परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण _ चित्रपट चर्चा

Submitted by किल्ली on 29 May, 2018 - 03:04

परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण

काल सिनेमागृहात जाऊन पाहिला.
एकदातरी पाहायला हवा असा चित्रपट !!

या चित्रपटाविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर, माझं मत असं आहे :
कथा : सत्यकथा आहे, देशप्रेम जागृत करते , प्रेरित करते
अभिनय: उत्तम
गाणी : सुश्राव्य
जमेची बाजू: देशाने केली अण्वस्त्र चाचणीची यशस्वी कथा !!
खटकलेल्या बाबी : नायकाचं खाजगी आयुष्य थोडंसं जास्त दाखवलं आहे, गरज नव्हती. सुरुवातीला चित्रपट संथ आहे, नंतर पकड घेतो.

अधिक माहितीसाठी विकी पाहा :
https://en.wikipedia.org/wiki/Parmanu:_The_Story_of_Pokhran

तुम्ही कोणी पाहिला असेल तर तुमचे मत अथवा अण्वस्त्र चाचणीविषयी आपली मते येथे मांडू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खटकलेल्या बाबी : नायकाचं खाजगी आयुष्य थोडंसं जास्त दाखवलं आहे, गरज नव्हती. सुरुवातीला चित्रपट संथ आहे, नंतर पकड घेतो. + १००००

खटकलेल्या बाबी : नायकाचं खाजगी आयुष्य थोडंसं जास्त दाखवलं आहे, गरज नव्हती. सुरुवातीला चित्रपट संथ आहे, नंतर पकड घेतो. +११११११११११११११११११११११११११११११११
बाकी निरिक्षणही पर्फेक्ट आहेत.
पण खरं सांगू का, मला जॉनपेक्षा डायना अभिनयाच्या बाबतीत कांकणभर ऊजवी वाटली... अर्थात हे माझे वै. म. आहे पटावे असा आग्रह नाही... कोण अंडररेटेड कोण ओवरहाईप्ड ह्या वादात पडण्याची ईच्छा नाही.

बकवास चित्रपट आहे. महा कंटाळवाणा आणि प्रेक्षकांना बिलकुल अक्कल नाही या (नेहेमीच्याच) गृहितकावर आधारलेला.

अतिशय बकवास आहे. आधी जॉन अब्राहम त्याच्या मठ्ठ चेहरा आणि शून्य अभिनयामुळे झेपत नाहीत. ह्यात त्याला माती करायला चांगला वाव मिळालाय.

देशप्रेम जागृत व्हायला चित्रपटांची गरज लागते..... Sad
आणि असे जागृत देशप्रेम साधारण किती दिवस टिकते?
देशप्रेम का जागृत होते? आपल्या देशाने अणूचाचणी केली म्हणून की इतर काही कारणे आहेत?

मला भयंकर आवडलाय. पोखरण येथील चित्रीकरण, पाकिस्तानी स्पाय, अमेरिकेच सॅटलाईट, ब्लाईन्ड स्पॉट्स, इन्स्टॉलेशन वै भाग उत्कन्ठावर्धक आणि नन्तर एक्च्युअल फोटोज दिल्याने इन्टरेस्टीन्ग झालाय.

बोमन इराणीचे काम आवडल. ..खरोखर मुत्सद्दी वाटतो.
आणि येस्स, डायनाचे ही काम खुप आवडले.

>>देशप्रेम जागृत व्हायला चित्रपटांची गरज लागते..... Sad
आणि असे जागृत देशप्रेम साधारण किती दिवस टिकते?
देशप्रेम का जागृत होते? आपल्या देशाने अणूचाचणी केली म्हणून की इतर काही कारणे आहेत?<< +१०००० Proud Proud Proud

मला देखील आवडला, फक्त डायना चे चाराक्टर उगाच घुसवल्यासारखे वाटले.
बोमन ने ग्रीप पकडला आहे रोल चा.
फक्त एक गंमत वाटली, चाचणी होत असते - रिव्हर्स काउन्ट डाउन सुरू असतो -5 ,4,3,2 वगैरे आणि अशा वेळी हे पांडव चिप्स काय खातायत, कॉफी काय पितायत?

फक्त एक गंमत वाटली, चाचणी होत असते - रिव्हर्स काउन्ट डाउन सुरू असतो -5 ,4,3,2 वगैरे आणि अशा वेळी हे पांडव चिप्स काय खातायत, कॉफी काय पितायत?>>>>> भुक लागली असेल ओ.
नैतर काही प्रतिकात्मक असेल बघा आपल्याला न समजण्यासारखं Happy

किल्ली, सिनेमा पाहिला नाही म्हणुन काही लिहिलं नाही Happy
पण ट्रेलर आणि गाणी पाहिलेली म्हणुन मला वरती बकवास आहे वाल्या कमेंत पट्ल्याच.

चांगला होता कि सिनेमा. रिअ‍ॅलिटीशी १००% जुळणारा आहे असा दावा नाही केलेला. उत्कंठा ताणण्यात यशस्वी ठरतो सिनेमा.

चांगला होता कि सिनेमा. रिअ‍ॅलिटीशी १००% जुळणारा आहे असा दावा नाही केलेला. उत्कंठा ताणण्यात यशस्वी ठरतो सिनेमा.
हो मला ही असेच वाटले होते