Home Loan Pay karave ka?

Submitted by rajyog on 6 November, 2018 - 05:12

Maze 12.0 L home loan baki aahe aani age aahe 37 years.

Tar home loan fedun tya varcha interest vachvava ka? ..ki hi amount Debt Fund kinva FD maddhe guntvawi?

Loan period ajun 10 years baki aahe. jankarani margdarshan karave. Dhanywad.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होम लोन च्या हप्त्यात इंटरेस्ट आणि प्रिंसिपल अमाउंट आपण भरतो.

यावर आपल्याला आयकारात खलील प्रमाणे सवलत मिळते.

१. त्यातील इंटरेस्ट हा सेक्शन २४ नुसार आपल्या टोटल इन्कम मधून वजा करू शकतो, जास्तीत जास्त २ लाख रु.
२. प्रिंसिपल अमाउंट ही सेक्शन 80 C मध्ये exempted आहे. 80 C मध्ये अनेक गोष्टी exempted आहेत या सगळ्यांची मिळून मर्यादा 1.5 लाख आहे.

या वरून तुम्ही तुमच्या वर्षभरातील हप्त्यातून एकंदरीत किती आयकर बचत करता ते काढा. आणि ही बचत धरून तुम्हाला अकच्युअल काय व्याजदर पडतो होमलोणवर ते काढा.

त्याच प्रमाणे जर तुम्ही लोन पूर्ण न फेडता ती रक्कम इतरत्र गुंतवली तर त्यावर किती व्याज मिळेल व त्या व्याजावर किती आयकर भरावा लागेल यावरून खरोखर काय दराने व्याज हाती येईल ते काढा.
दोहोंची तुलना करा आणि कुठले जास्त फायद्याचे हे बघा.
FD मध्ये गुंतवणुक करणे फायद्याचे ठरणार नाही.

SIP किंवा दुसरे ऑप्शन्स बघा... मला या बद्दल जास्त माहिती नाही. कुठे गुंतवायचे याबद्दल जाणकाराचा सल्ला घ्या.

थेट हो किंवा नाही असे उत्तर देणे कठीण आहे, कारण तुमच्या हफ्त्यामधे मुद्दल किती आणि व्याज किती जाते ते माहिती नाही, हफ्ता किती ते माहीती नाही, व्याजदर माहीती नाही.
वर मानव यांनी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थीत गणित करून ठरवावे लागेल. सध्या लोनमुळे किती टॅक्स वाचवताय, लोन संपवलेत तर तुमचा टॅक्स स्लॅब बदलेल का? लोन संपवल्यावर हातात दरमहा येणार्‍या रकमेत (टॅक्स वजा करून) किती फरक पडतोय आणि त्यातली किती रक्कम तुम्ही गुंतवणार आहात, त्यावर येणारे व्याज किती असेल?

अनेक फॅक्टर्स तपासून पहा, नीट अभ्यास करून एक तक्ता बनवलात तर निर्णय घ्यायला मदत होईल. मी हे सगळे मांडून माझ्यापुरते गणित केले होते आणि मला तरी होम लोन संपवण्याचा निर्णय घेऊन फायदा झाला.

महत्वाचे: घरातली सगळी बचत मोडून लोन संपवणार असाल तर उत्तर ठाम "नाही" असे आहे. तुमच्या कडे अधिकची बचत झाली असेल तरच लोन संपवण्याचा विचार करा. संपूर्ण १२ लाख होत नसतील तर पार्शीअल रक्कम प्रीपे करा पण खीसे रीकामे करून लोन क्लीअर करू नका.

थाॅर माणूस +1
येत्या काळात होम लोन चे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. तुमचा व्याजदर फिक्स आहे का फ्लोटिंग?
येत्या काही काळात मोठा खर्च अपेक्षित आहे का? १~१.५ वर्षांत? उच्च शिक्षण, भांवडांचे लग्न ,नवीन सोईस्कर जागेवरील घर इत्यादी.
वरील मुद्दे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.

माझे पण Home_A_Loan सुरू आहे.
ऑक्टो. २०१६ मध्ये बँकेचा इंटरेस्ट रेट 9.45 % होता.
तो कमी होत होत जाने. 2018 ला 9.05% होता.
यंदा जून पासून वाढत गेला, सध्या परत 9.4% आहे.

व्याजदर आणि घरांच्या रिकाम्या असण्याचा संबंध नाहीये. गृहकर्ज हे केवळ एका प्रकारचे कर्ज आहे. अर्थव्यवस्थेत इतर ठिकाणी मागणी वाढली की बॅका तसा पुरवठा करतात आणि मागणी पुरवठ्याच्या सिध्दांता प्रमाणे गृहकर्जाचे दर वाढतील. सध्या महागाई वाढत आहे त्यामुळे व्याजदर वाढणार हे नक्की.