बालुशाही _ सविस्तर

Submitted by किल्ली on 15 November, 2018 - 13:22
balushahi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर

बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात

१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.

प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
b1.jpg

कोमट तेलात बालुशाही:
b2.jpg

तळत असताना:
b3.jpg

तयार बालुशाही:
b4_0.jpg

झाल्या सगळ्या करूनः, या खायला
b5.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.

२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही

३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता

४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012

माहितीचा स्रोत: 
सासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फक्त रंगाची शेड लाइफबॉय सारखी.
बाकी खायला जेली या आंग्ल पदार्थाच्या जवळ जाणारा.
व्हीबी,ये लो.
https://www.maayboli.com/node/46081
https://www.maayboli.com/node/39196
https://www.maayboli.com/node/30714

अरे वाह, खरेच अगदी गुण्यागोविंदाने शंभरी गाठली ह्या धाग्याने.
हल्ली हे दुर्मिळच

करताना येत असेल कदाचित ..>>> Proud

याला हलवा म्हणतात ते नव्हतं माहित Lol बाकी लहान असताना लाल आणि हिरव्या रंगाचा खाल्ला आहे. Lol

लाल जर लाईफबॉय साबण असेल तर हिरवा कोरफड जेली

धन्यवाद मोद, वत्सला, मंजूताई, अन्जू , च्रप्स, मानव पृथ्वीकर, VB , पवनपरी11 Happy

हीच ट्रीक वापरली ( थंड तेल)तर टपरी टाईप समोसे, कचोरी होतात खुसखुशीत>>> हो खरय, आम्ही कचोरी वगैरे घरीच करतो Happy
याला बालुशाही नाव कसे पडले असावे?>> काय महीत, तुम्हीच शोधा आणि सान्गा Happy Proud
बदामी हलवा नावाचा लाल लाइफबॉय साबण >>> Lol

माझा पहिला वहिला शंभरी गाठलेला धागा>>>>> तोही वादविवादापासून दूर शतक पार केल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात यावा हि विनंती स्थळ लकडीपुल की शिवाजी पार्क किल्लीताईंच्या धाग्याला किल्ली दण्यात आली आहे. इच्छुकांनी लाभ घेत धागा
पंचशतकी पार करण्यात व विनोदी धाग्यात नोंद करण्यात आपला खारीचा वाटा उचलावा...

किती वर्षांनी हमाम चं नाव ऐकलं.
या साबणावर एका फुलाचा ठसा असायचा.तसं फुल आमच्या शाळेत सुविचार फळ्यावर असायचं.आणि 'गवत डुलतं, फुल फुलतं, सावे विद्यालयाचं नाव खुलतं' हा सुविचार ☺️☺️☺️
(माझ्या सध्याच्या भयंकर गझलांचं बाळकडू असं खोल रुजलेलं आहे.)

आज ऑफीसमधील बिहारी कलिगने “गाजा“ नावाची मिठाई आणलेली. सेम टू सेम बाशा च्या चवीची अन घटकपदार्थ सेमच असतील बहुधा.
पण आकार चौकोनी होता

माझे माहेर आणि सासर मराठवाड्याचे आहे मंजुताई. >>>> अय्यो हो ते मराठवाडी धपाटे विसरलेच होते. मराठवाड्याची म्हणजे 'गुलमंडी' हवे होते Happy

गुलमंडी नाय , ती जरा दूर आहे...मंजुताई... वजीराबाद ,आनंद नगर , भाग्य नगर ह्यापैकी कोणतेही स्थळ.. Happy

बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही >>> Lol
हे भारीच
बालुशाही मस्तच

हैद्राबाद/ आंध्रा तेलंगणा मध्ये ह्याला खाजा काइलू म्हणतात. दुकानात बघितले आहे. जी पुल्ला रेड्डी दुकानात साजुक तुपा तले मिळतात. दंगेखोर नातवंडा ना खायला घालायला म्हणून बुक मार्क करून ठेवलेली आहे.

जाहीर सत्कार करण्यात यावा हि विनंती स्थळ लकडीपुल की शिवाजी पार्क
<<
अहो!

पुण्यात सत्कार शनिवार वाड्यावर करतात. लकडीपुलावर नव्हे. Happy

याला बालुशाही नाव कसे पडले असावे?>> काय महीत, तुम्हीच शोधा आणि सान्गा.>>>

हा पदार्थ पहिल्यांदा ज्या व्यक्तीने बनवला तिने शालू घातला होता बनवताना. त्यापदार्थाने तेलात जेव्हा उडी मारली तेव्हा तेल तिच्या शालूवर आणि पोलक्याच्या बाहीवर उडाले.
बाहीची आणि शालूची वाट लागल्याने तिने
"बाही", "शालू" या दोन शब्दांची वाट लावून (म्हणजे ऍनाग्राम)
बालूशाही असे त्या पदार्थाला नाव दिले.

धन्यवाद mr.pandit , अमा, आ.रा.रा. Happy

@ मानव पृथ्वीकर: Lol _/\_
@ आ.रा.रा. :
हा पदार्थ एअर फ्रायर मध्ये तळता येइल का? Proud Light 1

Pages