मृत्यु

Submitted by naidu suvarna p... on 28 November, 2018 - 04:34

तुझ्या माझ्या मिलनाचा निश्चित आहे क्षण ,
हे सारे जाणते रे माझे हि मन ,
येशील जेव्हा माझ्या तू भेटीस,
आनंदाने विसावेल तुझ्याच कुशीत ,
भेटण्यास मला तू होशील आतुर,
माझ्याकडूनही न व्हावा क्षणभर उशीर,
भेटताना तुला मन असावे शांत,
मनात न उरावी कसलीच खंत,
तुझ्या माझ्या नात्याचाही होणार आहे अंत ,
विचार करण्यासही नाही मिळणार उसंत,
जन्मापासून आहेस माझ्या तू सोबत,
तरी या नात्याचा मज नाही उबग,
तुझ्या माझ्या या नात्याची अशी हि संगती,
मनापासून करते तुज एक विंनती ,
येशील जेवा तू माझ्या भेटीस,
सुगंधाची उडावी चौफेर उटी
भेटताना तुला मन असावे शांत,
मनात न उरावी कसलीच खंत,
भेटताना तुला मन असावे शांत,
भेटताना तुला मन असावे शांत,

Group content visibility: 
Use group defaults

मृत्यूप्रती अतिशय प्रगल्भ आणि संयत भावना. पण कविता म्हणून जरा सॅड वाटली.
मला जन्म मृत्य्यू मधले आयुष्य म्हणजे आनंद सोहळा असावा असे वाटते
लिहित रहा.