झिरो (o) टीजर! काय आवडले आणि काय जास्त आवडले?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 16 June, 2018 - 17:49

शाहरूखचा चित्रपट चालो न चालो. पण त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकं नेहमीच तुटून पडतात.
ईदच्या मुहुर्तावर त्याने आपल्या आगामी चित्रपट झिरोचा टीजर रीलीज केला आणि चोवीस तासांच्या आत दोन करोडपेक्षा जास्त लोकांनी तो बघायचा विक्रम केला.
जर तुम्ही त्या दोन करोड लोकांमध्ये नसाल तर तुमच्यासाठी खाली लिंक देतो.
टीजर यूट्यूब ट्रेंडींगमध्ये फूटबॉल वर्ल्डकपला दुसर्‍या क्रमांकावर सारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ही भारतीय चित्रपटप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे _/\_

#1 ON TRENDING
Zero | Eid Teaser | Shah Rukh Khan | Salman Khan | Aanand L Rai | 21 Dec 2018
https://www.youtube.com/watch?v=89aTDByJTz4

मला कमी जास्त आवडलेल्या गोष्टी

१) टीजरमधील शाहरूखची एंट्री. बॉलीवूडच्या ईतिहासात आजवर बुटक्यांचा वापर केवळ विनोदनिर्मितीसाठीच केला गेला आहे. पण झिरो मध्ये मेन हिरो खुद्द शाहरूख खान एका बुटक्याची भुमिका करत आहे हे बघूनच थक्क व्हायला होते. त्याच्या या प्रयोगासाठी त्याला त्रिवार हॅटसऑफ !!!

२) टीजर असा असावा की चित्रपटाच्या कथेची पुरेशी कल्पना न देता उत्कंठा वाढवावी. शाहरूखला बुटके बघून हा उद्देश साध्य होतो.

३) टीजरमध्ये जो एक छोटासा म्युजिकचा तुकडा आहे त्यावरून चित्रपटाचे संगीत चांगले असावे असे सध्या तरी वाटते.

४) शाहरूखसोबत यात सलमान दिसतो. दोघांना एकत्र बघणे चाहत्यांसाठी पर्वणी असते. शाहरूखला सलमानसमोर बुटके बघणे अजून मजेशीर वाटते. सलमान जर टीजरपुरता नसून यात पाहुणा कलाकार असेल तर आणखी मजा आहे.

५) बुटक्या व्यक्तींच्या नाचात एक टिपिकल उत्साह एक अतरंगीपणा असतो. शाहरूखने ती बॉडी लॅंगवेज नेमकी पकडल्यासारखे वाटतेय. त्यामुळे पुर्ण चित्रपटभर त्याने काय धमाल केली असेल हे बघायची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. कारण शाहरूख म्हणजे सळसळत्या चैतन्याचा झरा आहे ..

६) चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का आणि कतरीना कैफ अश्या टॉपच्या दोन लोकप्रिय अभिनेत्री आहेत. पण ते या टीजरमध्ये कुठेही नव्हत्या. त्यामुळे आता पुढच्या ट्रेलरची वाट तितक्याच उत्सुकतेने बघितली जाईल.

७) शाहरूखचा झिरो धो धो चालला तर बुटक्या व्यक्तींना नक्कीच एक ग्लॅमर येईल. कित्येकांना शाहरूख म्हणून हाक मारली जाईल. कित्येकांच्या मनातील न्यूनगंड निघून जाईल. ईन्शाल्लाह असेच व्हावे. टीजरला लोकांनी डोक्यावर उचलून धरले आहेच.

मात्र या सगळ्यात एकच गोष्ट खटकली. चित्रपट डिसेंबरला प्रदर्शित होतोय. आणि टीजर आताच रीलीज करून उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. त्यामुळे पिक्चर रीलीज व्हायच्या आधी मी मरून तर नाही ना जाणार ही भिती सतावू लागली आहे Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्याशिवाय यांच्या नावावर चित्रपट चालत नाहीत. <<
त्यांचे चित्रपट नांवावर अजुनहि चालतात, शारुखचे त्याच्या स्वतःच्या नांवावर आता अजिबात चालत नाहित, मग मोठा ब्रँड कोण? येडा बनके पेढा मत खा...

जसे सचिन हा क्रिकेटचा देव आहे तसे शाहरूख हा बॉलीवूडचा देव आहे.
पण सचिन फक्त एका साईडने फलंदाजी करू शकतो. बाकीची दुसरया एण्डने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण ईत्यादी कामे बाकीच्यांना करावी लागतातच..
शाहरूख एका बाजूने आपला अभिनय करू शकतो.. कथा पटकथा संवाद संगीत दिग्दर्शन कलादिग्दर्शन ... अरे चित्रपटाला तर ईतर कित्येक पैलू असतात..

आणि म्हणूनच सचिनने शतक मारलेला सामनाही आपण हरतो तसे शाहरूखने छान काम केलेला चित्रपटही डब्यात जाऊ शकतो.>>>>>> इतके भयाण कंपॅरीजन आजपर्यंत कुठे वाचले नव्हते/ बघीतले नव्हते. शाहरुखच्या उणिवा दाखवायला कुणी सुरुवात केली की ऋन्मेष लगेच सचिन, रजनीकांत, कमल हसन, अमिताभला हात धरुन मध्ये ओढत आणतो.

ऋन्मेष, तू एकदा सर्व्हेच घे लोकांमध्ये. तुझे मुंबईकरच सांगतील तुला की शारुख व्हर्सेस सचिन, अमिताभ, अमिर, रजनीकांत, कमल हसन यात उजवं कोण आहे ते. आता असे लिहु नकोस की सर्व्हे कशाला घ्यायचा? मला काय करायचे आहे? शाहरुख त्याची गुणवत्ता सिद्ध करेलच ब्ला ब्ला ब्ला...

कारण मी अमिताभची कितीही मोठी फॅन असले तरी कायम त्याचीच दाढी कुरवाळत बसत नाही, जे तू सतत करतोस.

मैत्रेयी,
"मी शाहरूखचा फॅनच नाही"- हा आपला शोध अफाट आहे.
तसेच मी सचिनला नावे ठेवतोय हा आपला तर्कही अचाट आहे.
पुन्हा माझ्या पोस्ट वाचा.

मी शाहरूखचा फॅन असल्याची बतावणी टीआरपी मिळवायला करतो हे मात्र गंमतीशीर वाटले.
मिस्टर राज, आपण वाचत आहात ना. शाहरूख त्याच्या फॅनलाही टीआरपी मिळवून देऊ शकतो. ते देखील एका मराठी संकेतस्थळावर. ब्रांड याला म्हणतात !

तुम्ही तीच चूक करत आहात जे शाहरूख न आवडणारयांपैकी नव्वद टक्के जनता करते. आणि म्हणून तुम्हाला शाहरूख काय चीज आहे हे कळत नाही. तुम्ही शाहरूखला फक्त बॉक्स ऑफिसच्या यशावर मोजायचा प्रयत्न करत आहात आणि ईथेच तुम्ही चुकत आहात. काल शाहरूखपटाचा एक टीजर रीलीज होतो आणि तासांभरात करोडो लोकं त्यावर तुटून पडतात. आज ट्रेलर रीलीज होतो आणि शाहरूख आपलाच मागचा रेकॉर्ड मोडतो. मागे रईसच्यावेळीही हेच अनुभवले. उद्या हा झिरो चित्रपट पटकथेत दम नसल्यास बॉक्स ऑफिसवर दणकून आपटेल. पण त्या अपयशाचीही ईतकी चर्चा होईल की एखाद्या अक्षयकुमारच्या सुपरहिट चित्रपटाची होत नसेल.
पण मुळात शाहरूख हा चित्रपटांच्याही पलीकडे आहे. क्रिकेट, राजकारण, फूटबॉल, मोठमोठ्या ब्रांडच्या जाहीराती, मुलाखती, पेज थ्री, एवार्ड शोज, टेलिव्हिजन, रिएलिटी शोज, टेड टॉल्क, ऑगी एण्ड कॉक्रोच, मिस्टर ईनक्रेडेबल... तो तुम्हाला कुठेही दिसू शकतो.. दिसत राहतो.. तो एक युथ आयकॉन आहे.. कित्येकांसाठी इन्स्पिरेशन आहे.. आपण जे ब्राण्डींग ब्रांण्डीग करतो त्याची तो युनिव्हर्सिटी आहे !

मी अमिताभची कितीही मोठी फॅन असले तरी कायम त्याचीच दाढी कुरवाळत बसत नाही, जे तू सतत करतोस.
>>.>>

रश्मी, याचा अर्थ असाही असू शकतो की मी जेवढा मोठा शाहरूखचा चाहता आहे तितक्या मोठ्या फॅन आपण अमिताभच्या नाहीत. मुळात आपण जितके अमिताभ अमिताभ करता मी देखील त्याच लिमिटमध्ये शाहरूख शाहरूख करावे ही अपेक्षाच चुकीची नाही का?
मला माझ्या प्रिय आणि आवडत्या व्यक्तींबद्दल बोलायला आवडते, एखाद्याला नाही आवडत. एवढे सिंपल आहे हे.

मला माझ्या प्रिय आणि आवडत्या व्यक्तींबद्दल बोलायला आवडते, एखाद्याला नाही आवडत. एवढे सिंपल आहे हे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2018 - 13:50
>>>>
म्हणजे सध्या स्वजो आणि सई च्या बाबतीत नावडती चे मीठ आळणी का?

टीजर यूट्यूब ट्रेंडींगमध्ये फूटबॉल वर्ल्डकपला दुसर्‍या क्रमांकावर सारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ही भारतीय चित्रपटप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे _/\_

अभिमानाची बाब आहे _ पण शारुक हाय मन्जी अभिनयाची बोम्ब आहे

मुळात शाहरूखकडून अभिनयाची अपेक्षा का ठेवावी?
तो सुपर्रस्टार आहे, तो एंटरटेनर आहे.. त्याने मनोरंजन करणे पुरेसे नाही का?
हे म्हणजे ते एखाद्या गायकीच्या रिएलिटी शो मध्ये गाणारयांकडून कपडे काय घालता, स्टाईल कसे मारता अश्या वायफळ अपेक्षा ठेवण्यासारखे झाले.

तुझे मुंबईकरच सांगतील तुला की शारुख व्हर्सेस सचिन, अमिताभ, अमिर, रजनीकांत, कमल हसन यात उजवं कोण आहे ते.
>>>लोल...कमल हसन या लिस्ट मध्ये??? Happy

पहिलं गाणं आलं..
अजय अतुलचे संगीत आणि शाहरूखवर चित्रीकरण मस्त भट्टी जमून आलीय सैराटचा प्रभाव जाणवतो संगीतावर पण मस्त आहे अंगावर काटा येतो

चित्रप्ट पाडायला नकारात्मक परीक्षणांना उत आलाय. चित्रपट न पाहताच. फसू नका ! >> +१११११११११११११११११११११११११११११

ऋन्मेष
एवढ्या ब्लॉक ब्लस्टर चित्रपटाच्या ट्रेलरवर एवढी चर्चा झाली तर चित्रपटावरील चर्चेसाठी एक स्वतंत्र धागा हवाच.
आणि लवकरात लवकर हा धागा ऊघडण्याचा मान तुम्हालाच मिळावा असे मला मनापासून वाटते. १०००+ जाण्याचे पोटेंशिअल असेल ह्या धाग्यात.

चित्रप्ट पाडायला नकारात्मक परीक्षणांना उत आलाय. चित्रपट न पाहताच. फसू नका !
Submitted by ऋन्मेऽऽष on 21 December, 2018 - 09:41

न पाहताच फसू नका. चांगलं तीनशे रुपयांचं तिकीट काढा आणि मगच फसा.

चांगलं तीनशे रुपयांचं तिकीट काढा आणि मगच फसा. >> नुसता चालता बोलता शाहरूख बघायला लोक कोट्यानी पैसे मोजतात... आणि तुम्हाला नाचता, डोलता, हसता, रडता, शाहरूख बघण्यासाठी तीनशे रुपडे जास्त वाटतात Sad
एसी हवेत आरामखुर्चीत बसून शाहरूख आणि त्याच्या गालावरच्या खळ्या बघण्यासाठी (१५० मिनिटांना ३०० रुपये ... मिनिटाला प्रत्येकी दोन रुपये) जास्त झाले? ऐकावे ते नवलच.

एसी हवेत आरामखुर्चीत बसून शाहरूख आणि त्याच्या गालावरच्या खळ्या बघण्यासाठी (१५० मिनिटांना ३०० रुपये ... मिनिटाला प्रत्येकी दोन रुपये) जास्त झाले? ऐकावे ते नवलच+1111

बघितला- इतकाही वाईट नाही आहे, ठग्स पेक्षा बरा आहे.
पण कंटाळवाणा आहे. 200 cr चे बजेट पाहता हिट होणे शक्य वाटत नाही, फ्लॉप आहे चित्रपट..

ठग्स पेक्षा बरा आहे.
>>>>
म्हणजे यंदा शाहरूखने आमीर आणि आमिताभला मात दिली Happy

हो- यंदा शाखा ने आमिर ला मात दिली, अमिताभ ओव्हररेटेड आहे त्याला कोणीही मात देईल. त्याने आराम करावा आता.

Pages