नाते अपुले सांगून जा

Submitted by द्वैत on 6 December, 2018 - 10:55

नाते अपुले सांगून जा
गीत पुराने गाऊन जा

तुझे माझे माझे तुझे
हिशोब सारे मांडून जा

ओट्यावरच्या फुलदाणीला
नाव स्वतःचे सांगून जा

दुःखे सारी विसरू म्हणतो
वाईट सवयी लावून जा

सोबत असती भास तुझे
इथून जा वा तिथून जा

जगता येईल अजून थोडं
इतकी आशा देवून जा

पत्थर केले मी हृदयाला
भगदाडे तू पाडून जा

विझून गेलेल्या स्वप्नांनो
अश्रूंसोबत वाहून जा

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users