सहज सुचलं म्हणून... (२)

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 10 September, 2018 - 13:06

समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातलं सांगायचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे शब्द !
शब्दांचं महत्व जरी एवढं असलं कि बऱ्याचदा हे 'शब्द'च एका उत्तम होऊ शकणाऱ्या संवादाच्या मध्ये येतात.असं होतं कारण,आपण जे काही शब्दांमधून बोलण्याचा प्रयत्न करत असता ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरेच पडतात.एकामागून एक कितीही शब्द ठेवले तरी 'जे ' व्यक्त करायचं असतं ते पुन्हा शिल्लक राहतंच !
काहीवेळा असंही होतं कि,सांगायचं असतं वेगळंच पण 'ते ' सांगायला आपण जे शब्द वापरतो त्यातून काहीतरी वेगळंच व्यक्त होऊन जातं आणि आपला त्यावर इलाज नसतो कारण कितीही प्रयत्न केला तरी शब्द अपुरेच पडतात !
शब्दांशिवाय बोलणं हा एक उपाय असतो पण तसा संवाद घडण्यासाठी 'तसे ' बोलणारे गरजेचे असतात,जे फार नसतातच आणि काहीवेळा तसं बोलणारेच जास्त असतात.
प्राण्याशी बोलण्यासाठी कुठे शब्द लागतात ?
एखादं गाणं आवडण्यासाठी त्यातले शब्द कळणं कुठं गरजेचं असतं ?
आई बाळाशी बोलताना कुठले शब्द वापरते ?
माणूस सोडला तर निसर्गातले इतर घटक कुठल्या शब्दांनी संवाद साधतात ?

शब्द जोडतात,शब्दच तोडतात,शब्द समजावतात,शब्दच फसवतात,कुठल्याही हत्यारापेक्षा जास्त खोल जखम हे शब्दच करतात आणि जगातल्या कुठल्याच औषधाने बऱ्या होणार नाहीत अशा जखमा शब्दच बरे करू शकतात.

फक्त भावना आणि फक्त शब्द दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्णच असतात,दोन्ही एकत्र आले कि मात्र जग बदलायला वेळ नाही लागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे.
ते म्हणतात ना, शब्द म्हणजे दुधारी तलवार.

भावना आणि फक्त शब्द दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्णच असतात,दोन्ही एकत्र आले कि मात्र जग बदलायला वेळ नाही लागत>> अप्रतिम विचार.

मने जुळली असतील तर चुकीचे शब्दही बरोबर अर्थच पोहोचवतात....
आणि नाहीतर बरोबर शब्दांचाही चुकीचा अर्थ लावला जातो !