धोंडो केशव कर्वेंचे चरित्र किंवा त्यांच्या कार्याविषयी

Submitted by अननस on 19 December, 2018 - 10:38

धोंडो केशव कर्वेंचे चरित्र किंवा त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्या आठवणी सांगणारे काही वाचनात आले काय? विशेषतः त्यांच्या आठवणी, लेखनाचे, भाषणाचे उतारे अवश्य या धाग्यावर लिहा.

Group content visibility: 
Use group defaults

धोंडो केशव कर्वे, बाया कर्वे आणि पार्वतीबाई आठवले यांची आत्मचरित्रे आहेत. पुणे मराठी ग्रंथालय, नगर वाचन मंदिर अशा जुन्या ग्रंथालयांत मिळतील.
पार्वतीबाई आठवल्यांच्या आत्मचरित्राची नवी आवृत्ती राजहंस प्रकाशनाने तीनचार वर्षांपूर्वी काढली आहे.

त्यांच्या आठवणी सांगणारा लेख इरावतीबाई कर्व्यांच्या ‘परिपूर्ती’ संग्रहात आहे.
(लेख आहे हे निश्चित - संग्रहाचं नाव माझी आठवण दगा देत नसेल तर हेच.)

टिळक,आगरकर आणि गोखले यांच्या चरित्रांमध्येही कर्व्यांचे उल्लेख आहेत. टिळकांनी डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचा राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी गोखल्यांनी कर्व्यांना गणित शिकवायला आणलं होतं. कर्व्यांच्या पुनर्विवाहाच्या पत्रिकेवर निमंत्रक म्हणून आगरकरांचं नाव होतं.
देवदत्त टिळक यांनी पंडिता रमाबाई यांचं चरित्र लिहिलं आहे. तेही बघा. बाया कर्वे रमाबाईंच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या.

https://www.youtube.com/watch?v=QWVmdAYbzEA ही एक जुनी क्लिप आहे. महर्षि कर्व्यान्च्या ८१ व्या वाढदिवसा च्या समारंभाची. त्यात त्यांचे भाषण आहे. दापोली जवळील `मुरूड' मधे त्यांच शिक्षण झालं. विकिपिडिया वरील माहितीत आलेली शाळा आणि दुर्गादेवीचे मंदीर मुरुड मधे अजुन आहे. पण कर्वे राहायचे तो वाडा दुसर्‍या कोणीतरी विकत घेतला व फारसा वावरात नाही. (तिथे त्यांचे स्मारक करायचा प्रस्ताव आहे) .
लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात `कर्वे ३ दिवस अनवाणी चालत मुरूड पासून पुण्यात आले परीक्षा देण्यासाठी आणि त्यात ते पहीले आले ' असा उल्लेख एका धड्यात होता. एकुणातच केवढं मोठं आणि काळाच्या पुढे असणारं काम आणि विद्वत्ता ! ग्रेट माणसं ! -^-.

जिद्दु,
श्रीधरपंतांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह केसरीवाड्यात आहे.
जयंतराव टिळकांच्या आत्मचरित्रात श्रीधरपंतांचे उल्लेख आहेत.
य. दि. फडक्यांनी श्रीधरपंतांवर एक लेख लिहिला आहे. दोन वर्षांपूर्वी बहुतेक मुक्तशब्दने त्यांच्यावर विशेषांक काढला होता.

रावी थँक यु क्लिपसाठी, छान आहे.>>>> +१ . दोनवर्षांपूर्वी ह्या संस्थेत जायचा योग आला. ह्या चित्रफितीत दाखवलीये ती त्यांची खोली तशीच ठेवली आहे. इतकी जुनी संस्था आजही टिकून आहे, नव्हे टिकूनच नाही तर अजून विस्तारतेच आहे हे बघून मनात विचार आला कि ह्याचा पाया किती भक्कम असेल!

"महर्षी ते गौरी" म्हणून एक छान पुस्तक आहे. त्यातही चांगलं विवेचन आहे. लेखिकेचे नाव आठ्वत नाहीये

महर्षी ते गौरी" म्हणून एक छान पुस्तक आहे. त्यातही चांगलं विवेचन आहे. लेखिकेचे नाव आठ्वत नाहीये >>>> मंगला आठलेकर

हिमालयाची सावली हे नाटक महर्षि कर्वे आणि बाया कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे. यात अर्थातच पूर्ण कर्वे कुटुंबातील व्यक्तिरेखा आहेतच. पण मुख्य धारा सतत सावलीतच राहाणार्‍या बाया कर्वे या महर्षींच्या पत्नीच्या प्रवासाची आहे. महर्षि जरी हिमालयाएव्हढे मोठे होते तरी त्यांची सावली बनून राहाणं किती कठीण होतं हे पाहाणं त्या काळी रोचक वाटलं होतं.