बाळाचा आजार

Submitted by सीमि on 25 November, 2018 - 01:20

माझी 17 नोव्हेंबर 2018 ला सिझेरियन डिलिव्हरी झाली. Ivf प्रेग्नेंसी 38 आठवडे पूर्ण झाल्यावर 3.4 kg चं सुदृढ व गोंडस बाळ जन्माला आले.प्रेग्नेंसी मधले सगळे रिपोर्ट व सोनोग्राफी रिपोर्ट नॉर्मल होते. पण त्याचे वजन करताना आणि क्लीन करताना लक्षात आलं की त्याचा श्वासांचावेग जास्त आहे. आणि तो निळा पडू लागला. लगेच त्याला ऑक्सिजन वर तासभर ठेवण्यात आलं व तो नॉर्मल झाला. आमच्या कडे दिल्या नंतर तो पुन्हा निळा पडू लागला व डॉक्टरांनी त्याला icu मध्ये शिफ्ट केलं जिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सुरुवातीला त्याचा श्वासाचा वेग 100 होता. ह्यात 3 शंका होत्या
1. हृदयाचे त्रास
2. Surfactant
3. Pneumonia

हृदयाचा 2 D echo नॉर्मल आहे. डॉक्टरांनी surfactant innitially 1 dose दिला त्याने काही फरक पडला नाही condition मध्ये. मग दुसराही दिला. पण surfactant चा प्रॉब्लेम कमी दिवसांच्या व कमी वजनाच्या बाळांना येतो. माझे बाळ पूर्ण दिवस व 3.4kg वजनाचे होते. At last pneumoniachi ट्रीटमेंट सुरू केली ज्यात high dose of antibiotic सुरू केले. 5 दिवसांनी तो व्हेंटिलेटरच्या बाहेर आलापण icu मध्येoxygen सप्लाय चालू आहे. 2 दिवस oxygen लेव्हल कमी करून 1-2 lit वर आणलीय जी minimum असते पण हा सप्लाय थांबवला की बाळा ला लगेच त्रास होऊ लागतो व तो निळा ही पडायला लागतो. हे सगळं काल पासून चालू आहे. डॉक्टर म्हणतात ही कंडिशन किती दिवस राहील सांगू शकत नाही. तरी जाणकारांनी प्रकाश टाकावा. Plz help...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं वाटलं वाचून... हूरहूर लागून राहिली होती... बाळ, बाळंतिणीला आशीर्वाद!

Pages