बालुशाही _ सविस्तर

Submitted by किल्ली on 15 November, 2018 - 13:22
balushahi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर

बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात

१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.

प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
b1.jpg

कोमट तेलात बालुशाही:
b2.jpg

तळत असताना:
b3.jpg

तयार बालुशाही:
b4_0.jpg

झाल्या सगळ्या करूनः, या खायला
b5.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.

२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही

३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता

४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012

माहितीचा स्रोत: 
सासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बालुशाहीसारख्या बद्दू प्रकारावर दोनशे प्रतिसाद काढून दाखवणार्‍याला या जगात काहीही अशक्य नाही Lol
मला नाही बुवा ते गोड सिमेंट घशाखाली ढकलत!..

२०० प्रतिसाद करायचेच असं ठरवल्यासरखे प्रतिसाद येताहेत आता>>>> हो न

पण भरकटलेला तरी शांत धागा म्हणून लिस्टित पयला येऊ शकतो ☺️

मला नाही बुवा ते गोड सिमेंट घशाखाली ढकलत!..
अगदी बरोबर, ९०% हलवाई तुम्ही म्हणता तशीच बालुशाही बनवतात. नुसतं प्रमाण माहीत असून चालत नाही, कणिक मळण्यापासून साखरेत घोळण्यापर्यंत ,प्रत्येक कृतीला कौशल्य लागतं.अर्थात त्याला अनुभव लागतो.
माझ्या आईची बालुशाही आणि वडिलांचा कोहळ्याचा पेठा कधीच फसत नाही. पेठा हा खुसखुशीत आणि गोड असावा, बालुशाही खुसखुशीत मध्यम गोड असावी.

२००च काय ठरवले तर ५०० पण करु. हाय काय अन नाय काय !!
निगडीच्या प्रदीप स्वीट मधली बालुशाही मस्त लागते. फक्त त्याच्या कडची जिलेबी भयानक असते.

बालुशाही खुसखुशीत मध्यम गोड असावी.>>>>> हो तशीच खाल्ली आहे.त्यामुळे ९०%चे कळले नाही.या धाग्यामुळे आता बालुशाही आणून खाल्ली पाहिजे.सॉरी किल्ली,करून खाण्याचा उत्साह नाही.

काहींच्या बालुशाहीचा गोडवा बाहेरच्या आवरणावर संपतो, तर काहींचा साखरेचा पाक आतपर्यंत मुसंडी मारतो , गोडवा बालुशाहीत बाहेरून आत कमीकमी होत जाणारा हवा, ह्यासाठी कौशल्य लागते.

मी सुद्धा हलवायाची बालुशाही खुसखुशीत गोड अशीच खाल्ली आहे. पण आपल्या मातोश्रीं कडेच ते काय कौशल्य वगैरे आहे असे जो पर्यंत इथे मान्य होत नाही तो पर्यंत श्रावण बाळ गप बसणार नाही.

पण काय मी म्हणते त्या बालूशाहीची चा भाऊ करावा नं .... म्हणजे तो आपला चिरोटा हो .... फारसा चवीत फरक नाही, फार कुटाणा नाही आणि बिघडण्याची शक्यताही बाशापेक्षा कमीच ..... आणि उडी मारणे स्टेप नसतेच..... आजपर्यंत एकाही धाग्याने शतक पाहिले नाही आणि (श्रेय अर्थात काशा) एक पाकृ लिहावी का (विचारात पडलेली मंजुली)
बाकी बाशा व पेठ्याचे 'गोड'से मार्मिक वर्णन आवडले Happy

आपला चिरोटा हो .... फारसा चवीत फरक नाही, फार कुटाणा नाही आणि बिघडण्याची शक्यताही बाशापेक्षा कमीचआपला चिरोटा हो .... फारसा चवीत फरक नाही, ________नाही हो मंजूताई चवीत फरक येतोच.एक कुरकुरीत आणि दुसरा खुसखुशीत!

बालुशाही बद्दल इतकं वाचून न राहवून मिठास ची अर्धा किलो घेऊन आले... खात खात लिहितेय...
किल्ली, तुझ्या निमित्ताने खूप दिवसांनी आवर्जून बाशा आणून खाल्ली.

ओह.. असय का ते.

: रून्मेश मोड ऑनः
मग ते का घा हव होत Wink

नाही हो मंजूताई चवीत फरक येतोच.एक कुरकुरीत आणि दुसरा खुसखुशीत!>>>
हा चवीतला फरक आहे?

पेठा तोंडात घातल्यावर आतला गोड गार रस जिभेवर आला पाहिजे. मला पेठा खूप आवडतो, पण चांगला मिळाला पाहिजे.
Submitted by वावे on 24 November, 2018 - 13:16

तुम्ही पंछीचा पेठा खा. आवडेल तुम्हाला.

Pages