सहज सुचलं म्हणून...(३)

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 30 September, 2018 - 01:07

जे आपल्याला हवं असतं ,ते कधीच मिळत नाही
ज्याला आपण हवे असतो ते आपल्याला कधीच आपलंस वाटत नसतं !
तुझं माझं आपलं त्यांचं....
खरंच या सगळ्याला अर्थ असतो कि फक्त शब्द ?

आपलं असणं आणि आपलं वाटणं कितीसा फरक असतो यात ?
बाकी कुठलंही नातं आपलं आहे असं वाटतं असतं आणि आपली आई मात्र जन्माआधी नऊ महिन्यांपासून आपलीच असते !
आपल्याला वाटण्या न वाटण्या च्याही आधीपासून !
एखाद्याच्या आयुष्यात असल्यासारखं वाटण्यापेक्षा खरंच असणं जास्त महत्वाचं असतं आणि तेच आवश्यकही असतं !
आपल्या नुसत्याच 'वाटण्या'पासून 'असण्या'पर्यंतचा प्रवास नात्यांना समृद्ध बनवतो.
एकदा तुमचं 'असणं' निश्चित झालं कि मग पुढचा प्रवास 'नसण्या'पर्यंतचा...
कारण तुमचं नसणं
हेच त्या असण्याला डोंगराएवढं महत्व देऊन जातं !

तुम्ही असल्यासारखं वाटणं ,तुमचं असणं ,तुमचं नसणं....यातलं खरं काहीच नाही...निव्वळ समजूत,आजपर्यंत जी आपणच आपली करून घेत आलो,आजही करून घेतो आणि पुढंही हीच समजूत करून घेण्याला पर्याय नाही..असं वाटणं ,यातही गैर काहीच नाही !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हे कसं आधी मिस झालं होतं.
खरं सांगायचं तर मी किमान तीन ते चार वेळा तरी वाचलं असेल.

आपल्या नुसत्याच 'वाटण्या'पासून 'असण्या'पर्यंतचा प्रवास नात्यांना समृद्ध बनवतो.>> मस्त.