शेवटी, ती एक आई होती...

Submitted by Mia on 5 November, 2018 - 04:37

आजच्या जेवणाची भ्रांत होणार होती. कितितरी दिवसापासुन ती लोक, जनावरांसारखी मागे लागलेलीत. काय बिघडवलेले मी त्यांचे? हे आमचे घर होते आम्ही सगळे इथे शांततेत राहायचो, यांच्या जगापेक्षा दूर, खुप दूर. आमची शेकडो कुटुंब होती तेव्हा, अनेक जाती-जमातींची! पण राहायचो मात्र एकोप्याने.
अचानक एक दिवस ही लोकं, आमच्या घराभोवती राहायला आली. आम्ही काही म्हट्लो नाही, ती देखील आपल्यासारखीच मग काय त्रास त्यांचा!

हळुहळु त्यांची संख्या वाढु लागली, पण आम्ही मनावर नाही घेतले नाही! वाढु द्या, आपल्याला त्रास नाही देत तोवर ठीक आहे... वर्ष गेलीत, ही लोक कमी होइचना??? किडेदेखील इतक्या वेगाने वाढत नसतिल पण ही लो़कं वाढतंच चाललेली! आधी, त्यांना खायला कमी पडायला लागले मग आमच्या घरामधली फळं, भाज्या न्यायला लागलीत. तेव्हा म्हटलं, पोट तरं प्रत्येकाला आहे, जोवर त्रास नाही देत, तोवर खाउ देत बिचार्‍यांना! पण दिवसेंदिवस यांची भीड चेपली. ही लोकं आमचे घरं तोडफोड करु लागलीत. आम्हाला मारु लागलीत, आमच्या जागेवरं कब्जा करु लागलीतं! आम्ही लढलो, आम्ही मारले गेलोत. आमच्यातली कित्तीतरी शहीद झालीत, काही पळालीत , काहींना यांनी पकडले आणि डांबुन ठेवले. आमची खुलेआम कत्तल केलीत या लोकांनी. आमची कितीतरी कुटुंब नष्ट झालीत. नंतर भुकेने आम्ही पोळलो, आमचे घर उद्ध्वस्त झालेलं होतं, खाण्याची भ्रांत होत होती पण तरी आम्ही जगत होतो. असे ना तसे, आज ना उद्या आम्हाला मरण येणार हे मात्र नक्की होते, बस आधी कोण जाते हा प्रश्न होता....

आत्ता संपत आलयं सगळे, मारलं त्यांनी माझ्या लोकांना, सगे-सोयरे सारे गेलेत. आत्ता फक्त मी आणि माझे बाळं..... ... रोज काय खावं हा प्रश्न आहे, लेकरं वाढतायेत माझी, माझे पोट मेले तर चालेल पण त्यांना का मारु?? मला आज निर्णय घ्यावाच लागणार. ती माझ्या घरात येउन त्यांचे जेवण भागवतात मग मी का जाउ नये, असेही ते माझेच जुने घर आहे, ज्यावर त्यांनी कब्जा केलाये... होइल काहीतरी सोय एका वेळीचं का असेना, जेवण तर मिळेलं.... ...

मी जायचा प्रयत्न केला, पण ती लोकं नाही घेउ देत काही. उलट मला पळवुन लावण्यासाठी गोळ्य- बंदुक, सुरे, विळे घेउन धावुन आलेत. मी एकटी असायचे, ते कितीतरी. पण त्यांच्या दावणीतले काहीतरी नेल्याशिवाय मला गत्यंतर नसायचे, मुलं उपाशी होती नं माझी!

एक दिवस मी पळत होते, त्या लोकांपासुन दुर, पण अचानक असे द्रुश्य पाहिले की माझे मलाच कळेनां काय करावे...ती लोकं आपल्याच लोकांना मारत होती... कोण मारत होते, कोण मरत होते.. आपापसातच! त्यादिवशी मला कळाले, आज पर्यंत आपण जगलो हे आश्चर्यच आहे. ही लोकं स्वतःच्याच लोकांना सोडत नाहीत, तर मी तर परकी... पण मला हे माहीती नव्हते, की हि लोकं त्या खुनांचा आरोप माझ्यावर लावणार होते. आणि तेच झाले, मी फसले. मी त्यांच्या अदृश्य जाळ्यात फसले, आता फक्त त्यांच्या हातात लागण्यास देर!

मी हे होउ देणार नाही, माझ्या बाळांना मी त्या नराधमांच्या हाती नाही लागु देणार, त्यांनी आधीही खुप प्रयत्न केलेत पण मी ते फोल पाडलेत. मी लढणार...माझ्या बाळांसाठी, माझ्या स्वातंत्र्यासाठी, माझ्या घरासाठी!

" बाळानो, तुम्ही जा झोपा. मी येते जेवण घेउन. पण एक लक्षात ठेवा, कुणाच्याही डोळ्यासमोर यायचं नाही. खासकरुन माणसांच्या समजलात?"

मी लढले, खुप वेळ लढले... पण शेवटी थकले... मी एकटी आणि ते कितितरी.. पण ही लढाई बरोबरीची कधीच नसणार होती... पण शेवटी मी एक आई, लढण्याशिवाय पर्याय नव्हता माझेकडे... ...
"मी जातेय.. देवा, माझ्या बाळांना सुखरुप ठेव...पण ती माणसांच्या हाती लागणार असतील तर त्यांना माझ्याकडे आण... त्यांच्यासोबत असण्यापेक्षा कदाचित माझी लेकरं माझ्यासोबत खुष राहतील...."

प्रिय अवनीस,
भावपुर्ण श्रद्धांजली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wahh

अप्रतिम लिखाण ... खरंच किती वाईट आहे ... आधी त्यांच्या घरात घुसायचे आणि मग त्यांनाच मारायचे. तिच्या बछड्यांचा काही थांग पत्ता लागला का? ते आईविना जास्त काळ जिवंत नाही राहू शकत

अगदी खरं Mia...जे माझ्या मनात यायचे ते तुम्ही अतिशय सुंदर रीतीने शब्दात व्यक्त केलंय...खरंच माणसांनी त्यांची घरे त्यांचे जंगल त्यांचे खाणे हिरावून घेवून त्यांच्यावरच आरोप करतात की ते नरभक्षक झालेत Sad

>>मला समजली नाही नीट। पृथ्वीच्या मनातली गोष्ट आहे का?>>>>>
नाही वेडोबा.. प्राण्याच्या मनातील गोष्ट .. अवनी वाघिणीला पकडण्या ऐवजी मारूनच टाकले ना ..त्यावरून लिहिले आहे Mia यांनी

काळजाला चटका लावून गेलं हो.... खूप छान पद्धतीने मांडलंय तुम्ही. _/\_

बिचारी अवनी.. प्राण्यांची राहण्याची जागा, अन्न यासोबत जीवही हिरावून घेतात या बिचार्‍या मुक्या जीवांचा..

Saglyanna Dhanyawad.. he lihitana mi swata sudha dolyache pani pusat hote.. kadhi kadhi apan manav kiti swarthi jhale ahot ase vatate

आताच एक बातमी बघीतली. ताडोबा मध्ये माया नावाची वाघिण पिल्लांना घेऊन रस्त्याने चालली होती. त्याच मार्गावर पर्यटक दोन्ही बाजूने त्यांच्या गाड्या थांबवुन, तिची वाट अडवुन फोटो काढत बसले होते. वनखात्याचा ( अंतरराष्ट्रीय सुद्धा ) नियम आहे की जंगलात रस्त्याने जातांना कुठल्याही वन्यपशुची / प्राण्याची वाट अडवता येत नाही. इथे तर एका बाई मोठमोठ्याने आरडाओरडा करत फोटो असेच घे, जीप अशीच वळव असे सांगत होती. जर या जीपवर त्या वाघिणीने हल्ला केला असता तर उद्या हेच लोक बोंबलणार की इथले वाघ-वाघिणी लोकांवर हल्ला करतात. जर त्या वाघिणीला वाटले की हे लोक माझ्या पिल्लांवर हल्ला करु शकतात, या भीतीने तिने आधी आक्रमण केले असते तर? कारण ती त्या पर्यटकांकडे खूप गोंधळुन बघत होती, पण तिने डरकाळी फोडणे, झेप घेणे असले कुठले प्रकार केले नाही.

मग जंगलातले नियम नक्की कुणासाठी? प्राण्यांसाठी की माणसांसाठी?

ही अवनी वाघीण जिथे रहात होती तिथे चुन्याच्या खाणी होत्या, त्या बळकवण्या साठी तिला नरभक्षक सिद्ध केले गेले म्हणे. खरे खोटे अजून माहीत नाही.

Kahihi jhale tari aapan tyanchya nivaryavar, potavar pay dilela ahe... mi ek post vachle hote madhe gelya 46 varshat manvane jitka nisargacha sanhar kelay titka kahi shatkat jhalela nahie....

छान लिहीलंय.... काळजाला भिडलं !
आताच एक बातमी बघीतली. ताडोबा मध्ये माया नावाची वाघिण पिल्लांना घेऊन रस्त्याने चालली होती. त्याच मार्गावर पर्यटक दोन्ही बाजूने त्यांच्या गाड्या थांबवुन, तिची वाट अडवुन फोटो काढत बसले होते. >>>>>> हा अनुभव आम्हालाही आला.
आजकाल ताडोबाच्या जंगलात वाघ दिसणं आता दुर्मिळ गोष्ट राहिली नाही....

काळजाला चटका लावून गेलं हो.... खूप छान पद्धतीने मांडलंय तुम्ही. _/\_ >>> + १११११

सुरुवात वाचुन लक्षातच आले नाही की नक्की कशाबद्दल आहे, पण खरेच छान लिहीलेय.

त्याच मार्गावर पर्यटक दोन्ही बाजूने त्यांच्या गाड्या थांबवुन, तिची वाट अडवुन फोटो काढत बसले होते. >>>>>> मुळात हे असलं धोकादायक पर्यटन कशासाठी? तेही ओपन जीपमधे.....
दुसरं म्हणजे आपल्या इथल्या पर्यटकांना अक्कलच नसते. सिविक सेन्स तर शून्यच त्यातून प्राणी दिसले की खोड्या काढणे हे तर लहानपणापासूनचा उद्योग. मला तर वाटले त्या वाघीण आईने चांगला इंगा दाखवायला पाहिजे होता. (फार क्रूर इच्छा होतात अशा काही बातम्या बघून) :रागः