मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालपणी:

आजा पिया तोहे प्यार दू
ओ मोहे भैया तोहे मार दू

जब हम जवां होंगे, जाने कहाँ होंगे लेकिन जहाँ होंगे, वहां पर याद याद करेंगे, तुझे याद करेंगे

(खरंतर तिथे फ़रियाद शब्द आहे)

गोमू संगतीनं माझ्या तू येशील का.
आजवर वाटत होते "गं तुझं टपोरं डोळं ग जसं सोन्याचं दाणं" असे ते शब्द असतील.
"काशिनाथ घाणेकर" चित्रपट बघितल्यानंतर "टपोरं डोळं" वेळी सुबोध हाताची बोटे गोल गोल करतो. पण कळेना कि "सोन्याचं दाणं" ला हात वरखाली का करतो? मग लक्षात आलं ते "कोळ्याचं जाळं" आहे :))

चंदनसा बदन चंचलसी तिवन असे मी ऐकायचो आत्त्ता आत्ता पर्यंत. परवा एका कार्यक्रमात एका नवोदित गायकाने चितवन हा शब्द फार सुस्पश्ट म्हणल्याने शंका आली.

ऐन दुपारी
यमुना तिरी
चोळी कुणी काढली, काढली
बाई माझी करंगळी मोडली

हे सर्व इमॅजिन करा, अ‍ॅक्शन करुन.

मी मित्रास असेच सांगितले होते (चुकीने), डमशराड साठी, त्याने जो खल्लास अभिनय केला काही विचारु नका ....... Proud

कोणालाही गाणं ओळखता आले नाही.

कुणीही ओळ चुकीचे आहे असे म्हटले नाही

करंगळी का मोडलं हा प्रश्न तेव्हा मनास फार छळत होते.
खुप नंतर, जेव्हा हे गाणं टि वी वर एकदा पाहिले, तेव्हा तर हसु आवरेना, अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र हे गाणं तर रस्त्या वर चित्रीत केलं गेलंय

हा किस्सा तर आमच्या प्रत्येक गटग मध्ये रिपीट असतो, आता तर त्याचे अभिनय आणि हावभाव फारच उच्च आहेत
Proud

मुळ गाणं :-

ऐन दुपारी
यमुना तिरी
खोडी उगी काढली, काढली
बाई माझी करंगळी मोडली

चं चं सफरचंद' Rofl चोळी कुणी काढली, काढली>>>>>> अरारारारा ....:हहगलो:

डॉक्टर परेशां हैं सारे, झक हकीमों ने मारी
बढती ही जाती है हर दिन, कैसी है ये बीमारी
मर्द जाता नहीं, चैन आता नहीं
मर्द जाता नहीं, चैन आता नहीं
काम करती दवा ना दुआ
लवेरिया हुआ...

हा नक्की कुठ्ल्या मर्दाच्या जाण्याची वाट बघतोय ते काही कळायचं नाही. मग खूप वर्षांनी गुगल बाबांच्या कृपेने कळलं की ते 'मर्द' नसून 'मर्ज़' आहे!

नींद चुराये, चैन चुराये
डाका डाले तेरी बन्सी>>
हे गाणं मी 'राधा ना दे तेरी बन्सी' असं ऐकत असे आतापर्यन्त

राधा बन्सी देत नाही म्हणून, चैन व नीन्द गेली असा काहीतरी अर्थ लावत असे Lol

वहां पर याद याद करेंगे, तुझे याद करेंगे>> हे ही असच ऐकत असे मी, देवा!

मर्द जाता नहीं, >>> मी हेच "मरभी जाता नहीं " असं ऐकत होतो.. सानुनासिक स्वरांची कृपा आणि काय Wink

>>>मर्द जाता नहीं, चैन आता नहीं
मर्द जाता नहीं, चैन आता नहीं<<

मी “दर्द” जाता नही एकायचे.
मर्ज म्हणजे काय शोधावे लागेल.

येसुदास यांनी गायिलेले हे गाणे त्याकाळात विविध भारती वर नेहमी लागायचे:

तेरी भोली मुस्कान नो ने
मुझे बाबुल बना दिया

रेडिओवर ऐकताना बाबुल म्हणतोय का पागल म्हणतोय कळतच नव्हते

हे झालय का?
magic , it's magic हे कोई मिल गया मधल गाणं,
ह्यातली पुढची इन्ग्लीश मधली ओळ मला आजपर्यन्त अशी ऐकु येत होती:
how about bath, juli.... Biggrin
खरी ओळ अशी आहे:
i've got the vibe that you need

आज्जी की पार्टी >> Lol

Rofl
कहर धागा आहे हा. २-३ दिवस पहिल्या धाग्यापासून वाचतेय आणि वेड्यासारखी हसतेय. नवरा हैराण झालाय माझा. सगळीच गाणी भारी एकदम.

अनाडी मधलं 'फुलों सा चेहरा तेरा' गाणं गाताना माझा भाऊ,... " रंग तेरा देख के रुप तेरा देख के ' उदबत्ती' हैरान है " असं गायचा.

खरंतर धाग्याच्या विषयाशी संबंधित नाही पण गाण्याशी संबंध आहे म्हणून.. बाबूजी जरा धीरे चलो बिजली खडी यहाँ बिजली खडी.. हे धूम मधलं गाणं गाजत होतं तेव्हाची गोष्ट. घरी आलेल्या पाहुण्यांसमोर मुलाने असा अर्थ सांगितला होता की "आजोबा, नीट बघून चाला, पुढे वीज पडलेली आहे..

उदबत्ती हैरान >>>> Rofl

आजोबा, नीट बघून चाला, पुढे वीज पडलेली आहे>>> Lol

Pages