढील दिली की गाडी घरंगळत जाते.+११११

काहि गरज नाहि रे....कंटाळा आला आहे त्याचा.. तुझे धागे उघड आणि काय धिंगाणा घालायचा आहे तो घाल.. पण एवढे स्पष्ट लिहिले असताना तरि तुला समजायला पहिजे होते.>>>>>आता अति केलं हसू झालंय त्याचं...
proud

अज्ञातवासी
तुम्ही खरच चांगलं लिहिलं आहेत. थांबू नका जे तुम्हाला लिहावसं वाटतं ते लिहा. मी नक्की आहे वाचायला.

मित्रांनो
विचार करा! ऋन्मे sषची हि परीस्थिती आहे तर प्रत्यक्ष शाहरूखच काय झालं असेल.
सोडून द्या

म्ही खरच चांगलं लिहिलं आहेत. थांबू नका जे तुम्हाला लिहावसं वाटतं ते लिहा. मी नक्की आहे वाचायला.+११११
येउ द्या अजून लिखाण

तू शाहरुखचा धृतराष्ट्र फॅन आहेस.
पण गांधारी टाईप नाही >> Rofl Rofl Rofl Rofl

अथ श्री महाभारत कथा..

कथा है पुरुषार्थ की ये,
स्वार्थ की परमार्थ की,

शाहरूख की है कहानी,
सदियो से भी पुरानी,
है ज्ञान की ये गंगा,
ऋन्मेऽऽष की अमर वाणी,
ये विश्व भारती है,
हीरो की आरती है,
है नित नयी पुरानी,
शाहरूख की ये कहानी,
महाभारत महाभारत,
महाभारत महाभारत।।

ऋन्मे sषची हि परीस्थिती आहे तर प्रत्यक्ष शाहरूखच काय झालं असेल.
सोडून द्या >>' द शाहरुख खान' चा आणि यांचा काही संबंध दुरदुर पर्यंत फॅन म्हणून सुद्धा दिसत नाही.
त्यांनी आभास निर्माण केला भयानक चाहते वगैरे असल्याचा आणि आपण खरं मानलं. हेचं चुकलं.

अन हो, ऋन्मेष च्या काही सगळ्याच कमेंट्स टाकाऊ नाहीयेत, अपवाद म्हणून काही चांगले प्रतिसाद देखील लिहतो तो.>> प्रचंड अनुमोदन.
+११११११११११११११११११११११११
मी तर म्हणेन त्यांच्या (आणि इतर कुणाच्याही) कुठल्याच कमेंट टाकाऊ नसतात... ते (इतर अनेकांसारख) नेहमीच चांगले लिहितात..

अज्ञात वासी तुम्ही लिहायचे सोडू नका. चांगला कंटेंट ही वाचकांची गरज असते. बाकी फ्लश होते. >>>>> धन्यवाद अमा... खूप हुरूप आला वाचून

अज्ञातवासी
तुम्ही खरच चांगलं लिहिलं आहेत. थांबू नका जे तुम्हाला लिहावसं वाटतं ते लिहा. मी नक्की आहे वाचायला.
मित्रांनो
विचार करा! ऋन्मे sषची हि परीस्थिती आहे तर प्रत्यक्ष शाहरूखच काय झालं असेल.
सोडून द्या>>>> धन्यवाद गुगु.
आपल्या सगळ्यांचे प्रतिसाद टॉनिक आहे माझ्यासाठी.

' द शाहरुख खान' चा आणि यांचा काही संबंध दुरदुर पर्यंत फॅन म्हणून सुद्धा दिसत नाही.>> दूर दूर पर्यन्त संबंध नसतानाही एखाद्या बद्दल प्रेम वाटण्यालाच फॅन असणे म्हणतात..

तर मंडळी, लक्षात घ्या, टवाळची संगत सोडावी, सज्जनांची ओढ धरावी. अरे जिथे मेनकेमूळे (की रंभा? की उर्वशी? मरू दे, आपल्याला काय करायचंय) व तिच्याकडे दुर्लक्ष न केल्याने विश्वामित्राची काय अवस्था झाली, तर आपण पामर काय?
तर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, दुर्लक्ष करा... दुर्लक्ष करा... दुर्लक्ष करा...
आणि हे मी कायम सांगतच राहीन.... सांगतच राहीन.... जब तक है जान... जब तक है जान....

द शाहरुख खान' चा आणि यांचा काही संबंध दुरदुर पर्यंत फॅन म्हणून सुद्धा दिसत नाही.
त्यांनी आभास निर्माण केला भयानक चाहते वगैरे असल्याचा आणि आपण खरं मानलं. हेचं चुकलं>>>> श्रद्धा हेच मी मागच्या काही प्रतिसादात लिहिलंय...

@अताज्ञवासी तुमच्या कथेचा पुढचा भाग कधी येणार आहे?>>>>>इथे जरा शांतता झाली की लिहिणारच होतो, पण धागाकर्ता धागा सोडून पळून गेला असं व्हायला नको.
आज किंवा उद्या नक्की टाकतो.

झिरो’ जर हिट ठरला नाही तर कदाचित मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही, असं शाहरुख काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाला होता.>> what a great sense of humor. Modest, humble yet funny.
शाहरूख सुपरस्टार असूनही डाऊन टू अर्थ असल्याचे हे केवढे मोठे प्रमाण आहे.

दूर दूर पर्यन्त संबंध नसतानाही एखाद्या बद्दल प्रेम वाटण्यालाच फॅन असणे म्हणतात..>> मला जे म्हणायचं होतं ते तुम्हाला समजलं नाही किंवा समजुन घ्यायचं नाहीये.
प्रेम असणं आणि इतरांना irritate होईल अशा पद्धतीने त्याचं प्रदर्शन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
मी शाहरुख खान चे बरेच Diehard फॅन पाहिलेत माझ्यासकट. पण हा प्रकार काहीतरी वेगळं आहे
××××××××

मी डायहार्ड फॅन वगैरे नाही, पण जेव्हा शाहरुख चांगलं काम करतो, तेव्हा मला नक्कीच आवडतो. त्याचा फॅनही नाही, आणि विरोधकही नाही.

मला जे म्हणायचं होतं ते तुम्हाला समजलं नाही किंवा समजुन घ्यायचं नाहीये.>> थोड विस्ताराने सांगता का?
प्रेम असणं आणि इतरांना irritate होईल अशा पद्धतीने त्याचं प्रदर्शन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. >> irritate होण ना होण आपल्या हातात असते. एखाद्याला कोणाचा आयडी बघूनच irritate होत असेल तर त्या आयडीने मायबोलीवर लॉगीन करूच नये की काय?

मी शाहरुख खान चे बरेच Diehard फॅन पाहिलेत माझ्यासकट. पण हा प्रकार काहीतरी वेगळं आहे>> काही वेगळा नाही.. ते भरभरून कौतुकाने बोलतात इतकेच.. मरे पर्यंत आपल्या हीरोची स्तुती करणाऱ्यालाच डाय हार्ड फॅन म्हणतात... तुम्ही आजवर बघितलेले फॅन फेक आहेत

हे बघा, ऋन्मेष शाहरूख खानच्या चित्रपटासंबंधित धाग्यावर शाहरूख खान बद्दल लिहित आहेत.. त्यांच्या लिहिण्याला आक्षेप घेणे, ईतरांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करा म्हणून सांगणे आणि त्यावरून वैयक्तिक टीका करणे हे मायबोलीवर विषयाला धरून लिहिण्याच्या त्यांच्या बेसिक अधिकाराला नाकारण्यासारखे आहे.

तुम्ही म्हणत असाल चित्रपटाबद्दल बोला शाहरूखखान बद्दल नाही.. तर चित्रपटात मध्यवर्ती भुमिका असलेल्या कलाकाराबद्दल बोलायचे नाही अशी अपेक्षा हास्यास्पद आहे. म्हणजे भाजपाबद्दल बोला पण मोदी बद्दल बोलू नका.... कॉग्रेस बद्दल बोला पण राहूल गांधींबद्दल बोलू नका...
तुम्ही आधी राजकारणाच्या धाग्यावर जाऊन मोदी मोदी किंवा रागां रागां करणार्‍यांवर सुद्धा आक्षेप घ्या पाहू Wink

<फक्त आणि फक्त चित्रपटाच्या चर्चेसाठी>
Lol
धागालेखकच रूळ सोडून इकडे तिकडे उड्या मारत चालताना पाहून मजा आली.

रुन्मेष च्या बरोबर (या धाग्यावर) हाबा बद्दल पण बोलू नका. >>+१११११११११११११११११११११११११११११
... फक्त झीरो आणि शाहरूख मयूर खानबद्दल बोला. Proud

धागालेखकच रूळ सोडून इकडे तिकडे उड्या मारत चालताना पाहून मजा आली.>>>>>
ऐकून आनंद झाला... आजकाल कुणाला चला हवा येऊ द्या पाहूनही मजा येत नाही, तेव्हा ही माझी चांगली उपलब्धी आहे. पण माणूस एकतर उड्या मारू शकतो, किंवा चालू शकतो. तर उड्या मारत कसं चालतात हे बघायला आवडेल. तेही रुळावर...

काही निवडक प्रतिसादकाना विनंती...
धागा दुसऱ्यांदा स्थलांतरित करण्याची वेळ आलीये. तेव्हा दुर्लक्ष करा. व्यक्तीकडे व प्रवृत्तीकडेही....

शाहरुख ला बायोपिक चांगला जमेल इंफॅक्ट. सिरीयस रोल्स चांगले जमतात त्याला. आठवा -चक दे , स्वदेस>>>>> +11111
Submitted by अज्ञातवासी on 26 December, 2018 - 11:56

चूक चूक चूक
× × ×

शाहरूखने सम्राट अशोकामध्ये काय दिवे लावलेले ते विसरलात का?

चक दे आणि स्वदेस हे बायोपिक होते हे मला आज समजले Happy

जोपर्यंत शाहरूख खान तुम्हें देखती हूं रे नावाच्या हिंदी मालिकेत काम करत नाही तोपर्यंत तो महान अभिनेता आहे हे मान्य करता येणार नाही.

जोपर्यंत शाहरूख खान तुम्हें देखती हूं रे नावाच्या हिंदी मालिकेत काम करत नाही तोपर्यंत तो महान अभिनेता आहे हे मान्य करता येणार नाही.

नवीन Submitted by मेरीच गिनो on 26 December, 2018 - 19:40>>> Rofl

पण हे मात्र खरे की शाहरुख काय किंवा सुभा काय, बहुतेक हल्ली लोकांना म्हातारेच आवडाय लागलेत Wink

Pages