बालुशाही _ सविस्तर

Submitted by किल्ली on 15 November, 2018 - 13:22
balushahi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर

बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात

१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.

प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
b1.jpg

कोमट तेलात बालुशाही:
b2.jpg

तळत असताना:
b3.jpg

तयार बालुशाही:
b4_0.jpg

झाल्या सगळ्या करूनः, या खायला
b5.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.

२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही

३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता

४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012

माहितीचा स्रोत: 
सासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुपा ऐवजी कॅश्यू बटर चालेल काय ?>>> हो Proud काहीही चिकट असणारे पदार्थ वापरलेत तरी चालेल Proud
किल्ले तू प्रयोग करीत रहा, आम्ही येत राहु>> यो यो
अगागा!! कुठे नेऊन ठेवले बालुशाहीला!>>> मायबोली की जय हो !!
ला नाही बुवा ते गोड सिमेंट घशाखाली ढकलत>> Lol
हो, असा रसरशीत पेठा आणि त्यात केवडा किंवा गुलाबाचा गंध असल्यास ... आहा>>> तोंपासु
२००च काय ठरवले तर ५०० पण करु. हाय काय अन नाय काय !!>>> _/\_
किल्ली, तुझ्या निमित्ताने खूप दिवसांनी आवर्जून बाशा आणून खाल्ली.>>> वा छान, enjoy
तुम्ही पंछीचा पेठा खा>>> ''पन्छी'', हे काय आहे?

थोडासा बदल -
साखरेचे खाणार तो IF चा बाफ काढणार

कुठे मिळतो पान पेठा? आणि तो पंछी पेठा पण! किती वर्षांत पेठा खाल्ला नाहीये! उत्तर भारतातला आहे ना हा पदार्थ?

उत्तर भारतातला आहे ना हा पदार्थ?>>> हो, आग्रा येथील पेठा फेमस आहे
सविस्तर काढा की.उगा पलिस्तर सारखं वाटून राहतंय.>>> मला पण ते 'कनिस्तर' आठव्तय सारखं Lol

{{{ तुपा ऐवजी कॅश्यू बटर चालेल काय ?>>> हो Proud काहीही चिकट असणारे पदार्थ वापरलेत तरी चालेल}}}

असं नका लिहू. नवशिके डिंक टाकून बालूशाहीऐवजी डिंकाचे लाडू बनवतील.

तुम्ही पंछीचा पेठा खा>>> ''पन्छी'', हे काय आहे?
Submitted by किल्ली on 26 November, 2018 - 14:40

http://www.panchipetha.com/

बालूशाहीऐवजी डिंकाचे लाडू बनवतील.>>> मग ते काहीतरी भलतच प्रकरण होइल...
नवशिक्यांसाठी गम्भीर सूचना:
नका हो कोणीही रेसीपी बदलू.. जसं मुख्य पोस्टमध्ये दिलं आहे तसं करा

पंछीचा पेठा >> लिन्क बद्दल धन्स..

बिपिनचंद्र, लिंकसाठी धन्यवाद! काय छान छान फोटो आहेत त्या साइटवर! पुण्यात कुठे मिळतो का हा पंछी पेठा? ( बंगळुरात मिळणार नाही याची जवळजवळ खात्री आहे Wink )

! पुण्यात कुठे मिळतो का हा पंछी पेठा? ( बंगळुरात मिळणार नाही याची जवळजवळ खात्री आहे Wink )
नवीन Submitted by वावे on 27 November, 2018 - 08:56

मला ताजमहाल बघायला गेलेल्या माझ्या मित्राने आणून दिला. तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता.

https://www.placeoforigin.in/buy-kesar-angoori-petha-sweea807-online

https://www.tastebells.com/agras-famous-angoori-petha

https://www.taazataaza.com/product/buy-panchhi-petha-online/

https://www.foodfeasta.com/brands/panchhi-petha.html

http://www.foodebaba.com/restaurant/detail/panchhi-petha

पाकृ-फोटो सगळंच तोंपासु.. प्रतिक्रिया पण भारी आल्या आहेत !
बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही>> Rofl

बालुशाही डोक्यात मनात घुमत राहुन जीवाची तडफड होउ लागली.
आज जनताची बालुशाही आणायला सांगितलीये शेवटी.
संध्याकाळी फोटो टाकेन Happy

khaja.jpg
हा आमच्या इथल्या जनता दुग्धालयातील अप्रतिम, चविष्ठ खाजा. (बालुशाही)
मउ, खुसखुशीत, योग्य प्रमाणात गोड, वरुन साखरेच्या पांढर्या खापर्या नाहीत, पाक आतपर्यंत मुरलेला अशी बालुशाही.

हा आमच्या इथल्या जनता दुग्धालयातील अप्रतिम, चविष्ठ खाजा. (बालुशाही)>> खुप जास्त प्रचंड तोंपासु
सुन्दर दिसतोय..गोल गरगरीत.. कौशल्याचं काम आहे ते

वाट पाहत होते मी बाशा फोटोची काल सन्ध्याकाळी Happy
ब्लेम इट ऑन किल्ली >> Proud

किल्ली, आता तु गुजा कर. इथे पोस्ट कर. मग मी विकत आणुन खाईन. Lol
मग अंगुर रबडी / बासुंदी कर.
मग मावा बर्फी, मथुरा पेढा, मलई सॅन्डविच ..... Lol

आता तु गुजा ,/ बासुंदी कर>> खुपदा केलेत अशातच. पण रेसीपी आणि फोटो नाय काढले

एवढ सगळ करुन खात बसले तर माझ्या वजनाच काय होइल.. आधीच ते १०० च्या पुढे गेलंय Happy
दिवाळी स्वीट्स खाउन..
चिरोटे, गुजा, बेसन लाडू, बेसन बर्फी, नारळ बर्फी , बासुन्दी, करन्ज्या, साटोर्या, शन्करपाळी एव्ढ झालेलं ह्या वर्षी घरात (होममेड बरं का)

साबा ह्यान्ची कृपा _/\_

अंगुर रबडी >> कात्रज ला तळ्याकाठी विजय डेअरी ची आणून खाते.. निव्वळ अप्रतिम आहे Happy

ubmitted by सस्मित on 28 November, 2018 - 12:27 >>> Rofl

खरेच आणायचे ठरविले होते, मम्माला तसे सांगणार ईतक्यात किल्लीची अजुन एक पोष्ट , वजनाने शंभरी ओलांडल्याची , ती वाचुन आवर घातला मनाला कसेबसे.

Pages