प्रेम अणि दुरावा

Submitted by इंग्रजी माध्यमच... on 11 December, 2018 - 09:59

डोकेदुखी काम झाल्यानंतर, गीता अखेरीस ऑफिसमधून बाहेर पडली. पर्यावरण इतके शांत आहे की हवेचा प्रवाह सहज ऐकता येतं. ती फुटपाथवर चालत आहे. तिने मोबाइल काढला आणि लगेच मिहीरला फोन केला. मनामधे म्हणाली "शी. . त्याचा फोन बंद". तिची मनःस्थिती काही अस्वस्थ झाली. ती त्याच्याबद्दल विचार करीत-करीत चालत होती. हृदय वेगाने धडक मारू लागला. अचानक तिला सकाळी त्यांच्या संभाषणाची आठवण झाली. ते दोघे एकमेकांवर रागावले होते. मन - "नाही ! तो आमच्या सकाळच्या वादविवादामुळे फोन बंद करून ठेवणार नाही". तिनं पुन्हा कॉल केला, वाटलं की अाता तरी फोन उचलेल. "मला फक्त त्याला सॉरी म्हणायचंय". फोन पुन्हा बंदच. तिला राग आला. "तो असं कसं करू शकतो. अाय हेट यू. मला कधीच वाटलं नव्हतं, तू असं करशील. अापले रोज सकाळ-संध्याकाळचे आणि रात्रीचे कॉल तू विसरलास? " तीचं मन तुटलं. तिच्या डोळ्यातून अश्रुचा एक थेंब रस्त्यावर पडला. ती रस्त्यावर चालत असतांना, संपूर्ण जग तिला भयानक वाटतय. ती दुःखी आणि क्रोधित आहे. तिला त्याची अाठवन येतंय. ती रेल्वे स्थानकावर पोहोचली. ट्रेन अाली आणि तिनं अात प्रवेश केला. ती खिडकीच्या काठावर बसत गडद काळ्या ढगांकडे पहात अाहे. ‘किती भयानक अाकाश अाहे. तसच माझा जीवन अाहे’. तिला अज्ञात नंबरवरून फोन आला. तिने उचलला. तो मिहीर कॉल आहे. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तीचा रागाचा पारा जड असल्यामुळे ती एकही शब्द बोलल्याशिवाय कॉल डिस्कनेक्ट करते. ती पुन्हा उगाचंच ढगांकडे बघित बसते. ती वेदनेत आहे. काही मिनिटांनंतर. ती त्याच अज्ञात नंबरवर फोन कॉल करते. त्यानं कॉल उचललाच नाहीये. ती रागात मोबाईल तिच्या बॅगमध्ये फेकते.
.
जेव्हा ती घरी पोहोचली. तिने पुन्हा प्रयत्न केला. नंबर बंदच होता. ती बावरली, कशी-बसी सावरली. तिच्याशी त्याच्या कोणत्याही मित्राचा संपर्क क्रमांक नव्हता. पण त्याच्या एका सहकार्यांचा नंबर आहे, जी गीताची मैत्रिण आहे, पण मिहीरची नाही. तिच्या मैत्रिणीनं फोनवर सांगितलं, " नक्की काय झालं, मला नाही माहित. ते रोजसारखे कामात व्यस्त होते" गीता म्हणाली, "बरं! जर त्याच्या कोणत्या मित्राचा नंबर असेल तर. मग त्याला विचार ना". काही मिनिटांनंतर, गीताला मैत्रिणीचा फोन कॉल येतो. ती सांगते की “मिहिरचा मोबाईल आज सकाळपासूनच खराब झाला आहे”. तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्यानंतर शेवटी तिनं कॉल डिसकनेक्ट केला. कॉल नंतर, ती निराश होते, ती रागात नाही. पण त्याच्या मोबाइल बिघडला म्हणून तिला वाईट वाटलं. काही मिनिटांनी मिहीरचा फोन आला. तिने त्याच्यावर शब्दांचे गोळ्या झाडायला सुरवात केली. "तू मला सांगितले का नाही" अाणि बरच काही ती बोलून राहिली. चार पाच मिनिटानंतर शेवटी मिहीरला बोलायला मिळालं "जेव्हा मी ऑफिसमधून जात होतो, मी तुला लँडलाइनवरून कॉल केला होता.. पण कॉल डिस्कनेक्ट झाला ". ती भोळेपणाने म्हणाली "ते नेटवर्कमुळे झालं असेल". तो मस्करीत बोलला "पण तू इतकी हरामी आहेस ना. तूच कट केला असणार". "तू मला दिवसातून किमान एकदातरी लँडलाईनवरून फोन करून सांगू शकत होतास की मोबाईल खराब झाला आहे. मी कॉल केलाच नसता. मी वेड्यासारखी तुला फोनवर फोन करतेय. तुझी इतकी अाठवण अली. दिवसभर तुझ्याच विचारात होती ". तो “सॉरी” म्हणाला.
.
त्याच्या कॉल झाल्यावर सुद्धा ती अजूनही निराश. ती रागामध्ये होती. घरी अाज पाव-भाजी तैयार होत होती. बाजारातून पाव विकत घेण्यासाठी ती भावासोबत गेली. ती रस्त्यावर आपल्या भावासोबत चालत अाहे. तिचा भाऊ तिझ्याच वयाच्या आहे. ते दोघे मित्र देखील आहेत. तो तिच्याकडे बघतो तर, ती अबोली चालत आहे. तिच्या मनात काहीतरी दुखावतय हे त्यानं जाणलं. तो तिला विचारतो आणि ती त्याला संपूर्ण गोष्ट सांगतली. तो थोडा विचार करीत म्हणाला, "अशा लहान-सहान मुद्द्यावरून तुमच्या दोघांमधे अंतर आणू देऊ नका". "हे लहान मुद्दे नाही अाहेत रे. अशा लहान-सहान प्रकरणांमध्ये भविष्यात मोठ्या समस्या येऊ शकतात." तो समजूत काडायला म्हणाला "बघ! त्याचा मोबाईल खराब झाला होता. तूच या प्रकरणाचा गैरसमज केला. तो ऑफिसमधून बाहेर पडल्यावर देखील त्याने तुला कॉल केला. पण, तूच जास्त रागामधे असल्यामुळे कॉल डिसकनेक्ट केलास ". "थांब! पण मला तो दिवसभरात सांगू शकला असता की त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करू नको कारण त्याचा मोबाइल खराब झालाय" भाव मस्करीमधे म्हणतो की "हा ! त्याला कॉल करण्याशिवाय, ऑफिसमध्ये इतर कोणतेही कामच नाही ना". ती मस्करीमधे म्हणाली "तू माझा भाऊ आहेस आणि तुम्ही त्याची बाजू का घेतोस". "मी नेहमी बरोबर म्हणतो. जेव्हा तू बरोबर असशील तेव्हा मी कधीकधी तुझी बाजू घेईन ". "कधीकधी. तू कधीकधी म्हणालास ". "जेव्हा तू बरोबर असशील. तेव्हा मी तुझी बाजू घेईन ". "पण तू कधीकधी म्हणालास". तो मस्करीमधे बोलतो "ठीक आहे. मी माफी मागतो. तो चुकीचा नव्हता, तो तुला 'सॉरी' म्हणाला. तरीही तू त्याच्यावर बोंबा मारलीस अाणि त्यानी एेकून देखील घेतलं. अशा तुम्ही मुली, जरी तुमची चूक असेल, तरीही तुम्ही अामच्यावरच गोळीबार करणार " तिने विचारलं, "म्हणजे मी त्याच्याशी बोलू शकेते ". तो म्हणाला "हो मग !".

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त.
खूप छान पकडल्या आहेत दोन्ही भावना प्रेमभावना आणि विरहभावना.

खूप छान लिहिता तुम्ही.. तुमचे मराठी लिखाण वाचून कोणीच म्हणणार नाही तुम्ही ईंग्रजी माध्यमात शिकलेले असाल.
पुढील गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहे.

कथा खुप बालिश आहे. कथानायिका पण.
शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.
भावाबरोबरचे संवाद अजिबात जमलेले नाहीत.
तू इतकी हरामी आहेस ना. तूच कट केला असणार>>>> Lol

पुढील गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहे.

Submitted by हायझेनबर्ग on 11 December, 2018 - 21:43>>>>> एवढी आतुरतेने वाट बघण्यापेक्षा तुम्हीच लिहा की एखादी छान कथा.