लघु ललित लेख - १

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 November, 2018 - 02:12

काल पाकिट रिकामे केले..

पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता.

कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला..

गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली.
एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते.
एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला..
आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही.

एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला.. छान दाढी केलेला.. माझाच आहे हे पटकन ओळखूच आले नाही.

एक गर्लफ्रेंडने दिलेली कसलीशी सामानाची यादी निघाली.. कधी ते सामान आणल्याचे आठवत मात्र नव्हते.
एक काढ्याची रेसिपी.. कधी तो काढाही प्यायल्याचे आठवत नव्हते..

एका कप्प्याला घट्ट चिकटून बसलेली कागदाची चपटी पुडी सापडली. आत माझे रक्षण करत निपचित पडलेला अंगारा होता.

काही कागदी चिटोरयांची अवस्था ईतकी दयनीय होती, की न वाचताच फाडावेसे वाटले..
वाचल्यावरही काही विशेष निघाले नाही.

काही विजिटींग कार्डस देखील अशीच होती. समोरच्याचे मन राखायला स्विकारली होती. बघ हं जपून ठेवतोय असे त्याला दाखवायला पाकिटात ठेवली होती. जी ना कधी वापरली होती ना कधी वापरणार होतो. त्यांनाही केराची टोपली दाखवली.

सरतेशेवटी सर्वात आतल्या कप्प्यात एक कागदाचा चिटोरा सापडला..
कधीकाळी दिवाळीच्या मुहुर्तावर ईदवर सुचलेल्या आणि कागदावर उतरवलेल्या दोन ओळी सापडल्या..

पत्थर माती के है टुकडे सारे..
जो ईद ना होती,
तो कोई चाँद ना कहेलाता..

बायकांच्या पर्ससारखे पुरुषांच्या बटव्यात खजिना लपलेला नसतो... तरी शोधाशोध करता काही आठवणी ओघळतातच Happy

- ऋन्मेष

----------

ता.क. - नव्या पाकिटाला पंधरा कप्पे आहेत!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शतशब्दकथांच्या धर्तीवर लघु-ललित-लेख हा प्रकार ट्राय करतोय ..

पण ललित म्हणजे भावनांचा उद्रेक असल्याने त्याला नेमके शंभर सव्वाशे शब्दांचे बंधन घालत नाहीये.

हा प्रकार आवडला नाही तर झरूर सांगा..

जो पर्यंत सर्वांना आवडत नाही तोपर्यंत ट्राय करत राहीन Happy

आपलाच ....
ऋन्मेष Happy

शतशब्दकथांच्या धर्तीवर लघु-ललित-लेख हा प्रकार ट्राय करतोय ..

पण ललित म्हणजे भावनांचा उद्रेक असल्याने त्याला नेमके शंभर सव्वाशे शब्दांचे बंधन घालत नाहीये.

हा प्रकार आवडला नाही तर झरूर सांगा..

जो पर्यंत सर्वांना आवडत नाही तोपर्यंत ट्राय करत राहीन Happy

आपलाच ....
ऋन्मेष Happy

छान आहे. जमलंय.
मला हे आधी कुठेतरी वाचल्यासारखं वाटलं. खासकरुन त्या दोन ओळी.

हा लघुललित प्रकार फार आवडला आणि जमलाही आहे.
पंधरावा कप्पा- कशात काय ठेवलय याची यादी अपडेट न केलेली असणार. हीहीही.
--
पुढचा विषय कुलुप(खरे) लावता येणारी डायरी.

छान आहे लघु ललित लेख !!! लेख वाचल्या वाचल्या माझ्या पाकिटाचे खिसे मोजले. फक्त आठ होते. त्यात पत्ता लिहिलेले चिटोरे, एटीएम च्या पावत्या , इमर्जन्सी साठी ठेवलेले पाचशे रु. आणि काही सुट्टी नाणी होती. कायम ट्रेनचा प्रवास असल्यामुळे पाकीट पॅन्टच्या खिशाऐवजी बॅगेतच विराजमान असते.

मस्त
नवर्‍याचं पाकीट चेक करावं का? :विचारात पडलेली भावली: Happy Proud

मुलांच्या पाकिटाला १४ कप्पे असु शकतात,
>>>>
अजून दोनचार जणांनी (जणींनी) शंका व्यक्त केली किंवा अविश्वास दाखवला की फोटो टाकतो.. हे मला फार आवडते Wink

मुलांच्या पाकिटाला १४ कप्पे असु शकतात,
>>>>
अजून दोनचार जणांनी (जणींनी) शंका व्यक्त केली किंवा अविश्वास दाखवला की फोटो टाकतो.. हे मला फार आवडते Wink

हा प्रकार आवडला नाही तर झरूर सांगा..>>> ऋ ने लिखा है न, तो नापसंद होने का सवालच नही Happy
खूप मस्त जमलय
आणि ऋ च्या पुनरागमनास भरभरुन शुभेच्छा !

फोटो टाकतो.>> नका टाकु फोटो ऋ,
मला घरी गेल्यावर मोजायचे आहेत पाकीटाचे कप्पे Proud

बादवे, ऋ, तुमचे प्रतिसाद २ दा का येत आहेत ?

बादवे, ऋ, तुमचे प्रतिसाद २ दा का येत आहेत ? >> एक प्रतिसाद ऋ चा, एक प्रतिसाद भभा चा (एक घास चिऊ चा च्या चालीवर वाचावे) Happy
अजून दोनचार जणांनी (जणींनी) शंका व्यक्त केली किंवा अविश्वास दाखवला की फोटो टाकतो.. हे मला फार आवडते >>> त्या पेक्षा तो तुझा दाढी केलेला , चुरगाळलेला फोटोच टाक ! Wink

हा लेख वाचून माझ्या पाकिटाचे कप्पे (पहिल्यांदा मोजले).
१५ आहेत. त्यातले ७ वापरात आहेत + आठव्या कप्प्यात स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड, आणि सेल फोन हरवला/खराब झाला तर म्हणून काही फोन नंबर्स लिहून ठेवलेला कागद आहे. (स्वतःचा आणि बायकोचा मोबाईल नं. व घरचा लँड लाईन नं. सोडून इतर कुठलेही फोन नं पाठ नाहीत. म्हणून ही खबरदारी).

तुमचे प्रतिसाद २ दा का येत आहेत ?
>>>
गेले काही महिने माझ्या प्रतिसादांची संख्या २ टक्के झाल्याने माबोची एखादी स्वयंचलित प्रणाली ही तूट भरून काढत असावी.

चला १४-१५ कप्प्यांचे एक कन्फ्रर्मेशन आले .. फोटो टंकायचा त्रास वाचला.
पण पुरुषी बटव्याला एवढे कप्पे खरेच गरजेचे असतात का हा सँशोधनाचा भाग होईल.

मला आठवतेय की कॉलेजला असताना आमच्याईथे काही असे नग होते जे मुद्दाम पाकिटात भरमसाठ ऐवज भरून ते फुगवायचे. जेणेकरून ते पाकिट मागच्या खिशात खोचता त्या भागाला उभारी येईन. जे त्यांच्यामते पुरुषी सौंदर्याचे लक्षण होते. कोणाचे काय तर कोणाचे.. Happy

हे थोपु काय असते?
थो - थोराड थोतांड थोडं थोडकं
पु - पुष्प पुल्लिंग पुलाव पुजारा ..

पण यातून काही समरुपक कॉम्बिनेशन नाही बनत..

नवऱ्याचे पाकीट आणि फोन कधीच तपासू नका, उगाच कोतबो मध्ये एक धागा वाढायचा.
>>>

च्रप्स,
माझा माबोवरचा पहिलाच धागा होता - गर्लफ्रेंडला फोन चेक करायची परवानगी द्यावी का?
त्याला वाचा फोडायलाच मी सर्वप्रथम हातात कळफलक बडवायला घेतला.
जर तिने तसे केले नसते तर कदाचित मी माबोवर कधीच काहीच लिहीलेच नसते.

सुंदर लेख अगदी प्रत्येकाला रिलेट व्हावा....
माझ्या बाबतीत एक गोष्ट होते ... मधे कधीतरी साफसफाई घेतो आणि कधीच न लागलेल्या वस्तू पुन्हा परत लागतील म्हणून ठेवून देतो. त्यांचा शेवट कधीही हात न लागण्यात होतो.

बायकांच्या पर्ससारखे पुरुषांच्या बटव्यात खजिना लपलेला नसतो... तरी शोधाशोध करता काही आठवणी ओघळतातच Happy
>>
वाह वाह. काय पण वाक्य आहे. लिहून ठेवतो.
वेलकम बॅक ऋ.
वाक्याच्या पूर्वार्धात दारूगोळा ठासून भरला आहे. Rofl दिवाळीची आतषबाजी नक्की होणार यावर.

रच्याकने पाकिट रिकामे केले ? का दिवाळी ने झालं? Happy
का नवीन पाकिट अॅमेझोन बंपर सेल मधून गफ्रे ने दिवाळी गिफ्ट दिले.

(ताजे) ता.क.: ऋ भाऊंचा मुखडा आम्ही पाहीला नाहीये, निदान त्यांच्या पाकिटाचा फोटो बघून दुधा ऐवजी ताक पिऊया.
कराल ना एवढे आपल्या माबो प्रेमाखातर. Lol झिरो शप्पथ

पत्थर माती के है टुकडे सारे..
जो ईद ना होती,
तो कोई चाँद ना कहेलाता..
>>>>>> वेद लिहिणारे ऋषी पण निसर्गापुढे नतमस्तक होतात. नानू सरंजामेची हिमालयाची उशी आठवली.

थोपु = थोबाड पुस्तक = facebook.
इतर कुठले शब्द वापरण्या ऐवजी थोबाड शब्द वापरल्याने facebook या प्रकारा संबधी शब्दकर्त्याच्या भावनांचा अंदाज घेता येतो.

Pages