लहाण भाऊ रक्षण कसा करणार !

Submitted by इंग्रजी माध्यमच... on 17 October, 2018 - 12:22

प्लॅटफॉर्मवर ट्रेन अाल्याचा अावाज एेकल्यावर, ट्रेनचा द्वितीय श्रेणीचा दरवाजा जिथं ज्या जागेवर येउन थांबतो, तिथं मी माझ्या मोठ्या बहिणीसोबत जात होतो. मी १७ वर्षाचा होतो. अामच्या पाठीमागून गरदुल्ल्यांचा गट केविलवाणा अावाज करत येत होता. माझ्या सोबत बहिण अाणि मी बळकट नसल्यामुळे मी थोडा घाबरलो. अाम्ही प्लॅटफॉर्मवर उभे असल्यापासूनच त्यांचं माझ्या बहिणीवर वाईट नजरा होत्या. त्या गटांचं एक जण बहिणीच्या बाजूला अाला व तिच्या हाताला एकदा स्पर्श केला. बहिण सुद्धा घाबरली. मान खालती घालून चालत होती. मला राग अाला. तरीही भीती अजून होतीच. त्याने पुन्हा स्पर्श केला व थोडा अामच्यापासून पुढं चाळू लागला. राग अाणि भिती दोन्ही मनामधे होत्या. मी धाडस केलं. अाम्ही जागा बदलल्या. तिच्या जागेवर मी चालत होतो अाणि ती माझ्या जागेवर. त्याला हे माहित नाही. तो हळु चाळु लागला व अामच्या जवळ अाला. थोडा पुढेच होता. तिच्या जागी मी असल्यामुळे, त्याने तिचा हात समजून माझा हात पकडला. मी क्षण न थांबता जोरात त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात फटका मारला. बोटात तांब्याची रिंग असल्यामुळे थोड जास्तच लागलं असावं. त्याचं डोकं भिणभिणलं. ते बघताच त्याचे साथी शिव्या देऊ लागले. ट्रेनचा दरवाजा अामच्या बाजूला येऊन थांबला, गर्दी जामली, गटातील लोकांनी मला मारण्यासाठी मला खेचण्याचा प्रयत्न केला. माझी भिती वाढली. मी कसाबसा हात सोडवून तिच्या सोबत गर्दीचा फायदा घेत ट्रेनमधे घुसलो. ते माघे राहीले. तरी ते सुद्धा घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण ट्रेन मधे जागा नसल्यामुळे दरवाजावरील लोकांनी अात येउनच दिले नाही. ट्रेन अाली म्हणून वाचलो. थोड नशीबाची साथ अाणि थोड धाडस दाखवल्यामुळे तेव्हा बहिणीच्या नजरेत माझ्याबद्दल अादर बघितला होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सुद्धा मस्त.
लहान वयातही बहिणीचे संरक्षण करण्याच्या अंगभूत जबाबदारीतून धाडसी स्वभावाचे छान प्रदर्शन करून कथेतल्या भावाने प्रसंग निभावून नेला.
अशा लहान सहान प्रसंगातूनच नातेसंबंध दृढ होतात.
मस्त कथा... अभिनंदन.