आधि माणूस जगवा?

Submitted by ashokkabade67@g... on 25 November, 2018 - 02:04

निवडणूक आली म्हणजे देशातील राजकीय पक्षांना राममंदिर आठवते.गेली चार वर्षे भाजप आणि शिवसेना केंद्रात आणि राज्यात बहुमताने सत्ता ऊपभोगत आहेत चार वर्ष यांना कधिच राम आठवला नाहीं की मंदिराची आठवण झाली नाही. मागील निवडणूकीत दीलेली आश्वासनेही पाळली नाहीत जनतेच्या समोर आता आपले प्रत्येक फसलेली धोरण आणि विकासाचे गाजर घेऊन जाता येणार नाही म्हणून यांना राम आठवला. देशात शेतकरी आत्महत्या करीत आहेत बळीराजा बळी जात आहे आरक्षणाचा वाद पेटला त्यात अनेक युवकांचा बळी गेला महागाई ़बेकारी वाढली जगणे अशक्य झाले .रामाची प्रतिमा हिंदू बांधवांच्या मनात इतकी अढळ आहे की एकमेकांना भेटताच आम्ही रामराम म्हणत रामाचे नावं घेतो.पण रामराम म्हणनाराच राहिला नाही तर .?रामाचे नाव घेणार कोण? म्हणुनच म्हणतो की आधी माणूस जगवा म्हणजे देव तुम्हाला मतेही मिळवून देईल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अशोक,
सत्यवचन,
>>>>आधी माणूस जगवा >>>>>>>
बहुसंख्य लोकांना हा साक्षात्कार होईल तो सुदिन,

@अशोक,
--
ज्यांना राम मंदिर हवे आहे ते सध्या आंदोलन करत आहेत, ज्यांना ते नको आहे त्यांनी शांत बसावे. तसेही गेल्या चार वर्षात, कोणताही लुंगासुंगा बरोजगार नेता उठून, कोणत्याही फुटकळ कारणा करता आंदोलन करतो मग अयोद्येत श्रीरामाच्या भव्य मंदिरा करता, रामभक्त हिंदूनी आंदोलन केले तर काय फरक पडतो.

शिवाय या आंदोलनांत, गेल्या काही महिन्या/वर्षाआधी देशभर झालेल्या हिंसक भारतबंद, आरक्षण या सारख्या आंदोलनात, आंदोलनकर्त्यांनी जे सरकारी व खाजगी मालमत्तेचे करोडो रुपयाचे नुकसान केले तसे राम मंदिर आंदोलनात झाल्याचे अजूनतरी ऐकिवात आले नाही. तेंव्हा असल्या जिलेब्या पाडणे बंद करा. व देशात जी हिंसक आंदोलने तथाकथीत सेक्युलर व निधर्मी करतात त्यावेळी "आधी माणुस जगवा" वगैरे जिलब्या पाडा.
--
जय श्री राम !

तसेही गेल्या चार वर्षात, कोणताही लुंगासुंगा बरोजगार नेता उठून, कोणत्याही फुटकळ कारणा करता आंदोलन करतो>>>>>
४ वर्षा आधी आंदोलन करणारे लुंगेसुंगे नेते कोण होते? त्यांची आंदोलने हिंसक नव्हती काय?

९२-९३ ल केलंत ते पुरेसे नाही का?
नवीन Submitted by विठ्ठल on 26 November, 2018 - 14:11
<<

अयोध्येतील एक 'बाबरी(?) मशीद' सोडल्यास,
९२ मधे आणखी किती मशीदी पाडल्या होत्या रामभक्त हिंदूनी ?

जर त्याही मशिदीची जागा इतिहासात कुठल्या मंदिराचीच आहे हे निष्पन्न झाले तर पुढे काय ?
तेव्हा हे अतिक्रमण हटवायचे का ठेवायचे /पोसायचे ?

एकूण एक धर्मस्थाने, राहण्याच्या जागा, सगळे जुने महाल यांचे ऑडिट करायचे का? 600 700 वर्षांपूर्वी जे होते तसे रिस्टोअर करू

कार्बन डेटिंग वरुन सायन्स जे बोलेल ते दोन्ही पक्षाने मान्य करावे
ज्याची मूळ मालकी त्यालाच आता हक्क मिळाला पाहिजे

ते करायला ,न्यायालये आहेत की नाही?
मग त्यांचे काम होईपर्यंत दोन्ही पक्षांनी त्याचा आदर केला पाहिजे,
आम्ही जाहीर केलेल्या तारखेपासून काम सुरू करू म्हणून कसे चालेल बरे?

निर्णय कशाच्या आधारावर घ्यायचा, ते न्यायालयाने ठरवले आहे. त्यांच्या मते तो जमिनीच्या मालकीचा झगडा आहे.

बाकी विकासाची पुंगी मोडली, भ्रष्टाचाराविरोधात बोंबलायची सोय नाही, तेव्हा पुढल्या निवडणुकीसाठी रामाचाच आसरा राहिला आहे.
१९९२, २००२ ची पुनराव्रुत्ती करायची असणार.

१९९२, २००२ ची पुनराव्रुत्ती करायची असणार.
नवीन Submitted by भरत. on 26 November, 2018 - 16:50
<<

१९९२, २००२ ची सुरुवात हिंदूनी केली होती म्हणता ?
---
या देशातील सोकॉल्ड ढोंगी फुरोगामी नेहमीच गोध्रा व मुंबईत सात हिंदू माथाडी कामगार रात्री झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून झालेली त्यांची हत्या, हे नेहमीच विसरतात.
---

<<< 600 700 वर्षांपूर्वी >>>
अहो इ.स. १०२४ मधे म्हणजे ९९४ वर्षांपूर्वी गझनीच्या महमूदने सोरटी सोमनाथ मंदिर उध्वस्त केले. तेंव्हापासून निरनिराळी मंदिरे फोडणे चालू आहे. आता काय फुक्कट मुसलमान नि ब्रिटिशांना शिव्या देता? जेंव्हा ते आले तेंव्हा हिंदूंनीच फितुरी करून त्यांच्या घशात देश घातला.

आता विचार करा - आहे हे असे आहे. आता मशिदी फोडणे, मंदिरे बांधणे हे करायचे का रस्ते दुरुस्त करायचे, कारखाने उभारायचे, शस्त्रे, तंत्रज्ञान यात संशोधन करायचे हे तुमचे तुम्ही ठरवा!
बाकी, साईबाबा, जे स्वतः बिचारे साध्या दगडी पारावर बसत, ज्यांनी कधी कुणाहिकडे पैसे मागितले नाहीत, त्यांच्या नावाने ३२ मण सोन्याचे सिंहासन बांधणारे लोक जिथे रहातात त्यांच्याकडून ही एव्हढीच अपेक्षा. हज्जारहून जास्त वर्षे मुसलमान रहातात भारतात. नि अजूनहि हाच हिंदू मुसलमान वाद! म्हणजे हिंदू नि मुसलमान अजूनही दोन्ही धर्मातले लोक कोणत्या गोष्टीला महत्व देतात ते कळते.
जी काय प्रगति होते आहे त्यात लक्ष घालण्या ऐवजी असले वाद करत बसायचे!
स्वधर्माबद्दल अभिमान जरूर असावा, पण कालमानाप्रमाणे प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे याचा विचार करा.

निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे श्रीरामाची आठवण.

आता मतदार जनतेने ठरवायचे आहे त्यांना हिंसा, अस्थिरता हवी आहे का शांतता, सौहार्दता. रामाच्या नावाचा वापर करुन मतदारान्ना मुर्ख बनवणर्‍या चुनावी जुमल्याला कृपया बळी पडू नका. १५ लाखाचा जुमला परवडला... पण जाती, धर्मात तणाव निर्माण करणारा हा जुमला देशाला आणि जनतेला परवडणारा नाही. सामान्याला रामाचे मंदिर झाले काय आणि नाही झाले काय काही फरक नाही पडत.

<< या देशातील सोकॉल्ड ढोंगी फुरोगामी नेहमीच गोध्रा व मुंबईत सात हिंदू माथाडी कामगार रात्री झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून झालेली त्यांची हत्या, हे नेहमीच विसरतात. >>
---------- प्रत्येक निरपराधी व्यक्तीच्या हत्येचा नेहेमीच निषेध आहे. Sad

<< ते करायला ,न्यायालये आहेत की नाही?
मग त्यांचे काम होईपर्यंत दोन्ही पक्षांनी त्याचा आदर केला पाहिजे,
आम्ही जाहीर केलेल्या तारखेपासून काम सुरू करू म्हणून कसे चालेल बरे?>>

---------- सबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय तालीबानी प्रवृत्ती मान्य करते का? तालीबान आणि या वर्गाच्या विचारसरणीत काहीच फरक नाही. एक मोठा वर्ग प्रवेश बंदीचे समर्थन करतो आहेच ना? न्याय व्यावस्थेचा आदर खुप खुप दुरची गोष्ट आहे.

{{{{आता विचार करा - आहे हे असे आहे. आता मशिदी फोडणे, मंदिरे बांधणे हे करायचे का रस्ते दुरुस्त करायचे, कारखाने उभारायचे, शस्त्रे, तंत्रज्ञान यात संशोधन करायचे हे तुमचे तुम्ही ठरवा!}}}}

आसा खय आस्त कारं महाराजा Uhoh
मंग अश्या हिसोबानी तं तुमाला त्यों १००० फुटांचा फिलाट कशाला ओ लागतंय ! रव्हां की संबर फुटात. म्हंजी बाकी लोकासनी बी रहाया गावंल ना पद्दतशीर जरा. कसं हाय ना जगामंदी लोकसंख्या फारच की वाढाया लागलीया. आता एक मानसाला जागा ओ किती लागतंय ? उगा आपली मोठी मोठी टॉवरमंदी चार दोन मानसे संबर लोकांची जागा गिलुन राहलय बगा

पण जाती, धर्मात तणाव निर्माण करणारा हा जुमला देशाला आणि जनतेला परवडणारा नाही. >>> १०० टक्के सहमत

आता जर दंगे झाले तर त्याची परिणीति गृहयुद्धात व्हायला वेळ लागणार नाही Sad

<<<<मंग अश्या हिसोबानी ............ राहलय बगा>>>
ते सगळे बरोबर आहे. पण मुळात धर्माच्या नावाखाली अंदाधुंद थांबवा. हा मा़झा मुख्य मुद्दा आहे.
मंदिरे, पुतळे, धर्मावरून वाद यापेक्षा शिक्षण, संशोधन समाजजागृती वर विचार करा. जर रस्ते बांधणी, वहातुकीची व्यवस्था केली तर देशात कुठेहि कारखाने, कामाच्या जागा उभारता येतील, म्हणजे शहरांमधे गर्दी होणार नाही.

शहरांमध्ये गर्दी होतच असते आणि होतच राहणार, जेथे अमेरिकेँसारखे अतिप्रगत देश ही गर्दी थोपवू शकले नाहीत तेथे इतर देशांची काय स्थिती असेल.

पण मुद्दा तो नाहीच आहे. चीन म्हणतो अरुणाचल त्यांचा तर देवून टाकायचा का ? म्हणजे चीन त्याच्यात रस्ते वगैरे बांधेल आणि शहरांची गर्दी कमी होईल !

<<<अमेरिकेँसारखे अतिप्रगत देश ही गर्दी थोपवू शकले नाहीत>>>
अमेरिकेचे नि चीनचे सोडा हो!! आपल्या देशाचा विचार करा. आपल्याकडे जगातले सर्वात जास्त हुषार लोक आहेत, असे माझे मत आहे, पण ते सतत दुसर्‍या देशांकडे बघत असतात.
इतर देशांतहि धर्माचे स्तोम आहे, पण ते त्यांनी प्रगतीच्या आड येऊ दिले नाही कारण शिक्षण. शिक्षण म्हणजे शाळेत जाऊन शिकणे हेच नव्हे तर जीवनविषयक शिक्षण. भारतात धर्माच्या नावाखाली फक्त धर्म, धर्म करत बसले. ते झाले गेले सोडून द्या. आता वेगळे विचार करा.
असे मी फक्त दुसर्‍यांना सांगतो कारण सध्या मला माझ्यापेक्षा इतर भारतीयच जास्त हुषार आहेत असे वाटते.

असे मी फक्त दुसर्‍यांना सांगतो कारण सध्या मला माझ्यापेक्षा इतर भारतीयच जास्त हुषार आहेत असे वाटते.
नवीन Submitted by नन्द्या४३ on 27 November, 2018 - 17:47

काय सांगता? एकही अमेरिकन, रशियन किंवा इंग्रजदेखील तुमच्यापेक्षा जास्त हुषार नाही? कमाल आहे.

<<<अमेरिकन, रशियन किंवा इंग्रजदेखील तुमच्यापेक्षा जास्त हुषार नाही>>>
पण मला भारताबद्दल जेव्हढी कळकळ वाटते तेव्हढी त्या देशांबद्दल वाटत नाही. तसे तर माझ्यापेक्षा हुषार सगळीकडेच असतील, पण मला असे वाटते की भारतीय लोक संख्येने नि हुषारीने जगात जास्त आहेत.

5 राज्यात हरल्यावर मंदिर आंदोलनवाले गायब झाले.

आता एप्रिल 2019 जागे होतील , चैत्राचे निमित्त घेऊन निवडणुकीचा मुहूर्त साधतील

Pages