अरे संसार संसार, दोन जीवांचा मैतर..

Submitted by सयुरी on 31 October, 2018 - 11:07

'अमेय ने जोरात शीला च्या कानाखाली वाजवली. त्याचा राग शिगेला पोहोचला होता. डोक्यात राग आणि मनात द्वेष घेऊन तो तसाच बाहेर पडला. शीला मात्र त्याच्याकडे सुन्न होऊन बघतच राहिली. कारण त्या दोघांमध्ये झालेला ते पहिलाच भांडण होतं.'
वाचत वाचत माधवी ने पान बदललं. इतक्यात दाराची घंटी वाजली, तिने उठून दार उघडलं. सारंग आला असणार हे तीला माहीत होतच.
माधवी आणि सारंग यांचं नुकताच लग्न झालं होता फार फार तर सहा महिने झाले असतील लग्नाला. अरेंज होतं लग्न, तरीही त्यांच्यातला गोडवा मात्र नवीन प्रेमी युगुलांसारखाच होता. सारंग त्याच्या नवीन घेतलेल्या घरात सपत्नीक राहत होता. माधवी घरूनच काम करायची, ऑनलाईन व्यायसाय होता तिचा म्हणून पूर्ण दिवस घरीच असायची ती. सारंग मात्र पूर्ण नऊ तास ऑफिस मध्ये असायचा. खरंतर माधवी घरी एकटी कंटाळून जायची पण करणार काय?
माधवी ने दार उघडलं. सारंग समोर होता. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी छान घडल्या चा आनंद होता.माधवी ने नेहमी प्रमाणे विचारलं तर तो सांगतो म्हणून फ्रेश व्हायला गेला. माधवी ची पण कळी खुलली होती. एरवी कामावरून थकून आलेल्या सारंग ला पाहण्यापेक्षा हा हैप्पी हैप्पी सारंग तीला अजून आवडला होता. दोघेही जेवायला बसले तेव्हा माधवी ने पुन्हा विचारलं.
"एवढा खुश व्हायचा कारण काय आहे नक्की?" माधवी
"अग माझ्या कॉलेज मध्ये एक मुलगी होती. जाम कडक होती दिसायला आणि आजच ती माझ्या ऑफिस ला जॉईन झालीये. "सारंग
हे ऐकून माधवी चा चेहरा नक्की काय बोलू असं झाला. ती एकदमच गप्पा झाली. हे सारंग च्या लक्षात आलं. आपण न विचार करता काहीही बोलतो याचा त्याला पश्चात्ताप झाला. त्याने बाजूला सावरायचा प्रयत्न केला.
"अगं छान होती पण आता एवढी चांगली नाही दिसत, जाडी झालीये फारच. " सारंग
माधवी हे ऐकून खळखळून हसायला लागली. पडती बाजू सांभाळण्याचा आपल्या नवऱ्याचा प्रयत्न फुकट गेला असं म्हणून तिने सारंग चे गाल खेचले आणि आपलं ताट घेऊन ती आत गेली. दोघेहीं या गोष्टीकड़े फारसं लक्ष न देता झोपायला गेले.
दुसऱ्या दिवशी रविवारी होता म्हणून दोघेही फिरायला गेले. त्यांची नेहमीची जागा. चौपाटी. तसं तर नवीन काहीच नव्हतं त्यात पण फक्त आणि फक्त माधवी ला समुद्र आवडतो म्हणून ते तिकडे जायचे. समुद्राच्या उत्साहात खळाळणारया लाटा तर कधी शांतता गार वारा या दोन्ही गोष्टी माधवी ला फार आवडायच्या. तिचा स्वभाव हीं तसाच काहीसा होता कधी शांतता तर कधी उग्र. दोघेही चालत होते.माधवी बोलण्यात मग्न होती पण सारंग चे तिच्याकडे लक्ष नव्हते. तो कुठेतरी भलतीकडेच न्याहाळत होता. माधवीच हीं लक्ष तिकडे गेलं. तिकडे कोणीतरी मुलगी पाठमोरी उभी होती आणि सारंग तीला पाहत उभा होता. हे पाहून आधी तर माधवी ला हसायला आलं आणि चेष्टा करत ती म्हणाली.
"मी सोबत असतानाही तू इतर मुलींना इतका बिनधास्त बघतोस? हा तसा तू घाबरत तर नाहीसच मला पण आज रात्रीचं जेवण हवाय ना तुला?" हे बोलून ती हसायला लागली. तीला हसताना पाहून सारंग हीं तिच्या हसण्यात सामील झाला.
"नाही ग मधु मी तुला सांगितलं होता ना ती भारी दिसणारी मुलगी ती तिचा आहे बहुदा. "सारंग
"अरे मग ओळखतोस तीला तर चल माझीही ओळख करून दे तिच्याशी." माधवी
सारंग ने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि हो म्हणून दोघेही तिच्याकडे गेले.
"अनिता? " सारंग
"अरे! सारंग हाय!" अनिता
"हाय! तू इकडे काय करते आहेस? " सारंग
"मी? अरे मी इकडे मासे पकडण्यासाठी आलेय बघूया म्हटलं आजच्या जेवणासाठी काही मिळतंय का ते? " अनिता.
हे ऐकून सारंग आणि माधवी हसायला लागले आणि अनिता हीं गोड हसली. सारंग ने दोघींची ओळख करून दिली. माधवी ला अनिता आवडली. त्यांनी थोडा वेळ एकत्र घालवलेला आणि आपल्या आपल्या घरी निघून आले.
"छान आहे रे अनिता" माधवी
"हो तशी ती बोलकी आहेच पण आज अशी एकटीच का फिरत होती काय माहित.कारण बोलल्याशिवाय तीला चैन पडत नाही, कोणीतरी सतत लागतं तीला बोलायला." सारंग
"हम्म! बराच आठवतंय साहेबाना तसं" माधवी
सारंग हसला आणि पुन्हा एकदा न विचार करता बोलून गेला.
"याच तर स्वभावावर फिदा होतो आम्ही" सारंग
"अच्छा! फिदा होतास तर?" माधवी त्याला चिडवण्याच्या स्वरात म्हणाली.
"हो हो बस आता माझी शाळा.उद्या परत सकाळी लवकर उठायचंय .तिच ट्रेन तिच गर्दी तोच बॉस आणि तेच काम, रिफ्रेशमेन्ट म्हणून नाही आयुष्यात ." सारंग
"असं कसं अरे अनिता आहे ना" माधवी
"मधु काय तूझी सारखं अनिता अनिता चालू आहे?" सारंग चिडून म्हणाला आणि बेडरूम मध्ये निघून गेला. अचानक चिड़लेल्या सारंग ला पाहून ती थोडी बिथरलीच, इतक्या चांगल्या मूड मध्ये असणारा माझा नवरा अचानक दुसऱ्या मुलीचं नाव घेताच कसा चिडला याचा अर्थात लावायचा निष्पाप प्रयत्न ती करू लागली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरेरे ही कथा क्रमश: आहे , मग हेडींग मधे लिहायचे न तसे म्हणजे , भाग पहिला वगैरे.

मी क्रमश: कथा वाचत नाही, ह्या कथेत न हेडींगमध्ये काही लिहीलेय न खाली क्रमश: , म्हणुन वाचली तर.....