द बिग पिक्चर - पुस्तक परिचय

Submitted by सनव on 19 December, 2018 - 09:14

द बिग पिक्चर- फाईट फॉर द फ्युचर ऑफ मुव्हीज- ( लेखक Ben Fritz) एकदम छान पुस्तक आहे.
हॉलिवुडमधील गेल्या काही दशकांतील ट्रेंड्स आणि आता पुढे काय, यावर केलेलं भाष्य आहे.

90 आणि अर्ली 2000 पर्यंत हॉलिवूडमध्ये विषयांचं वैविध्य होतं. मानवी स्वभाव, नाती, भावना यांचं चित्रण होत होतं जे जगभर सर्वाच्या मनाला भिडेल असं होतं. Father of the bride मधल्या बापाशी भारतीय पिताही स्वतःला जोडू शकतो किंवा you've got mail सारखि प्रेमकथा जगभर गाजते. टायटॅनिकला तर बॉलिवूडसारखा प्रणयपट म्हटलं गेलं. कास्ट अवे, the pursuit of happiness, erin brocovitch यासारख्या चित्रपटांतून एका व्यक्तीची संघर्षगाथा दाखवली गेली.

पण आता हॉलिवूड म्हणजे marvel असं समीकरण झालं आहे. फँटसीचं अगम्य जग आणि त्यात येत असलेले ठराविक franchise चे चित्रपट. स्पायडरमॅन, अव्हेंजर्स, प्लॅनेट ऑफ एप्स आणि अजून काय काय. त्यात मग कधी न संपणारे सिक्वेल्स प्रिकवेल्स रिबूट्स. So who are these creatures and what did they do to the real hollywood?

या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हे पुस्तक.

साधारण आढावा असलेले ट्रेंड्स-
- फँटसी चित्रपटाचं वाढतं वर्चस्व , marvel चा उदय, डिझनीचं साम्राज्य
- तीन चार मध्यम किंवा लहान बजेट चित्रपट बनवण्याऐवजी एकेक बिग बजेट चित्रपट बनवण्याकडे स्टुडियोजचा कल,
- Netflix amazon इत्यादी streaming service वर आशयघन मालिका बनणं व हॉलिवूडचा प्रेक्षक तिकडे वळणं
- द पोस्ट किंवा स्पॉटलाईट सारखे चित्रपट जास्तकरून फेस्टिव्हल्स व अवार्ड सर्कलसाठीच बनणं
- स्टार ऍक्टर्सचा भाव पडणं
- चायनामधून हॉलिवूडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात होणारी गुंतवणूक व त्याचे परिणाम (crazy rich asians!!)
- disney, mattel आदींनी चित्रपटाकडे merchandise promotion चं एक vehicle म्हणून पाहणं (डिझ्नी वर्ल्ड मधल्या टॉय स्टोरी लँड, फ्रोझन राईड्स पासून ते थीम बर्थडे केक, Hallowe'en costume , स्टेशनरीपर्यंत फार मोठी यादी आहे- ज्यांच्या घरात यांचे चाहते राहतात ते अगदी रिलेट करू शकतील.)
- the interview हा चित्रपट, नॉर्थ कोरियन्सच्या धमक्या आणि सोनी हॅकिंग स्कॅन्डल

शेवटी अर्थात पुढे चित्र काय असेल याबद्दल लेखकाने आपले विचार मांडले आहेत. वाचताना कंटाळा येत नाही, बिजनेसबद्दल असूनही पेज टर्नर असलेलं पुस्तक आहे.

हे वाचताना प्रश्न पडला की भारतीय चित्रपट क्षेत्रात असं काही transformation होईल का?
मला दिसलेले काही ट्रेंड्स- बाहुबलीपासून सैराट, काशिनाथ घाणेकर पर्यंत प्रांतीय चित्रपटांना वाढती पसंती, हिंदी हार्टलँड छोटं बजेट चित्रपटांना यश (दम लगा के हैशा, बरेली की बर्फी ते बधाई हो), इत्यादी. अजून काय असू शकतील?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनव खूप छान परिचय. हा एकमेव असा विषय आहे, जिथे मी तासनतास आवडीने बोलू शकतो. MBA ला असताना वर्षभर मी याच विषयावर प्रोजेक्ट बनवला होता, "The changing strategies of big eights of hollywood"
मोठा प्रतिसाद लिहिनच, पण आता एवढंच. मी पहिला...

सर्वप्रथम आपण बिग एट म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊ. याना मराठीत आपण मोठे आठ म्हणू. यांचं एक शब्दात वर्णन करायचं झालं, तर या म्हणजे चित्रपटनिर्मिती आणि वितरण संस्था. या म्हणजे?

20th Century Fox
Columbia Pictures
MGM
Paramount Pictures
RKO Radio Pictures
United Artists
Universal Studios
Warner Bros

हळूहळू एकेकाची माहिती येईलच.

20 century fox - जगातल्या दोन्हीही सर्वात जास्त कमावणारे चित्रपट. टायटॅनिक आणि अवतार यांची निर्मिती आणि वितरणाचा बहुमान फॉक्स कडे जातो. फॉक्सच मूल्यमापन करायचं झालं, तर जगातला कुठलाही विषय फॉक्स ला वर्ज्य नाही. अगदी G रेटेड चित्रपटापासून ते NC -17 पर्यंत फॉक्स चित्रपट काढू शकते. यांच्या शिरपेचात स्टार वार्स, अवतार, टायटॅनिक असे अनेक मानाचे तुरे आहेत.
मार्व्हल कॉमिक्सच्या x men सिरीज, फंटास्टिक दोर आणि डेडपुलचे हक्क यांच्याजवळ आहेत...
एवढं सगळं असून...
...आता ही संस्था डिजनेनी विकत घेतली आहे.

रोचक परिचय.
अज्ञातवासीचे प्रतिसाद वाचतेय.

क्रेझी रिच एशिअन बद्दल काय म्हटलंय? मला आवडलेला तो मूव्ही.
रादर सर्चिंग, क्रेझि रिच एशिअन हे यावर्षी आलेले मेन स्ट्रीम एशिअन लीड अ‍ॅक्टर चित्रपट एकदम आवडलेले.

छान धागा. इन्टरेस्टिंग दिसते पुस्तक.

अज्ञातवासी - लिहा, आवडेल वाचायला. मार्व्हल कॉमिक्स ची कथाही अफाट आहे. पूर्वी फेमस असलेले हे कॉमिक्स. ती कंपनी नंतर डबघाईला आली होती असे ऐकले. मग एकदम मोठे ट्रान्स्फॉर्मेशन झाले चित्रपटांमुळे.

हिंदीत दिसलेला ट्रेण्ड म्हणजे हिंदी बेल्ट मधल्या वातावरणाचे चांगले डीटेलिंग केलेले अनेक चित्रपट आले गेल्या काही वर्षांत.

Columbia Pictures-
एक साधा सरळ मध्यमवर्गीय माणूस, परिवार सांभाळतो आणि कधीतरी ट्रीपला जाऊन राजसारखं जगतो....
... त्याच नाव कोलंबिया पिक्चर.
कोलंबिया ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. सोनी यांची पालक कंपनी. मध्यमवर्गासारखेच यांचे चित्रपट मध्यम असतात. ना लो बजेट ना हाय. यांनाही कुठलाही विषय वर्ज्य नाही. पण यांचे चित्रपट कधीही खूप जीव लावावा असेही नसतात, आणि जीव घ्यावा असेही....
मग हे राजासारखे कधी जगतात?
तर लोकहो, स्पायडरमॅनचे हक्क यांच्याकडे आहेत. जेम्स बॉण्डचे हक्क यांच्याकडे आहेत. जुमांजीचे हक्क यांच्याकडे आहेत. या चित्रपटाच्या जीवावर बिचारे राजेशाही जीवन जगतात थोडे आठवडे. मग आहेच मध्यम चित्रपट...
पण मध्यमवर्गात एक बंडखोरी असते. ही बंडखोरी कधीकधी जग हलवून टाकते. यांनी केलेली अशीच एक बंडखोरी...
... द इंटरव्ह्यू....
याविषयी पुन्हा कधीतरी

MGM.
वेस्ट इंडिजची टीम आठवतेय? एकेकाळी फक्त नावानेच दुसऱ्याच्या उरात धडकी भरवणारी...
...आणि आता?
वेस्ट इंडिज आपल्या गटात आली तर सोपा ड्रॉ म्हणून लोक आनंदी होतात.
तर आपली वेस्ट इंडिज म्हणजे MGM. गतकाळातील वैभव जगविण्यासाठी धडपड करणारी....
MGM एक स्वप्न होतं. सच्च्या कलाकारांनी बघितलेलं स्वप्न. १९२४ साली स्थापन झालेलं स्वप्न. MGM म्हणजे भव्यदिव्य मानवी भावनांचं उत्कट प्रदर्शन.... MGM म्हणे मुकयुगाचा अनभिषिक्त राजा...
MGM चे काही चित्रपट...
Ben-Hur
The Wizard of Oz
Gone with the wind
Doctor Zhivago
आणि अनेक.... जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा यादीतील सर्वात जास्त चित्रपट MGM चे आहेत.
एवढं सगळं असून या स्टुडिओने दोनदा दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता... पण सच्च्या कलाकारांपायी, नावापायी किंवा आर्थिक गणितांपैकी काही गणितानी हा स्टुडिओ वाचवला. दिवळखोरीपर्यंत जाण्याचं मुख्य कारण म्हणजे MGM ची डायनोसॉर वृत्ती. या स्टुडिओत बदलण्याची वृत्तीच नाही. बोलपटांकडे वळणारा... तोही नाईलाज म्हणून..
शेवटचा स्टुडिओ हाच!
तरीही अजूनही MGM गतकाळातील वैभवाची आठवण करून देणारे casino royale, skyfall, The hobbit सारखे चित्रपट बनवितो...
....कारण सुवर्णयुग गेलं, तरी वेस्ट इंडिज ट्वेन्टी ट्वेन्टी चा वर्ल्डकप जिंकतोच की!
Ars Gratia Artis राजा....

अज्ञातवासी, मस्त पोस्ट्स. अजून माहिती असेल तर लिहीत राहा. उदाहरण खूप छान दिली आहेत, मुद्दा पटकन कळतो आहे Happy

सनव, पुस्तकाच्या माहितीसाठी आभारी आहे. इंटरेस्टिंग वाटतं आहे.

सॉरी मी मोबाईलवर टाईप करत असल्याने वेळ लागतोय.

पॅरामाउंट...
या स्टुडियोला काय म्हणावं, कशाची उपमा द्यावी नाही कळत.
जर एक बाजूला फेरारी, रोल्स रॉयस आणि लॅम्बोर्घिनी उभ्या असतील आणि तिथे एखाद्याने मर्सिडीज लावली, तर त्याला तुम्ही गरीब म्हणाल?
...पण त्यांच्यापुढे तो तसा गरीबच...हो ना?
तर असा हा पॅरामाउंट. हा स्टुडिओ म्हणजे श्रीमंत असा. पण गर्भश्रीमंत नाही हो. स्वतःची ओळख राखून असणारा. ना गतकाळातीळ अतीभव्यता, ना आजची गरिबी. मस्त जगण्याइतकी श्रीमंती. बस...
तर यांची आजची श्रीमंती म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स, G I Joe, Mission Impossible, Indiana Jones, Terminator आणि बरेच चित्रपट.
हा स्टुडिओ वायकॉमने विकत घेतलाय.

धन्यवाद फारएन्ड, अॅमी, अंकु मीरा.... तुमचे प्रतिसाद वाचून लिहायला बळ मिळालं. आधी मला वाटलं मी धागा हायजॅक करतोय की काय? पण आता हायसं वाटतय.

बाकी स्टुडिओची माहिती येईलच थोड्या वेळात.

अज्ञातवासी, तुम्ही मस्त लिहिताय, धागा हायजॅक वगैरे काही नाही उलट चांगली माहिती देत आहात. थँक्स!

@अमितव, स्पेसीफिकली त्या मुव्हीबद्दल नाहीये पण काही ट्रेंड्स वर भाष्य आहे जसं
- एशियन देशातून हॉलिवूडमध्ये गुंतवणूक
- एशियन देशात हॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकवर्ग वाढत असणे व एकूण कमाईचा मोठा हिस्सा ओव्हरसीज कमाई असणे
- वरील दोन्हीमुळे कंटेंटवर होणारा परिणाम (उदा. एशियन व्यक्तिरेखांना मिळणारं representation आणि अशी कॅरेक्टर शक्यतो हुशार, सत्शील दाखवणे)
- असे चित्रपट उचलणे ज्यांना भाषेचे बंधन नसेल व जगभर अपील होतील. यात फँटसी हा जॉनर जास्त चालतो.

सर्व प्रतिसादकांचे आभार!

@फारएन्ड, पुस्तकात marvel ची सगळी स्टोरी आहे. आता त्यांनाही डिझनीने घेऊन टाकलंय.

छान माहिती अज्ञातवासी.

स्टार वॉर्स म्हणजे फक्त आणि फक्त जॉर्ज लुकस आणि जॉर्ज लुकस म्हणजे लुकस फिल्म्स.
डिझनीने जॉर्ज लुकस ला बिलेनिअर बनवत त्याकडून 'लुकस फिल्म्स' हाऊस आणि स्टावॉ चे सगळे हक्क विकत घेतले.
पण स्टावॉ फ्रँचाईझी मागे सगळी मेहनत आणि डोकं फक्त आणि फक्त जॉर्ज लुकस... स्टावॉ नापावासून लुकस वेगळा काढता येत नाही.

टायटॅनिक ची स्टोरी सुद्धा रंजक आहे.
कॅमरूनच्या हट्टापायी वाढत्या बजेटने पॅरामाऊंचे कंबरडे मोडले... कॅमरूनने मनासारखा सेट ऊभारण्यास पैसे न मिळाल्यास सोडून जाण्याची धमकी दिली... तेव्हा पॅरामाऊंटने 20th Century Fox ह्या रायवल कंपनीबरोबर ह्या प्रोजेक्ट साठी भागिदारी केली.... दोघांच्या भागिदरीतही खर्च एवढा वाढला की अजुन पैसे टाकून येणारी रिस्क कमी करण्यासाठी त्यांनी तिसरी कंपनी भागैदारीत आणली. (ट्रायस्टार? नेमकं नाव आठवत नाहीये) दोन रायवल कंपन्यांनी एकत्र येऊन एक प्रोजेक्ट स्पॉन्सर करण्याची ऊदाहरणे माझ्यामते तेव्हा फारच दुर्मिळ होती.

छान परिचय. सनव तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हॉलिवूडमध्ये फँटसी सिनेमांची क्रेझ आलीय. पण, हे भव्य, अतिभव्य करण्याच्या नादात सामान्य कथा कुठेतरी राहून जाताहेत का, असा प्रश्न पडतो. द पोस्ट सिनेमाचं कौतुक झालं, पण तो चालला नाही बहुधा.

RKO Radio Pictures.

शनिवारवाडा माहितीये?
कुणाला माहिती नसणार.
एकेकाळच्या अतिप्रचंड वैभवशाली साम्राज्याची अनभिषिक्त साक्षीदार वास्तू,अनेक दिगविजयांचं लेण मिरवणारी वास्तू. येथे हजारो याचक येऊन तृप्त होऊन गेले. येथे सोन्याच्या पाटावर लोकांनी जेवणे केलीत, येथे अत्तरांचे हौद लुटले गेले, या वास्तुने अनेक युगपुरुष बघितले...
... आणि या वास्तुने अख्या महाराष्ट्राची एक पिढी संपलेली बघितली, आयाबायांचा आक्रोश बघितला, राजकारणाने पोखरलेली पेशवाई बघितली, स्वकीयांच्या रक्ताने बरबटलेले हात बघितले.
आज हे सगळं पाहिलेल्या फक्त भिंती मूकपणे उभ्या आहेत...
1929 साली स्थापन झालेला RKO म्हणजे हॉलीवूडच्या अस्सल सुवर्णयुगाची ओळख. RKO म्हणजे MGM च्या तोडीस असलेला अनभिषिक्त सम्राट, RKO म्हणजे विविधतेची खाण, RKO म्हणजे नटसम्राटांची पहिली पसंती. या स्टुडिओने सुवर्णयुगात हॉलीवूडला जे सुवर्णक्षण दिलेत, ते कोणत्याही स्टुडिओला जमले नाहीत.
सिटीझन केन RKO ने हॉलीवूडला दिला...
पण प्रत्येक शनिवारवाड्यात एक दादासाहेब असतो....
...आणि RKO चा दादासाहेब म्हणजे हॉवर्ड ह्युज.
सर्वकाही आपल्या हातात ठेवण्याच्या वृत्तीने RKOच स्वातंत्र्य हिरावून घेतलं. अनेक अचाट पण अपयशी प्रयोग करून हॉवर्डने RKO ची पत घालवली. अनेक उद्योग करून, अनेक ठिकाणी डोकं लावून, अनेक वेड्या खटपटी करून, या माणसाने RKOची पेशवाई घालवली.
RKO ची 1959 साली शकले झालीत. अजूनही एखाद्या छानशा रात्री RKO चा कोणताही चित्रपट काढावा, आणि एकट्याने लावून बसावे, हॉलिवूडच सुवर्णयुग जगायचं असेल तर...इतिहासाचं साक्षीदार व्हायचं असेल तर...
...आजच्या भग्नावशेषांची सुवर्णकाळातील भव्यता बघायची असेल तर...

नवीन प्रतिसादकांचे धन्यवाद.
अज्ञातवासी, भारी माहिती देताय, तुमची स्टाईल पण मस्त, शनिवारवाडा, मध्यमवर्गीय माणूस, वेस्ट इंडियन टीम - हे सही जमलंय!
टोच्या , कथा तर राहून जातच आहेत. तोच मुख्य काळजीचा विषय आहे.

UNITED ARTISTS

प्रत्येक मोठ्या शहरात एक क्लब असतं, फक्त उच्चभ्रू लोकांसाठी! तिथे सामान्यांना प्रवेश नसतो. त्या क्लबवरून जाणाऱ्या सामान्य माणसाला त्या क्लबविषयी आकर्षण असतं, भीती असते, कुतूहल असतं, पण त्या क्लबच्या भिंतींच्या आड काय चाललंय ते त्यांना कधीच कळत नाही.
पण ते क्लब कायम आपला दर्जा राखून ठेवतं. कालांतराने तिथे माणसांची वर्दळ वाढते, कानोकाणी क्लबच्या कथा ऐकू येतात, आणि एखाद्या दिवशी अशी वेळ येते, की सामान्य माणसासाठीही क्लबचा प्रवेश खुला होतो, पण...
...आत गेल्यावर कळतं,आपला दर्जा उंचावला म्हणून नव्हे तर क्लबचा दर्जा खालावला, म्हणून आपल्याला प्रवेश मिळालाय.
युनायटेड आर्टिस्ट हा असाच एक क्लब. त्या काळातील नटसम्राटांनी काढलेली कंपनी. या कंपनीचे संस्थापक बघितले तरी आपल्याला नतमस्तक व्हायची वेळ येते.

Douglas Fairbanks, Mary Pickford, Charlie Chaplin, आणि D. W. Griffith.
यांच्या करारांवये 1919 साली या कंपनीची स्थापना झाली होती. कालानुरूप या कंपनीची वैभव इतकं वाढलं, की असा एकही नावाजलेला कलाकार नव्हता, जो UA बरोबर जोडला गेलेला नाहीये. या संस्थेच्या यशस्वी चित्रपटांची गणना नाही. किती पुरस्कार पटकावले असतील गणना नाही. १९६५ नंतर या संस्थेचा प्रभाव कमी होत गेला.
आता हा क्लब सर्वांसाठी खुला आहे....

अज्ञातवासी, छान लेख Happy

मला दिसलेले काही ट्रेंड्स- बाहुबलीपासून सैराट, काशिनाथ घाणेकर पर्यंत प्रांतीय चित्रपटांना वाढती पसंती, हिंदी हार्टलँड छोटं बजेट चित्रपटांना यश (दम लगा के हैशा, बरेली की बर्फी ते बधाई हो), इत्यादी. अजून काय असू शकतील? >>>>>>>

१. राजकुमार राव, विकी कौशल, आयुषमान खुरानासारखे कलाकार मोठया फॉर्ममध्ये आले. १०० करोड क्लबमध्ये त्यान्च्या चित्रपटाची गणना झाली.
२. बिग बजेट चित्रपटान्पेक्षा, छोट्या बजेटच्या Content-Driven सिनेमान्ना महत्व आणि यश ( बधाई हो, स्त्री, बरेली की बर्फी ई.)
३. तिन्ही खानान्ची सद्दी हळूहळू सम्पत चाललीय. अक्षय कुमार, अजय देवगण हे वेगळे चित्रपट केल्यामुळे अजून टिकून आहेत.
४. मराठी, हिन्दी आणि इतर प्रान्तीय चित्रपटात बायोपिकचा ट्रेन्ड.
५. प्रेक्षकान्ना कथा, सस्पेन्स, शेवट इन्टरप्रिट करायला लावणार्या चित्रपटात वाढ ( स्त्री, अन्धाधून, तुम्बाड. खर तर हयाची सुरुवात बाहूबलीपासून झाली होती. )
६. हिन्दी चित्रपटात सन्गीताचे महत्व घटत चालले आहे. हिरो- हिरोईन्स लिपसिन्किन्ग बन्दच झाले आहे.
७. सामाजिक विषयावरन्च्या चित्रपटात वाढ ( टॉयलेट एक प्रेमकथा, सुई धागा ई.)
८. एकेकाळी इरोटिक सिनेमान्चा ट्रेन्ड होता, तो आता नाहीसा झालाय.
९. आयटम- सॉन्गस कमी झालेत.
१०. ओरिजनल सन्गीत तयार होत नाही. रिक्रिएटेड गाण्यान्ना महत्व.
११. नायिका- प्रधान चित्रपटान्ना मोठ्ठे यश. नायिका स्वत:च्या बळावर सिनेमा हिट करु शकतात.
१२. नवीन टॅलेण्ट चान्गले काम करते. उदा. वरुण धवन, सुशान्त सिन्ग राजपूत, रणवीर सिन्ग ई.

धन्यवाद सुलू.
तुम्ही बरीच स्थित्यंतरे चपखल मांडली आहेत.
सहावा मुद्यातील एक शब्द चुकीचा वाचल्याने माझा क्षणभर गैरसमज झाला होता...

वॉर्नर ब्रदर्स...

वॉर्नर ब्रदर्स हा मला आवडणाऱ्या स्टुडिओजपैकी सगळ्यात जास्त आवडणारा स्टुडिओ. वॉर्नरला आपण आजच्या घडीला जगातला तिसरा सगळ्यात मोठा स्टुडिओ म्हणू शकतो. डिजनेला टक्कर देण्याची क्षमता आणि तितक्या प्रॉपर्टीज असणारा स्टुडिओ म्हणजे WB.
वॉर्नरने आपल्याला lord of the rings, harry Potter सारख्या सिरीज दिल्या. नोलानचे inception आणि बॅटमॅन वॉर्नरने दिलेत.
वॉर्नर मात्र आता हळूहळू तोट्यात जातोय. कारण म्हणजे DC युनिवर्स! त्याविषयी पुन्हा कधीतरी!

धन्यवाद सुलू. >>>>>> तुमचे स्वागत आहे, अज्ञातवासी

तुम्ही बरीच स्थित्यंतरे चपखल मांडली आहेत. >>>>>> धन्यवाद

सहावा मुद्यातील एक शब्द चुकीचा वाचल्याने माझा क्षणभर गैरसमज झाला होता >>>>>>> Lol

बॉलिवूडच्या सध्याच्या ट्रेन्डविषयी ' द बिग पिक्चर' सारख पुस्तक असेल तर ते वाचायला आवडेल.

तुमची स्टुडिओज विषयीची माहिती मनोरन्जक आणि ज्ञानात भर घालणारी आहे.

सॉरी खूप दिवसानंतर प्रतिसाद टाकतोय! गोड मानून घ्या!

युनिव्हर्सल स्टुडिओज!

हॉलीवूडच्या आजच्या सर्वात मोठ्या दोन स्टुडिओजपैकी हा एक स्टुडिओ.
डिजने ला टक्कर देणारा हाच!
युनिव्हर्सलच्या प्रॉपर्टी पहिल्या, तर थक्क व्हायला होतं. यांच्याकडे फास्ट अँड फुरियस सिरीजचे राईट्स आहेत. यांच्याकडे जुरासिक पार्कचे राईट आहेत. डिजनेच्या अनिमेशनला टक्कर द्यायला इलुमीनेशन स्टुडिओ आहे (मिनियन यांचेच) हॉरर पासून एरोटीकापर्यंत यांना कुठलाही विषय वर्ज्य नाही.
आजच्या घडीला डिजनेच्या वावटळीतही युनिव्हर्सल समर्थ उभा आहे!!!

युनिव्हर्सल द ग्रेट! त्यांचं अम्युजमेंट पार्क पण छान आहे म्हणे, मी पाहिलेलं नाही.
तर पुस्तकात स्टार ऍक्टर लोकांच्या नावावर चित्रपट चालणे कसं बंद झालं याबद्दल माहिती आहे. टॉम क्रूझ व विल स्मिथ हे बडे स्टार्स. त्याशिवाय tom hanks leonardo DiCaprio adam Sandler हे मोठे स्टार. आता मार्वल युगात अँट मॅन आयर्न मॅन हेच स्टार झालेत.
नुकतंच भारतात हे दिसून आलं. खानावळीचे चित्रपट धाडकन पडताना दिसले. आता भारतात पण स्टार्सची क्रेझ फेड होते का बघायचं.

सनव येस! हॉलीवूड आता स्टार बेस्ड बसून स्टोरी बेस्ड झालंय. मात्र त्याही स्टोरीत दर्शकांना चांगले आणि मुळात शोभणारे अभिनेते हवेत. इन्फिनिटी वॉर मध्ये स्टार लॉर्डवरून ख्रिस प्रॅटची उडालेली खिल्ली हेच दाखवते.
लिओनार्दो दिकॅपरिओ या वावटळीत टिकेल, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्या नावावर 2 बिलियन डॉलरचीही मुव्ही आहे, आणि 300 मिलियन डॉलरचीही, मात्र तरीही तो आपला दबदबा टिकवून आहे.
हॉलीवूडचा सगळ्यात मोठा निखळलेला तारा म्हणजे जॉनी डेप! आणि मला वाईट वाटतंय त्याच्याविषयी. ब्रॅड पिट, टॉम कृज, जॉर्ज क्लूनी, विल स्मिथ, डेंझेल वॉशिंग्टन, adam sandler, mark wahlberg, Matt demon ही अजून काही मोठी नावे!
हिंदीतही यावर्षी जे काही हिट चित्रपट गेलेत, ते सगळे कथानक आणि सादरीकरण यांच्या बळावर... पण याचा अर्थ स्टारची फेस वॅल्यू संपली, असा बिलकुल नाही. उद्या अमीर खान दंगलसारखा एखादा सशक्त चित्रपट घेऊन उभा राहिला तर तो चालेलच.
मात्र येस. परिवर्तन चालुये. आता कुणीही खान प्रेक्षकांना गृहीत धरणार नाही!
म्हणतात ना, चेंज बिफॉर इट चेंजेस यू!!!

Pages