ज्योतिषी कसा असावा

Submitted by रमेश रावल on 10 December, 2018 - 03:14

आत्ताच एक धागा वाचला..ज्योतिष शिकण्यासंदर्भात होता.. लोक्कांचे वेगवेगळे मत होते.. कोणी कुणा ज्योतिषाला फ्रॉड
म्हणत होते..तर कोणी ज्योतिष शिकू नका पदरी निराशा पडेल म्हणत होते...
काही लिहण्याअगोदर माझ्या विषयी थोडेसे सांगायचे म्हंटले तर
माझे काका ज्योतिषी आहेत त्यामुळे लहानपणापासून त्यांच्या कडे आलेली माणसे व त्यांना आलेले अनुभव मी स्वतः ऐकत आलेलो आहे.
जस जसे मोठा होत गेलो तसतसे इतर पुस्तके वाचू लागलो आणि माझ्या हातात अंधश्रद्धा निमूर्लन ची पुस्तके पडली त्यांचे बहुतेक लिखाण हे जोतिषशात्र
विरोधात होते (किंव्हा माझा त्यातच इंटरेस्ट असल्याने तसे वाटत असेल ) म्हणून त्या दृष्टीने हि विचार करू लागलो, जसे कि एवढ्या लांबून ग्रह म्हणजे निर्जीव गोळे माणसाच्या जीवनावर कसा प्रभाव पाडेल वगैरे.. हेच प्रश्न मी माझ्या काकांना विचारायचो त्यांच्या कडे त्याची तर्कशुद्ध उत्तरे नव्हती पण त्यांनी सांगितलेल्या
भविष्याचा अनुभव मी स्वतः इतरांच्या तोंडून खूपदा एकला असल्याने व मला थोडे थोडे कुंडली वाचन आत्ता जमू लागल्याने या शात्रात काहीतरी दम आहे हे कळत होते पण अजून बरीच प्रश्न बाकी होते मग मी बाहेर कोणी क्लास घेत का हे पाहू लागलो..इतर ज्योतिषांना भेटू लागलो.. तेंव्हा मला खूप वाईट अनुभव आले.. या पवित्र शास्त्रात चालणारा अपवित्रपणा ,फसवणूक,लुबाडणे हे मी पहिले आहे.. थोडं फार तरी कळत असल्याने उगीच ग्रहांचे रत्न देणे,शांती सुचवणे व फसवे उपाय कळत होते बरं त्याबद्धल विचारलं कि म्हणायचे आमच्या गुरूने असेच शिकवले आहे व त्यामागील तर्क आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत.
असो.. आता सर्व काही ज्योतिषांचेच चुकते असे हि नाही.. मी पत्रिका फुकट पाहत होतो..पण जे व्यावयसाय म्हणून ज्योतिष करतात त्यांनी का फुकट पाहावी नाही का ? आणि फुकट म्हंटले तर लोक १० प्रश्न घेऊन उभे असतात वरती एखादे उत्तर चुकले तर ज्योतिश्याच्या नावाने खडे फोडायचे.. बर लोक पण ना मुला मुलीच्या लग्नाला लाखाने खर्च करतील पण लग्न कधी होईल हे उत्तर फुकटात हवे... आणि काही ज्योतिषी तर १००० - २००० च्या खाली पत्रिकेला हात लावत नाहीत.. मी बरेच वेळेला पाहिलंय मोठं मोठे जाहिरात करणारे..पुस्त्तक लिहिणारे जोतिशी दोन दोन हजार रुपये घेऊन काडीचा मात्र योग्य भविष्य सांगत नाहीत..फक्त नाव मोठं..
काही ज्योतिषी तर असे भेटले ते, मी सांगेन तसेच होणार असे ठामपणे सांगतात वर म्हणतात माझा अभ्यास तेवढा आहे.. तिथेच समजून जा याला ज्योतिष किती कळाले ते..
बर चुकत जातकांचेही.. मला जेंव्हा जास्त लोक्कांचे मेसेज व मेल येऊ लागले तेंव्हा मी फुकट ज्योतिष सोडून इच्छित फी (जातकाच्या मनानुसार ११ रुपये सुद्धा चालतील) चालू केली तर अशी फी सांगून हि लोक नाही देत..
म्हणून मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे..तुम्हाला काय वाटत ज्योतिषी कसा असावा व कसा नसावा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्हाला ज्योतीषी हा धंदा करायचा आहे की अभ्यास?
धंदा करायचा असेल तर खुशाल हजारो रुपये घेत जा. बनवा बनवी करणारे काही तुम्ही एकटेच नाहीत - सगळीकडे चालते. जाहिरातबाजी करून काय वाट्टेल तो माल लोकांना विकतात कारण लोक विकत घेतात, धंदा यशस्वी.

अभ्यासच करायचा असेल, तर कुणा माहितीतल्या वृद्ध व्यक्तीची कुंडली घ्या नि तपासा, कुंडलीत म्हंटल्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात घडले का?

नि तुमचा विश्वास असेल की तुम्ही ज्योतिष सांगितल्याने कुणाचा फायदा होणार असेल तरी त्या व्यक्तीचा विश्वास नसेल तर काय उपयोग?

कित्येक लोक एका डॉक्टर वर विश्वास ठेवत नाहीत, दुसर्‍यावर ठेवतात कारण त्यांना स्वतःला वैद्यकीय ज्ञान नसते, त्यामुळे हा केवळ लोकांच्या मर्जीचा प्रश्न होतो.
इथे खुद्द ज्योतिषी सांगू शकत नाही की हे असे का, तर लोक तरी केवळ मर्जीनुसार विश्वास ठेवणार ना?

आपला भूतकाळ प्रामाणिक असेल आणि वर्तमानकाळ सचोटिचा असेल तर भविष्यकाळाबाबत चिंता करण्याची काहीही गरज नाही.

स्वतःचे भविष्य ज्योतिषाकडुन बघणारे शक्यतो भूतकाळात चुकीचं वागलेले, वर्तमानकाळात सचोटीने न वागणारे, स्वत:च्या कर्तबगारीवर विश्वास नसलेले आणि दुसर्यांच्या मागेमागे करुन स्वतःची फरफट करुन घेणारेच असतात असे निरीक्षणाअंती समोर आले आहे.

या अशा विषयावर चर्चा होऊन गेल्या आहेत.

तरी बारा राशी ,ग्रहांची साधी कुंडलीही बरंच काही सांगून जाते. रत्न वगैरे फ्रॅाड आहे. केपि फ्राड आहे.
ठराविक मर्यादा जातकाच्या अगोदरच स्पष्ट झालेल्या असतात ( आरोग्य, जोडीदार,संतान,संपत्ती,शेजार,नातेवाइक यांचे सुख.) त्यापलिकडे जात नाही कुणी.
असो.

रत्न वगैरे फ्रॅाड आहे. केपि फ्राड आहे.?

निव्वळ असुयेपोटी टिका की काही स्वानुभव आहे म्हणून हां आकस !

तसं नाही. जर ज्योतिषीचा त्याच्या शास्त्रावरच विश्वास आहे, ग्र्हमानाने अमुक गोष्ट होणार/होणार नाहीच मग रत्न मधे का आणतात?
केपी म्हणजे फसलेल्या न समजणाऱ्या घटनांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न वाटतो. असुया नाही. मतभिन्नता असेल.

१. ज्योतिषी विद्येचा अभ्यास वाढवावा, आता युट्युबवर ज्योतिषी विद्येबद्दल खूप व्हिडिओज आहेत, ते बघून खूप छान माहिती मिळेल. बहुतेक वेळा लोकांची काहीतरी समस्या असते, ती समस्या निवारण करण्यासाठी ते ज्योतिषांकडे येतात, ती समस्या काय आहे? कुठल्या ग्रहांच्या स्थितिवरून निर्माण झाली आहे, ग्रंहाचे गुणधर्म, त्यांचा होणारा परिणाम हे व्यवस्थित सांगता आले पाहिजे.

२. त्या समस्येवर उपाय काय? तो कसा करावा? का करावा? किती दिवस करावा? त्यामुळे नक्की काय होईल? तेव्हा आचरण कसे असावे? या लहान सहान गोष्टी समजून सांगाव्यात, एखादी पूजा करायची असेल तर त्याचा विधी काय? कोणते मंत्र घ्यावेत? याची सगळी माहिती द्यायला हवी.

३. बऱ्याच वेळा ज्योतिषाने सांगितलेला उपाय मनाला पटत नाही, कारण त्या मागचं शास्त्र ज्योतिषांकडून कळत नाही किंवा ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, मग तो उपाय केला जात नाही आणि मग ज्योतिषाला नाव ठेवली जातात.

३. त्यामुळे जेवढं तर्कशुद्ध, प्रामाणिकपणे, सहज, सोप्या शब्दात समजावून सांगाल, तसं लोकांना ते पटेल आणि त्यांचा विश्वास वाढेल.

४. विषयांतर होऊ शकतं पण, देवदत्त पटनायक देव देवतांवबद्दल, पौराणिक कथांबद्दल छान माहिती देतात, समजावून सांगतात, त्या पद्धतीने जर तुम्हाला सांगता आलं, त्याचा उपयोग होईल.

५.ज्योतिषी सल्ला देण्याआधी आधीच त्या सल्ल्याची फी घ्यावी. ही फी सर्वांसाठी सारखी असावी, आमच्याकडून हजार घेतले, मग तुमच्याकडून का पाचशेच का घेतले? यावरून सुद्धा बदनामी होते.काही ज्योतिषी प्रश्नांवरून फी ठरवतात, दोन प्रश्नांचे एवढे, तीन प्रश्नांचे एवढे, ही पद्धत पण चांगली आहे. अपॉइंटमेंट पद्धत ठेवून काम करावे जेणेकरून लोकं पण गंभीरपणे घेतात

धागा डिलीट कसा करतात>>>
एडमिन /वेमांना विपु करा, या धाग्याची लिंक देऊन, हा डुप्लिकेट धागा असल्याने रद्द करा अशी विनंती करा.