तुमचा विकान्ताचा मेन्यू काय असतो?

Submitted by स्वप्नाली on 29 November, 2018 - 16:23

विक-डे मध्ये फारसे काही वेग ळे करायची सोय नसते, मुले सुद्धा तेच तेच खावून कन्टाळतात...
तेव्हा चला चर्चा करूया तुमचा विकान्ताचा मेन्यू (घरी केलेला ) काय असतो?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पार्टी होस्ट , काय करतील ते. नाहीतर रेस्टॉरंट वाले काय खायला घालतील ते.
विकांताला मेनु बनवत बसले तर वीक डेजला ऑफिसात काम्,घरात काम वगैरे तक्रारी कशा करणार ? Happy

60 ml स्कॉच
>>>
मुलांसाठी काय प्रमाण योग्य राहील? Happy

माझा विकांताचा स्पेशल मेन्यू कॉफी !
आता त्या कॉफीची वेळ झाली आहे.
उद्या सुट्टी असल्याने माझा विकांत सुरू झाला आहे.

कॉफीसोबत केकटोस्ट आवडतात. नाहीतर मग पोह्याचा चिवडा किंवा फरसाण.

सकाळचा सर्वात फेव्हरेट ब्रेफा कांदापोहे..

त्यानंतर उतरत्या क्रमाने,
मालवणी वडे चहासोबत
घावणे, सोबत हिरवी चटणी हवी. ती घावण्याला लाऊन घावणा चहात बुडवून खावा. चटणी चहात विरघळून चहा सुद्धा मस्त तिखट होतो.
हाल्फफ्राय पाव
चहा पुरी
...
उपमा, साबुखिचडी, ब्रेडबटर वगैरे वगैरे..

संध्याकाळी घरी असल्यास मालपोवा किंवा खारीबटर आणि बाहेर असल्यास ओली भेल, शेवपुरी, पाणीपुरी चाट वगैरे..

लंच आणि डिनरमध्ये मात्र विकांताला फक्त नॉनवेजच खाऊ शकतो. तिथे तडजोड करत नाही. तरी सणवार असेल, नैवेद्याचे जेवण असेल तर दुपारी एक वेळ ते खाऊन रात्री कसर भरून काढतो.

आमच्याकडे पत्नीने एक चांगला पायंडा पाडलाय ; वीकांताचा नाही पण रोजच्या साठी..
आठवड्यातून रोज संध्याकाळसाठी पोळी - भाजी सोडून एक वेगळा मेनू ..
पाव भाजी , SPDP - पाणी पुरी , ऑम्लेट - फ्रेंच टोस्ट - भुर्जी , ईडली / वडा सांबार व चटणी , झुणका-भाकरी- लसणाची चटणी.
क्रम कसाही आदलून बदलून.
त्यामुळे रोज उत्सुकता राहते आणि जेवायचा उत्साहदेखिल !

काहीही.. अगदी काहीही मनाला वाट्टेल तो मेनु असतो आमच्याकडे. वेज-नोन्वेज काहीही असला तरी पण पुर्णांन्न असतो. भरपेट 'जेवण' होतं.

@ पशुपत : पाव भाजी , SPDP - पाणी पुरी , ऑम्लेट - फ्रेंच टोस्ट - भुर्जी , ईडली / वडा सांबार व चटणी हे सर्व जेवणाचे मेनु..?? Uhoh
आमच्यात हे सर्व स्नॅक्स मधे खातात Lol Lol Lol

रविवारी नॉ.व्हे मेम्बर्ससाठी चिकन/ मटन/ आता मिळायला लागल्या म्हणुन लाव्हर्या यापैकी काहीही. फिश रेसिपी दुपारी होत नाहीत. फिश प्रकार आमच्याकडे रात्रीच कराय्चे असा अलिखित नियम आहे. Proud आणि ते ही रविवारी नाही. .. विकडेजला करतो.
आम्हा व्हेज मेम्बर्ससाठी दुपारी डुबुकवड्यांची/ शेंगोळ्यांची/ पाटोड्यांची/ भरले मोदकांची मसाल्याची आमटी/ शेवभाजी/ मटर मश्रुम करी! रविवारी मसाल्याचीच आमटी हवी. कारण इतर कडधान्ये, हिरव्या भाज्या, फळभाज्या इतर दिवशी होतात म्हणुन.

रविवारी सकाळी नाश्ता भरपूर असतो आणि हेवी असतो...जसा की उडीद वडे, आलू पराठे, आप्पे किंवा डोसे काहीही..
दुपारी जेवायला अंडा करी किंवा चिकन करी , पोळ्या, जिरा रईस, कोशिंबीर, वरण.
मग रात्री नुसता भात असला तरी चालतो.
रविवारी संध्याकाळी नाहीच मी स्वयंपाक करत..
.

SPDP - पाणी पुरी , ऑम्लेट - फ्रेंच टोस्ट - भुर्जी , ईडली / वडा सांबार व चटणी >>>>हे खाऊन झाल्यावर आमच्या घरचे विचारतील कि जेवायला काय केले आहे? Proud

हे खाऊन झाल्यावर आमच्या घरचे विचारतील कि जेवायला काय केले आहे? Proud>>> हो न, रोजरोज असले आवडणार नाही अन वर्किंग असेल तर झेपणार सुद्धा नाही, थकून भागून आल्यावर डाळ भात करणे पण जीवावर येते. पण कधीतरी बदल म्हणून आम्हीदेखील करतो पापु, डोसे ई.ई. रात्रीच्या जेवणात☺️

डोसे, पावभाजी, मिसळ-पाव+पुलाव, अंडा-भुर्जी, भरपूर भाज्या घालून नूडल्स, सॅलड+सूप हे मला पूर्ण जेवन वाटते Happy त्यामुळे रोजच्या पोळीभाजीला कंटाळून विकांतला हा बदल आवर्जून केला जातो.

फार वर्षांपूर्वी बायकोने मला विचारलं होतं, आता जेवायला बसायचं का?
तेव्हा मी विचारले, चॉईस काय आहे?
बायकोने शांतपणे उत्तर दिले, हो की नाही?
तेव्हापासून मी मेन्यू विचारत नाही.

आमच्याकडे शनिवारीच घावणे/आंबोळी साठी तांदुळ डाळ भिजवली जाते.. आयतवारी मग चिकन असेल तर त्यासोबत आंबोळ्या होतात नाहितर मग तांदळाचे वडे किंवा पुर्‍या.. संध्याकाळी मग सोलकढी भात... ते नसेल तर आयतवार म्हणजे माश्यांचा दिवस ठरलेला. मस्तपैकी लाल माश्यांचं सार.. फ्राय केलेला मासा, चपाती, भात अन कोशिंबीर Happy त्यादिवशी डाळ वगैरे बनविणे म्हणजे कैद्याला दिलेली सजा वाटते Happy

आयतवारी >>> वाह्ह खुप दिवसांन्नी वाचला हा शब्द , अगदी गावी गेल्याचा फील आला Happy

वाह भावना गोवेकर एक नंबर.. अगदी आमच्या घरच्यासारखे वाटले. घावणे आंबोळ्या सोलकढी वडे यांची मजा औरच नॉनवेजसोबत..

ते लाल माश्यांचे सार की माश्यांचे लाल सार..
सार तर माझ्या अफाट म्हणजे आफाट आवडीचे. जगात नंबर एक ! सोबत फ्राय मासे आणि कोलंबी.. मग सारभात खाताना मी पोट भरले म्हणून थांबतच नाही. एकतर टोप रिकामे होते किंवा कोणीतरी थांबवते.. पण त्यानंतर मी जागचा उठू शकत नाही पंधरा मिनिटे.. म्हणून मीच घरच्यांना सांगतो की मी किती खातोय यावर लक्ष ठेवा आणि आता बस आता बस अशी आठवण करून देत जा Happy

आज मी अंडा करी आणि कुलचे बनवलेत. बरोबर गेम ऑफ थ्रोन्स मारामारी. शनिवारी दुपारी घरी झोप. Happy

आलू पराठे, व्हेज बिर्याणि, रायतं
डोसे, बटाटा भाजी , चटणी, फोडणीचे ताक /रसम
मिसळ पाव, दही भात बुत्ती
पाव भाजी
भाज्या टाकून खिचडी-कढी-पापड
मेथी पराठे- बुंदी रायता - मुगाची प्लेन पातळ खिचडी
हॊट ऎंड सवार सूप, हाका नूडल्स
Happy

आताच मी पाच सहा किंगसाईज थालीपीटं लोण्याचा गोळा टाकून फस्त केलीत. पोट तुडुंब भरले. कारण दुपारी जेवणाला स्पेशल नाहीये. कालचेच हॉटेलातील उरलेले चायनीज (चि. क्रिस्पी, चि.ह. नूडल्स आणि चिंट्रीशे राईस) सर्व उरलेसुरले एकत्र ढवळून संपवायचे आहे.

आज standard किड्स पार्टी मेनू केलाय : पबम, पराठे, पुलाव, रायता, केक (विकत- शेफ बेकर्स चा ऑपेरा, पहिल्यांदाच हा फ्लेवर ऑर्डर केलाय, मस्त आहे). नो चिप्स, नो एयरेटेड ड्रिंक्स अजून तरी कोणाला आठवण आलेली नाही. फ्रेशली squeezed मोसंबी juice फ्रिजमध्ये रेडी ठेवलाय, कोणाला कोल्ड-ड्रिंक्स चा मूड आला तर. पराठे कुठे गेले कळलं नाही आणि पुलाव एवढा उरलाय.... सगळ्यांकडे डबा पार्सल द्यावा का?

Pages