काल पाकिट रिकामे केले..
पाकिटाला टोटल चौदा कप्पे होते. कित्येक रिकामे. तर कित्येकात ढुंकूनही न पाहिल्याने काही ऐवज पडला होता.
कार्ड पैसे ओळखपत्रे अश्या महत्वाच्या वस्तू पहिले बाजूला काढून घेतल्यावर एकेक कप्पा चेक करायला घेतला..
गेल्या पाचसहा महिन्यांची मेडीकल बिले सापडली.
एक जुनी बूटाची पावती आढळली.. जिचे बूट कधीच वारले होते.
एक रिटर्न तिकीट जी दुसरया दिवशी वापरता येते म्हणून जपून ठेवली होती. आज वर्ष झाले होते त्या प्रवासाला..
आतल्या कप्प्यातून एक एटीएममधून पैसे काढल्याची पावती निघाली.. ती कोणत्या अंधश्रद्धेने जपून ठेवलेली याची कल्पना नाही.
एक चुरगळलेला पासपोर्ट साईज फोटो सापडला.. छान दाढी केलेला.. माझाच आहे हे पटकन ओळखूच आले नाही.
एक गर्लफ्रेंडने दिलेली कसलीशी सामानाची यादी निघाली.. कधी ते सामान आणल्याचे आठवत मात्र नव्हते.
एक काढ्याची रेसिपी.. कधी तो काढाही प्यायल्याचे आठवत नव्हते..
एका कप्प्याला घट्ट चिकटून बसलेली कागदाची चपटी पुडी सापडली. आत माझे रक्षण करत निपचित पडलेला अंगारा होता.
काही कागदी चिटोरयांची अवस्था ईतकी दयनीय होती, की न वाचताच फाडावेसे वाटले..
वाचल्यावरही काही विशेष निघाले नाही.
काही विजिटींग कार्डस देखील अशीच होती. समोरच्याचे मन राखायला स्विकारली होती. बघ हं जपून ठेवतोय असे त्याला दाखवायला पाकिटात ठेवली होती. जी ना कधी वापरली होती ना कधी वापरणार होतो. त्यांनाही केराची टोपली दाखवली.
सरतेशेवटी सर्वात आतल्या कप्प्यात एक कागदाचा चिटोरा सापडला..
कधीकाळी दिवाळीच्या मुहुर्तावर ईदवर सुचलेल्या आणि कागदावर उतरवलेल्या दोन ओळी सापडल्या..
पत्थर माती के है टुकडे सारे..
जो ईद ना होती,
तो कोई चाँद ना कहेलाता..
बायकांच्या पर्ससारखे पुरुषांच्या बटव्यात खजिना लपलेला नसतो... तरी शोधाशोध करता काही आठवणी ओघळतातच
- ऋन्मेष
----------
ता.क. - नव्या पाकिटाला पंधरा कप्पे आहेत!
शतशब्दकथांच्या धर्तीवर लघु
शतशब्दकथांच्या धर्तीवर लघु-ललित-लेख हा प्रकार ट्राय करतोय ..
पण ललित म्हणजे भावनांचा उद्रेक असल्याने त्याला नेमके शंभर सव्वाशे शब्दांचे बंधन घालत नाहीये.
हा प्रकार आवडला नाही तर झरूर सांगा..
जो पर्यंत सर्वांना आवडत नाही तोपर्यंत ट्राय करत राहीन
आपलाच ....
ऋन्मेष
शतशब्दकथांच्या धर्तीवर लघु
शतशब्दकथांच्या धर्तीवर लघु-ललित-लेख हा प्रकार ट्राय करतोय ..
पण ललित म्हणजे भावनांचा उद्रेक असल्याने त्याला नेमके शंभर सव्वाशे शब्दांचे बंधन घालत नाहीये.
हा प्रकार आवडला नाही तर झरूर सांगा..
जो पर्यंत सर्वांना आवडत नाही तोपर्यंत ट्राय करत राहीन
आपलाच ....
ऋन्मेष
छान आहे. जमलंय.
छान आहे. जमलंय.
मला हे आधी कुठेतरी वाचल्यासारखं वाटलं. खासकरुन त्या दोन ओळी.
हा लघुललित प्रकार फार आवडला
हा लघुललित प्रकार फार आवडला आणि जमलाही आहे.
पंधरावा कप्पा- कशात काय ठेवलय याची यादी अपडेट न केलेली असणार. हीहीही.
--
पुढचा विषय कुलुप(खरे) लावता येणारी डायरी.
खासकरुन त्या दोन ओळी .
खासकरुन त्या दोन ओळी .
>>>
भन्नाट भास्करच्या प्रोफाईलखाली आहेत
हो का
हो का
छान आहे लघु ललित लेख !!! लेख
छान आहे लघु ललित लेख !!! लेख वाचल्या वाचल्या माझ्या पाकिटाचे खिसे मोजले. फक्त आठ होते. त्यात पत्ता लिहिलेले चिटोरे, एटीएम च्या पावत्या , इमर्जन्सी साठी ठेवलेले पाचशे रु. आणि काही सुट्टी नाणी होती. कायम ट्रेनचा प्रवास असल्यामुळे पाकीट पॅन्टच्या खिशाऐवजी बॅगेतच विराजमान असते.
मस्त
मस्त
नवर्याचं पाकीट चेक करावं का? :विचारात पडलेली भावली:
सावधान! पुढे धोका आहे (असु
सावधान! पुढे धोका आहे (असु शकतो)
नवर्याचं पाकीट चेक करावं का?
नवर्याचं पाकीट चेक करावं का?>>>> मुलांच्या पाकिटाला १४ कप्पे असु शकतात, हे आजच सम्जतय
सस्मित
मुलांच्या पाकिटाला १४ कप्पे
मुलांच्या पाकिटाला १४ कप्पे असु शकतात,
>>>>
अजून दोनचार जणांनी (जणींनी) शंका व्यक्त केली किंवा अविश्वास दाखवला की फोटो टाकतो.. हे मला फार आवडते
मुलांच्या पाकिटाला १४ कप्पे
मुलांच्या पाकिटाला १४ कप्पे असु शकतात,
>>>>
अजून दोनचार जणांनी (जणींनी) शंका व्यक्त केली किंवा अविश्वास दाखवला की फोटो टाकतो.. हे मला फार आवडते
हे मला फार आवडते >>>>
हे मला फार आवडते >>>>
हा प्रकार आवडला नाही तर >>> ऋ
हा प्रकार आवडला नाही तर झरूर सांगा..>>> ऋ ने लिखा है न, तो नापसंद होने का सवालच नही
खूप मस्त जमलय
आणि ऋ च्या पुनरागमनास भरभरुन शुभेच्छा !
फोटो टाकतो.>> नका टाकु फोटो ऋ
फोटो टाकतो.>> नका टाकु फोटो ऋ,
मला घरी गेल्यावर मोजायचे आहेत पाकीटाचे कप्पे
बादवे, ऋ, तुमचे प्रतिसाद २ दा का येत आहेत ?
मस्त लिहीलय.
मस्त लिहीलय.
बादवे, ऋ, तुमचे प्रतिसाद २ दा
बादवे, ऋ, तुमचे प्रतिसाद २ दा का येत आहेत ? >> एक प्रतिसाद ऋ चा, एक प्रतिसाद भभा चा (एक घास चिऊ चा च्या चालीवर वाचावे)
अजून दोनचार जणांनी (जणींनी) शंका व्यक्त केली किंवा अविश्वास दाखवला की फोटो टाकतो.. हे मला फार आवडते >>> त्या पेक्षा तो तुझा दाढी केलेला , चुरगाळलेला फोटोच टाक !
हा लेख वाचून माझ्या पाकिटाचे
हा लेख वाचून माझ्या पाकिटाचे कप्पे (पहिल्यांदा मोजले).
१५ आहेत. त्यातले ७ वापरात आहेत + आठव्या कप्प्यात स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड, आणि सेल फोन हरवला/खराब झाला तर म्हणून काही फोन नंबर्स लिहून ठेवलेला कागद आहे. (स्वतःचा आणि बायकोचा मोबाईल नं. व घरचा लँड लाईन नं. सोडून इतर कुठलेही फोन नं पाठ नाहीत. म्हणून ही खबरदारी).
तुमचे प्रतिसाद २ दा का येत
तुमचे प्रतिसाद २ दा का येत आहेत ?
>>>
गेले काही महिने माझ्या प्रतिसादांची संख्या २ टक्के झाल्याने माबोची एखादी स्वयंचलित प्रणाली ही तूट भरून काढत असावी.
चला १४-१५ कप्प्यांचे एक
चला १४-१५ कप्प्यांचे एक कन्फ्रर्मेशन आले .. फोटो टंकायचा त्रास वाचला.
पण पुरुषी बटव्याला एवढे कप्पे खरेच गरजेचे असतात का हा सँशोधनाचा भाग होईल.
मला आठवतेय की कॉलेजला असताना आमच्याईथे काही असे नग होते जे मुद्दाम पाकिटात भरमसाठ ऐवज भरून ते फुगवायचे. जेणेकरून ते पाकिट मागच्या खिशात खोचता त्या भागाला उभारी येईन. जे त्यांच्यामते पुरुषी सौंदर्याचे लक्षण होते. कोणाचे काय तर कोणाचे..
मस्त आहे लेख.
मस्त आहे लेख.
स्मिते, थोपु वर वाचल्या असतील
स्मिते, थोपु वर वाचल्या असतील
नवऱ्याचे पाकीट आणि फोन कधीच
नवऱ्याचे पाकीट आणि फोन कधीच तपासू नका, उगाच कोतबो मध्ये एक धागा वाढायचा.
हे थोपु काय असते?
हे थोपु काय असते?
थो - थोराड थोतांड थोडं थोडकं
पु - पुष्प पुल्लिंग पुलाव पुजारा ..
पण यातून काही समरुपक कॉम्बिनेशन नाही बनत..
नवऱ्याचे पाकीट आणि फोन कधीच
नवऱ्याचे पाकीट आणि फोन कधीच तपासू नका, उगाच कोतबो मध्ये एक धागा वाढायचा.
>>>
च्रप्स,
माझा माबोवरचा पहिलाच धागा होता - गर्लफ्रेंडला फोन चेक करायची परवानगी द्यावी का?
त्याला वाचा फोडायलाच मी सर्वप्रथम हातात कळफलक बडवायला घेतला.
जर तिने तसे केले नसते तर कदाचित मी माबोवर कधीच काहीच लिहीलेच नसते.
सुंदर लेख अगदी प्रत्येकाला
सुंदर लेख अगदी प्रत्येकाला रिलेट व्हावा....
माझ्या बाबतीत एक गोष्ट होते ... मधे कधीतरी साफसफाई घेतो आणि कधीच न लागलेल्या वस्तू पुन्हा परत लागतील म्हणून ठेवून देतो. त्यांचा शेवट कधीही हात न लागण्यात होतो.
बायकांच्या पर्ससारखे
बायकांच्या पर्ससारखे पुरुषांच्या बटव्यात खजिना लपलेला नसतो... तरी शोधाशोध करता काही आठवणी ओघळतातच Happy
>>
वाह वाह. काय पण वाक्य आहे. लिहून ठेवतो.
वेलकम बॅक ऋ.
वाक्याच्या पूर्वार्धात दारूगोळा ठासून भरला आहे. दिवाळीची आतषबाजी नक्की होणार यावर.
रच्याकने पाकिट रिकामे केले ? का दिवाळी ने झालं?
का नवीन पाकिट अॅमेझोन बंपर सेल मधून गफ्रे ने दिवाळी गिफ्ट दिले.
(ताजे) ता.क.: ऋ भाऊंचा मुखडा
(ताजे) ता.क.: ऋ भाऊंचा मुखडा आम्ही पाहीला नाहीये, निदान त्यांच्या पाकिटाचा फोटो बघून दुधा ऐवजी ताक पिऊया.
कराल ना एवढे आपल्या माबो प्रेमाखातर. झिरो शप्पथ
पत्थर माती के है टुकडे सारे..
पत्थर माती के है टुकडे सारे..
जो ईद ना होती,
तो कोई चाँद ना कहेलाता..
>>>>>> वेद लिहिणारे ऋषी पण निसर्गापुढे नतमस्तक होतात. नानू सरंजामेची हिमालयाची उशी आठवली.
थोपु = थोबाड पुस्तक =
थोपु = थोबाड पुस्तक = facebook.
इतर कुठले शब्द वापरण्या ऐवजी थोबाड शब्द वापरल्याने facebook या प्रकारा संबधी शब्दकर्त्याच्या भावनांचा अंदाज घेता येतो.
Pages